' राम मंदिर बांधलं जावं म्हणून ह्या आजीने केलेली “भीष्मप्रतिज्ञा” आज पूर्णत्वास आली! – InMarathi

राम मंदिर बांधलं जावं म्हणून ह्या आजीने केलेली “भीष्मप्रतिज्ञा” आज पूर्णत्वास आली!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

गेली कित्येक वर्षं प्रलंबित असलेला राममंदिराचा प्रश्न, अखेरीस मागच्या वर्षी निकालात निघाला. एवढेच नाही, तर राममंदिराच्या बांधकामासाठी, भूमिपूजनाचा मुहूर्त सुद्धा काढण्यात आलाय.

भगवान श्रीराम यांच्या जन्मभूमीवर, पुन्हा एकदा राममंदिराची निर्मिती होणार आहे. अर्थात, भूमिपूजनाच्या मुहूर्तावरून सुरु असणारं राजकारण, उलटसुलट चर्चा, यांना सुद्धा उधाण आलं आहे.

मात्र, या सर्व पार्श्वभूमीवर, आज ५ ऑगस्ट रोजी, राममंदिराचे भूमिपूजन करण्यात येत आहे. हा दिवस सगळ्यांसाठीच ऐतिहासिक ठरणार आहे.

यासाठी अयोध्यासुद्धा सजली आहे.

 

 

प्रतिज्ञा घेतली म्हटलं की कोण आठवत? सर्वात पहिलं नाव येत, माता गंगा आणि राजा शंतनू यांचा मुलगा देवव्रत. तेच कौरव – पांडवांचे पितामह भीष्म!

आजन्म अविवाहित राहण्याची अतूट प्रतिज्ञा घेऊन इतिहासात अजरामर झाले. ही घटना होती द्वापारयुगा मधली. आज कलियुगात कोण अशी प्रतिज्ञा कोण घेईल अस वाटत का?

प्रण घेऊन त्याचं वहन करणे हे आजच्या काळात तर शक्यच नाही वाटत. पण असं नाही. अशा व्यक्ती आजही आपल्या भारतात आहेत.

भगवान राम संपूर्ण भारतवर्षाचे आराध्य दैवत! त्यांच्या बद्दल आणि त्यांच्या जन्मभूमी बद्दलची भारतीयांची असलेली आशा-भावना ही लपलेली नाही.

रामजन्मभूमीच्या भूमीपूजनाला सुरवात होईल तेव्हा मध्ये प्रदेश मधील जबलपूर येथील ८२ वर्षीय उर्मिला चतुर्वेदी तब्बल २८ वर्षानंतर अन्नग्रहण करणार आहेत.

बाबरीचा विवादित ढाचा पाडल्यानंतर, ‘जोपर्यंत रामजन्मभूमीचं भूमिपूजन होत नाही तोपर्यंत अन्न ग्रहण करणार नाही’ अशी उर्मिला चतुर्वेदी यांनी आपली भीष्म प्रतिज्ञा जाहीर केली.

उद्या २८ वर्षानंतर ५ ऑगस्ट २०२० रोजी जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी रामजन्मभूमीच्या भूमीपूजनासाठी जमिनीवर कुदळ मारतील तेव्हा त्यांचा प्रण पूर्ण होईल!

 

urmila chaturwedi inmarathi
loksatta.com

 

रामजन्मभूमी आंदोलनात आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या अनेकांची आपल्याला नावे माहीत असतील.आंदोलनात योगदान देणारे काही आज मोठमोठे नेते बनले आहेत.

रामजन्मभूमी साठी चाललेल्या संघर्षात उर्मिला चतुर्वेदी सारख्या अनेक भक्तांच सुद्धा योगदान आहे. ज्यांच्या आस्थेच्या बळावर उद्याचा दिवस उजडणार आहे.

उर्मिला चतुर्वेदी यांचं म्हणणं आहे, त्यांचं शरीर जरी कमजोर असलं तरी त्यांचा निर्णय हा अटळ आहे. वयाच्या या पडावामध्ये असताना सुद्धा आपल्या पूजनीय रामाला छत मिळण्याची त्या वाट बघत होत्या.

