Site icon InMarathi

शेअरहोल्डर की स्टेकहोल्डर? यात अनेकांची गल्लत होते! तुम्ही होऊ देऊ नका! वाचा!

Difference-between-stakeholder-and-shareholder inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जगात अनेक बदल घडून आलेले दिसत आहेत. संपूर्ण जगासमोर आर्थिक संकट सुद्धा उभं ठाकलं आहे. याचा मोठ्या प्रमाणावर परिणाम शेअर मार्केटवर सुद्धा झालेला दिसून येतोय. असं असूनही, भविष्यातील तरतूद म्हणून आर्थिक गुंतवणूक करणं हा सुद्धा अनेकांसाठी महत्त्वाचा मुद्दा ठरला आहे.

यासाठीच शेअर मार्केटकडे तुम्ही मोर्चा वळवला असेल. शेअर मार्केट हा जुगार आहे असं म्हणणारी मंडळी सुद्धा तुमच्या आजूबाजूला पाहायला मिळतील. तर शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याआधी योग्य ती माहिती आणि ज्ञान मिळवणं आवश्यक आहे, असं सांगणारे लोकही तुम्हाला भेटतील.

शेअर मार्केट विषयी माहिती मिळवायची झाली, तर सगळ्यात महत्त्वाच्या आहेत त्या या दोन संज्ञा; शेअरहोल्डर आणि स्टेकहोल्डर! या दोन संज्ञा बऱ्याच जणांना सारख्याच वाटतात. अनेक जण असेही म्हणतात की शेअरहोल्डर आणि स्टेकहोल्डर मध्ये जास्त फरक नसतो. पण खरंच असं आहे का? तर त्याचं उत्तर आहे- नाही.

शेअरहोल्डर आणि स्टेकहोल्डर या दोन वेगवेगळ्या परिभाषा आहेत. या दोन भिन्न गोष्टींमधील लोकांच्या मनातील संभ्रम दूर करण्यासाठी हा संक्षिप्त लेख!

 

 

शेअरहोल्डर म्हणजे काय?

शेअरहोल्डर हा तो व्यक्ती असतो (किंवा एखाद्या व्यवसायाच्या किंवा संस्थेच्या रुपातही असू शकतो) ज्याच्या नावावर कंपनीमधील ठराविक स्टॉक्स असतात.

शेअर मार्केट मधून कंपनीचे काही शेअर्स खरेदी केले की तो व्यक्ती त्या कंपनीचा शेअरहोल्डर म्हणजे एकप्रकारे कंपनीचा सहमालक/मालकीतला भागीदार असतो.

शेअरहोल्डर कंपनीमधील कामकाजाला जबाबदार नसतो. कंपनीमध्ये काय सुरु आहे याच्याशी त्याचा अजिबातच संबंध नसतो. कंपनी नफ्यात असल्यास नफ्यातील ठराविक हिस्सा त्याला कंपनीतर्फे मिळतो किंवा तो आपले स्टॉक्स विकून देखील फायद्यात राहू शकतो.

म्हणजेच कंपनीतील व्यवहारांचा आणि शेअरहोल्डरचा काहीही संबंध नसतो…

 

स्रोत

आता जाणून घेऊया स्टेकहोल्डर बद्दल!

स्टेकहोल्डर हा कोणीही व्यक्ती असू शकतो जो कंपनीशी जोडला गेला आहे आणि ज्याच्यावर कंपनीमध्ये घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा प्रभाव पडत असतो.  स्टेकहोल्डर हा कंपनीला जिवंत ठेवतो असे म्हटले तर वावगे ठरू नये. स्टेकहोल्डर नसेल तर कंपनी जास्त काळ तग धरू शकत नाही.

आपण इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की जो कंपनीचा शेअरहोल्डर असतो तो एकप्रकारे ऑटोमॅटिकपणे कंपनीचा स्टेकहोल्डर सुद्धा असतो, पण जो स्टेकहोल्डर असतो तो मात्र कंपनीचा शेअरहोल्डर असेलच असे नाही. म्हणजे हे असं झालं की चौकोन हा त्रिकोण असतो, पण त्रिकोण हा चौकोन नसतो.

 

स्रोत

अजूनही लक्षात येत नाहीये, चला अजून सोप्प करून सांगू.

स्टेकहोल्डर्स या संकल्पनेला आपण एक मोठे घर मानु जे- ज्यांचे मालकीचे स्टॉक्स आहेत अर्थात शेअरहोल्डर्स तसेच कर्मचारी, ग्राहक, सप्प्लायर्स, कम्युनिटी मेम्बर्स, ट्रेड असोसीएशन्स या सर्वाना सामावून घेते.

जर कंपनी नफ्यात असेल, तिचा विस्तार झाला असेल किंवा कंपनीने आपला व्यवसाय अधिक वाढवला असेल तर या सर्व सकारात्मक गोष्टींचा परिणाम या घरातील सर्वावर होईल. पण घराचे खरे मालक शेअरहोल्डर्सचं राहतील इतर सर्व नाममात्र सदस्य!

आता तुमच्या लक्षात आले असेल की शेअरहोल्डर आणि स्टेकहोल्डर या दोन संज्ञा पूर्णपणे वेगळ्या आहेत.

शेअरहोल्डर आणि स्टेकहोल्डरमधील फरक समजून घेणं, तुमच्या शेअर मार्केटमधील गुंतवणुकीसाठी पहिलं महत्त्वाचं पाऊल ठरेल.

आज तुम्ही या दोन्ही संज्ञा नीट समजून घेतल्या असतीलच…!!!!!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version