' प्रोटीनची कमतरता ठरू शकते फारच गंभीर; या ७ गोष्टींकडे अजिबात दुर्लक्ष करू नका! – InMarathi

प्रोटीनची कमतरता ठरू शकते फारच गंभीर; या ७ गोष्टींकडे अजिबात दुर्लक्ष करू नका!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

===

जसं कोरोनाचं संकट जगावर घोंगावू लागलं, तस प्रत्येक घराघरात आरोग्याविषयी चर्चा रंगू लागल्या. यंदा जवळपास वर्षभर या चर्चा रंगलेल्या आपण पाहतोय.

अगदी घरगुती काढ्यांपासून ते आर्सेनिकच्या गोळ्यांपर्यंत प्रत्येकजण कोरोनाशी लढण्यासाठी आपली नवीन थिअरी मांडत होता.

 

aayurvedic drink inmarathi1

 

precaution is better than cure या उक्तीप्रमाणे कोरोना झाल्यावर औषधोपचार करण्यापेक्षा आधीच प्रतिबंधात्मक उपचारांकडे धाव घेतली.

अनेक डॉक्टरांनी व्हिटॅमीन्स, प्रोटीन्स युक्त औषधांची यादी हाती दिल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या. व्हिटॅमीन्स, प्रोटीन्स आपल्या शरीरात इतकी महत्वाची भुमिका बजावतात हे अनेकांच्या प्रथमच लक्षात आलं.

कारण विटॅमिन्स आणि प्रोटीन्स या शरीरातील घटकांकडे यापुर्वीपर्यंत सामान्यांकडून कायमच दुर्लक्ष केलं जायचं. हाच अनुभव तुमच्यापैकी अनेकांना आला असेल.

 

vitamin b12 inmarathi

 

आपलं सौंदर्य खुलवण्यासाठी हजारो रुपये खर्च करताना शरीराचं अंतर्गत पोषण करण्याकडे आपलं दुर्लक्ष होतंच हे मान्य करायला हवं.

शरीराची वाढ निकोप व्हावी, त्याला पोषणमुल्य मिळावी यासाठी प्रोटीन्स अर्थात प्रथिनांची नितांत गरज असते.

अनेकांना त्यांच्या सकस आहारातून प्रोटीन्सचा भरपूर साठा मिळतो, मात्र अनेकांच्या आहाराचं गणित न जुळल्याने प्रोटीन्ससाठी औषधं, प्रोटीन्स बार यांच्यावर अवलंबून रहावं लागतं.

प्रोटीन्स मिळविण्याचे अनेकविध पर्याय असले, तरी आपल्या शरीरात प्रोटीन्सची कमतरता आहे हे ओळखायचं कसं? हा प्रश्न तुम्हाला पडला असेलच.

 

protein diet inmarathi

 

मात्र त्यासाठी कोणत्याही खर्चिक टेस्ट किंवा वारंवार डॉक्टरांकडे तपासणी करण्यापेक्षा आपलं शरीरच त्यासाठी आपली मदत करतं.

विश्वास बसत नाहीये? मग शरीरातील प्रोटीन्सचं प्रमाण कमी झाल्यानंतर आपलं शरीर आपल्याला कोणकोणत्या प्रकारचे संकेत देतं हे पाहणं अत्यंत महत्वाचं आहे. सध्याच्या काळाची ती गरजच आहे असं म्हणा ना!

शरीराच्या या संकेतांकडे दुर्लक्ष करणं म्हणजे स्वतःचंच नुकसान करून घेणं.

चला तर, प्रोटीन्स घटल्याबाबतची धोक्याची घंटा देणारे शरीराचे हे संकेत…

 

१.  गळणारे केस

सध्याच्या धावपळीच्या जगात केसगळती ही समस्या सर्रास दिसून येते.

 

indian girl hair fall inmarathi

 

तरुणांपासून जेष्ठांपर्यंत प्रत्येकाकडून केसगळतीबाबत तक्रार केली जात असली, तरी ३० ते ५५ या वयोगटातील लोकांना सर्वाधिक त्याचा त्रास सहन करावा लागतो.

पाण्यातील दोष किंवा हार्मोनल बदल यांमुळे केसगळती होऊ शकते, मात्र यापैकी कोणतेही कारण नसतानाही तुम्हाला मोठ्या प्रमाणात केसगळतीला सामोरं जावं लागत असेल तर मात्र तुम्ही वेळीच सावध होणं गरजेचं आहे.

केसांचा संबंध प्रोटीन्सशी असल्याने शरीरातील प्रोटीन्सची पातळी घटताच त्याचा थेट परिणाम केसांवर होतो.

 

hair problem inmarathi

 

यामध्ये केस गळतीसह केस पातळ होणं, केसांचा रंग अचानक बदलण यांसारखी लक्षणं दिसून येतात.

 

२. नखं / त्वचा यांच्यात बदल

केसांसह तुम्हाला त्वचा आणि नखांमध्येही बदल जाणवत असले तर हा देखील महत्वाचा संकेत आहे.

यामध्ये कोणत्याही कारणास्तव त्वचेवर लाल चट्टे दिसून येणं, त्वचा कोरडी होणं अशी लक्षणं दिसतात.

 

 

नखांची काळजी घेत असताना नख अचानक तुटत असेल अथवा त्यावर पांढ-या रंगाचा थर जमा होत असेल तर तातडीने डॉक्टरांची भेट घ्या.

 

nails inmarathi

 

३. स्नायुंची हानी

दंड किंवा मांडीजवळ असलेले स्नायु अर्थात मसल्स या जागी प्रोटीन्स सर्वाधिक प्रमाणात साठवले जातात.

जर शरीरातील प्रोटीन्सचं प्रमाण खालावलं तर या स्नायुंवर त्याचा सर्वाधिक परिणाम होतो.