उर्मिला चतुर्वेदी एवढ्या उत्साही झाल्या आहेत की ते आपल्या नातेवाईकांना अयोध्येयला जाऊन या ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार होण्यासाठी राजी करत आहेत.

परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव आणि लॉकडाऊनच कारण देऊन त्यांना थांबवण्यात आलं. नंतर परत कधी आयोध्येला जाऊन रामललाचं दर्शन नक्की करू अस आश्वासन त्यांना देण्यात आलं आहे.

मुळात, रामजन्मभूमी वरून जो हिंदू-मुस्लिम वाद होता त्यावरून उर्मिला चतुर्वेदी बऱ्याचदा दुःखी झाल्या होत्या.

उर्मिला पुढे म्हणतात, शारीरिक दृष्ट्या त्या भूमीपूजनाला उपस्थित नाही राहू शकत पण मनाने त्या तिथे सगळ्या विधीना उपस्थित राहणार आहेत.

त्यांची इच्छा आहे की आयोध्ये मध्ये त्यांना एखादी जागा मिळावी, जिथे त्या राहून आपल्या रामाच्या शरण जाऊन आराधना करू शकतील.

आपलं उरलेलं जीवन त्या रामासोबत घालवू इच्छितात आणि त्यासाठी अयोध्या सारखी जागा जगात कुठेही नाही.

 

ayodhya inmarathi
opindia.com

 

उर्मिला चतुर्वेदी यांच्या या तपस्येत त्यांच्या कुटुंबाने त्यांना पूर्ण सहकार्य केले. ते सुद्धा ह्याच प्रतीक्षेत आहेत की लवकरात लवकर राममंदिराचे बांधकाम सुरू व्हावे जेणेकरून त्या अन्नग्रहण करतील.

उर्मिला या मागच्या २८ वर्षांपासून समाज आणि इतर लोकांपासून लांब राहिल्या. बऱ्याच जणांनी त्यांच्यावर दबाव सुद्धा घातला की त्यांनी त्यांचा हट्ट सोडून द्यावा. पण त्यांना न जुमानता उर्मिला चतुर्वेदी यांनी आपला प्रण पूर्ण केला.

त्यांच्या कुटुंबाचा हेतू आहे की शरयू नदीच्या काठावर त्यांचा हा प्रण तोडला जावो. १९९२ पासून ते २०२० पर्यंत सलग २८ वर्ष उर्मिला चतुर्वेदी यांनी उपवास ठेवला.

आणि त्यांच्या या उपवासाचे फळ उद्या त्यांना मिळणार आहे आणि त्यांचा उपवास ते पूर्ण करणार आहेत. उर्मिला चतुर्वेदी सारखे अनेक रामभक्त आहेत ज्यांनी आपापल्या परीने संकल्प ठेवला आहे.

 

urmila chaturwedi featured inmarathi
prabhatkhabar.in

 

बिहारच्या किशनगंजचे रहिवासी आहेत देव दास म्हणून. त्यांनी राममंदिर बनत नाही तोपर्यंत विना चप्पल राहण्याचा संकल्प केला.

दास हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्थानिक जिल्हा कार्यकर्ते आहेत. ते तिथेच एक किराणाच दुकान चालवतात.

संघाचे कार्यकर्ते असल्यामुळे ते साहजिकच अनेक समाजोपयोगी कामात अग्रेसर असतात. आतापर्यंत त्यांनी बेवारस अशा १८०० पेक्षा जास्त प्रेतांचा दाह संस्कार स्वतः केला आहे.

एकूणच उद्या त्यांचा सुद्धा प्रण पूर्ण होणार आहे. तर उर्मिला चतुर्वेदी, देव दास यांच्या सारखे भारतात अनेक असे रामभक्त सापडतील ज्यांचा संकल्प आज खऱ्या अर्थाने पूर्ण होणार आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?