Site icon InMarathi

हजारो पाकिस्तान्यांना “बाप तो बाप होता है” हे ठणकावणाऱ्या मराठी मर्दाशी एक्स्क्लुजिव्ह बातचीत

prashant vengurlekar video special interview inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, माझ्या देशाचा मला प्रचंड अभिमान आहे…शाळेच्या कोणत्याही पाठ्यपुस्तकातील प्रतिज्ञेच्या या ओळी आपण सर्वांनीच वाचल्या असतील, अनेकांच्या त्या तोंडपाठही असतील. मात्र केवळ त्याचं पाठांतर न करता त्या ओळी प्रत्यक्ष काहीजण जगले याचे इतिहासात असंख्य पुरावे मिळाले.

सायमन गो बॅक, चले जाव या घोषणांनी कायमच भारत देश दुमदुमला. अर्थात अन्यायाविरुद्ध बंड पुकारण्याची प्रत्येकाची त-हा निराळी असली तरी त्यात एक समाध धागा होता, तो म्हणजे `माझा भारत देश’.

“सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?” असा सवाल उपस्थित करताना लोकमान्य टिळकांनी ना कशाची तमा बाळगली ना कशाची भिती.

फक्त माझ्या देशावर अत्याचार करणा-यांना जाब विचारला जावा ही त्यांची एकमेव भावना आज कित्येक वर्षांनंतरही धगधगतीय.

 

 

त्यानंतर लाखोंच्या बलिदानाने स्वातंत्र्य मिळाले खरे मात्र खरंच आज आपण स्वतंत्र आहोत का? हा प्रश्न अनेक नव्या प्रश्नांना जन्म देतो.

स्वातंत्र्यसंग्रामाला पुर्णविराम मिळाल्यानंतर आज ७३ वर्षांनंतरही एका भारतीयाला आपल्या देशासाठी रस्त्यावर उतरावं लागतं ही बाब वरकरणी कुणाला खरी वाटली नसती मात्र गेल्या दोन दिवसांपासून सोशल मिडीयावर धुमाकुळ घालणा-या एका व्हिडिओने परदेशातील हे भयावह वास्तव समोर आणलं आहे.

१५ ऑगस्टला आपण देशाचं स्वातंत्र्य उत्साहात आणि अभिमानाने साजरा होत असताना जर्मनीतील फ्रैंकफर्ट मात्र दरवर्षी भारताविरोधी आंदोलनाला चेव चढतो. तेथिल बहुसंख्य पाकिस्तानी नागरिक या आंदोलनात सहभागी होतात आणि भारताविरोधीचा नारा एकमुखाने दिला जातो.

त्यांच्यापासून हजारो किलोमीटर अंतरावर आपण रहात असल्याने आपल्याला त्याची झळ बसत नसली तरी तेथे राहणा-या भारतीयांची काय अवस्था होत असले याचा जरा विचार करा.

कामानिमित्त मातृभुमीपासून दूर असल्याची खंत आणि याची देही याची डोळा भारतविरोधी घोषणा ऐकणं ही शिक्षा भारतीयांना भोगावी लागते.

वर्षानुवर्ष या प्रथेत खंड पडला नसला तरी यंदाचा स्वातंत्र्यदिन मात्र एक नवा विचार घेऊन उगवला होता.

 

 

काय झालं नेमकं या दिवशी? व्हायरल झालेल्या या व्हिडिओत दिसणारी ही भारतीय व्यक्ती नेमकी कोणत्या प्रेरणेतून हे सगळं बोलतीय? तुमच्या अनेक प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात या व्हिडियोतील भारतीय प्रशांत वेंगुर्लेकर यांच्याकडून.

 

 

इनमराठीने त्यांच्याशी ही खास बातचीत केली असून त्यातून केवळ फ्रैंकफर्टच नव्हे तर संपुर्ण युरोपात पाकिस्तानी नागरिकांच्या मनमानीचे अंगावर काटा आणणारे वास्तव समोर आले आहे.

प्रश्न –  १५ ऑगस्ट या दिवशी नेमकं असं काय घडलं ज्यामुळे शेकडोंच्या जनसमुदायाला तुम्हाला एकट्याने तोंड द्यावं लागलं?

