Site icon InMarathi

वारंवार विचार करूनही निर्णय चुकत असतील तर नशिबाला दोष देण्यापेक्षा या सोप्या टिप्स नक्की ट्राय करा

overthinking 2 inmarathi

news18.com

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आपण दैनंदिन जीवनात नेहमीच अनेक निर्णय घेत असतो. खरं बघता निर्णय घेणं जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. निर्णय घेणं ही देखील एक कला आहे असं म्हटलं जातं, पण प्रत्येकाला हि कला अवगत असेलच याची काही शाश्वती नाही.

ही कला अवगत करणे मात्र प्रत्येकासाठी अत्यंत आवश्यक आहे. कारण आपण रोज लहान मोठे हजारो निर्णय घेतो आणि अगदी लहान निर्णय घेताना देखील आपण संभ्रमात पडतो.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

म्हणजे जर बाहेर जेवायला जायचं असेल तर कुठल्या हॉटेलमध्ये जेवायला जायचं हे देखील ठरवायला अनेक वेळी आपल्याला त्रास होतो किंवा अगदी टी शर्ट घेऊ की नको हा निर्णय देखील आपण लवकर घेऊ शकत नाही.

 

shutterstock.com

 

हे आपल्या सर्वांसोबत कधीतरी नक्की घडलं असेलच. मग अशावेळी आपली निर्णय क्षमता वाढवण्यासाठी या लेखात आम्ही तुमच्यासाठी काही सोप्या टीप्स घेऊन आलो आहोत. यांचा वापर करून तुम्ही निर्णय क्षमता विकसित करू शकतो.

आपण अनेक प्रसंगी फक्त निर्णय न घेतल्यामुळे आपल मोठं नुकसान होतं आणि नंतर भविष्यात आपण त्या प्रसंगाबद्दल पश्चात्ताप करतो, विचार करतो की निर्णय घेतला असता तर चुकला असता पण किमान प्रयत्न तरी केला असता.

अशा प्रसंगी जेव्हा तुम्हाला निर्णय घ्यायचा असेल तेव्हा खाली दिलेल्या काही गोष्टींचा विचार नक्कीच करायला हवा.

 

१. आर्थिक गोष्टींचा विचार करा :

 

livemint.com

कुठलाही निर्णय घेण्याआधी त्या निर्णयामुळे होणाऱ्या परिणामांचा विचार करा, फायदे आणि तोटे यांचा विचार करून मगच योग्य निर्णय तुम्ही घ्यायला हवा.

यातील निर्णय घेताना मुख्य बाब म्हणजे आर्थिक गोष्टींचा नक्की विचार करा म्हणजे एखादा निर्णय घेतल्यानंतर त्याचा तुम्हाला किती आर्थिक फायदा किंवा तोटा होऊ शकतो याचा चांगल्या पद्धतीने विचार करा.

असा विचार केल्यामुळे तुम्हाला निर्णय घेण्यात संभ्रम निर्माण होणार नाही आणि तुम्ही त्या प्रसंगी योग्य पद्धतीने निर्णय घेऊ शकाल.

 

२. खूप कमी पर्यायांचा विचार करा :

 

shutterstock.com

 

मित्रांनो लक्षात घ्या निर्णय घेण्याच्या आधी तुमच्याकडे अनेक प्रकारचे पर्याय उपलब्ध असतात.

या उपलब्ध असलेल्या अनेक पर्यायामुळे तुम्हाला निर्णय घेताना संभ्रम निर्माण होतो अशा वेळी शेवटचा निर्णय घ्यायच्या आधी तुम्ही तुमचे फक्त तीन चांगले पर्याय उपलब्ध ठेवा.

आणि यातूनच कुठलातरी एक निर्णय होईल असा विचार करा कमी पर्यायांचा विचार केल्यामुळे तुम्हाला योग्य निर्णय घेण्यात नक्कीच मदत होईल.

 

३. वेळेचे बंधन लक्षात घ्या :

 

yourfinancebook.com

 

आपण एखादा अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेताना अंदाजे किती वेळ घेतो याचा विचार करा.

म्हणजे जर तुमच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा निर्णय तुम्ही घेत असाल तर त्याला महत्त्व देत भरपूर वेळ देणं आवश्यक असतं.

अशाच प्रकारे निर्णयाचं महत्त्व जाणून घेऊन त्या पद्धतीने त्याला वेळ द्यावा त्यामुळे तुमची निर्णय क्षमता विकसित होण्यास नक्कीच मदत होईल.

 

४. लहान गोष्टींसाठी फार विचार करू नका :

 

savemke.com

 

जर तुम्ही मोबाईल हातात घेऊन कुठला चित्रपट बघू किंवा आज कुठल्या हॉटेलमध्ये जेवायला जायचं अशा लहान गोष्टींचा विचार करत असाल तर या लहान गोष्टींसाठी खूप विचार करून आपली विचारशक्ती खर्च करू नका.

कारण या तत्कालिक गोष्टी आहेत आणि त्याचा तुमच्या जीवनावर ती फार दूरगामी परिणाम होणार नाही. त्यामुळे उपलब्ध पर्यायांपैकी सर्वात चांगला पर्याय निवडून त्यावर अंमलबजावणी केली तर चांगले परिणाम बघायला मिळतात.

 

५. अभ्यास असणे गरजेचे :

 

gmat.economist.com

 

निर्णय घ्यायच्या आधी त्या बाबतीत आपला अभ्यास असणं ही अत्यंत गरजेची गोष्ट आहे, जर तुम्ही अत्यंत महत्त्वाच्या गोष्टीचा निर्णय घेणार असाल तर मात्र त्याला वेळ देऊन त्याचा अभ्यास केल्यानंतरच तुम्ही तुमचा निर्णय घेणं केव्हाही चांगलं.

त्यामुळे तुम्हाला भविष्यात पश्चात्ताप करण्याची वेळ नक्कीच येणार नाही.

 

६. तज्ज्ञ व्यक्तीचा सल्ला घ्या :

 

startupnation.com

 

एखादा निर्णय घेताना आपण नेहमीच अनेक व्यक्तींचा सल्ला घेऊन निर्णय घ्यायचा प्रयत्न करतो परंतु सल्ला देणारी प्रत्येकच व्यक्ती त्या विषयात तज्ञ असेल याची काहीही शाश्वती देता येत नाही.

त्यामुळेच आपण शक्यतो अनुभवी आणि अभ्यासू व्यक्तीचा सल्ला घ्यावा ज्याने करून आपला निर्णय चुकणार नाही.

म्हणजेच जर तुम्हाला कार घ्यायची असेल तर तुम्ही तुमच्या मित्राचा सल्ला घेण्या ऐवजी जवळच्या आणि विश्वासू मेकॅनिक चा सल्ला घ्यायला हवा यामुळे तुमच्याकडे चांगला पर्याय उपलब्ध होऊ शकेल.

७. समर्थपणे निर्णय घ्या :

तुम्ही कोणाचाही सल्ला घेतला तरीही तो निर्णय तुम्हालाच घ्यायचा आहे हे पक्कं लक्षात ठेवा एकदा निर्णय घेतल्यानंतर तुम्हाला त्या निर्णयाची जबाबदारी घेता यायला हवी.

तो निर्णय घेतल्यानंतर कितीही नुकसान झालं तरी आपल्याला तो निर्णय बदलणे अशक्य असल्यामुळे विचारपूर्वक आणि जबाबदारीने निर्णय घ्या.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version