Site icon InMarathi

बस्स ही एकच गोष्ट करा : डिप्रेशन आसपासही फिरकणार नाही!

family featured inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लेखक : सर्वेश फडणवीस

===

समाज माध्यमांवर सतत नकारात्मक विचार ऐकून कंटाळा आला. असाच एक विषय सध्या ह्या माध्यमातून सुरू आहे सुशांतसिंग राजपूत आत्महत्या की नैराश्यातून आत्महत्या?

आपल्याकडे माध्यमांनी समाजाभिमुख राहून समाजभान बाळगावे ही आणि एवढीच अपेक्षा आहे. नुकतेच एका counsellor ह्यांच्याशी ह्या विषयावर बोलणे झाले आणि जे वास्तव समोर ते भयानक आहे.

वेळीच आवरले नाही तर पुढची परिस्थिती अधिक भीषण होईल ह्यात शंका नाहीच. सुशांतसिंग प्रकरणात सत्य समोर येईलच पण त्यामुळे आपण नैराश्य बाळगण्याचे कारणच काय हे समजलं नाही.

 

news24online.com

 

आज नातं हे इतके लवचिक झाले आहे की आपण कुठल्याही गोष्टींवरून नैराश्याने ग्रस्त होऊ तर ते चूक आहे.

पद, पैसा, प्रतिष्ठा या गोष्टी समाजात वावरताना गरजेच्या आहेतच पण त्या वैयक्तिक हितासाठी. सामाजिक स्वास्थ्याचा विचार केला तर नाती टिकवून ठेवणं महत्वाचं आहे. ही नैतिक जबाबदारी प्रत्येकाची आहे.

यात वरकरणी फायदा दिसत नसेलही पण नकळतपणे मना – मनांची वीण घट्ट होऊन समाजजीवनाला स्थिरता आणि प्रेम हे नात्यांमुळेच लाभत असते.

नाती, कुटुंब, समाज ही भारतीय समाजाची अनोखी वैशिष्ट्ये आहेत. नात्यांची वीण घट्ट असली म्हणजे कुटुंबात स्वास्थ्य आणि समाजात समृद्धी आपोआप येते. एकमेकांना समजून घेण्यात जो आनंद आहे तो तर केवळ स्वर्गीय..!

हा आनंद मिळवायचा असेल, टिकवायचा असेल तर नात्या-नात्यांमधील संवाद टिकवणे गरजेचे आहे.

पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती असल्याने घरात सदस्यसंख्या जास्त होती. वडीलधाऱ्या मंडळीचा वावर जास्त असल्याने एकप्रकारचा वचक असायचा. सुख – दु:ख वाटून घेण्याच्या सवयीचं बाळकडू मिळाल्याने समाजात मिसळणे तुलनेनं सोप्प जायचं.

त्यावेळची कुटुंबे म्हणजे प्राथमिक सामाजिक संस्थाच होती. सहज संवाद असल्याने बोलण्याचा संकोच नसल्याने नैराश्यानेग्रस्त वगरे ती मंडळी नसायची.

 

mehtvta.com

 

हल्ली ‘न्युक्लिअर’ कुटुंबांची चलती आहे. बरीचशी कुटुंब चौकोनी. चार कोन चार दिशेस आणि त्यांना जोडणारा ‘कर्ण’रुपी संवाद जवळजवळ पुसट झालेला.

प्रत्येक जण पैशाच्या मागे धावतो आहे. कुटुंबाचे पालनपोषण व त्यांच्या गरजा भागवण्यासाठी तो आवश्यकच आहेच पण त्याच्याच मागे सगळा वेळ जात असल्याने नात्यांत ओलावा निर्माण करणारा ‘संवाद’ कुठेतरी हरवला की काय असे वाटते.

चार लोक एकत्र आली तरी मोबाईल नामक एक शस्त्र सोबत आहेच त्यामुळे त्याचा फायदा काहीच नाही. म्हणून मग सल्लागार शोधून आपण आपलं मन हलकं करतोय.

सुशांतसिंग च्या केस मध्ये मीडियामध्ये जी रस्सीखेच सुरू आहे ती मुळात चुकीची आहे. आपल्याकडे न्यायसंस्था आहेत त्यांच्या तपासातून योग्य निर्णय जेव्हा यायचा तेव्हा येईलच पण इथे चढाओढीत आपल्यावर तेच ते बिंबवण्याचा प्रयत्न सुरू आहे.

कोरोना महामारीच्या अनुषंगाने आपण घरातच आहोत. शारीरिक कष्ट होत नसल्याने आपण सारखा तोच तो विचार करतोय पण ह्यातून बाहेर पडावे लागेचल.

संवादाचा अभाव हाच ज्वलंत प्रश्न आज समाजासमोर आ वासून उभा आहे. त्यामुळेच अशी विदारक चित्रे आणि कटू प्रसंग निर्माण होत आहेत. मात्र त्यावर तोडगा काढणे हेही आपल्याच हातात आहे.

मला वाटतं की यावर एकमेव तोडगा म्हणजे ‘ संवाद’. संवाद वाढवून नाती खुलवण्याचा प्रयत्न करायला हवा. माणसामाणसात प्रेम, आपुलकी, जिव्हाळा टिकवणं महत्वाचं आहे. नातं जीवाचं- जीवाशी, मित्रत्वाचं- मैत्रीशी,प्रेमाचं – प्रेमाशी जुळायला हवं.

 

knot9.com

 

यातून खूप आनंद मिळेलच आणि ह्यामुळे नैराश्यही जवळ येऊन चिकटणार नाही. प्रयत्न करून तर बघू शकतोच.

अश्या नट-नट्या आपले आदर्श असतील तर येणारा काळ कठीण आहे. सामान्य जीवन जगणाऱ्यांनी दुसऱ्यांचे आदर्श पुढे ठेवावेत; पण तसे वागणे कठीण हे ध्यानात घ्यावे. जे जे आदर्श वाटते त्यांचे जगणे, मरणे, कार्यकर्तृत्व याने आपण हरखून जातो.

सहज बघितलं तर आपल्या आसपास एखाद चांगलं काम केलेल्या माणसाची गोष्ट घडलेली असेल. संवादातून तो आदर्श सांगण्याचा प्रयत्न करूया.. बदल नक्की घडेल मुळात बदलाची सुरुवात तर होईल.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version