Site icon InMarathi

मिस युनिव्हर्स म्हणजे आकर्षक चेहरा, ३६-२४-३६ फिगर नव्हे, इथे बुद्धीचाही कस लागतो!

har inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आज सकाळीच भारतीयांसाठी एक खुशखबर होती ती म्हणजे तब्बल २१ वर्षानंतर भारतीय मॉडेल हरनाज संधूने मिस युनिव्हर्स हा ‘किताब जिंकला. आज जगभरात ज्या ज्या सौंदर्य स्पर्धा भरवतात त्यात तुमच्या सौंदर्याबरोबरीने तुमच्या बुद्धीचीदेखील चाचणी केली जाते. म्हणूनच आज आपण लेखात अशाच काही मॉडेल्स बद्दल जाणून घेणार आहोत..

प्रत्येक व्यक्ती सहसा एखादा छंद जोपासत असते. आपली आवडती गोष्ट मनापासून करणं प्रत्येकाला हवंहवंसं वाटतं. विरंगुळ्याचा सर्वोत्तम पर्याय म्हणून हा छंद अत्यंत फायदेशीर असतो. मात्र ही आवड जोपासत असताना, ध्येय गाठण्यात अडथळा येणार नाही याचीच काळजी घ्यावी लागते.

 

 

छंद आणि करिअर यांची सांगड घालणं प्रत्येकाला शक्य होत नाही. या दोन्ही गोष्टींची योग्य सांगड घालणारी व्यक्तीच आयुष्यात खऱ्या अर्थाने यशस्वी ठरते.

छंद किंवा आवड म्हणून जोपासलं जाणारं, एक उत्तम क्षेत्र म्हणजे मॉडेलिंग! मॉडेल म्हटलं, की दिसायला सुंदर आणि बुद्धीला थोडी कमी, असा एक सर्वसाधारण विचार मनात येतो.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

 

एखादी व्यक्ती मॉडेलिंग क्षेत्रात आहे, म्हणजे त्या व्यक्तीला शिक्षणाचे महत्त्व नाही, असं मानणारे अनेकजण आहेत. हा सर्वसाधारण विचार, शंभर टक्के योग्य नाही. मॉडेलिंगच्या क्षेत्रात असलेल्या आणि तरीही उच्चशिक्षित असणाऱ्या अनेक सुंदरींची यादी मांडता येईल.

अभिनेत्री अमिषा पटेल, परिणीती चोप्रा ही नावं तर अगदी हमखासपणे या यादीत समाविष्ट करता येतील.

 

zeenews.india.com

 

मागच्या वर्षी चर्चेत आलेला  दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत सुद्धा याचे उत्तम उदाहरण आहे. तो दिसायला जितका हँडसम होता, तेवढंच त्याचं शैक्षणिक कर्तृत्व सुद्धा उत्कृष्ट होतं.

काही दिवसांपूर्वी २०१९च्या संघ लोक सेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. मॉडेलिंग क्षेत्रात ससूनही, शिक्षणाला महत्त्व देणारं आणखी एक नाव आपल्या परिचयाचं झालं.

मॉडेलिंगची आवड उत्तमरित्या जोपासून सुद्धा ध्येय गाठण्यात यशस्वी ठरलेली ऐश्वर्या शेरॉन ही आज चर्चेचा विषय ठरली आहे.

 

 

युपीएससीच्या परीक्षेत भारतातून ९३वा क्रमांक प्राप्त केलेल्या ऐश्वर्याची २०१६च्या मिस इंडिया स्पर्धेत अंतिम फेरीमध्ये दाखल झाली होती. याशिवाय अनेक ब्युटी कॉन्टेस्टमध्ये तिने तिची छाप पाडली आहे.

मॉडेल म्हणून प्रसिद्ध झालेली ऐश्वर्या युपीएससीकडे कशी वळली? काय आहे या ‘ब्युटी विथ ब्रेन’ची कहाणी? तिचा हा अनोखा प्रवास नेमका कसा होता, हे जाणून घेऊयात, आजच्या या लेखातून…

मुलं अभ्यास करत नाहीत आणि पालक अभ्यास करण्यासाठी त्यांच्या मागे लागतात, अशी परिस्थिती सगळ्याच घरांमध्ये पाहायला मिळते.

मात्र, ऐश्वर्याच्या घरातील परिस्थिती काहीशी वेगळी होती. लहानपणापासून आयएएस होण्याचं स्वप्न तिनं पाहिलं होतं.आईची इच्छा पूर्ण करण्यासाठी तिने मॉडेलिंगच्या क्षेत्रात पाऊल ठेवलं.

 

jagran.com

पालकांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांच्या आवडीचं क्षेत्र मुलं निवडतात. ऐश्वर्याने सुद्धा हा मार्ग निवडला. मात्र ते करत असताना तिच्या ध्येयापासून ती कधीही विचलित झाली नाही.

ऐश्वर्या राय, हिने ‘मिस वर्ल्ड’ चा खिताब जिंकला, म्हणून ऐश्वर्या शेरॉन हिला ऐश्वर्या हे नाव देण्यात आलं.

