भीक मागून केलेली कमाई, या “करोडपतींच्या” संपत्तीचा आकडा वाचून थक्क व्हाल!!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
जगाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात एक फरक तुम्हाला नेहमी पाहायला मिळेल तो म्हणजे श्रीमंत आणि भिकारी. दोन टोकाचे दोन शब्द. दोन टोकाच्या दोन व्यक्ती.
आपल्या इथे मिडल क्लास किंवा हायर मिडल क्लास हे प्रकार आत्ता आले आहेत. पण तरीही श्रीमंत आणि भिकारी हा फरक काही केल्या कमी होत नाही, ती दरी काही भरून निघणार नाही!
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
लहानपणापासून खेळत आलेल्या पत्त्यांच्या भिकार सावकार ह्या खेळापासूनच आपल्यावर श्रीमंत गरीब ह्याचे संस्कार होतात त्यात कुणाला दोष देण्यात अर्थ नाही. हा प्रकृतीचा नियम आहे!
एकाचं घर सुख समृद्धीने भरलेलं असतं तेंव्हाच एखाद्याच्या घरात एक वेळ जेवणाची सुद्धा भ्रांत असते.
करोडपती – लखपती कंगाल झालेले भरपूर पाहिले असतील. पण भीक मागून दिवस ढकलणारे लखपती/करोडपती पाहिले आहेत का?
शक्यतो मंदिर किंवा इतर धार्मिक स्थळे, ट्राफिक सिग्नल, बाजार सारख्या गर्दीच्या ठिकाणी भिक्षा ग्रहण करून आपली उपजीविका करणारे आपण बऱ्याचदा पाहतो.
उपजीविकेसोबत त्यापैकी बऱ्याच जणांचा हा आता रोजगाराचा मार्ग सुद्धा झाला आहे. रोजगार अशा साठी ही भीक मागून यांनी एवढी प्रॉपर्टी जमा केली आहे की तुम्ही आम्ही विचार सुद्धा करू शकणार नाही.
मध्यंतरी मुंबईत एका भिकारीचा मृत्यू झाला. तेव्हा त्याच्या नेहमीच्या राहण्याच्या ठिकाणावरून पोलिसांनी लाखभर रुपयांचे चिल्लर हस्तगत केले होते.
यावरून तुम्ही एकंदरीत अंदाज लावू शकता. तर पाहूया अशाच भारतातील काही ‘श्रीमंत’ भिकऱ्यांबद्दल!
कृष्ण कुमार गीते :
मुंबईच्या चर्नी रोड भागात सिपी टॅंक एरिया हा याचा भीक मागण्याचा एरिया. दिवसाला १५००-२००० भीक मागून कमाई होते याची. विशेष म्हणजे नालासोपारा मध्ये याचा स्वतःचा फ्लॅट आहे. आपल्या भावासोबत तो तिथे राहतो.
२००० च्या हिशोबाने याची महिना मिळकत आणि एकूण वार्षिक मिळकतीचा अंदाज लावा. अनेक चाकरी करणाऱ्या मुंबईकारांपेक्षा तरी जास्तीच. ते देखील एकही रुपये टॅक्स न भरता.
सर्वतीया देवी :
बिहारची राजधानी पटणा येथील सर्वतीया देवी या प्रसिद्ध भिकारी आहेत. पटणाच्या अशोक सिनेमाच्या मागच्या बाजूला त्यांनी भीक मागून स्वतःच अस घर बांधले आहे.
विशेष म्हणजे त्या महिन्याला ३५००० एवढा विम्याचा हफ्ता भारतात. सामान्य लोकांचा ३५००० चा वार्षिक हफ्ता असेल. या बाई महिन्याला तेवढा भारतात.
—
- भिकाऱ्यांना स्वतःच्या पायावर उभं करून त्यांना स्वयंपूर्ण बनवणारा अवलिया!
