' काही रस्त्यांवर पांढरी पट्टी असते तर काहींवर पिवळी, असे का ते समजून घ्या! – InMarathi

काही रस्त्यांवर पांढरी पट्टी असते तर काहींवर पिवळी, असे का ते समजून घ्या!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

गाडी चालवताना अथवा प्रवास करताना आपल्यापैकी प्रत्येकाचे रस्त्यांवरील पट्ट्यांनी लक्ष वेधून घेतले असेल. काही रस्त्यांवर तुम्हाला सरळसोट रस्त्याभर पांढरी पट्टी दिसली असेल तर काही रस्त्यांवर पिवळी पट्टी दिसली असेल.

या पट्ट्या कधी कधी तुटक तुटक देखील असतात. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की या पट्ट्या देखील एक वाहतूक नियम दर्शवतात, जो बऱ्यापैकी लोकांना अजूनही माहित नाही. चला तर आज जाणून घेऊया या पट्ट्यांमागचा अर्थ!

 

roads lines white and yellow InMarathi

सरळसोट-गडद पांढरी पट्टी

 

roads lines white InMarathi

स्रोत

या सरळसोट आणि गडद असणाऱ्या पट्ट्या दर्शवतात की चालक ज्या लेन मधून जात आहे त्याच लेन मधून त्याने गाडी पुढे न्यावी, त्याने लेन बदलून दुसऱ्या लेनमध्ये येऊ नये.

 

तुटक पांढरी पट्टी

 

roads lines white distance InMarathi

स्रोत

या तुटक पांढऱ्या पट्ट्या दर्शवतात की चालक लेन बदलून दुसऱ्या लेनमधून गाडी चालवू शकतो. पण असे करताना खबरदारी बाळगावी आणि लेन बदलताना समोरून किंवा मागून कोणतीही गाडी येत नसेल तरच लेन बदलावी.

 

सरळसोट-गडद पिवळी पट्टी

 

road line yellow InMarathi

स्रोत

या सरळसोट आणि गडद असणाऱ्या पिवळ्या पट्ट्या दर्शवतात की चालक पुढील गाड्यांना ओव्हरटेक करू शकतो. परंतु तो पिवळी पट्टी क्रॉस करू शकत नाही. पण या सरळसोट-गडद पिवळी पट्ट्यांचे नियम प्रत्येक राज्यानुसार वेगवेगळे आहेत.

तेलंगणामध्ये या पट्ट्या असे दर्शवतात की चालक पुढील गाड्यांना ओव्हरटेक करू शकत नाही.

 

दुहेरी सरळसोट-गडद पिवळी पट्टी

 

road-lines-meaning-marathipizza05

स्रोत

या दुहेरी सरळसोट आणि गडद असणाऱ्या पिवळ्या पट्ट्या दर्शवतात की या रस्त्यावर पासिंग करण्यास परवानगी नाही.

 

तुटक पिवळी पट्टी

 

road-lines-meaning-marathipizza06

स्रोत

या तुटक पिवळ्या पट्ट्या दर्शवतात की इथे पासिंग करण्यास परवानगी आहे. पण ती देखील काळजीपूर्वक!

 

सरळसोट पिवळी पट्टी आणि तुटक पिवळी पट्टी

 

roads lines yellow 1 InMarathi

स्रोत

अश्या प्रकारच्या पट्ट्या ज्या रस्त्यावर आहेत त्यावर चालक जर तुटक पिवळ्या पट्ट्यांच्या बाजूने वाहन चालवत असेल तर त्याला ओव्हरटेक करण्यास परवानगी आहे, परंतु जर तो सरळसोट पिवळी पट्टी असणाऱ्या बाजूने वाहन चालवत असेल तर त्याला ओव्हरटेक करण्यास परवानगी नाही.

आता या पट्ट्यांमधला नेमका फरक तुमच्या लक्षात आला असेलच, तर यापुढे हे नियम पाळण्याचा प्रयत्न करा आणि इतरांसोबत देखील ही माहिती जास्तीतजास्त प्रमाणात शेअर करा!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?