“सडकचा धडा”- महेश भट्ट आणि समस्त बॉलिवूडकरांच्या विकृत मानसिकतेचा मुखवटा आता नक्कीच उतरेल!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
लेखक : अखिलेश विवेक नेरलेकर
===
महेश भट हे नाव म्हणजे सध्या एका शिवी प्रमाणेच घेतलं जात आहे. हे नाव ऐकताच सध्या सगळ्याच लोकांच्या तळपायाची आग मस्तकात जात आहे.
बरं हे सगळं आत्ताच सुरू झालं आहे अशातला भाग नाही, महेश भट हे नाव जेंव्हापासून चर्चेत यायला लागलं आहे तेंव्हापासून काही न काही विवाद उभे राहायला लागले आहेत.
पण आज हे नाव ऐकलं तरी लोकं का संतप्त होत आहेत तर सुशांत सिंग राजपुतच्या केसमध्ये त्यांच कनेक्शन, रिया चक्रवर्ती बरोबर सोशल मीडियावर होणारे त्यांचे व्हायरल फोटो वगैरे वगैरे!
बरं ह्या सगळ्या प्रकारणात महेश भट एकदम सिनियर प्लेयर.
स्वतःच्या मुलीला एका मॅगझीन साठी पॅशनेट स्मूच देऊन फोटोशूट करणारा आणि वरती त्याच तोंडातून “ही माझी मुलगी नसती तर मी हिच्याशी लग्न केलं असतं” असं अत्यंत घृणास्पद विधान करणाऱ्या म्हातारचळ लागलेल्या महेश भटचे प्रताप आपल्याला नवीन नाहीत!
स्वतःची मुलगी असो किंवा त्या काळची टॉपची अभिनेत्री परवीन बाबी प्रत्येक प्रकरणात ह्या महाशयांचा हात नाहीतर पाय काही ना काहीतरी आहेच!
बरं ह्यांनी धर्मपरिवर्तन केलेलं आहे…ते ही मानलं! कुणाला कोणता धर्म स्वीकारायचा आहे ह्याची मुभा आपल्या देशात प्रत्येकाला आहे.
पण हाच माणूस जेंव्हा “२६/११ आरएसएस की साझीश’ ह्या दिग्विजय सिंग ह्यांनी लिहिलेल्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला जातो तेंव्हा नेमकं काय चित्र लोकांसमोर येतं हे वेगळं सांगायची गरज नाही.
मुळात महेश भट ला आरएसएस मधला आर जरी समजला असता तरी ह्या सोहळ्याला जाण्याआधी त्याने १००० वेळा विचार केला असता. पण नाही एवढं डोकं असतं तर ते महेश भट कसले!
शिवाय झाकीर नाईक सारखा माणूस जो दुनियेतल्या टॉप च्या एजन्सीच्या हिट लिस्ट वर आहे ज्याच्यावर टेररिस्ट ना ट्रेनिंग देण्याचे आरोप लागले आहेत.
तो माणूस महेश भट ची प्रशंसा करतो तसेच महेश भट ह्या माणसावर बायोपिक काढण्याची इच्छा व्यक्त करतो तिथेच समजत ह्यांचं नेमकं टार्गेट कोण आहे?
ह्याच महेश भटच्या मुलावर डेव्हिड हेडली शी कनेक्शन असल्याचे आरोप लागले आहेत ज्याने २६/११ ह्या हल्ल्याची ब्लु प्रिंट तयार केली.
अशा महेश भटच्या सिनेमाला २० वर्षानंतर सुद्धा ह्या महामारीच्या काळात हॉटस्टार सारख्या प्लॅटफॉर्म वर जागा मिळते ही गोष्ट म्हणजे आपल्याच प्रेक्षकांच्या तोंडात जबरदस्त चपराक आहे!
खरंतर बॉलिवूड फिल्म इंडस्ट्री, अंडरवर्ल्ड पाकिस्तान कनेक्शन ही गोष्ट आता काही नवीन राहिली नाही.
इतकं होऊन सुद्धा महेश भट सारख्या माणसाला इंडस्ट्री मध्ये आदराने काम मिळतं तर सुशांत सारख्या किंवा कंगना सारख्या अन्यायाविरोधात आवाज उठवणाऱ्या कलाकारांना दाबलं जातं हे सत्य आहे.
पण उशिरा का होईना लोकं आता जागरूक व्हायला लागले आहेत.
