आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
रामायण हे भारतीय संस्कृतीतलं महाकाव्य. वाल्मिकी ऋषींनी लिहीलेली ही रामकथा शतकानुशतके लोकांच्या मनावर अधिराज्य करते आहे.
आदर्श पुत्र, आदर्श भाऊ, आदर्श राजा, उत्तम योध्दा, एकपत्नी, एकवचनी, एकबाणी असलेला राम हा खरोखरच एक आदर्श मानव होता.
ईक्ष्वाकू कुळात अयोध्या नगरीत दशरथ आणि कौसल्येच्या पोटी जन्मलेला राम आजही तमाम हिंदू लोकांचे खूप मोठे श्रद्धास्थान आहे.
भारतीय इतिहासातील अनेक धर्मीय सम्राटांनी केलेल्या लढाया,आणि स्वाऱ्यांनी जी धर्मस्थानं नेस्तनाबूत केली त्यात अयोध्येतील रामलल्लाचं जन्मस्थानही सुटलं नव्हतं.
वर्षानुवर्षे चाललेला संघर्ष यात कितीतरी जिवीतहानी झाली, बाबरी मशिद लोकांनी उध्वस्त करून टाकली. त्यावर चाललेली न्यायालयीन लढाई कितीतरी वर्षं चालू होती.
शेवटी राममंदिर उभारणीसाठी सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालानंतर सर्वधर्मियांनी शांतता राखत; ऐक्याचं खरोखर दर्शन घडवून जगासमोर एक उत्तम उदाहरण ठेवलं की, कोणत्याही धार्मिक भावनेपेक्षा न्यायालयाच्या निवाड्याचा येथे आदर राखला जातो.
यानंतर पुढचा भाग होता तो राममंदिराची प्रत्यक्ष उभारणी करणे. मंदिर उभारले, की मंदिरात रामाची मूर्ती प्राणप्रतिष्ठीत करुन सर्व भारतीयांच्या श्रद्धास्थानाला मूर्तरुप देणं.
५ आॅगस्ट २०२० रोजी, म्हणजे आज अयोध्येत श्रीराम मंदिर शिलान्यास झाला.
यासाठी अयोध्या सजली. लोकांनी सोशल मिडियावर अक्षरश: दिवाळी साजरी केली. आणि का करू नये? जनतेचा आदर्श राजा…ईश्वरी अंश असलेल्या या श्रद्धास्थानावर किती लोकांचं प्रेम आहे.
प्रसादासाठी लाखभर लाडू, वनवासात असताना प्रभू रामचंद्र यांनी जिथं जिथं म्हणून वास्तव्य केलं त्या त्या ठिकाणची माती, पाणी मागवलं गेलं. खुद्द श्रीलंकेनं सोन्याची वीट पाठवून लंकेत सोन्याच्या विटा ही म्हण सार्थ केली आहे.
राजकीय पक्ष, जाती धर्म यांचा विचारही न करता हिंदूंशिवाय इतर बांधवांना देखील या शिलान्यासाचं आमंत्रण दिलं आहे. केंद्र सरकार, उत्तर प्रदेश सरकार जातीनं लक्ष घालून हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी अग्रणी आहेत.
आता यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रभू रामचंद्र यांची मूर्ती घडविण्याचे काम!!!
प्रत्येक शिल्पकाराला आपल्या आराध्य दैवतांची मूर्ती घडवायला मिळणं हे किती मोठं काम वाटत असतं. काही काही जणांचं तर ते स्वप्न असतं!!!
सर्वसाधारणपणे विविध देवतांच्या, राष्ट्रपुरुषांच्या मूर्ती घडवताना मूर्तीकार आनंदीच असतो. कारण आपला व्यवसाय करत असताना त्यातही असं उत्तम काम मिळणं हा कलेचा गौरव तर असतोच असतो, पण या कामामुळे त्या मूर्तीकाराचं नांव अजरामर होतं.
मंदिर उभं करताना भले शिला पायाभरणीमध्ये जातात.. त्यामुळं पायातील दगडांचं महत्त्व काही कमी होत नाही. त्यावरच हा सारा डोलारा उभा असतो.
त्यात असणाऱ्या मूर्ती या लोकांना सात्विक समाधान देतात. साक्षात भगवंताला लोकांसमोर आणायचं कामच हे मूर्तीकार करत असतात.
चाफळला असणाऱ्या प्रभू रामचंद्र यांच्या मूर्ती विषयी तर एक कथा आहे, की त्या मूर्ती घडवणारा शिल्पकार आंधळा होता, पण त्याने ती मूर्ती घडवली.
