आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
अभिनेता सुशांत सिंग राजपूतने त्याच्या राहत्या घरी आत्महत्या केली या घटनेला आता जवळपास दीड महिना झाला. सुशांतचं असं अचानक जाणं सगळ्यांनाच खूप धक्कादायक होतं.
स्वतःच्या हिमतीवर हिंदी मालिकेतून पदार्पण करणाऱ्या या कलाकाराने अल्पावधीतच बॉलीवूडमध्ये स्वतःचं वलय निर्माण केलं होतं. त्यामुळे त्याच्या अनपेक्षित जाण्याने सगळ्यांच्याच मनाला चटका लागला.
अचानक असं काय घडलं, की त्याला आत्महत्येचं पाऊल उचलावं लागलं? इतका कसला मानसिक त्रास होता? हे प्रश्न तुमच्याआमच्यासारख्या सगळ्यांनाच पडू लागेल आणि यातून सुरू झाला आरोप- प्रत्यारोपांचा भीषण खेळ.
बॉलीवूडमधल्या नेपोटीझमपासून अगदी त्याची प्रेयसी रिया चक्रवर्ती, तिचे कुटुंबीय या सगळ्यांवर ताशेरे ओढले गेले. राजकारण्यांपासून कलाकारांपर्यंत सगळ्यांनी या प्रकरणात उडी घेतली.
केंद्राच्या समतीने या प्रकरणाचा तपास “केंद्रीय अन्वेषण विभागाकडे” देण्यात आला. सीबीआयने तपास हाती घेतल्यानंतर त्याच्या “विशेष चमू”ने सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
या सहा जणांमध्ये रियासह, तिचे वडील, भाऊ, मैत्रीण, रियाचा आणि सुशांतचा व्यवस्थापक यांचा समावेश आहे.
रिया, तिचा भाऊ आणि सुशांत यांनी मिळून तीन कंपन्या स्थापन केल्या होत्या. या व्यवहारात घोटाळे झाल्याचा संशय ईडीला आहे. त्यानुसार त्यांना समन्स देखील पाठवण्यात आले होते.
सुशांत सिंगच्या खात्यातून १५ कोटी रुपये काढल्याचा आरोप रियावर करण्यात आला होता. सुशांतचे वडील यांनी रियावर अनेक आरोप केले होते.
“घरातून जाण्यापूर्वी रियाने घरातील काही वस्तु चोरल्या, याशिवाय ती सुशांतला धमक्या सुद्धा देत असे” अशी तक्रार सुशांतच्या वडिलांनी केली होती.
या सगळ्याच तपास सीबीआयने हाती घेतला असून, सीबीआयने नेमलेले अधिकारी पाहता या प्रकरणाचा तपास नक्कीच लागेल.
सुशांतच्या मृत्यू प्रकरणाचा तपास “विशेष” पथकाद्वारे करण्यात येणार आहे. याच पथकाने पूर्वी ऑगस्टा वेस्टलँड घोटाळा आणि विजय मल्ल्याविरोधातील बँक घोटाळ्याचा तपास केला होता.
नीरव मोदी घोटाळा प्रकरणाचा तपास करण्याची जबाबदारी देखील या पथकाकडे होती.
जाणून घेऊया, या विशेष पथकातील अधिकाऱ्यांबद्दल :
या Special Investigation Team (SIT) च्या नेतृत्वाची जबाबदारी आयपीएस अधिकारी मनोज शशिधर यांच्यावर सोपवण्यात आली आहे. त्याच्यासोबत Investigating Officer म्हणून अनिल यादव, पोलीस उपनिरीक्षक (Deputy Inspector General of Police – DIG) गगनदीप गंभीर असणार आहेत.
आयपीएस मनोज शशिधर :
या विशेष चमूचे मुख्य आहेत, आयपीएस मनोज शशिधर. १९९४ गुजरात कॅडर बॅचचे ते अधिकारी आहेत. अतिशय इमानदार- निडर आणि धारदार व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे.
याच वर्षी म्हणजे, जानेवारी २०२० मध्ये सीबीआयचे जॉईंट डिरेक्टर म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या विश्वासातील अधिकाऱ्यांमध्ये मनोज शशिधर यांची गणना होते.
सीबीआय पूर्वी मनोज शशिधर गुजरात स्टेट इंटेलिजन्स ब्यूरोमध्ये अॅडिशनल डीजी म्हणून कार्यरत होते. वडोदरामध्ये पोलीस कमिशनर, अहमदाबादच्या क्राईम ब्रांच मध्ये डीसीपी देखील होते.
अहमदाबादमध्ये ते जॉइंट कमिशनर पदावर देखील कार्यरत होते.
त्यांच्या कामाचा इतिहास लक्षात घेता, सुशांत सिंग प्रकरणाची कसून चौकशी त्यांच्याकडून होईल यात शंका नाही.
आयपीएस अधिकारी गगनदीप गंभीर :
गगनदीप गंभीर यांनी आतापर्यंत अनेक मोठ्या घोटाळ्यांचा तपास केला आहे. त्या २००४च्या गुजरात कॅडरच्या अधिकारी आहेत. त्यांचं प्राथमिक शिक्षण बिहारच्या मुजफ्फरपुर शहरात झालं.
त्या लहानपणापासूनच अतिशय हुशार आणि मेहनती होत्या. दहावीनंतर त्यांनी पंजाब युनिव्हर्सिटीमधून आपलं शिक्षण पूर्ण केलं. तिथेही त्या टॉपर होत्या.
साधारण दिड वर्षांपूर्वी त्यांची बदली सीबीआयमध्ये झाली. या आधी त्यांनी अनेक महत्त्वाच्या घोटाळ्यांचा तपास केला आहे.
उत्तर प्रदेशमधील अवैध खाण घोटाळा तसेच बिहार मधील सृजन घोटाळा यासारख्या मोठ्या प्रकरणाचा तपास त्यांनी केला आहे. पत्रकार उपेंद्र राय केसचा तपास देखील त्यांनी केला आहे.
या दोघांशिवाय Investigating Officer म्हणून अनिल यादव यांची नेमणूक सीबीआयने केली आहे. त्यांनी देखील या आधी अनेक महत्त्वाच्या घोटाळ्यांचा तपास केलं आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून रोज वर्तमानपत्रांमध्ये या विषयीच्या अनेक बातम्या येत आहेत. सीबायआयची विशेष टीम बघता “नेमकं काय घडलं?” या सगळ्यांना पडलेल्या प्रश्नाचं उत्तर आता मिळेल अशी अपेक्षा आहे.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.