IIMची मुलाखत उत्तीर्ण होण्यासाठी या विद्यार्थ्याला केली हॅरी पॉटरने मदत!! बघा काय आहे ही जादू
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
लहानपण देगा देवा असं का म्हणतात? त्यासारखी मजा कधीच परत मिळत नाही. लाडकोड, मायेची गोधडी हे सारं फक्त बालपणातच असतं.
आजी आजोबांनी सांगितलेल्या राजा राणीच्या, चिऊकाऊच्या,पऱ्यांच्या, प्राणी पक्षांच्या, देव दानवांच्या गोष्टी ऐकत ऐकत एक पिढी लहानाची मोठी झाली.
रात्री झोपताना आजी बाळाच्या अंगावर मऊसूत पांघरूण घाली अन् मायेचा उबदार हात अंगावर फिरवीत बाळांना काल्पनिक विश्वात हळुवार घेऊन जाई.

आठवतंय का हे सारं? रामाच्या, कृष्णाच्या गोष्टी आजी सांगायची. त्यात राक्षस होते, हिमगौरी आणि सात बुटके होते. झोपलेली राजकन्या होती. अंगाई गीते होती. शिवाजी महाराज होते.
या साऱ्या गोष्टी ऐकत ऐकत बालपण खूप समृद्ध झालं. आजी, आजोबा, आत्या,काका, भावंडांचा खेलखाना यात ही पिढी किती छान आयुष्य जगली.
आता कुटुंब लहान, घर लहान. आई बाबा, एखादेच मूल. बरा पैसा त्यामुळे मुलांची आवडनिवड, हौस पुरवली जाऊ लागली. पण मायेची भूक,अज्ञाताचं अद्भूत जग हे काही मुलांना मिळेनासे झाले.
मग पालकही सरसावले. त्यांनी मुलांना देशी विदेशी पुस्तके आणून दिली. काॅमिक्सनी भारतात प्रवेश केला. फँटम आला..चाचा चौधरी आले..ही मॅन होता..त्यातून गोष्टी सांगण्यास सुरुवात केली.
त्यात काल्पनिक गोष्टी, खगोलीय सत्य, विज्ञानाधिष्ठीत गोष्टी अशा अनेक बाबी सापडल्या व तो खजिना ते मुलांसमोर रिता करू लागले. स्पायडरमॅन बॅटमॅन, सिंड्रेला, टेल ऑफ टू सिटीज, छोट्या छोट्या बोधकथा सामील होत्या.

कार्टूननं मुलांचं जग व्यापलं. पोरं सतत टिव्हीवर कार्टून्स पहात रहायची. पुस्तकं मोडीतच निघाली होती. वाचन जवळपास बंद झालं होतं.
आणि अचानकपणे हॅरी पाॅटर आला!!! अगदी नजीकच्या काळातील पुस्तक मालिका म्हणजे हॅरी पॉटर!!! हॅरी पॉटरचं गारुडच अवघ्या मुलांवर झालं.
जे.के. रोलिंग ही हॅरी पॉटरची लेखिका. तिला या पुस्तकानं जगभर ओळख मिळवून दिली. या पुस्तकाच्या ८ भागांनी थोरामोठ्यांना मोहून, भारावून टाकले.
अगदी कोणालाही विचारा,”तुम्ही हे पुस्तक वाचले का?” तर उत्तर “हो ” असेच येईल. इतकी प्रसिद्धी या पुस्तकाला मिळाली.
हरी पॉटरची पुस्तकं वाचता वाचता आताची पिढी लहानाची मोठी झाली. त्यातील जादुई दुनिया, काल्पनिक विश्व , त्याचा जादूचा झाडू हे चमत्कारिक म्हणायला हवे.
ही पिढी पुस्तके वाचत नाही हा समज या पुस्तकानं मोडीत काढण्याचा विक्रमच केला. मुलांना वाचताना मजा पण नक्कीच आली.
बी स्कूल म्हणजे बिझनेस अॅडमिनीस्ट्रेशन शिकवणाऱ्या प्रथितयश संस्थेत निवड होण्यासाठी एका काॅलेजच्या तरुणाला हॅरी पॉटर या पुस्तकानं मदत केली आहे. आश्चर्य वाटलं ना? पण हे सत्य आहे.
आय आय एमला प्रवेश मिळवणं हे अनेकांचं स्वप्न असतं. प्रचंड तयारी करुन ते तिथंवर पोहोचतात. आयआयटीच्या एका टप्प्यातून पार झालं की पुढं आय.आय.एम खुणावत असतं.
बरं आय आय एम मध्ये प्रवेश मिळणं इतकं सहज आहे का? नाही!!! पण एका युवकाला इथं प्रवेश मिळताना वाचन कसं मदतीला आलं …याची ही कथा!!!

