जगाला अंधाराची भीती दाखवणारा हा प्रसिद्ध लेखक स्वतः अंधाराला सामोरा गेला की मात्र…!!!!!!!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
थरार, हॉरर, भयपट किंवा भयकथा किंवा नॉव्हेल बऱ्याच लोकांना वाचायला आवडतात!
थरार आणि भयपट सिनेमा म्हंटलं की आपल्यासमोर अल्फ्रेड हीचकॉक पासून रामसे बंधु आणि राम गोपाल वर्मा पर्यंत कित्येक दिग्दर्शकांचे चित्रपट आठवतात!
त्याप्रमाणेच आपण भयकथा, थरारनाट्य, क्राइम थ्रीलर कादंबऱ्या म्हंटलं की आपल्यासमोर नारायण धारप, रत्नाकर मतकरी ह्यांच्यासारखे भारतीय लेखक आठवतात किंवा मर्डर मिस्ट्री सोडवणारा शेरलॉक होल्मस आठवतो!
ह्यांच्याच यादीतला आणखीन एक दिग्गज लेखक म्हणजे स्टिफन किंग. स्टिफन किंग – अमेरिकेचा स्टार लेखक. ज्यांच्या हॉरर, सुपर नॅचरल, सस्पेन्स, क्राईम स्टोरी मुळे हॉलीवूड मधील किती तरी चित्रपट, टेलिव्हिजन सिरीज तयार झाल्या आहेत.
स्टिफन किंग यांच्या करिअर मधील पुस्तक आणि त्यांच्या विक्रीचे आकडे बघितले तर कोणीही आश्चर्यचकीत झाल्याशिवाय राहणार नाही. या ७२ वर्षीय लेखकाने आजपर्यंत ६१ कादंबरी लिहिल्या आहेत.
त्यापैकी ७ व्या कादंबरीच्या वेळी त्यांनी त्यांचं रिचर्ड बॅकमन हे टोपण नाव वापरलं होतं. त्या सोबतच त्यांनी २०० शॉर्ट स्टोरीज सुद्धा लिहिल्या आहेत.
आजपर्यंत त्यांची ३५० मिलियन म्हणजे जवळपास ३५ करोड पेक्षा जास्त पुस्तकं जगभरात विकली गेली आहेत.
इतर कोणी या आकड्यांच्या आसपास सुद्धा नाहीये आणि म्हणूनच त्यांना ‘किंग ऑफ हॉरर’ अशी सार्थ पदवी प्रेक्षकांनी आणि समीक्षकांनी दिली आहे.
स्टिफन किंग बद्दल खूप माहिती इंटरनेट वर उपलब्ध आहे. पण, एक गोष्ट ज्याबद्दल कायम बोललं जातं ती ही की, पूर्ण जगाला घाबरवणाऱ्या या लेखकाला स्वतः सुद्धा भीती वाटते.
त्याला राक्षस अस्तित्वात असतात असं एकेकाळी वाटायचं. १९८२ मध्ये स्टिफन किंग यांनी एक मुलाखत Henry Nevison या टेलिव्हिजन चॅनल ला दिली होती.
त्या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या व्यक्तिगत आयुष्याबद्दल सुद्धा माहिती दिली होती. त्यांनी हे पण सांगितलं होतं की, “राक्षस पळून जावेत म्हणून रात्री झोपताना मी लाईट सुद्धा चालू ठेवूनच झोपतो.”
या विधानाने त्यांचे चाहते, मीडिया सगळेच आश्चर्यचकित झाले होते.
लेखक, कवी हे लोक संवेदनशील असतात. पण त्यांच्या लिखाणातील काही पात्रांना त्यांनी व्यक्तिगत आयुष्यात सुद्धा एक जागा दिलेली असते या गोष्टीचं हे उदाहरण होतं.
अन्यथा, इतका यशस्वी, श्रीमंत माणूस कोणत्या गोष्टीला घाबरु शकतो हे आपल्याला पटत नाही.