महेश भट च्या नुकत्याच हॉटस्टार वर रिलीज होणाऱ्या सडक २ ह्या सिनेमाच्या ट्रेलर ला जगातल्या सर्वात जास्त डिसलाईक मिळणारा ट्रेलर मध्ये गणना केली जात आहे.
३ तासात ५ लाख पेक्षा अधिक डिसलाईक्स आणि कित्येक निगेटिव्ह कमेंट्स तुम्हाला युट्युब वर पाहायला मिळतील. लोकं तरीही म्हणतील लाईक आणि डिसलाईक मुळे काय फरक पडणार?
पण निदान लोकांना ह्या विकृत मानसिकतेबद्दल जाणीव व्हायला लागली आहे ते काय कमी आहे? ह्या लोकांची ही मानसिकता हाणून पाडण्यासाठी लोकांनी उचललेलं पहिलं पाऊल नक्कीच प्रशंसनीय आहे.
असाच एक आणखीन केविलवाणा प्रयत्न २ दिवसांपूर्वी गुंजन सक्सेना ह्या सिनेमाबाबत झाला…सिनेमा खरंतर आज नेटफ्लिक्स वर रिलीज होणार आहे.
पण धर्मा प्रोडक्शन म्हणजेच करण जोहर चा सिनेमा आणि त्यात जान्हवी कपूर असल्याने ह्या सिनेमाला क्लीन चिट मिळवण्यासाठी २ दिवस आधीच ह्या सिनेमाच्या स्पेशल स्क्रीनिंगची लिंक काही खास मोठमोठ्या क्रिटिक्सना दिली गेली.
आणि २ दिवसांपासून आपण ह्या सिनेमाविषयी चांगले रिव्युज युट्युब वर सोशल मीडिया वर पाहत आहोत.
हाच फंडा सुशांतच्या दिल बेचारा सिनेमाच्या बाबतीत का वापरला गेला नाही? नेपोटीझम आणि बॉलिवूड मध्ये चालणारं Lobbying ला क्लीन चिट देण्याच्या धर्मा प्रोडक्शन चा हा प्रयत्न लोकांना न समजण्याइतके ते दुधखुळे नक्कीच नाहीत.
बरं हे एकच उदाहरण नाही, बॉलिवूडच्या सध्याच्या कित्येक सिनेमात दिसणारा लाल सलाम, हिंदू फोबिक पात्र हे देखील आता लोकांना कुठेतरी खटकायला लागली असून त्यामागची ह्या फिल्ममेकर्स ची मानसिकता आता हळू हळू वर येत आहे.
कशाप्रकारे गली बॉय सारख्या सिनेमाला (लायकी नसताना सुद्धा) डझनभर अवॉर्ड दिले जातात.
आणि कशाप्रकारे उरी सारख्या सिनेमासाठी Jingoism सारख्या टर्म्स वापरल्या जातात, ताशकंत फाईल्स सारख्या सिनेमाचा उल्लेख देखील केला जात नाही..इथेच ह्या बॉलिवूडची हिपोक्रसी सिद्ध होते…!
बॉलिवूडची हिपोक्रसी लोकांना पूर्णपणे समजली आहे.
कशाप्रकारे ही लोकं तू मेरी खुजा मैं तेरी खुजाऊ ह्या नियमाप्रमाणे ही इंडस्ट्री स्वतःच्या बापाची जहागीर असल्यासारखी चालवतात आणि सुशांत सारख्या गुणी कलाकारांची आयुष्य उध्वस्त करतात कारण स्वतःची वाचवायची असते ना!
पण आता लोकं सुद्धा बरीच शहाणी झाली आहेत, फिल्मी मॅगझीनच्यापलीकडे लोकांचा वाचण्याचा, ऐकण्याचा स्कोप वाढला आहे.
त्यामुळे आता प्रेक्षक बॉलिवूडच्या ह्या मुखवटा धारण केलेल्या चेहऱ्याला भुलणार नाहीत हे मात्र नक्की!
स्वतःच्या देशाला संस्कृतीला नावं ठेवून स्वतःचे खिसे भरणाऱ्या ह्या इंडस्ट्री पेक्षा आपले मराठमोळे कलाकार आणि संस्कृतीचा वारसा जपणाऱ्या आपल्या मराठी फिल्म्स शंभर पटीने उत्तम!
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.