आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
कोरोना आला तसा आपल्या सगळ्यांच्या जीवनात एक बदल झालेला आहे. वारंवार हात धुणे, सॅनिटायझरचा वापर करणे, चेहऱ्यावर मास्क लावणे, सोशल डिस्टंसिंग पाळणे इत्यादी गोष्टी आपण आता करतोच आहोत.
पण त्याचबरोबर इतरही अनेक गोष्टी आपण पाळत आहोत. कुठल्याही गोष्टीला हात लावणे टाळत आहोत. गर्दीची ठिकाणे टाळत आहोत. ज्यांची ऑफिसेस सुरू झाली आहे तेही आता काळजी घेत आहेत.
याशिवाय घरात आणलेलं सामानही आपण व्यवस्थित सॅनिटाईझ करून घरात घेत आहोत. तरीही आपल्या मनात अनेक शंकाकुशंका निर्माण होत आहेत.
या शंका मनात निर्माण व्हायचं कारण म्हणजे भीती. कोणत्याही गोष्टींवर कोरोनाचे विषाणू असू शकतात ही भती प्रत्येकाच्या मनात आहे.
म्हणूनच कोणतेही खाद्यपदार्थ खाण्याआधी ते स्वच्छ करून, धुवून, ऊकडूनच खाल्ले पाहिजेत. म्हणूनच असे पदार्थ कसे हाताळावेत याविषयी शंका निर्माण होत आहेत.
त्यापैकीच एक म्हणजे दुधाची पिशवी कशी हाताळावी? दूध प्यावे की नाही? लहान मुलांना दूध द्यावे की नाही? या शंका आपल्या मनात येत आहेत.
कारण पूर्वीच्या अभ्यासानुसार, साध्या कार्डबोर्डवर कोरोनाचा विषाणू २४ तास, तर प्लास्टिक वर तो तीन दिवस राहू शकतो असा निष्कर्ष निघालेला आहे. म्हणूनच अशा शंका मनात उत्पन्न होत आहेत.
दूध हे पोषण मिळण्यासाठी आवश्यक पदार्थ आहे आणि ते आपल्या भारतात मुबलक प्रमाणात मिळते. यामुळे या कोरोनाच्या काळातही दूध पिणे आवश्यक आहे.
उलट हळद घालून घेतलेले दूध तर सध्या इम्युनिटी वाढवण्यासाठी उपयुक्त आहे. म्हणूनच दूध घेतलेच पाहिजे.
फक्त ते दूध घरी कसे आणायचे? ते आणताना कोणती काळजी घ्यायची? यासंबंधीच्या काही गाईडलाईन्स एफ एस एस ए आय (fssai) म्हणजेच ‘फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडिया’ या संस्थेने सांगितल्या आहेत.
जर त्यांचे तंतोतंत पालन केलं तर कोणताही धोका नाही.
दुधाची पिशवी घरात आणताना घ्यावयाची काळजी :
जर दुधाची पिशवी घरापर्यंत येणार असेल तर, ती आणून देणाऱ्या व्यक्तीने मास्क घातला आहे की नाही हे पाहावे. सोशल डिस्टंसिंग पाळूनच दुधाची पिशवी घरात घ्यावी.
पिशवी घरात आणल्या आणल्या लगेच दूध भांड्यात काढू नये.
दुधाची पिशवी सिंकमध्ये पाण्याखाली स्वच्छ धुऊन घ्यावी.
दूधाची पिशवी धुऊन झाल्यावर सिंकही लगेच साबण लावून स्वच्छ धुवावा.
पिशवी धुतल्यावर स्वतःचे हातही धुऊन घ्यावेत.
दुधाची पिशवी थोडावेळ तशीच ठेवावी जेणेकरून त्यावरील पाणी वाळून जाईल.
पण जर लगेच दूध हवे असेल, तर पिशवी स्वच्छ कपड्याने पुसून घेऊन, कोरडी करून मगच दूध भांड्यात काढावे. जेणेकरून पिशवी वर राहिलेले पाणी दुधात पडणार नाही ही काळजी घ्यावी.
जर थोड्यावेळाने दूध काढायचे असेल तर आधी आपले हातही स्वच्छ धुवावेत. नंतरच दूध भांड्यात काढावे.
त्यानंतर आपले हात परत एकदा साबणाने धुऊन मगच दूध तापायला ठेवावे.
जर दूध आणायला बाहेर जाणार असाल, तर चेहऱ्यावर मास्क लावून बाहेर जावे.
दुकानामध्ये दूध विक्रेत्याने देखील मास्क लावला की नाही हे पहावे. सोशल डिस्टंसिंग पाळून दुधाची पिशवी घ्यावी.
जर दुकानांमध्ये गर्दी असेल किंवा रस्त्यावर गर्दी असेल, तर घरी आल्यावर लगेच गरम पाण्याने आंघोळ करावी. त्यानंतरच घरातील इतर वस्तूंना हात लावावा.
आणलेल्या सामानाची पिशवी लगेचच किचन मध्ये नेऊन ठेवू नये. ही सामानाची पिशवी देखील डीसिन्फेक्टींग करून घ्यावी.
दुधाची पिशवी घरात आणल्या आणल्या लगेच फ्रीजमध्येही तशीच ठेऊ नये. ती स्वच्छ धुवून, पुसून मगच फ्रीजमध्ये ठेवावी.
दुधाचा वापर करताना ते पूर्ण उकळलेले असलेले घ्यावे. असे गरम दूध घेण्याने कोणताही धोका उत्पन्न होत नाही.
आताच्या काळात कोरोनामुळे कच्चे दूध घेणे टाळावे. खबरदारी घेणे आवश्यक आहे.
बाहेरून दूध आणताना आपण आपला मोबाईल जर बाहेर काढला असेल आणि दुकानाच्या काऊंटरवर ठेवला असेल, तर तो मोबाईल देखील घरी आल्यावर सॅनिटाईझ करणे गरजेचे आहे.
या अशा छोट्या-छोट्या गोष्टींची काळजी घेणे सध्या खूप गरजेचे बनले आहे. कारण एकतर आता पाऊस देखील पडत आहे, त्यामुळे आधीच वातावरण दूषित झाले आहे. इतरही अनेक आजारांची साथ पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
त्यात अजूनही कोरोनावर कोणताही ठोस उपाय सापडलेला नाही. म्हणूनच या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे.
—
हे पण वाचा : कोरोना : बाहेरून आल्यावर आपण तर अंघोळ करतो, पण या ९ वस्तु स्वच्छ करणं आहे जास्त गरजेचं
—
त्याचबरोबर काहीजण अतिप्रमाणात साबण, सॅनिटायझर वापरत आहेत. अगदी फळं, भाज्या धुवायला देखील साबण लावत आहेत. परंतु यामुळे केमिकल आपल्या शरीरात जाण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही.
यासाठी शासनाने ज्या गाईडलाईन्स दिल्या आहेत त्या पाळल्या पाहिजेत. या गोष्टींचे पालन केल्यास कोरोना विषाणूची बाधा होण्याची शक्यता कमी होते.
===
महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.