Site icon InMarathi

अपघातानंतर तातडीने मदत मिळवण्याची अभिनव संकल्पना : “रक्षा Safedrive”

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

अपघातात तुम्ही अडकून पडलात आणि मदत मिळवण्यासाठी काय करावं हे तुम्हाला माहित  नाहीये – अशा वेळेस आपण काय कराल?

रस्त्यावर वर्दळ नाहीये, तुम्ही आणि तुमचा परिवार आड-रस्त्याला अडकून पडलात – अशा वेळी मदतीची अपेक्षा कुठून करणार?

 

अश्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी माणूस स्वतः ती परिस्थिती अनुभवलेला असावा लागतो.

अश्याच आणीबाणीच्या अनुभवातून गेलेल्या प्रसाद पिल्लई ह्यांनी जयंत जगदीश ह्यांच्यासोबत ‘रक्षा- safe drive’ सुविधा सुरु करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. हे दोघेही तिरुअनंतपुरमचे आहेत.

अपघात घडल्यास आपल्याला तत्काळ मदत मिळावी म्हणून आपल्याला फक्त एक छोटसं उपकरण गाडीमध्ये लावावं लागणार आहे.

Image source: Kickstarter

रक्षा चे काही features :

1. क्रॅश डिटेक्शन सेन्सर्स

गाडीचा अपघात झाल्यावर सामान्य माणसाल धक्का बसतो. तो शांत नसतो. ह्या वेळी हे feature उपयुक्त ठरते. गाडीचा अपघात detect करून आपोआप गाडीशी संपर्क प्रस्थापित होतो आणि मदत विना-विलंब मिळते. रक्षा device मध्ये एक सिम कार्ड बसवलेलं असेल जे crash झाल्याचं ओळखून स्थानिक मदत, मित्र-परिवार इ. ना अपघात घडल्याची माहिती पाठवून संपर्क साधेल.

2. GPS लोकेटर

ह्या GPS लोकेटर मुळे रक्षाच्या call center ला, अपघात कुठे घडलाय हे नेमकं कळेल. तुमच्या सगळ्या आप्तेष्टांना, परिवाराला देखील हे लोकेशन कळेल आणि आवश्यक त्या हालचाली होतील – लवकरात लवकर.

३. पॅनिक बटन

अपघातग्रस्त व्यक्तीसाठी हे बटन आहे. हे बटन दाबताच रक्षाच्या ऑफिसमध्ये अपघाताची माहिती पोहोचते आणि तुमच्याकडे मदत पोहोचवण्याचं काम तत्काळ सुरु करण्यास मदत होते.

४. चालकाचा Performance

तुम्ही नुकताच नवीन driver ठेवला असेल तर तुमच्या माघारी तो कशी गाडी चालवतोय हे आता तुम्हाला तपासता येणार आहे. शिवाय, तुम्ही स्वतःच गाडी चालवत असाल तर तुम्हाला स्वतःच्या driving चा योग्य तो feedback मिळेल. त्यानुसार तुमच्या driving कौशल्यावर सुधारणा आणि आवश्यक ती काळजी घेता येणार आहे.

 

 

हे उपकरण रिक्षा, बाईक, मोटार कार, बस, ट्रान्सपोर्ट च्या गाड्या, इ. सर्व प्रकारच्या वाहनांवर लावता येण्यासारखं आहे. लावण्याची process खूप सोपी आहे.

हे उपकरण फेब्रुवारी २०१६ मध्ये उपलब्ध झालंय. किंमत असेल १०,००० रु .

ह्यात एका वर्षाची सेवा included असेल. त्यानंतर ग्राहकांना हव्या त्या सोयींसाठी ठराविक किंमत मोजावी लागेल (साधारण महिन्याचे १००० रु).

ह्या कल्पनेला वास्तवात आणायला पिल्लई ह्यांना 146 लोकांनी KICKSTARTER वर पाठिंबा दिला आहे. संपूर्ण प्रक्रियेच्या development साठी  $ 16, 146 (साधारण १,००,००० रूपये) लागले आहेत.

सध्या “रक्षा” आपलं स्वतःचं call-centre सेट करण्यावर काम करत आहे. हे त्यांचं स्वतःचं वेगळं बेस असेल, ज्यामुळे मदत अजून लवकर मिळवून देणं शक्य होईल.

 

“रक्षा” ची संकल्पना थोडक्यात सांगणारा हा एक छोटासा व्हिडीयो.

थोडक्यात, “रक्षा” ही लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी आणखी एक उत्तम सोशल-इंटरप्राईज आहे.

फोटो स्रोत: raksha.me

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version