रोहन जैन हा युवक कानपूर येथे आय आय टी चे शिक्षण घेऊन उत्तीर्ण झाला. पुढे त्याला आय आय एम ची पदवी प्राप्त करायची होती.
इथं प्रवेश मिळणं सोपं नाही. विविध फेऱ्या पार कराव्या लागतात. लेखी परीक्षा मग मुलाखती.. रोहनच्या त्यासाठी मुलाखती चालू होत्या.आय आय एम अहमदाबाद,आय आय एम बंगलोर,आय आय एम कलकत्ता अशा ठिकाणी त्याला मुलाखती साठी बोलावले होते.
आय आय एम अहमदाबादला मुलाखतीसाठी गेला असताना मुलाखतकार त्याला प्रश्न विचारीत होते. मुलाखत घेणारे पण हुशारातील हुशार. देणारेही बुद्धिमान!!!
पण कधी कधी तो सूर लागत नाही, बोलणं खुंटतं किंवा मुलाखत रटाळ नीरस होते. इथंही तसंच झालं होतं. हवी तशी ती मुलाखत रंगत नव्हती.
शेवटी रोहनला त्याच्या आवडत्या पुस्तकावर प्रश्न विचारला गेला अन् रोहनला उत्साह आला. आपले आवडते पुस्तक हॅरी पॉटर आहे असे त्याने सांगितले. आपण ते सात वेळा वाचले आहे अन् त्यातील वाक्येच्या वाक्ये तोंडपाठ आहेत असेही त्याने म्हटले.

आपण आपल्या शिक्षणासाठी त्याचा कसा उपयोग करू शकतो यावर तो १०मिनिटे बोलला. अन् काय आश्चर्य!हरी पॉटरची जादूची कांडी फिरली व रोहनची आय आय एम अहमदाबाद येथे निवड झाली.
आय आय एम बंगलोर येथे रोहन जैन मुलाखतीसाठी गेला असताना मुलाखत निराशाजनक, नकारात्मक होऊ लागली होती. यश मिळणे गरजेचे होते कारण त्यावर प्रवेश अवलंबून होता.
आवडते पुस्तक कोणते? असा प्रश्न विचारला गेला अन् अवचित तोंडातून शब्द बाहेर आले “हॅरी पॉटर”. पुन्हा त्याच पुस्तकाने जादू केली.
त्यावर २० मिनिटे भरभरून बोलणे झाले. त्याचा उपयोग आपण कसा करू शकू ह्यावर चर्चा झाली, मुलाखतकारांवर चांगली छाप पडली.
आय आय एम कलकत्ता येथेही रोहनची फसव्या, पेचपूर्ण प्रश्नांनी मुलाखत झाली. मुलाखतीला रंग चढेना. पुन्हा छंद विचारला गेला. वाचन ,असे उत्तर मिळताच पुढील प्रश्न होता, आवडते पुस्तक कोणते? अर्थातच परत एकदा हॅरी पॉटर मदतीला धावला.

त्याची काल्पनिक दुनिया,आपण किती अन् कशी पारायणे केली या व्यवस्थापन क्षेत्रात त्याचा किती उपयोग होईल ह्या गोष्टी पटवून दिल्यावर निवड
ही निश्चित होती.
इन्स्टाग्रामवर रोहीतनं आपला अनुभव शेअर केला आहे.
“हॉगवर्ट महाविद्यालयातून मला प्रवेशासाठी अजून बोलावणं आलेलं नाही, तरी माझे आयुष्य आनंदी, कल्पनारम्य, जादूई बनवण्यात हॅरीपॉटरचाच फार मोठा सहभाग आहे” असे रोहन जैननं आपल्या पोस्टमध्ये लिहीलं आहे.
कधीतरी असं वाटतं का, की लहानपणी सुपरहिरो वाटलेलं एखादं पुस्तकातील पात्र अशी मदत करेल? याचंच नाव जादू!!! ग्रंथ हेच गुरु हे परत एकदा सिद्ध झालं…
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.