प्रशांत – मी मुळचा कुडाळ तालुक्यातला असून बालपण, शिक्षण कुलाब्यात गेल्यानं अस्सल मुंबईकर. २०११ साली कामानिमित्त जर्मनी गाठली. फ्रैंकफर्ट मध्ये नोकरीसह सारंकाही अलबेल असलं तरी पाकिस्तानी नागरिकांची मनमानी, भारताविरुद्ध सातत्याने काढले जाणारे मौर्चे या बाबी कायमच अस्वस्थ करतात.

मात्र या उपद्रवींकडे दुर्लक्ष करणं शहाणपणाचं हा विचार करत आपला सुसंस्कृतपणा माझ्यासह अनेक भारतीय जपतात.

मात्र या १५ ऑगस्ट दिवशी संयमांनी परिसीमा गाठली. त्या दिवशीही भारतीय दुतवासाच्या कार्यक्रमावरून ते घरी परतताना पुन्हा एकदा भारतविरोधी घोषणा कानांवर थडकल्या. भारतीयांच्या दुख-या नसेवर बोट ठेवत दरवर्षीप्रमाणे त्याही दिवशी पाकिस्तानी नागरिकांचा भारतविरुद्ध मोर्चा सुरुच होता.

भारतदेश, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात घोषणा दिल्या जात होत्या. मी केवळ माझ्या  मोबाईलमध्ये रॅलीचं शुटिंग करत उभा होतो, मात्र माझी ही कृती त्यांना सहन न झाल्याने त्यापैकी काहींनी त्यावर आक्षेप घेतला तर काहींच्या घोषणांना अधिकच चेव चढला.

अखेरिस मी त्या जनसमुदायासमोर जात सारे जहॉं से अच्छा या देशभक्तीपर गीताचे सुर आळवले. ज्या दिवशी माझ्या देशाने स्वातंत्र्यावर आपलं नाव कोरलं त्या दिवशी देशाचा अवमान सोसणं सहन होत नव्हतं.

ज्याप्रमाणे त्यांना रॅली काढण्याचा अधिकाप आहे त्याचप्रमाणे मलाही माझ्या देशाचं इमान जपण्याचा अधिकार आहे. मात्र त्यांना माझा हा अधिकार रुचला नाही आणि म्हणूनच त्यांनी जी धक्काबुक्की करण्यास सुरु केली ते व्हिडिओमध्ये तुम्ही सर्वांनीच पाहिले.

 

 

२. व्हिडिओ हा तीन भागांमध्ये तुटक स्वरुपात असल्याने दरम्यानच्या काळात नेमकं कायम घडलं याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले गेले, त्यातलं नेमकं वास्तव काय आहे?

माझ्या शुटिंगला आक्षेप घेतल्यानंतर त्यांनी आरेरावी करण्यास सुरवात केल्याने तो व्हिडिओ थांबबावा लागला. मात्र हा वाद तेवढ्यावर थांबला नाही.

मी महाराष्ट्रीयन असून बाळासाहेब ठाकरेंचा माझ्यावर वरदहस्त असल्याने भिती किंवा न केलेल्या चुकीची शिक्षा यांना माझ्यपाशी थारा नाही. माझ्या अंगावर धावून आलेल्या काहींना थोपविताना मी म्हटलं बाप बाप होता है… तरिही त्यांचा कांगावा सुरुच होता.

या दरम्यान मी हाती भारताचे झेंडे घेऊन शांतपणे सारे जहां से अच्छा हे गीत गाण्यास सुरुवात केली. त्यांनी केलेल्या अपमानाचा निषेध करण्याची ही माझी शांततापुर्ण पद्धत होती असे म्हणा ना… मात्र त्यांना हे देखील मान्य नव्हते. त्यामुळे जमावातील एका ज्येष्ठ गृहस्थाने मला त्यांच्या हातातील झेंड्याने मारण्यास सुरुवात केली.

हा प्रकार अत्यंत लज्जास्पद होता, तरिही मी संयम कायम ठेवला होता. तेवढ्यात पोलिस आले आणि त्यांनी प्रकरण शांत करण्यास सुरुवात केली.

 

३. या गोंधळातून तुमची सुटका कशी झाली? याबाबत संबंधीत जमावाला पोलिसांकडून काही शिक्षा झाली का?

