Site icon InMarathi

वायुसेनेतून निवृत्त होऊन सुद्धा त्यांनी इतरांचे प्राण वाचवण्यासाठी स्वतःच्या प्राणांची आहुती दिली!

deepak sathe featured inmarathi

thebetterindia.com

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

कालचा दिवस हा २०२० ह्या वर्षातला आणखीन एक काळा दिवस म्हणता येईल!

कोरोनाच्या संसर्गामुळे परदेशात अडकलेल्या भारतीयांना परत मायदेशी भारतात आणण्यासाठी ‘वंदे भारत’ मिशन भारत सरकारने एयर इंडियाच्या मदतीने सुरू केलं.

सर्वप्रथम चीन, मग इटली, इराण आणि आता आखातातील भारतीयांना परत आणण्याचे काम सुरू होते.

याच ‘वंदे भारत’ मिशन अंतर्गत दुबईहुन भारतासाठी मार्गस्थ झालेले एयर इंडियाचे आयएक्स १३४४ हे बोइंग ७३७-८ विमान काल १९० भारतीयांना एयरलिफ्ट करणार होते.

सदर विमान कोझिकोडे आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरणार होते.

पण अनपेक्षितरित्या अतिमूसळधार पावसामुळे लँडिंगच्या वेळेस आलेल्या अडचणींमुळे विमानाचा अपघात झाला आणि दोन पायलट सहित एकूण १४ जणांचा या अपघातात मृत्यू झाला.

१२७ प्रवासी अजूनही हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत. या बोइंग विमानाचे कॅप्टन होते दीपक वसंत साठे आणि साहाय्यक वैमानिक अखिलेश कुमार.

 

thestatesman.com

 

सदर अपघातात या दोघांचाही मृत्यू झाला. एयर इंडियाचे कॅप्टन दीपक साठे हे भारतीय वायुसेनेचे निवृत्त अधिकारी होते. केवळ अधिकारी नसून डेकोरेटेड अधिकारी होते.

तब्बल २२ वर्ष त्यांनी वायुसेनेत सेवा बजावली. १९८१ मध्ये वायुसेनेत भर्ती झालेले साठे विंग कमांडर पदावरून २००३ साली निवृत्त झाले .

साठेंबद्दल अधिक सांगताना त्यांचे वायुसेनेत सहकारी राहिलेले ग्रुप कॅप्टन ख्रिस्तोफर सांगतात, ५८ व्या एनडीए बॅचचे ते टॉपर होते.शिवाय भारतीय वायुसेनेची मानाची तलवार (Sword of Honour) सुद्धा त्यांनीच पटकवलेली.

हिंदुस्थान एरोनॉटिकल लिमिटेडचे त्यांच्या काळातील सर्व विमाने यशस्वीपणे उडवण्यात त्यांचा हातखंडा होता.

एका टॉप रेटेड पायलटचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याची कल्पनासुद्धा करवत नाही. मुसळधार पावसामुळे लँडिंगचा अंदाज न आल्यामुळे अपघात झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

विमान लँडिंग बद्दल एयर ट्रॅफिक कर्मचारी सांगतात,

इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टम पायलटला एका विशिष्ट उंचीपर्यंत मार्गदर्शन करते आणि नंतर रनवे टच पॉईंट पाहणे आणि लँडिंगचा निर्णय घेणे पायलटवर अवलंबून असते.

 

liveupdates.hindustantimes.com

 

टचडाउननंतर विमान लँडिंगची प्रक्रिया पूर्ण करू शकेल की नाही हे पायलटला ठरवावे लागते.

दुसरी शक्यता वर्तवण्यात येते की,त्या आणीबाणीच्या प्रसंगात विमानाने लँडिंग योग्य प्रकारे केलेले पण कोझिकोडे विमानतळावर साठलेल्या पाण्यामुळे विमानाचे ब्रेक न लागल्यामुळे विमान भिंतीवर जाऊन धडकले आणि अपघात झाला असावा.

विशेष करून कोझिकोडे विमानतळावर पावसाळ्यात अतिरिक्त धावपट्टीची गरज ही नेहमी असते.

वायुसेनेचे अधिकारी सांगतात, अशा परिस्थिती मध्ये सिंगल सीटर जेट उतरवणे सोप्पे असते पण एयरबस किंवा बोइंग उतरवणे कठीण काम असते.

कॅप्टन साठे यांनी घेतलेला निर्णय आणि केलेली लँडिंग प्रवाशांच्या दृष्टीने घेतलेला योग्य निर्णय होता. ज्यामध्ये त्यांनी स्वतः प्राण गमावले पण प्रवाशांमध्ये जास्त जीवित हानी होऊ दिली नाही.

नागरी उड्डाण मंत्रालयाच्या प्रतिनिधीनी सांगितले की, कॅप्टन साठे यांनी भर पावसात विमान लँड करण्याचा निर्णय घेतला पण त्यांना तो टाळावा लागला. दुसऱ्या प्रयत्नात त्यांनी विमान लँड करण्याचा प्रयत्न केला पण त्यांचा अपघात झाला.

 

jobsvacancy.in

 

दीपक साठे २००३ साली वायुसेनेतून निवृत्त झाल्यावर ते एयर इंडिया मध्ये भरती झाले. विमान उडवण्याचे त्यांचे कौशल्य पाहून त्यांना सर्वप्रथम एयरबस ए ३१० वर नेमण्यात आले. ए ३१० हे मोठे प्रवासी वाहक विमान आहे.

कालांतराने त्यांना एयर इंडिया एक्स्प्रेस या एयर इंडियाच्याच दुसऱ्या सहाय्यक डिव्हिजन मध्ये शिफ्ट करण्यात आले. तिथे ते बोइंग ७३७ वर वैमानिक म्हणून कार्यरत होते.

एकूणच, दीपक साठे यांचा वायुसेनेतील आणि एयर इंडिया मधील अनुभव पाहता त्यांच्याकडून चूक झाल्याची शक्यता खुद्द एयर इंडिया नाकारते.

चौकशीतुन याबाबत तथ्य पूढे येईलच. कोझिकोडे विमानतळाची धावपट्टी ही त्या मानाने लहान असल्यामुळे पावसाळ्यात विमान उतरवताना नेहमीच अडथळे येतात.

त्यात अतिवृष्टी ही विमान उतरवण्यात अजून अडथळे निर्माण करते.

वायुसेनेत सेवा देणाऱ्या दीपक साठे यांनी वायुसेना सोडल्यानंतर सुद्धा आपली जबाबदारी सोडली नाही. स्वतःची आहुती देऊन त्यांनी मोठी जीवित हानी टाळली.

 

thenewsminute.com

 

तर अशा ह्या धाडसी आणि दुसऱ्यांसाठी प्राण पणाला लावणाऱ्या दीपक साठे ह्यांना इनमराठी टीमकडून श्रद्धांजली आणि त्यांच्या ह्या कार्याला आम्हा सर्व भारतीयांकडून सलाम!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version