Site icon InMarathi

हात जोडून “नमस्कार” करण्याच्या भारतीय प्रथेमागे आहे एक महत्त्वाचं वैज्ञानिक कारण!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

‘नमस्कार’ किंवा ‘नमस्ते’ ही आपल्या भारताने पूर्ण जगाला दिलेली देण आहे. २०२० मध्ये या दोन्ही हात जोडून लांबूनच “Greet” करण्याच्या पद्धतीचा फारच जास्त वापर जगभरात होतांना दिसत आहे.

कोरोना मुळे उद्भवलेल्या परिस्थितीत अजूनही फार बदल झालेला नाहीये. Social Distancing चं महत्व आज ही लोकांना सांगावं लागतंय. ते साध्य करण्यासाठी फक्त नमस्कार करून एकमेकांपासून लांब राहणं हे गरजेचं झालं आहे.

मध्यंतरी आपण बघितलं असेल की, कसं ब्रिटन चे प्रिन्स चार्ल्स हे एका कार्यक्रमात जात असताना ते त्यांचा पारंपरिक shake hand न करता त्यांच्या स्वागताला आलेल्या प्रत्येकाला चक्क ‘नमस्ते’ करत होते.

त्यांची ही पद्धत बघून उपस्थित जनसमूह आणि मिडियातील लोकांनी त्यांचं खूप कौतुक केलं होतं.

याच बरोबर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे यांनी देखील “नमस्काराची” पद्धत स्वीकारली.

 

zeenews.india.com

 

नमस्कार हा फक्त एक औपचारिकता म्हणून केला जात नाही. त्याला एक शास्त्रीय कारण आहे. असं म्हणतात, की तुमच्या शब्दांपेक्षा तुमची बॉडी लँग्वेज, हातवारे हे तुम्हाला काय म्हणायचं आहे, ते कमी वेळात समोरच्या व्यक्तीला समजावून सांगत असतात.

ऑफिसच्या मीटिंग मध्ये कोणी टेबल वर हात मारून एखादी गोष्ट सांगितली ,की त्यावेळी सगळेजण अचानक कोणता विषय सुरू आहे हे लक्ष देऊन ऐकतात.

आता तर हे सगळं विसरायला होतंय. कारण, आता ‘दूरच रहा आणि फक्त कामाचंच बोला’ ही संस्कृती सगळीकडेच लागू होत आहे.

हाताच्या position चं महत्व आपण लोक जेव्हा ध्यान करतात तेव्हा सुद्धा बघू शकतो. काही लोक अंगठा आणि पहिलं बोट एकमेकांवर टेकवतात. काही लोक दोन्ही हात एकमेकांवर ठेवतात.

 

.newstracklive.com

 

हात जोडण्याचं महत्वाचं कारण म्हणजे, आपला उजवा आणि डावा हात हे आपल्या दोन मतांना किंवा दोन दिशांचं प्रतिनिधित्व करत असतात.

जेव्हा आपल्याला एखादी व्यक्ती दिसते, तेव्हा आपलं त्या व्यक्तीबद्दल एक तर सकारात्मक मत असतं किंवा नकारात्मक.

आपले दोन्ही हात जेव्हा एकत्र येतात, तेव्हा आपण या दोन पर्यायांमध्ये विचार करणं बंद करतो आणि त्या व्यक्तीला आपल्या विचारांपर्यंत पोहोचण्यापासून लांबच ठेवतो.

याला इंग्रजी मध्ये one ness म्हणजेच एकरूपता असं म्हणतात. नमस्कार च्या position ने आपण जजमेंटल होणं नकळत बंद करत असतो.

तुमची भेट ही एक तर तुम्हाला किंवा समोरच्या व्यक्तीला आनंद देणारी किंवा काही संदेश देणारी असते. ती भेट जर तुम्हाला अगदीच औपचारिक ठेवायची असेल तर ‘दुरून नमस्कार’ हा कधीही चांगला पर्याय ठरतो.

मागच्या चार महिन्यांनी आपल्याला कोणाला भेटल्याशिवाय सुद्धा कामं होऊ शकतात हे खूप चांगल्या पद्धतीने शिकवलं आहे. पण, भेटणं अगदीच आवश्यक असेल, तर नमस्कार करून भेटा असं आपलं शास्त्र सुद्धा सांगतं.

 

 

हिंदू मान्यता नुसार, आपण आत्म्याला मान्यता आणि नमस्कार करत असतो. एखाद्या व्यक्तीला नमस्कार करणे म्हणजे, “माझ्यातील आत्मा (spirit soul) हा तुझ्यातील आत्म्याला वंदन करतोय” असं म्हणण्यासारखं आहे.

नमस्कार किंवा नमस्ते चा उगम हा संस्कृत शब्द ‘नमः’ पासून झाला आहे. नमस्कार करणं म्हणजे अशी शारीरिक कृती ज्याने आपण हे मान्य करतो किंवा सांगतो की, “तुझ्यामध्ये माझ्यापेक्षा काही चांगल्या qualities आहेत ज्यांचा मी सन्मान करतो”.

एका अर्थाने हे समर्पण भावना अंगिकारण्यासारखं आहे.

वैदिक पद्धती किंवा हिंदू संस्कृतीने सुरू केलेला नमस्कार किंवा नमस्ते ला आता जगभरात लोकप्रियता मिळाली आहे. या मुद्रेला “अंजली मुद्रा” किंवा “प्रणाम आसन” असं ही संबोधलं जातं.

नमस्कार करताना जेव्हा दोन्ही हात एकमेकांवर दाबले जातात, तेव्हा अॅक्युप्रेशर च्या नियमाने तुमच्या मनातील अगतिकता किंवा तणाव निघून जातो हे सुद्धा सिद्ध झालं आहे.

 

opindia.com

 

तुमच्या तळहातावर काही प्रेशर पॉईंट्स आहेत ज्यांना दाबल्यावर तुम्हाला डोकेदुखी, मान दुखणे, पोट दुखणे, श्वसन अश्या विविध समस्यांपासून सुटका मिळते.

आपण जेव्हा हात मिळवतो, तेव्हा तुमच्या अंगात नसलेली पण समोरच्या व्यक्तीत असलेली नकारात्मकता तुमच्यात येण्याची दाट शक्यता असते.

नमस्कार करताना कोणताही स्पर्श होत नाही, फक्त सकारात्मक ऊर्जा ही पसरत असते. नमस्कार हा नकळत समानतेचा सुद्धा संदेश देत असतो आणि कोणत्याही अहंकाराला कधीच जवळ येऊ देत नाही.

अशाप्रकारे, नमस्कार ही वैज्ञानिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या सर्वात योग्य भेटण्याची पद्धत आहे. आजपासून “शेकहँड” सोडा आणि भेटल्यावर हेच म्हणा, “नमस्कार, कसे आहात ? हसताय ना… हसायलाच पाहिजे “.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version