रैनाप्रमाणेच धोनीबरोबर रिटायर झालाय हा “पाकिस्तानी” फॅन…!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
१५ ऑगस्ट ला भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी ह्याने निवृत्त होत असल्याचं जाहीर केलं आणि जगभरातले क्रिकेट फॅन्स खूप भावूक झाले. भले ते धोनी फॅन्स असो किंवा नसो.
त्याच्यापाठोपाठ भारतीय संघातला एक दमदार फील्डर आणि बॅट्समन सुरेश रैना ह्याने सुद्धा निवृत्त होत असल्याचं जाहीर केलं त्यामुळे आणखीन एक धक्का क्रिकेटफॅन्सला बसला!
खरंतर खेळातून निवृत्त होणं ही अत्यंत सहाजिक गोष्ट असते. पण इतकी वर्ष ज्या खेळाडूचा खेळ आपण एंजॉय केला तो खेळाडू आता मैदानात दिसणार नाही ही भावना काही वेगळीच आहे. समजण्या आणि समजावण्या पलिकडची आहे.
भारतात क्रिकेट म्हणजे एक धर्मच मानला जातो. आपल्याइथे सिनेमा आणि क्रिकेट ह्या २ गोष्टी प्रचंड लोकप्रिय आहेत. आणि त्यासाठी लोकं काहीही करू शकतात.
सचिन तेंडुलकर आऊट झाला की देशातले कित्येक टेलिव्हिजन सेट बंद व्हायचे. तो खेळत असताना काही लोकं तर चक्क टीव्हीची पूजा देखील करायचे. अशा अनेक गोष्टी आपण ऐकल्या असतील, अनुभवल्या असतील!
आणि भारत पाकिस्तान क्रिकेट सामना म्हंटला की त्या सामन्याकडे लोकं विश्वयुद्धासारखं बघायचे. रस्त्यावर अक्षरशः शुकशुकाट असायचा. खासकरून इंडिया जेंव्हा टार्गेट चेस करायची तेंव्हाची मजा काही औरच असायची!
कित्येक लोकं एकत्र जमुन ती मॅच दात ओठ चावत, हाताच्या मुठी आवळत दंग होऊन बघत बसायचे. ही परिस्थिति बऱ्याच जणांनी अनुभवली असेल. ही झाली देशातली परिस्थिती!
पण प्रत्यक्ष भारत – पाकिस्तान ही मॅच ज्या मैदानावर होत असे तिथला माहोल काही औरच असे. तो जोश, एकेमएकाला टक्कर देण्यासाठी सदैव तयार असलेले क्रिकेट फॅन्सनी स्टेडियम मध्ये धुमाकूळ घातल्याच सुद्धा आपण पाहिलं असेल!
खासकरून ह्या सामन्याच्या वेळेस भारत आणि पाकिस्तान ह्या २ देशांमधलं पराकोटीचं वैमनस्य आणि खेळावरची श्रद्धा ह्या दोन्ही गोष्टी एकदम बघायला मिळत असत.
पण ह्या अशा सामन्याच्या वेळीस पाकिस्तानी क्रिकेट फॅन भारताला सपोर्ट करताना किंवा भारतीय क्रिकेट फॅन पाकिस्तान ला सपोर्ट करतानाचं चित्र तुम्ही पाहिलं आहे का? पाहिलं असेलही पण खूप कमी वेळा हे चित्र पाहायला मिळतं.
कारण भारत पाकिस्तान सामना म्हणजे एक वेगळच टेंशन निर्माण करणारा सामना म्हणून प्रसिद्ध असायचा!
जसे भारतात सुद्धा पाकिस्तानी क्रिकेटर्सचे चाहते आहेत तसेच पाकिस्तानात सुद्धा भारतीय क्रिकेटर्सचे भरपूर चाहते आहेत. २ देशांमध्ये कितीही तणाव असला तरी दोन्ही देशांनी खेळाच्या माध्यमातून खिलाडू वृत्तीचं दर्शन घडवलं आहे.
आज आम्ही तुम्हाला अशाच एका पाकिस्तानी फॅनचा किस्सा सांगणार आहोत ज्याने धोनीच्या निवृत्तीनंतर एक भलताच निर्णय घेतला आहे.
कराची मध्ये जन्मलेल्या मोहम्मद बशीर बोझाई ह्यांनी धोनीच्या निवृत्तीनंतर क्रिकेट मॅच बघणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ते धोनीचे जबरदस्त फॅन असून त्याच्या निवृत्तीमुळे क्रिकेट मधून मन उडालं असल्याने त्यांनी हा निर्णय घेतला आहे.
ह्यांना शिकागो चाचा असे सुद्धा संबोधले जाते. भारत पाकिस्तानच्या प्रत्येक मॅच मध्ये हे शिकागो चाचा उपस्थित असायचेच. पण आता त्यांनी ह्या मॅचेस न बघायचा निर्णय घेतला असून ते आता रांची इथे येऊन धोनीची भेट घ्यायचे प्लॅनिंग करत आहेत.
एकदा वर्ल्ड कप सेमी फायनल चं तिकीट मिळत नसल्याने चाचा शिकागो हे निराश होते. पण धोनीने स्वतः त्यांना तिकीट मिळवून दिलं आणि तेंव्हापासून चाचा शिकागो हे धोनीचे जबरा फॅन झाले!
शिकागो इथे एक रेस्टॉरंट चालवणारे हे चाचा ह्यांना ३ वेळा हार्ट अटॅक आला असून आता देशोदेशी जाऊन मॅच बघायचं त्यांनी बंद केलं आहे. त्यांच्यासाठी आता क्रिकेट हे संपल्यातच जमा आहे!
“धोनीसाठी एक भव्य निरोप समारंभ व्हायला हवा होता, पण धोनी ह्या सगळ्यापेक्षा कित्येक पटीने मोठा आहे” असं देखील ते म्हणाले!
पुढे ते म्हणतात की “त्याच्या निवृत्ती मुळे मला वाईट वाटलं आहे पण त्याची खेळी ही सदैव माझ्या स्मरणात राहील.”
भारतात अशा वेड्या फॅन्सची कमी नाही. त्यातूनही असे क्रिकेट चे किंवा खेळाडूचे चाहते तुम्हाला प्रत्येक घरात बघायला मिळतील. सचिन तेंडुलकरचे सुधीर हे फॅनचं उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहेच.
पण केवळ एका खेळाडूने निवृत्ती घेतल्यानंतर तो खेळ बघणच बंद करायचं ठरवणारे शिकागो चाचा यांच्यासारखे फॅन निराळेच. पाकिस्तानी असून सुद्धा खेळावर आणि त्या खेळाडूवर असलेली त्यांची निष्ठा ही फार दुर्मिळ गोष्ट आहे.
हे असे फॅन्स मिळायला सुद्धा भाग्य लागतं. खरंच कमाल आहे त्या धोनीची आणि त्याच्यावर नितांत निस्वार्थ प्रेम करणाऱ्या शिकागो चाचा सारख्या करोडो फॅन्सची!
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.