- मंदिरात भिक मागून जमवलेले अडीच लाख दिले त्याच मंदिरात दान : दानशूर महिलेची अशीही कथा
—
संभाजी काळे :
हे महोदय आपल्या परिवारातील इतर चार जणांसोबत मुंबईच्या पॉश अशा खार भागात भीक मागून उदरनिर्वाह करतात. उदरनिर्वाह म्हणण्या ऐवजी बिझनेस योग्य शब्द ठरेल.
यांची वैयक्तिक १००० रुपये दिवसाला कमाई आहे. या भीक मागण्याचा पेशातून यांनी विरार मध्ये स्वतःचा फ्लॅट विकत घेतला आहे. सोलापुरात जमीन शिवाय दोन घरे. बँक खात्यात लाखोंचं सेव्हिंग वेगळं.
लक्ष्मी देवी :
मुंबई स्थित लक्ष्मी देवी वयाच्या १६ व्या वर्षापासून त्या मुंबईत भीक मागत आहेत. दिवसाला १५०० – २००० एवढी यांची मिळकत आहे. असेच भीक मागून त्यांनी लाखो रुपयांची सेव्हिंग बँकेत करून ठेवली आहे.
भारत जैन :
आता पर्यंत जे भिकरी पाहिले त्यांचे फ्लॅट, घरे वगैरे आपण मुंबईच्या बाहेर असलेले पाहिले. भारत जैन यांचे फ्लॅट आहेत मुंबईच्या परळ भागात. एक नाही तर दोन दोन फ्लॅट.
आणि दोन्ही फ्लॅटची किंमत ही आजच्या बाजारभावानुसार करोडोच्या घरात आहे. परळ भागातच रेल्वे स्टेशनला साईड ज्यूसच एक दुकान भाड्याने देऊन त्याचं भाड सुद्धा वसूल करतात.
भारत जैन हे भीक मागतात पण त्यांची फॅमिली एक स्टेशनरीचं दुकान चालवते. भारत जैन महिना ७५००० भीक मागून कमवतात. बसतोय का विश्वास?
पप्पू कुमार :
अंदाज लावा याची एकूण संपत्ती किती असेल? दहा लाख? वीस लाख? जास्तीत जास्त ५० लाख? नाही!
सव्वा करोड! पप्पू कुमार बिहारच्या रेल्वे स्टेशनवर भीक मागतो. एका पायाने अधू असलेला पप्पू दिव्यांग आहे. एका अपघातात त्याने आपला पाय गमावला.
तेव्हा पासून भीक मागण्याचे काम तो करत आहे. सेव्हिंगने भरलेले चार बँक खाते आणि अनेक छोटे छोटे उद्योग पप्पू ने भीक मागून उभे केले आहेत.
मालना/मासू :
–
हे ही वाचा – ट्रेनमध्ये भीक मागणाऱ्या प्राध्यापकाची कथा
–
अजून एक मुंबई स्थित लखपती भिकारी. मुंबईतच लाखोंच्या किमतीच्या गाळ्याचा मालक.
याची विशेषता म्हणजे हा भीक मागण्याचा ठिकाणावर रिक्षाने येतो. ठरलेल्या ठिकाणी कपडे बदलून ८ – ९ तास आपली भीक मागण्याची ड्युटी करून परत रिक्षाने आपल्या घरी.
साधारण तीस ते चाळीस हजार एवढी यांची महिना कमाई आहे.
एकूणच, आपली उपजीविका भागवण्यासाठी भीक मागणे पर्याय निवडणाऱ्या या भिकाऱ्यांनी ही पद्धत नेक्स्ट लेव्हलला नेऊन ठेवली आहे.
अनेकांची मुंबईत घर घेण्याची स्वप्न जिथे धुळीला मिळतात तिथे या भीक मागून उपजीविका करणाऱ्यांनी केवळ भीक मागून मुंबईत फ्लॅट घेतल्याचे आपण पाहिले.
आता यावर या भिकाऱ्यांचं कौतुक करायचं की अजून काय ते आता तुम्हीच ठरवा.
===
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.