आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
गेल्या वर्षापासून कोरोनाचं सावट जगावर घोंगावत आहे. वृत्तवाहिन्यांपासून सोशल मिडीयापर्यंत सगळीकडेच कोरोना रुग्णांचा वाढता आकडा अस्वस्थ करतो. कोरोना व्यतिरिक्त अन्य विषयच फारसा चर्चिला जात नाही.
गेल्या वर्षी कोरोनापाठोपाठ ‘राम मंदिर’ हा विषय सर्वाधिक ट्रेन्डिग ठरला होता.
रामजन्मभूमी असणाऱ्या अयोध्येत राममंदिर पुन्हा उभं राहावं यासाठी देण्यात आलेला अनेक वर्षांचा लढा, भूमिपूजनासाठी निवडण्यात आलेला ५ ऑगस्टचा मुहूर्त, त्यावरून सुरू असणारे राजकारण, हे सध्याचे ‘हॉट टॉपिक्स’ ठरले होते.
गेल्या वर्षीप्रमाणे यंदा वाराणसीच्या काशिविश्वेवराचा मुद्दा चर्चेत आला आहे. फास्ट ट्रॅक कोर्टाने मंदिर – मश्जिद या वादाच्या सर्वेक्षणाला हिरवा कंदिल दिल्याने पुन्हा एकदा हिंदु मंदिरांवर झालेली आक्रमणं हा वादाचा मुद्दा ठरत आहे.
मात्र, काही कारणांमुळे नष्ट झालेले आणि नंतर पुन्हा बांधण्यात येत असलेले हे काही पहिले मंदिर नाही.
एकदाच नव्हे, तर एकाहून अधिकवेळा पुनर्बांधणी करण्यात आलेली मंदिरं सुद्धा भारतात आहेत. कित्येक परकीय आक्रमणं, परकीयांनी प्रस्थापित केलेल्या राजसत्ता, या सगळ्याचा परिणाम म्हणून भारतातील अनेक मंदिरं नष्ट झालेली आहेत.
खरंतर, देवाची मूर्ती थोडी जरी भंग पावली, तरी तिची प्राणप्रतिष्ठा आणि पूजा भारतीय संस्कृतीत केली जात नाही. याचाच गैरफायदा घेऊन परकीयांनी भारतातील मंदिरे उध्वस्त केली आहेत.
असं असूनही, परकीयांनी नामशेष करण्याचा प्रयत्न केलेली मंदिरं पुन्हा उभारण्यात आली. यात काही मोठ्या आणि प्रसिद्ध मंदिरांचा सुद्धा समावेश आहे.
आजच्या या लेखातून जाणून घेऊयात, अशीच काही मंदिरं, त्यांचा इतिहास आणि त्यांच्या पुनर्बांधणीबद्दल…
१. काशी विश्वेश्वर, वाराणसी
याच मंदिरावरून आज पुन्हा एकदा वादाच्या नव्या फैरी झाडल्या जात आहेत.
उत्तर प्रदेशातील, वाराणसी येथे आज उभं असलेलं विश्वेश्वराचं मंदिर हे मुघल राजांनी अनेकदा उध्वस्त केलं होतं.
हिंदूंसाठी अतिशय महत्त्वाचं असलेलं काशी-विश्वेश्वराचं मंदिर पूर्वी ज्ञानवापी मशिदीच्या जागेवर उभं होतं, अशी नोंद इतिहासात आढळते.
विश्वनाथ मंदिर उभं असलेलं वाराणसी शहर, हे ३५०० हजार वर्षांपासून अस्तित्वात असल्याचे उल्लेख इतिहासात आहेत. सर्वप्रथम, ११५४ साली विश्वेश्वराचे मंदिर नष्ट करण्यात आले होते.
मुघलांनी तत्कालीन ज्योतिर्लिंग सुद्धा लुटून नेले आहे. मात्र, केवळ २० वर्षांच्या कालावधीत, हे मंदिर पुन्हा बांधण्यात आले. त्यानंतर, १५व्या शतकात सुद्धा मुघल सम्राटांनी हे मंदिर उध्वस्त केले आहे.
१६व्या शतकातील, मुघल सम्राट अकबर याच्या काळात मंदिराची पुनर्बांधणी करण्यात आली. मात्र त्याचा नातू औरंगजेब; याने १६६९ साली मंदिर पाडून, तेथे ज्ञानवापी मस्जिद उभारली.
इसवीसन १७८० मध्ये राणी अहिल्याबाई होळकर यांनी मशिदीपासून काही अंतरावर विश्वेश्वराच्या मंदिराची उभारणी केली. त्यांनी उभारलेले हे देवस्थान आजही दिमाखात उभे आहे.