अशीच प्रभू रामचंद्रांची अयोध्येत जी मूर्ती घडवली जाणार आहे तिचं काम जेष्ठ मूर्तिकार श्री.राम सुतार यांना दिलं गेलं आहे.
२५१ फूट उंचीची प्रभू रामचंद्र यांची मूर्ती बनवणं हे मोठं आव्हान आहे आणि ते या जेष्ठ मूर्तिकारांनी लीलया पेलले आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या आदेशानुसार, ही मूर्ती बनवण्याची जबाबदारी श्री.राम सुतार यांना सोपवली गेली आहे. आणि त्याचं काम सुरु झालं आहे. अगदी युद्धपातळीवर हे काम सुरू आहे.
राम मंदिर उभारणीच्या कामाला सुरुवात केली आहे. त्यासाठी ट्रस्ट तयार केला आहे. ज्या पद्धतीनं ट्रस्टचं काम सुरू झालं आहे, त्याच वेगाने या मूर्तीचंही काम चालू आहे.
कोण आहेत हे श्री. राम सुतार?
श्री. राम सुतार हे नोएडा येथे राहणारे जेष्ठ मूर्तिकार आहेत. त्यांना आणि त्यांचा मुलगा अनिल सुतार यांना पद्मपुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.
गुजरात मधील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्मारकासाठी उभारलेला १८३ मीटर उंचीचा पुतळाही त्यांनीच तयार करून दिला आहे.
प्रभू रामचंद्र यांच्या मूर्तीच्या घडणावळीतील महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही मूर्ती पूर्णपणे स्वदेशी असणार आहे. मूर्तिकार म्हणून प्रसिद्ध असलेल्या राम सुतार यांनी आजवर १५००० मूर्ती तयार केल्या आहेत.
राम सुतारांचा जन्म महाराष्ट्रातील धुळे येथे १९२५ साली १९ फेब्रुवारी रोजी झाला. खूप लहान वयात त्यांनी मूर्ती बनवायवा सुरुवात केली होती. मुंबई मधील प्रसिद्ध जेजे स्कूल ऑफ आर्ट येथे त्यांनी आपलं कलेचं शिक्षण घेतलं आहे.
कांस्य, दगड आणि संगमरवरी मूर्ती बनवण्यात श्री.राम सुतार यांचा हातखंडा आहे. त्यांनी पुरातत्व खात्याचतही काम केले आहे. अजंठा वेरूळ येथील जगप्रसिद्ध कैलास लेणे, आणि इतर मूर्तींना मूळ रुपात आणण्याचे कठीण काम त्यांनी केलं आहे.
इतकंच नव्हे तर गंगासागर धरणावर चंबळ देवीची मूर्ती त्यांनीच बनवली आहे.
त्यांनी बनवलेला गांधीजींचा पुतळा हा खूप प्रसिद्ध झाला. इतका की भारत सरकारनं रशिया, फ्रान्स, बार्बाडोस, अर्जेंटिना या आणि इतरही कितीतरी देशांत ती मूर्ती गांधीजींच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त भेट म्हणून दिली आहे.
म्हणूनच या राष्ट्रीय मूर्तिकाराची निवड या कामासाठी त्यांची निवड झाली आहे. ही मूर्ती परदेशी कलाकाराला देणं सरकारला अशक्य होतं का? नाही.. पण आपली संस्कृती आपला भारतीय माणूस जसा साकारेल तसा परदेशी माणूस करु शकतो का?
कदाचित करेलही..पण आपल्या देशातील इतकं मोठं काम आपल्याच माणसाला देणं कधीही चांगलं. म्हणूनच या पंचाण्णव वर्षांच्या जेष्ठ कलाकाराला ही मोठी जबाबदारी सोपवली आहे.
निश्चितपणे ती ते उत्तम रित्या पार पाडतील यात संशय नाही.
रामचंद्रांच्या मूर्तीची वैशिष्ट्यं –
ही मूर्ती पूर्णपणे स्वदेशी असेल.
या मूर्तीचा व्यास २० मीटरचा असेल. त्याचबरोबर ही मूर्ती ५० मीटर पायावर उभी असेल.
इथे एक मोठं संग्रहालय असेल. या संग्रहालयात विष्णूचे दशावतार असतील. जे लोकांना डिजीटल पद्धतीने दाखवले जातील. त्याचबरोबर फूड प्लाझा, रामाची माहिती देणारी गॅलरी आणि डिजिटल म्युझियम असेल.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.