' आयर्नची कमतरता; मात करण्यासाठी आहारात हव्या या महत्वाच्या पदार्थांचा समावेश – InMarathi

आयर्नची कमतरता; मात करण्यासाठी आहारात हव्या या महत्वाच्या पदार्थांचा समावेश

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

===

आजकाल औषधांइतक्याच मल्टिव्हिटॅमिन्स किंवा आयर्न डेफिसिएन्सीच्या गोळ्या खाल्ल्या जातात असं म्हटलं तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही.

खोटं वाटतंय?

जरा, तुमच्या घरातल्या प्रत्येकाकडे असलेला औषध-गोळ्यांचा खजिना एकदा तपासा.

 

tablets medicine inmarathi 1
drweil.com

 

अर्थात प्रत्येकाची कारणं वेगळी असतील. म्हणजेच लहान मुलांची वाढ निकोप होत नाही म्हणून या गोळ्या डॉक्टरांनी दिल्या असतील तर महिलांमध्ये होणा-या हॉर्मोनल बदलांसाठी त्यांना त्या गोळ्या घ्याव्या लागत असतील.

घरातील तरुण मंडळींनी फिटनेसचं संतुलन राखण्यासाठी आपल्या डाएटिशीयनकडून अशा पोषक गोळ्यांसाठी सल्ला घेतला असेल.

अर्थात प्रत्येकालाच या गोळ्यांची गरज आहे हे नक्की, मात्र जरा विचार करा की, आपल्या शरिरासाठी इतका महत्वाचा असलेला घटक आपल्याला आहारातून का मिळत नाही? शरीरातील नैसर्गिक घटकांसाठी केवळ औषधांवरच अवलंबून रहावं लागतं का?

असे प्रश्न तुम्हालाही पडले असतील तर हा लेख वाचणं तुम्हाला अत्यंत गरजेचा आहे.

भलेही बाजारात असंख्य पर्याय उपलब्ध असतील, कृत्रिम, रासायनिक औषधं असतील पण तुमच्या घरातील काही सोप्या पदार्थांकडे थोडं बारकाईनं लक्ष दिलंत तर अशा औषधांवर अवलंबून राहण्याची गरज नाही.

चला तर, अशा काही पदार्थांबाबत जाणून घेऊ, जे तुमच्या रोजच्या आहारात समाविष्ट केलेत तर नैसर्गिकरित्या तुमची प्रकृती सुधारण्यास मदत होईल आणि महागड्या गोळ्या, त्यामुळे होणारे साईड इफेक्ट्स यांना कायमचा निरोप देता येईल.

१. मांस

मांसाहारी असाल तर आयर्न मिळविण्यासाठी कोणत्याही इतर पदार्थांवर अवलंबून राहण्याची गरज नाही.

 

chicken-InMarathi

 

चिकन, मटण या यांसारखे पदार्थ आयर्नचा पुरवठा करण्यासाठी उपयुक्त असताच पण त्यासह जेवणात मासे खात असाल तर मग आयर्नची चिंताच सोडा.

अर्थात शाकाहारी लोकांनाही यासाठी अनेक पर्याय उपलब्ध असले तरी मांसाहारी खव्वैयांना मात्र त्यांच्या आवडत्या पदार्थांतूनच आयर्न अर्थात लोहाचा साठा मिळतो.

 

butter chicken inmarathi
youtube

 

त्यासाठी तुम्हाला आवडत्या अशा कोणत्याही पदार्थांत चिकन, मटण, मासे यांचं सेवन केलंत तरी तुम्हाला पोषणाचा हा पौष्टिक खजिना सापडेल.

२. अंडी

संडे हो या मंडे… लहानपणापासून ऐकलेल्या या ओळी तुम्हालाही तोंडपाठ असतील.

पण वरकरणी मजेशीर वाटणा-या या गाण्याचा अर्थ अत्यंत समर्पक आणि महत्वाचा आहे.

 

eggs inmarathi

 

केवळ मांसाहरीच नव्हे तर अनेक शाकाहारी लोकही अंडं खातात.

मात्र केवळ आवड म्हणून नव्हे तर औषध म्हणून अंड खाऊ शकता. अंड्यामध्ये सर्वाधिक प्रमाणात आयर्न असल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार नियमिपणे अंड्याचं सेवन करा.

 

egg dishes inmarathi

 

ऑमलेट, भुर्जी, उकडलेलं अंड यांसारख्या अनेकविध चविष्ट प्रकारातूनही तुम्हाला तंदुरुस्त रहायला मदत करेल.