लिखाणा सोबत स्टिफन किंग यांनी इतर क्षेत्रात सुद्धा नाव कमावलं आहे. स्टिफन किंग हे त्यांच्या पत्नी सोबत मिळून एक रेडिओ स्टेशन चालवतात. या रेडिओ स्टेशन चं नाव “Stephen King’s Rock Station” असं आहे.
स्टिफन किंग यांना बेसबॉल च्या मॅचेस बघण्याची सुद्धा प्रचंड आवड आहे.
त्यांच्या एका कादंबरी मध्ये त्यांनी Tom Gordon या बेसबॉल प्लेअर बद्दल सुद्धा लिहिलं होतं आणि Fever Pitch या बेसबॉल वर तयार झालेल्या सिनेमात त्यांनी एक छोटा रोल सुद्धा केला होता.
स्टिफन किंग यांनी त्यांच्या आयुष्यात सुद्धा भीतीदायक प्रसंग जगले आहेत. त्यांच्या स्वतःच्या कार अपघाता सोबतच त्यांनी त्यांच्या एका जवळच्या मित्राचा एका ट्रेनच्या धडकेने मुत्यू होताना बघितलं आहे.
ह्या घटनेला अनुसरून त्यांनी त्यांच्या ‘The Body’ या पुस्तकात एक प्रसंग लिहिला आहे ज्यावर आधारित Stand By Me या चित्रपटात एक सीन दाखवण्यात आला आहे.
संगीत क्षेत्रात सुद्धा स्टिफन किंग यांनी योगदान दिलं आहे. त्यांनी काही म्युजिकल प्ले लिहिले आहेत. लेखक मंडळींचा मिळून एक म्युजिक बँड मध्ये स्टिफन किंग हे गिटार वादक म्हणून सहभाग नोंदवत असत.
१९९२ ते २०१२ पर्यंत या बँड ने वर्ल्ड टूर केली होती.
स्टिफन किंग यांना १९८० च्या दशकात ड्रग्स आणि दारू ची सवय लागली होती. एका इंटरव्ह्यू मध्ये त्यांनी असं सांगितलं होतं की, Cujo ही अशी कादंबरी आहे जी मी कधी लिहिली हे माझं मलाच आठवत नाही.
या गोष्टीची त्यांना खंत आहे की, ते तो पूर्ण पुस्तक लिखाण प्रवास विसरले आहेत. त्यांच्या परिवाराच्या साथीने त्यांनी या व्यसनांवर मात केली आणि आज ते नॉर्मल आयुष्य जगत आहेत.
स्टिफन किंग यांनी सुरू केलेली लिखाणाची परंपरा ही अविरत सुरू आहे. त्यांची पत्नी यांच्या सुद्धा कित्येक कादंबरी प्रकाशित झाल्या आहेत.
त्यांचा मोठा मुलगा Joe याने नुकतंच Joe Hill या टोपण नावाने एक बेस्ट सेलर हॉरर पुस्तक लिहिलं होतं.
स्टिफन किंग यांचा लहान मुलगा Owen यांनी सुद्धा शॉर्ट स्टोरीज लिहिल्या आहेत आणि वडिलांसोबत Sleeping Beauties या कादंबरी चं लिखाण केलं आहे.
आपल्या कलेच्या इतक्या प्रेमात असणारे लोकच त्यांच्या क्षेत्रात इतकी मोठी मजल मारू शकतात हे स्टिफन किंग यांच्या जीवन प्रवासातून लक्षात येतं.
त्यांचा हा प्रवास असाच सुरू राहो आणि लोकांना ते असेच घाबरवत राहो हीच सदिच्छा. त्यासाठी रोज रात्री लाईट चालू ठेवून झोपण्याची तयारी सुद्धा स्टिफन किंग यांचे चाहते नक्कीच दर्शवतील.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.