' इतिहासातली एक विचित्र घटना, जेव्हा लोकं नाचून नाचून थकून मरायला लागले! – InMarathi

इतिहासातली एक विचित्र घटना, जेव्हा लोकं नाचून नाचून थकून मरायला लागले!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

गेली २ वर्ष आपण जवळजवळ कशीबशी काढली, संपूर्ण जगभरात कोरोना नावाचे थैमान सुरु होते. या रोगाची  तीव्रता इतकी होती की चीनमधील एका शहरात या रोगाची उत्पत्ती झाली आणि पाहता पाहता हा रोग संपूर्ण जगात पसरला. या रोगाचे इतके भयंकर परिणाम होते की थेट लागण झालेल्या व्यक्तींना थेट मृत्यूनेच गाठले होते.

 

corona featured 2 inmarathi

 

महामारी ज्यालाच आपण पॅनडेमीक म्हणतो, ही टर्म काय नवीन नाही. स्वातंत्र्यपूर्व काळात प्लेगची महामारी, तसेच नंतर इबोलाने परदेशात घातलेलं थैमान हे सगळं आपण पाहिलेलं आहे!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

हे ही वाचा प्लेग, रँड, चापेकरबंधू आणि टिळक यांच्या बदनामीचे नवे षडयंत्र!

एकंदर साऱ्या जागाचा, लोकांचा जीवनाकडे बघायचा दृष्टिकोनच या महामारीमुळे बदलल्याचे आपल्याला दिसत आहे!

पण आज आम्ही तुम्हाला अशाच एका विचित्र एपिडेमीक बद्दल सांगणार आहोत. एपिडेमीक म्हणजे पॅनडेमीकच्या एक लेवल खाली, पॅनडेमीक म्हणजे वैश्विक महामारी तर एपिडेमीक म्हणजे साथरोग.

रोमन सम्राज्यातलं Strasbourg शहर जे सध्याच्या फ्रांस मध्ये येतं त्या शहरात १५१८ ह्या साली लोकं नाचण्यामुळे मृत्यूमुखी पडायला लागले होते. रोमन इतिहासात ह्याला डान्सिंग एपिडेमीक किंवा डान्सिंग मॅनीया/प्लेग असे देखील म्हंटले जाते!

 

dancig plague inmarathi

 

साधारण जुलै महिन्याच्या दरम्यानच ह्या एपिडेमीकला सुरुवात झाली जेंव्हा शहराच्या रस्त्यावर एक महिला अचानक नाचायला लागली. असं म्हंटलं जातं की ती सलग ५ ते ६ दिवस नाचत राहिली!

हळू हळू आणखीन ३४ लोकं तिच्या ह्या नाचात सामील झाले आणि बघता बघता सगळं शहरच वेड्यासारखं नाचायला लागलं. ह्या एका महिलेच्या नाचण्यामुळे प्रथम काही तरुण मुलींचा घोळका हयात सहभागी होऊ लागला.

पण जसंजसं परिस्थिति आणखीन गंभीर होत गेली तसतसं ही गोष्ट वाढत गेली आणि त्या शहरातले मॅजिस्ट्रेट पासून कित्येक सामान्य लोकं सुद्धा ह्या साथरोगाला बळी पडायला लागले!

ही परिस्थिति का आणि कशी निर्माण झाली? आणि नंतर अचानक हा प्लेग कसा थांबला? ह्याचं नेमकं उत्तर कोणालाच ठाऊक नाही कारण त्यावेळेस मेडिकल सायन्सने इतकी प्रगती केलेली नव्हती!

लोकं मरु लागले, काही लोकं कित्येक दिवस बेशुद्ध असायचे, आणि ह्यावर तिथले डॉक्टर्स सुद्धा काहीच उपाय करू शकत नव्हते! आणि हा नाच इतका भयानक होता की लोकं स्ट्रोक तसेच थकवा ह्यामुळे मृत्युमुखी पाडायला लागले.