वर सांगितलेला काही प्रकार दुस-या व्हिडिओत दिसून येतो. मात्र त्यानंतरही घटना दुर्दैवाने व्हिडियोमध्ये नाही. पोलिसांनी माझी बाजु घेत जमावाला ताकीद दिली, त्यामुळे मीही प्रकरण न वाढवता पोलिसांच्या आदेशाप्रमाणे निघून जाण्यासाठी वळलो, तितक्यात जमावातील एका व्यक्तीने माझ्यावर पाठीमागून हल्ला केला.

मी सावध असल्याने कोणतीही दुखापत झाली नाही. मात्र या झटापटीत माझ्या हातून झेंडा खाली पडला. माझा फोन हिसकावून घेत त्यातील व्हिडिओ डिलीट करण्याचा त्यांचा प्रयत्न होता.

मात्र सुदैवाने माझ्या प्रतिकारामुळे हे माझा फोन शाबुत राहिला. दरम्यान पोलिसांनी या हल्लेखोरांना ताकीद देत मलाही संरक्षण दिले. या सगळ्या प्रकारात सर्वाधिक दुर्दैवी बाब म्हणजे आपला झेंडा खाली पडला, मात्र मी तो तातडीने उचलून माझ्याजवळ संबंधित घटनेचा पुरावा म्हणून जपून ठेवला आहे.

४. काही ठराविक दिनी हा अनुभव येतो की वर्षभर असा मनस्ताप सोसावा लागतो?

१५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी या दिवशी हमखास भारतविरोधी मोर्चा काढला जातो. मात्र वर्षातील कोणत्याही दिवशी त्यांची ही मनमानी सुरु असते. ते त्यांच्या स्वातंत्र्यदिनी कोणताही कार्यक्रम न करता केवळ भारतविरोधी कारवायांमध्ये ते धन्यता मानतात.

यामध्ये पाकिस्तानी नागरिकांची संख्या सर्वाधिक असते. मात्र त्यांच्यासह खलिस्तानी नागरिकांचाही समावेश असतो. भारतीयांकडून कोणतंही वैर बाळगलं जात नसताना सातत्याने हा उपद्रव सुरुच असतो.

अर्थात याबाबत भारतीयांनी अॉम्बसीशी चर्चा केली आहे, अर्थात या वरकरणी धमक्यांना भारतीय घाबरत नाहीत हे खरं असलं तरी आपल्या मातृभुमीचा अवमान ऐकून घेणं हे अत्यंत कठीण आहे.

एकंदरित संपुर्ण युरोपात अशा प्रकारच्या घटना घडतात, मात्र यांच्या उपद्रवाकडे दुर्लक्ष करणं योग्य असं म्हणून वाद न वाढवता त्याकडे दुर्लक्ष केलं जातं.

५. घडलेल्या घटनेनंतर धमक्या किंवा अन्य कोणत्याही बाबींची भिती जाणवते का? 

झालेल्या प्रकरणात मी एकटाच खुल्या माथ्याने सहभागी होतो त्यामुळे त्या सगळ्याच समुहाने माझा चेहरा स्पष्टपणे पाहिल्याची भिती कुटुंबाला वाटते, मात्र मला यापैकी कशाचीही भिती नाही.

मी काहीही गैर केलेलं नाही, त्यांना रॅली काढून माझ्या देशाचा अपमान करण्याचा त्यांना अधिकार असेल तर मलाही माझ्या देशाच्या प्रतिमेचं रक्षण करण्याचा अधिकार आहे. अर्थात झालेला प्रकार मी काही निकटवर्तीयांना पाठवला आणि त्याव्दारे तो आता जगभर पसरला आहे.

अर्थात मला प्रसिद्धीची हाव नाही मात्र भारतीयांना सोसावा लागणारा हा प्रकार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचत आहे, त्यावरून अनेक भारतीय एकत्र येत आहेत याचा आनंद आहे. घटनेनंतर मी अॅम्बसीसी चर्चा केली, पुराव्यासहित त्याची माहिती दिली, लोकांकडून येणारा प्रतिसाद हा देखील अत्यंत महत्वाचा ठरत असल्याने भारताविरोधात केल्या जाणा-या निरर्थक मोर्चांना यापुढे परवानगी मिळूच नये यासाठी यापुढेही कायम प्रयत्न करणार आहे.
===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version