२. कृष्ण जन्मभूमी, मथुरा
स्थानिक मंडळींच्या म्हणण्यानुसार, हे मंदिर ५००० वर्षांहून अधिक जुने आहे. हे मंदिर यादवकालीन असल्याचे म्हटले जाते.
मात्र, राजा दुसरा चंद्रगुप्त याच्या काळात मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला असल्याचे ऐतिहासिक पुरावे सुद्धा सापडतात.
औरंगजेब याने हे मंदिर देखील उध्वस्त केले होते. केशव देव मंदिराच्या भागात, औरंगजेब बादशहाने दर्गा उभा केला आहे. मात्र, श्रीकृष्ण जन्मला, तो तुरुंग आजही शाबूत आहे.
याआधी, इसवीसन १०१७ मध्ये सुद्धा हे मंदिर पाडण्यात आले होते. मात्र, मुघल साम्राज्य काळात, राजा वीर सिंह बुंदेला, यांनी मंदिराची पुन:निर्मिती केली.
मात्र, औरंगजेबाने उध्वस्त केलेले मंदिर पुन्हा उभे राहण्यास १९६५ चा काळ यावा लागला. मथुरेत हे मंदिर मोठ्या दिमाखात उभे असले, तरी राजकीय वर्तुळात, त्याविषयीचे अनेक मतभेद आजही कायम आहेत.
–
हे हे वाचा – इस्लामी-आक्रमणापूर्वी चक्क एका रात्रीत बांधलं गेलेलं प्राचीन मंदिर…!!!
–
३. सोमनाथ मंदिर, गुजरात
गुजरातमधील सोमनाथ मंदिर, आज भारतातील महत्त्वाच्या देवस्थानांपैकी एक आहे.
१९५५ साली, भारताचे तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली या मंदिराची पुनर्निर्मिती झाली. याआधी तब्बल ६ वेळा हे मंदिर नष्ट करण्यात आले होते.
इसवीसन पूर्व काळापासून अस्तित्वात असलेले हे मंदिर, सातव्या शतकात दुसऱ्यांदा बांधले गेले आहे. अरबी गव्हर्नर जुनायद यांनी आठव्या शतकात ते पुन्हा पाडल्यानंतर, राजा नागभट्ट यांनी इसवीसन ८१५ मध्ये पुन्हा त्याची उभारणी केली.
महम्मद गजनवि याने १०२४ मध्ये मंदिरावर हल्ला केला. ५००० भाविकांची हत्या, संपत्तीची लूट आणि नष्ट केलेलं मंदिर, अशी तिहेरी हानी झाली.
गुजरातचे राजा भीम आणि मालवाचे राजा भोज यांनी मंदिर पुन: निर्माण केले. मात्र, १३व्या शतकात, पुन्हा हे मंदिर नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
मुघल बादशहा औरंगजेब, याने हिंदुस्थानातील महत्त्वाची देवस्थाने नष्ट करण्याची एकही संधी सोडली नाही. इसवी सन १७०६मध्ये त्याने सोमनाथ मंदिर सुद्धा नामशेष केले.
४. मदन मोहन मंदिर, वृंदावन
मुघल बादशहा औरंगजेबाच्या काळात, अनेक मंदिरे उध्वस्त करण्यात आली. यात मदन मोहन मंदिराचा सुद्धा समावेश होता. या हल्ल्यात मंदिराचे शिखर संपूर्णपणे उध्वस्त करण्यात आले.
मात्र, त्याकाळातील मदन गोपाळ याची मूर्ती मंदिरातून बाहेर काढून राजस्थानला हलवण्यात आली होती. हल्ला झाल्यास मूर्ती भंग होऊ नये, यासाठी ही खबरदारी घेण्यात आली.
१९व्या शतकात, इसवीसन १८१९ मध्ये बंगालचे श्री नंद कुमार बोस यांनी नवीन मंदिर स्थापन केले. शिखर भंग पावल्यामुळे, जुने मंदिर पूजा – अर्चनेस योग्य नव्हते. म्हणून नवीन मंदिराची निर्मिती करण्यात आली.
मंदिरातील मूर्ती आजही राजस्थानमध्ये असल्यामुळे, या मंदिरात आता देवाची प्रतिकृती ठेवण्यात आली आहे.
५. मीनाक्षी मंदिर, मदुराई
भगवान सुन्दरेश्वर (शंकराचा अवतार) आणि मीनाक्षी देवी (पार्वती) यांचा विवाह जिथे संपन्न झाला, त्या भागात मदुराई येथे हे मंदिर बांधण्यात आले आहे.