 

indiatoday.in

 

तिनेदेखील मॉडेलिंग करावं असं तिच्या आईला वाटत होतं. ऐश्वर्याने सुद्धा हा छंद जोपासण्याचा निर्णय घेतला. ‘दिल्ली टाइम्स’च्या फ्रेश फेस या स्पर्धेतून तिने मॉडेलिंगच्या क्षेत्रात पाऊल टाकलं. आपली उत्तम छाप पाडून तिने स्वतःची ओळख निर्माण केली.

एक यशस्वी मॉडेल म्हणून तिचा प्रवास सुरु झाला. मॉडेलिंग क्षेत्रात उत्तम काम सुरु केल्यानंतर तिला ग्लॅमर सुद्धा मिळत गेलं.

प्रसिद्धी मिळाल्यानंतर ते ग्लॅमर योग्यप्रकारे हाताळणं सगळ्यांनाच जमत नाही. मात्र, ऐश्वर्याने या ग्लॅमरचा परिणाम तिच्या स्वप्नावर होऊ दिला नाही.

 

 

कॉलेजमध्ये अभ्यास आणि मॉडेलिंग याची उत्तम सांगड घालत तिची वाटचाल सुरु होती. मॉडेलिंग क्षेत्रात सुद्धा नवनवीन संधी मिळत होत्या. २०१८ पर्यंत तिने त्या संधी सुद्धा स्वीकारल्या.

पण, त्यानंतरच्या काळात तिने अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला.

सर्व प्रोजेक्ट्स संपवून आणि सोशल मीडियाचा त्याग करून तिने अधिक जोमानं अभ्यासाला सुरुवात केली. एक वर्षं तिने घेतलेली मेहनत आज तिने मिळवलेल्या यशामधून दिसून येत आहे.

१० + ८ + ६ हे तिच्या यशाचं सूत्र असल्याचं ती सांगते. दिवसातून १० तास अभ्यास, ८ तास झोप आणि उरलेल्या ६ तासांमध्ये इतर सर्व गोष्टी पार पाडण्याचा फॉर्म्युला तिने ठरवला होता.

कुठल्याही कोचिंग क्लासला न जाता, घरच्या घरी अभ्यास करणं तिनं पसंत केलं.

 

indiatoday.in

 

आयपीएस अधिकारी महेश भागवत यांचं मार्गदर्शन तिला लाभलं. स्टडी मटेरियल, इंटरव्यू आणि मॉक टेस्टसाठी त्यांचं मार्गदर्शन तिला खूप फायद्याचं ठरलं.

युपीएससी २०१९च्या परीक्षेत उत्तम यश मिळवल्याबद्दल ‘फेमिना मिस इंडिया’च्या ट्विटरवरून सुद्धा तिला शुभेच्छा देण्यात आल्या.

 

 

युपीएससीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवल्यानंतर, एका वृत्तवहिनीला दिलेल्या मुलाखतीत तिने मांडलेलं मत आजच्या पिढीसाठी फारच उपयुक्त ठरणारं आहे.

“पालकांनी मुलांना योग्य ती मुभा द्यायला हवी. आज एकविसाव्या शतकात स्त्रिया सगळ्याच क्षेत्रांमध्ये छाप पाडत आहेत. त्यांनी यशस्वी व्हावं यासाठी सगळ्यांचा सपोर्ट त्यांना मिळणं आवश्यक ठरतं.

मला ही मुभा आणि घरच्यांचा पाठिंबा होता. म्हणून हे यश मिळवणं शक्य झालं. नव्या काळातील महत्वाकांक्षी मुलींना असाच पाठिंबा त्यांच्या पालकांनी द्यायला हवा.” हे मत मांडताना,

‘भारताचं संविधान हाच माझा धर्मग्रंथ आहे. आयएएस म्हणून काम करत असताना, स्वतःपेक्षाही माझं काम माझ्यासाठी अधिक महत्त्वाचं असेल’ हे नमूद करायला सुद्धा ती विसरली नाही.

ऐश्वर्याचे वडील अजयकुमार, हे भारतीय सैन्यामध्ये कर्नल पदावर कार्यरत आहेत. आईचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मॉडेल झालेली ऐश्वर्या आता वडिलांच्या पावलावर पाऊल ठेऊन देशसेवेसाठी सज्ज झाली आहे. आज ती अनेकांची रोलमॉडेल ठरली आहे.

सुंदर दिसताना, किंवा मॉडेलिंग करत असताना सुद्धा शिक्षण क्षेत्रात उत्तम यश मिळवता येतं हे ऐश्वर्याने सिद्ध केलं आहे. सौंदर्य आहे, म्हणजे बुद्धिमत्ता नाही हा समज तिने खोडून काढला आहे.

मॉडेल ते रोलमॉडेल हा तिचा प्रवास खूपच थक्क करणारा आहे… सुंदर असणाऱ्या ऐश्वर्यच्या या अफाट बुद्धिमत्तेला सलाम!!!

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version