 

हे ही वाचा – कुठली अंडी बनावट आहेत ओळखण्यासाठी सोप्या आणि खात्रीलायक टिप्स..

 

 – खवय्यांच्या पसंतीचे ‘कडकनाथ’ चिकन आता मिळणार घरपोच ! कसे ते जाणून घ्या..

 

३.  ड्रायफ्रुट

काजु, बदाम यांसारखे ड्रायफ्रुट्स सर्वानाच आवडतात. मात्र खीर, शीरा यांसारख्या पदार्थांची लज्जत वाढवण्यापुरताच त्याचा विचार केला जातो.

तुम्हीही असंच करत असाल तर, तर ही चुक वेळीच सुधारा.

 

dry fruits inarathi
firtcry parenting

 

कोणत्याही प्रकारचे ड्रायफ्रुट, चणे, शेंगदाणे यांसारखे पदार्थ नाष्ट्यात किंवा दिवसभरात किमान एकदा तरी जरूर खा.

दररोज तेच खाण्याचा कंटाळा येत नसेल तर कोणत्या दिवशी कोणता प्रकार खायचा याचा याचे एक सोपे वेळापत्रक तयार करा.घरातील डायफ्रुट संपले असतील तर शेंगदाणे, चणे हा देखील त्याला उत्तम पर्याय ठरतो.

४.  पालेभाज्या

पालेभाज्या पाहून नाक मुरडत असाल तर जरा थांबा. आयर्न, मल्टिव्हिटॅमिनसाठी कडु गोळ्या घेण्यापेक्षा हिरव्या पालेभाज्यांचा पर्याय केंव्हाही चांगला.

 

green-leafy-vegetables-diet InMarathi

 

आपल्या प्रत्येकाच्याच घरात आठवड्यात किमान दोनदा तरी हिरव्यागार, ताज्या भाज्यांंची चविष्ट भाजी केली जाते.

पालक, मेथी, अळु, चुका, मुळा यांपासून तुम्हाला आवडणा-या कोणत्याही भाजीची निवड करा, पण तुमच्या घरातला हा ठेवा अजिबात वाया जाऊ देऊ नका.

ही चविष्ट भाजी तुम्हाला प्रचंड प्रमाणात आयर्नचा पुरवठा करेल.

५. डाळी

भारतात प्रत्येक पावलागणिक खाण्यापिण्याच्या सवयी बदलतात. पण यात सर्वाधिक समान असलेला धागा कोणता? जरा विचार करून बघा.

उत्तर आहे डाळ.

 

dal makhani inmarathi

 

कुणी वरण म्हणतं, कुणी आमटी तर कुणी दाल…नावं काहीही असो हा पदार्थ तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे.

त्यामुळे शाकाहारी किंवा मांसाहारी कोणत्याही प्रकारच्या खव्वैयांसाठी डाळ हा सर्वोत्तम उपाय आहे.

यामध्ये तुरीची डाळ, मुगाची डाळ, हरभ-याची डाळ यांसारखे अनेक पर्याय उपलब्ध आहेत, त्यामुळे हा पर्याय सर्वाधिक चविष्ठ आहे यात शंका नाही.

 

varan bhat inmarathi
mumbai mirror

 

तुमच्या स्वयंपाकघरातच आयर्नचा इतका साठा दडलेला असताना औषधं, गोळ्या यांच्यावर अवलंबून राहण्यात काहीच अर्थ नाही.

रोजच्याच आहारात काही मोजकेच बदल केले, तुम्ही नाकारणा-या या गोष्टीं आवडीने खाल्ल्यात तर डॉक्टर किंवा महागड्या आहारातज्ञांकडे फे-या माराव्या लागणार नाही.

अर्थात वय किंवा हॉर्मोनल बदलांमुळे शरिरात आयर्न, व्हिटॅमिन्स यांची पातळी सातत्याने खालावत असेल तर मात्र डॉक्टरांच्या सल्ल्याखेरीज अन्य पर्याय नाही.

 

iron inmarathi
firstcry parenting

 

मात्र भविष्यात अशा संकटांना सामोरं जावं लागू नये असं वाटत असेल तर मात्र आजपासून हेल्दी पदार्थांना जवळ करा.

 

हे ही वाचा – झिंकची कमतरता असणं सुद्धा आहे धोकादायक… हे १० पदार्थ खा आणि बिनधास्त रहा

 

                   – आहारात हे १० पदार्थ असतील तर प्रोटीन सप्लिमेंट्स घेण्याची शाकाहारी लोकांना गरज पडणार नाही

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?