सुशांत सिंहचं मानसिक आरोग्य बिघडलं ते पेंटिंग कोणी पाहुच नये अशी त्या चित्रकराचीच इच्छा होती!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत आणि रिया चक्रवर्ती यांचे इटलीमधील फोटो काल अचानक सोशल मीडियावर दिसू लागले. इन्स्टाग्रामवर तर ऑक्टोबर २०१९ मधील त्यांच्या या ट्रीपची तुफान चर्चा सुरु झाली.
या ट्रीपची चर्चा पुन्हा सुरु होण्याचं कारण आहे, चौकशीदरम्यान रियाने केलेल्या एका घटनेचा उल्लेख!
इटलीमधील या ट्रिपदरम्यानच सुशांतचे मानसिक संतुलन बिघडू लागले होते, असा दावा अभिनेत्री रिया हिने केला आहे. इटलीमधील एका ६०० वर्षं जुन्या ऐतिहासिक हॉटेलमध्ये त्यांचे वास्तव्य होते.
या हॉटेलमधील एक पेंटिंग बघितल्यावर सुशांत अस्वस्था झाला होता, असे रियाचे म्हणणे आहे. हे पेंटिंग बघून त्याने काही मंत्रोच्चार सुरु केले होते. त्यानंतरचा बराच काळ तो अस्वस्थ होता असा दावा सुद्धा रियाने चौकशी दरम्यान केला आहे.
इटलीमधील ज्या पेंटिंगचा उल्लेख रियाने केला, ते नेमकं आहे तरी कसं? कोण आहे या चित्राचा चित्रकार? काय आहे या पेंटिंगमागचा इतिहास? जाणून घेऊया आजच्या या लेखामधून…
या पेंटिंगचे नाव ‘सॅटर्न डेवोरिंग हिज सन’ असं आहे. हे चित्र स्पॅनिश चित्रकार फ्रान्सिस्को गोया याने, १९व्या शतकात घराच्या भिंतीवर काढले होते.
चित्रात एक नग्न व्यक्ती पाहायला मिळते. तिच्या हातात एक धड दिसत आहे. या शरीराचं मुंडकं मात्र त्या व्यक्तीने खाऊन टाकलेलं आहे. भेदक नजरेने तुमच्याकडे पाहणारी ही नग्न व्यक्ती म्हणजे ग्रीक देवता सॅटर्न आहे.
हे चित्र ग्रीक पौराणिक कथेवर आधारित आहे. या संदर्भातील कथा सुद्धा अत्यंत रंजक आहे.
कृष्णाचा कंसमामा, बहीण देवकीच्या प्रत्येक अपत्याला मारत असे. तिच्या पोटी जन्माला येणारं मूल त्याचा अंत करणार हे त्याला ठाऊक होतं. अशीच कथा सॅटर्नबद्दल सांगितली जाते.
आपल्या वडिलांना धुडकावून लावून सॅटर्नने सत्ता आपल्या हाती घेतली होती. त्याचा मुलगा सुद्धा त्याच्याशी असंच वागणार असल्याची भीती त्याला होती. म्हणूनच, त्याने त्याच्या प्रत्येक मुलाला जन्मतःच खाऊन टाकलं होतं, असं म्हटलं जातं.
मात्र त्याचा सहावा पुत्र ज्युपिटर याला आईने वाचवलं आणि सॅटर्नपासून सुरक्षित ठेवलं. पुढे त्यानेच सॅटर्नचा नायनाट करून राज्य ताब्यात घेतलं होतं.
फ्रान्सिस्को गोया याने रेखाटलेलं हे भयावह चित्र, याच कथेवर आधारित आहे.
१८ व्या शतकात, १७४६ साली जन्माला आलेला फ्रान्सिस्को गोया, हा खरंतर रोमँटिक चित्र काढण्यासाठी प्रसिद्ध होता. पुढील काळात तो स्पेनमधील राजदरबारी सुद्धा चित्रकार होता.
स्पेनच्या राजदरबारात त्याने अनेक उल्लेखनीय पेंटिंग्स काढलेली आहेत. वयाच्या ४६ व्या वर्षांपासून तो नैराश्यात असल्याचा उल्लेख इतिहासात केलेला आढळतो.
१८१९ ते १८२३ च्या काळात मद्रिदमधील राहत्या घरात त्याने काही गूढ चित्रं रेखाटली होती. घरांच्या भिंतीवर रेखाटलेल्या या १४ चित्रांचे त्याने नामकरण सुद्धा केले नव्हते. ही चौदा चित्रं ‘ब्लॅक पेंटिंग्स’ म्हणून ओळखली जातात.
‘सॅटर्न डेवोरिंग हिज सन’ हे पेंटिंग, याच १४ पेंटिंग्सपैकी एक आहे. त्याची ही चित्रं कुणीही बघू नयेत अशी फ्रान्सिस्को गोया याची इच्छा होती. हे पेंटिंग १८७४ पर्यंत, म्हणजेच तब्बल ५० वर्षं त्या भिंतीवर तसंच पडून होतं.
खरोखरंच ती चित्रं कुणीही पाहिलेली नव्हती. मात्र गोया याच्या नातवाकडून ते घर Baron Emile d’Erlange याने विकत घेतलं. Salvador Martinez Cubells या यशस्वी चित्रकाराकडून ही सारी चित्रं कॅनवासवर रेखाटून घेतली.
अशारीतीने ब्लॅक पेंटिंग्स, कॅनवासवर चितारली गेली. त्यामुळेच आज ‘सॅटर्न डेवोरिंग हिज सन’ हे पेंटिंग अस्तित्वात आहे.
हे पेंटिंग बघूनच त्यातील भेदकता आणि त्याचं भयावह असणं जाणवतं.
हे चित्र पाहिल्यावर, मनात काही प्रमाणात भीतीची भावना निर्माण होते. ‘खरोखरंच या भयानक पेंटिंगचा परिणाम सुशांतच्या मनस्थितीवर झाला होता का?’ याचा छडा लावण्याचं काम सीबीआयचे अधिकारी निश्चितपणे करतील.
मात्र, रियाच्या एका वक्तव्यामुळे आज हे गूढ पेंटिंग पुन्हा एकदा लोकांच्या चर्चेचा विषय ठरू लागलं आहे, यात शंकाच नाही. या गूढ आणि भयावह पेंटिंगची लोकप्रियता सुद्धा वाढू लागली आहे.
हे पेंटिंग सुशांतच्या मृत्यूचं कारण ठरलं आहे की नाही, याविषयी भाष्य करणं सध्यातरी अशक्य आहे.
कारण, आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचा आपल्या मनावर काय परिणाम होईल हे सांगणं कठीणच! हे रहस्य सोडवण्याचा प्रयत्न वर्षानुवषे सुरू आहे. तो कायम सुरु राहील. मानवी मन आणि भावभावनांवर परिस्थितीचा होणारा परिणाम, हे जणू काही न सोडवता येणारं कोडं आहे.
मात्र, या पेंटिंगमागचं गूढ उकलण्यावर जसा प्रकाश टाकला जातोय, त्याचप्रमाणे सुशांतच्या मृत्यूचं गूढ सुद्धा लवकरात लवकर उकललं जावं…
–
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.