 

musscles inmarathi

 

या स्नायुंचे पोषण योग्यरितीने होत नसल्याने त्यांची हानी होत असल्याचं तुमच्या लक्षात येत असेल तर हे लक्षण चांगलं नाही.

मसल्सचं प्रमाण घटत असेल किंवा त्यात वेदना जाणवत असतील तर त्याबाबत अजिबात दुर्लक्ष करु नका.

 

४.  हाडं फ्रॅक्चर होण्याची शक्यता

शरीरातील केवळ स्नायुच नव्हे, तर हाडांनाही यामुळे धोका निर्माण होऊ शकतो.

शरीराला योग्य प्रमाणात प्रोटीन्सचा पुरवठा होत नसेल, तर त्यामुळे हाडं फ्रॅक्चर होण्याचा धोका वाढतो.

 

fracture inmarathi

 

हाडांमध्ये प्रोटीन्सचं प्रमाण अधिक असल्याने खालावलेल्या प्रोटीन्स पातळीमुळे हाडं ठिसूळ होतात. अशावेळी कोणताही लहानसा अपघात किंवा अनवधानाने लागलेला फटकाही फ्रॅक्चरसारखं मोठं संकट निर्माण करतात.

 

५. रोगप्रतिकारशक्तीवर मात

कोरोनाच्या संकटात आपल्या शरीरातील रोगप्रतिकारशक्ती किती महत्वाची आहे हे प्रत्येकालाच समजलंय.

 

Immunity-inmarathi

 

अनेकांनी या रोगप्रतिकारशक्तीच्या बळावर कोरोनाशी सुरु असलेलं अवघड युद्धही जिंकलं. कोरोनाच नव्हे तर कोणत्याही विकारावर मात करायची असेल तर रोगप्रतिकारशक्ती आपली मदत करते.

मात्र शरिरातील प्रोटीन्सची खालवणारी पातळी थेट या रोगतप्रतिकारशक्तीवर घाला घालते.

वेगाने कमी होणाऱ्या प्रतिकारशक्तीमुळे कोणत्याही प्रकारचा व्हायरस, व्हायरल इन्फेक्शन किंवा अन्य कोणत्याही प्रकारच्या आजाराची बाधा तुम्हाला इतरांपेक्षा त्वरित होण्याचा धोका आहे.

 

corona virus fight inmarathi

 

त्यामुळे सर्दी, खोकला यांपासून ते इतर कोणत्याही इन्फेक्शनपर्यंत कोणतीही लक्षणं वारंवार दिसून येत असतील, अथवा एखादा आजार शरीरात दिर्घकाळ टिकून राहिला असेल तर प्रोटीनची संख्या तपासणं गरजेचं आहे.

 

६.  फॅटी लिव्हर

फॅटी लिव्हर हे प्रोटीन्सच्या कमतरतेचं आणखी एक महत्वाचं आणि गंभीर लक्षण आहे.

लिव्हर अर्थात यकृताजवळ जास्त प्रमाणात फॅट साचत असेल तर वेळ न दवडता डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.

 

fatty liver inmarathi

 

लिव्हरजवळ साचणारे अतिरिक्त फॅट अथवा चरबी ही लिव्हरच्या कार्यप्रणालीसाठी धोक्याची आहे, त्यामुळे भविष्यात मोठं संकट ओढवण्यापुर्वीच याबाबत तपासणी करून उपचार सुरु करा.

 

७.  मुलांची खुंटणारी वाढ

खूप प्रयत्न करूनही माझ्या मुलाची उंची वाढत नाही किंवा माझ्या मुलीची तब्बेत सुधारत नाही अशा तक्रारी तुम्ही अनेकदा ऐकत असाल.

कदाचित तुमच्या घरीही अशा प्रकारच्या समस्या असतील.

 

shorter gilr inmarathi

 

योग्य वयात आपलं मूल निरोगी आणि सुदृढ असावं ही कोणत्याही पालकांची माफक अपेक्षा असते. त्यासाठी पालक सगळे प्रयत्न करतात.

असं असूनही अनेक मुलांची वाढ ठराविक वयात खुंटते. काहींचे वजन वाढत नाही तर काहींची उंची, तर काही मुलं वारंवार आजारी पडतात.

अशावेळी त्या मुलाच्या शरीरात प्रोटीन्सचं प्रमाण कमी असण्याची शक्यता असते.

मात्र पालकांकडून नेमक्या त्याच गोष्टीकडे दुर्लक्ष केल्याने ही समस्या वाढत जाते.

शरीराला प्रोटीन्स पुरवणारी औषधं, सप्लिमेंट्स मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असली तरी अन्नाव्दारे केला जाणारा प्रोटीन्सचा पुरवठा सर्वाधिक चांगला मार्ग आहे.

 

protien inmarathi

 

प्रोटीन्सचं शारीरिक महत्व हे त्या प्रथिनामध्ये असलेल्या ऍमिनो ऍसीड वरून ठरवता येते. दूध, मासे, मांस, सोयाबीन हे पदार्थ अतिशय महत्त्वाचे आहेत.

केवळ मांसाहारातूनच प्रोटीन्स मिळतात हा अनेकांचा गैरसमज आहे, मात्र प्रत्यक्षात सोयाबीन, पनीर, भाज्या, कडधान्य यांसारख्या अनेक पदार्थांतून प्रोटीन्सचा साठा मोठ्या प्रमाणावर मिळतो.

 

Indian_Protein_Diet_Plan InMarathi

 

त्यामुळे भविष्यातले धोका टाळायचे असतील तर आहारातून प्रोटीन्सचा साठा वेळोवेळी आणि योग्य प्रमाणात मिळत राहील याची काळजी घ्या.
===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?