चौदाव्या शतकात, मलिक काफूर याने मीनाक्षी मंदिर उध्वस्त केले होते. मात्र, सतराव्या शतकात, मदुराईचे पहिले प्रधानमंत्री आर्य नाथ मुदलियार यांनी मंदिराची पुनर्बांधणी केली.
तत्कालीन स्थापत्यात पुढील काळात काही बदल सुद्धा करण्यात आले.
६. मार्तंड सूर्यमंदिर, काश्मिर
काश्मिरच्या खो-यांमधील सौंदर्याचा नमुना म्हणजे मार्तंड सूर्यमंदिर. ८ व्या शतकात हे मंदिर बांधलं गेलं होतं. स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमुना म्हणून या मंदिराची ओळख होती.
मात्र सिकंदर बुतशिकनने या मुस्लिम शासकाने हे मंदिर उध्वस्त केले. कर्कोटा चे राजा ललितादित्य मुक्तिपाडा यांनी या मंदिराची सर्वात आधी स्थापना केली असावी असा अंदाज आहे.
श्रीनगर पासून ६० किमी अंतरावरील अनंतनाग या जिल्ह्यात हे मंदिर वसलेले आहे. अनंंतनाग ते पहलगाम या दरम्यान मार्तंड या पठारावर हे मंदिर स्थापित आहे.
मुस्लिम इतिहासकार हसननी ‘हिस्ट्री ऑफ कश्मीर’ या पुस्तकात कश्मिरी जनतेचे जबरदस्तीने केले जाणारे धर्मांतर यावर भाष्य केले आहे, सन १३९३ मध्ये काश्मिरी पंडितांवर अनन्वित अत्याचार केले गेले. तत्कालीन धार्मिक नेता हजरत अमीर कबीर यांनी आपल्या डोळ्यांनी ही परिस्थिती पाहिली होती.
याच काळात अनेक मंदिरांवरही घाला घालण्यात आला.
–
हे ही वाचा – पॅरेलिसिस झालेली व्यक्ती ठणठणीत बरी होते या मंदिरात! खरं की खोटं? वाचा
–
७. मोढेरा सूर्य मंदिर, पाटन, गुजरात
गुजरातच्या अहमदाबाद पासून सुमारे१०० किलोमीटर अंतरावर पुष्पावती नदीच्या तटावर हे मंदिर उभे आहे.
सूर्यवंशी सोलंकी राजा भीमदेव (प्रथम) यांनी सन १०२६ मध्ये या मंदिराची स्थापना केल्याचे इतिहास सांगतो.
मुस्लिम शासक अलाउद्दीन खिलजीनी आक्रमणांच्या दरम्यान या मंदिराचे प्रचंड नुकसान केले होते. केवळ मंंदिराच्या वास्तुचेच नव्हे तर देवतांच्या मुर्तीचेही नुकसान करत तेथिल भाविकांचा मानसिक छळही करण्यात आला होता.
८. हम्पीचे मंदिर
इतिहासातील प्रसिद्ध राजा कृष्णदेव राय यांनी या मंदिराची स्थापना केली होती. कर्नाटकातील हम्पी या शहराला युनेस्कोतर्फे ऐतिहासिक वास्तुंचा दर्जा मिळाला आहे तो केवळ येथिल मंदिरांच्या भव्यतेमुळे.
‘मंदिरांचा प्रदेश’ अशीही त्याची ओळख आहे.
अशाच एका भव्य मंदिराचे सौंदर्य मुस्लिम शासकांनी नेस्तनाभुत केले. राजा कृष्णदेव राय यांच्या मृत्युनंतर या साम्राज्यावर बीदर, बीजापुर, गोलकुंडा, अहमदनगर तसेच बरार येथिल मुस्लिम शासकांनी सन १५६५ मध्ये प्रचंड हल्ले केले. केवळ हल्लेच नव्हे तर या प्रदेशाची प्रचंड लूट केली.
एकेकाळी सौंदर्यासाठी ओळखला जाणारा हा प्रदेश या हल्ल्यानंतर अनेक वर्ष ओळखताही येत नव्हता.
इतिहासकारांच्या मते हा इतिहासातील या सर्वाधिक क्रूर हल्ला होता.
हिंदू मंदिरांवर आजपर्यंत अनेकदा हल्ले झाले, तेथिल केवळ संपत्तीवरच नव्हे तर भाविकांच्या भावनांवरही ओरखडे पडले, मात्र तरिही असे अनेक हल्ले पचवून या मंदिरांचे पुर्ननिर्माण केले गेले.
हल्ल्यांचे घाल सोसूनही पुन्हा एकदा स्थिर असलेल्या मंदिरांची यादीही मोठी आहे.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.