Site icon InMarathi

आयुष्याकडे बघायचा दृष्टिकोन बदलणारी सुधा मूर्ती ह्यांची ही पुस्तकं तुम्ही वाचायलाच हवीत!

sudha murthy featured inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आयटी इंडस्ट्री मधलं सर्वात मोठं आणि प्रतिष्ठित नाव म्हणजे इन्फोसिस. आणि ह्या आयटी कंपनीचे कर्ता धर्ता म्हणजे नारायण मूर्ती आणि त्यांची पत्नी सुधा मूर्ती!

यशाच्या शिखरावर विराजमान होऊन देखील साधेपणा कसा जपायचा हे बघायचं असेल तर ह्या दाम्पत्याकडे बघा.

नारायण मूर्ती ह्यांची कारकीर्द आणि त्यांनी घेतलेली मेहनत आपल्याला ठाऊक आहेच. पण त्यांच्या ह्या प्रवासात त्यांची पत्नी सुधा मूर्ती ह्यांनी त्यांना कशी साथ दिली हे फार कमी लोकांना ठाऊक आहे.

पुरुषाच्या खांद्याला खांदा देऊन त्यांनी ह्या क्षेत्रात केलेली प्रगती वाखाणण्याजोगीच आहे!

१९६० च्या दशकात जेंव्हा इंजिनियरिंग ह्या क्षेत्रात फक्त पुरुषांचं वर्चस्व होतं त्या क्षेत्रात सुधा मूर्ती ह्यांनी कम्प्युटर सायंटिस्ट म्हणून करियर करायचे ठरवले आणि त्यांनी ते करून दाखवलं सुद्धा.

 

 

शिक्षणाची आवड आणि मेहनत करायची तयारी ह्या दोन गोष्टींमुळे त्या भारतातल्या पहिल्या महिला इंजिनियर बनल्या. आणि सर्वात मोठ्या आयटी कंपनीचं चेअरपर्सन हे पद सुद्धा भूषवलं.

फक्त इतकंच नाही तर त्यांचं समाज कार्य सुद्धा अफाट आहे. आरोग्य, शिक्षण, महिला सशक्तीकरण, स्वच्छता, आर्ट, कल्चर अशा विविध क्षेत्रात त्यांचं योगदान अमूल्य आहे.

२००६ साली सुधा मूर्ती ह्यांना पद्मश्री देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला असून, आज देशातल्या तरूणांसाठी आणि खासकरून तरुण मुलींसाठी त्या एक रोल मॉडेल आहेत.

सुधा मूर्ती ह्यांची आणखीन एक ओळख म्हणजे त्यांचं अफाट वाचन आणि त्यांनी लिहिलेली वेगवेगळ्या विषयांवरची पुस्तके! कौटुंबिक, प्रेम, काल्पनिक, तसेच सामाजिक विषय अशा वेगवेगळ्या विषयांवर त्यांनी पुस्तकं लिहिली आहेत!

 

 

ही पुस्तकं इतकी प्रेरणा देणारी आहेत की भारताच्या बऱ्याच प्रमुख भाषांमध्ये त्यांचा अनुवाद झाला आहे. शिवाय त्यात त्यांनी वापरलेली भाषा सुद्धा खूप सोपी असल्याने देशातल्या प्रत्येकाला त्यातून काही ना काही तरी बोध मिळतोच!

आज १९ ऑगस्ट सुधाताईंचा वाढदिवस. या निमित्ताने आज आम्ही तुम्हाला त्यांनी लिहिलेल्या काही खास पुस्तकांची ओळख करून देणार आहोत जी तुम्ही वाचायलाच हवीत!

१. वाईज अँड अदरवाईज :

 

 

या पुस्तकात सुधा मूर्ती ह्यांच्या जीवनप्रवासातले ५० अविस्मरणीय किस्से आहेत. आयुष्यात त्यांना भेटलेली असामान्य कर्तुत्व असलेल्या सामान्य माणसांविषयी यातून तुम्हाला एक वेगळीच माहिती मिळते.

शिवाय सुधा मूर्ती ह्यांचा अनुभव कीती दांडगा आहेत याची प्रचिती सुद्धा येते!

 

२. ३००० टाके :

 

 

या पुस्तकात सुद्धा ११ खऱ्या गोष्टी आहेत. ज्या सुधा मूर्ती ह्यांनी इन्फोसिस मध्ये काम करताना अनुभवल्या आहेत.

कर्नाटकातल्या ३००० देवदासींचं पुनर्वसन, मुलांच्या एंजिनियरिंग कॉलेज मध्ये शिक्षण घेणाऱ्या एकट्या मुलीच्या दृष्टीने आलेले अनुभव, फिल्म इंडस्ट्री अशा वेगवेगळ्या विषयांवरच्या शॉर्ट स्टोरीज यात तुम्हाला वाचायला मिळतील!

 

३. गरुडजन्माची कथा :

 

 

ब्रह्मा विष्णु महेश ह्या तीन शक्तिशाली देवांच्या पार्श्वभूमीवर हे पुस्तक आहे. यातल्या कथेत असुर, राक्षस, राजकुमार, राजकुमारी, गर्वीष्ठ राजा अशी वेगवेगळी पात्र अनुभवायला मिळतील.

फेअरी टेल सारखी कथा जरी वाटत असली तरी हे पुस्तक तुम्हाला एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जाईल!

 

४. डॉलर बहू :

 

 

पैशांमुळे माणूस एकमेकांपासून कसा दुरावतो, नात्यांमध्ये कशी कटुता येते, कुटुंब कशी तुटतात हे तुम्हाला डॉलर बहू ह्या पुस्तकाच्या कथेत अनुभवायला मिळेल.

प्रेम आणि विश्वास यांच्या जोरावरच नाती टिकतात हेच ह्या पुस्तकातून सांगायचं प्रयत्न सुधा मूर्ती ह्यांनी केला आहे!

 

५. महाश्वेता :

 

 

हे पुस्तक सुधा मूर्ती ह्यांचे सुद्धा अत्यंत आवडते पुस्तक आहे. कौटुंबिक कथानक जरी असलं तरी त्यातून बरंच शिकण्यासारखं सुद्धा आहे.

एका भयंकर आजाराने ग्रस्त आणि नावऱ्यापासून वेगळी झालेली नायिका जेंव्हा मुंबईत येते तेंव्हा तिला मिळालेल्या यशामुळे ती सन्मानाने ताठ मानेने जगायला शिकते!

 

६. आजीच्या पोतडीतल्या गोष्टी :

 

 

नावावरूनच तुम्हाला कळलं असेल की हे पुस्तक कशावर असणार आहे. हे पुस्तक आणि यातल्या कथा तुम्हाला तुमच्या बालपणात घेऊन जाईल. तुम्ही तुमच्या आजी आजोबांसोबत घालवलेला वेळ हा आयुष्यातला सगळ्यात सुंदर क्षण होता हे तुम्हाला हयातून जाणवेल.

अशा वेगवेगळ्या कथांमधून मानवी जीवन, स्वभाव, समाजव्यवस्था, कौटुंबिक मूल्य यावर प्रकाश टाकणारी सुधा मूर्ती ह्यांची ही पुस्तकं तुम्हाला वेगळाच अनुभव देतील. 

आयटी कंपनी ते भरतातील सर्वात प्रसिद्ध आणि प्रेरणादायी लेखिका असा सुधा ताईंचा प्रवास खूप काही शिकवणारा आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

Exit mobile version