आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
आज भारताचा स्वातंत्र्यदिन. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली.
यासाठी कित्येकांनी आपले संसार, घरदार पणाला लावले. “तुजसाठी मरण ते जनन, तुजविण जनन ते मरण” असं म्हणत ब्रिटिशांच्या बंधनात जखडलेल्या मातृभूमीला स्वतंत्र करण्यासाठी ते अविरत झटले.
स्वातंत्र्याचे स्वप्न साकार करण्यासाठी त्यांनी अंगावर बंदुकीच्या गोळ्या झेलल्या, तुरुंगवास भोगला. आणि अखेरीस १५ ऑगस्ट १९४७ला हे स्वप्न साकार झालं.
हा दिवस प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची बाब आहे. इतिहासात आणि देशवासियांच्या मनात या दिवसाचं अनन्यसाधारण महत्त्व आहे.
सध्या कोरोनामुळे आपण सगळेच घरी अडकून पडलो आहोत. एरवी ठिकठिकाणी होणारे ध्वजवंदन, स्पर्धा, विद्यार्थ्यांचे संचलन, सांस्कृतिक कार्यक्रम यावर्षी नसतील. टाळेबंदी शिथिल करण्यात आली असली तरीही मोजक्याच प्रमाणात हे कार्यक्रम होतील.
भारतीय स्वातंत्र्यसंग्रामाची आपल्या सगळ्यांना माहिती आहेच, म्हणूनच स्वातंत्र्यदिनानिमित्त इतिहासात जरा डोकावून पाहूया….
खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरं जर तुम्हाला येत असतील, तर अजिबात वेळ न दवडता कमेंट करून आम्हाला आणि इतरांना पण ती उत्तरं सांगा.
चला तर मग, करूया सुरुवात??
===
१. स्वतंत्र भारताच्या पहिल्या महिला कॅबिनेट मिनिस्टर कोण?
===
२. स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती कोण?
===
३. आपलं राष्ट्रगीत कुणी लिहिलं आहे?
===
४. ‘चलो दिल्ली’ हा नारा कुणी दिला?
===
५. कोणत्या घटनेमुळे गांधीजींना असहकार आंदोलन मागे घ्यावे लागले?
===
६. जालियनवाला बाग हत्याकांड घडवणाऱ्या जनरल डायरला कुणी यमसदनी पाठवले?
===
७. भगत सिंग ह्यांनी तुरुंगात केलेलं उपोषण किती दिवसांचं होतं?
===
८. दांडीयात्रेच्या वेळेस ‘रघुपती राघव राजाराम’ हे गाणं कुणी म्हटलं?
===
९. स्वातंत्र्यासाठी २ वेळा काळ्यापाण्याची शिक्षा कुणी भोगली?
====
१०. ३१ ऑक्टोबर म्हणजे “राष्ट्रीय एकता दिवस” कोणाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो?
===
११. भारतातली पहिली महिला शिक्षिका कोण?
===
१२. “जय जवान, जय किसान” हा नारा कोणी दिला?
===
१३. कोणत्या चळवळीनंतर गांधीजी देशाच्या प्रत्येक घरात पोहोचले?
===
१४. लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव कोणत्या साली सुरू केला?
===
१५. भारतात एकूण राज्यं आणि संघराज्यं किती?
या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला येत असतील, तर लगेच कमेन्ट करून आम्हाला आणि इतरांना पण सांगा.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.