तिथल्या काही डॉक्युमेंट्स च्या आधारे त्या शहरात दिवसा १० ते १५ लोकं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्युमुखी पडत असल्याची नोंद केली गेलेली आहे!

 

dance mania inmarathi

 

प्रख्यात अभ्यासक जॉन वॉलर ह्यांच्या “A Time to Dance, a Time to Die: The Extraordinary Story of the Dancing Plague of 1518” या पुस्तकात ह्या एपिडेमीक बद्दल तुम्हाला रेफरन्स सापडतील. 

ह्या साथरोगाच्या मागे २ थिअरीज आहेत, काही लोकांचे म्हणणे आहे की अन्नातून झालेल्या विषबाधेमुळे ही परिस्थिति उद्भवली. पाव बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या धान्यामधून काही अंमली पदार्थ लोकांच्या खाण्यात आल्याने लोकं नाचायला लागले!

तर जॉन वॉलर यांच्या मते ह्यामागे खाण्याच्या माध्यमातून झालेली विषबाधा हे कारण नसून मास सायकॉलॉजीकल डिसऑर्डर हे कारण होते!

त्या शहरात त्या काळात असलेली राजवट, सामान्य जनतेवर होणारा अन्याय, त्यांच्यावर आलेली उपाशी राहण्याची परिस्थिति, गरिबी ह्या सगळ्यातून त्या लोकांच्या मानसिकतेत बदल होऊन ती लोकं असं अघोरी नाचू लागले असेही त्यांचे म्हणणे आहे!

अशी मानसिक स्थिती निर्माण होण्यामागे लोकांवर असलेला मानसिक तणाव हा देखील कारणीभूत असतो असेही त्यांनी म्हंटले आहे!

खरंतर विषबाधे पेक्षा जॉन वॉलर ह्यांची सायकॉलॉजीकल डिसऑर्डर ची थेअरी खूप लोकांना पटली. ईस्ट आफ्रिका मधील टांझानिया ह्या देशात १९६० साली असाच एक साथरोग पसरला होता ज्याला “लाफिंग एपिडेमीक” असं म्हंटलं गेलं.

 

laughing epidemic inmarathi

 

आणि त्या संदर्भात सुद्धा मानसिक आजाराचेच दाखले दिले गेले म्हणून ही थेअरी प्रमाण मानली जाते!

बरं ह्या डान्सिंग प्लेगची ही फक्त एकच घटना नाही, १६ व्या शतकात स्वित्झर्लंड मध्ये देखील ह्या आजाराने डोकं वर काढलं होतं. शिवाय १९७३ ते १९७८ ह्या काळात सिंगापूर इथल्या एका फॅक्टरी मध्ये देखील हा डान्सिंग प्लेग आउटब्रेक झाल्याची नोंद घेतलेली आहे!

अर्थात ह्या प्लेगचं ठोस असं कारण कुणीच सांगू शकलेलं नाही. वेगवेगळ्या विषयावर अभ्यास करणारे वैज्ञानिक तसेच तज्ञ मंडळी ह्यांनी ह्या बाबत स्वतंत्र मतं मांडलेली आहेत.

पण या सगळ्यामागे मानसिक आजाराचं कारण हेच बऱ्याच थेअरीज मधून समोर आलं आहे!

 

dancing plague 2 inmarathi

 

लोकं नैसर्गिक पद्धतीने मृत्युमुखी पडतात किंवा एखाद्या अपघातात, किंवा एखाद्या शॉकमुळे मृत्युमुखी पडतात. पण मानसिक तणावामुळे लोकं बेभान नाचून मरण पावतात हे ऐकायला विचित्र वाटत असलं तरी ते घडून गेलेलं आहे!

तुमच्याही माहितीत अशा आणखीन कोणत्या घटना असतील तर त्या नक्की आमच्याबरोबर शेयर करा!

===

हे ही वाचा कोरोनापेक्षाही भयंकर अशा `या’ बिन चेहऱ्याच्या शत्रूने यापुर्वी जगावर आक्रमण केलं होतं

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?