आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
५ ऑगस्ट २०२०. देशातील तमाम हिंदूंसाठी पूजनीय असलेल्या मर्यादापुरुषोत्तम प्रभू श्रीरामांच्या जन्मभूमीच्या पुनर्निर्माण करण्यासाठी अयोध्येत भूमिपूजन झाले.
पंतप्रधानांची मर्यादा, आमंत्रण – निमंत्रण, कोरोनाची पार्श्वभूमी बघता भरपूर वाद विवाद निर्माण झाले. लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी यांना न देण्यात आलेलं निमंत्रण, शरद पवारांचे भूमिपूजनाला न जाण्याचे वक्तव्य वगैरे वगैरे.
हे सर्व चालू असताना बातमी आली की रामजन्मभूमी आंदोलनात ‘हुतात्मा’ झालेल्या कोठारी बंधूंच्या कुटुंबाला सुद्धा या सोहळ्याचे आमंत्रण गेले.
अन पुन्हा एकदा कान टवकारले गेले. ६ डिसेंबर तारीख आली की ‘मंदिर वही बनाएंगे’ चा उद्घोष आणि कोठारी बंधूंची आठवण ही हमखास काढली जाते.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
—
मग पाहूया नेमके हे कोठारी बंधू आहेत तरी कोण?
भारतीय जनता पार्टी, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यासारख्या हिंदुत्ववादी विचारसरणीच्या संघटनांनी एकत्र येऊन कारसेवेचे भव्य आयोजन केले होते.
लालकृष्ण अडवाणी नेतृत्व करत असलेल्या रथयात्रेने अवघा देश ढवळून निघाला होता. आणि त्यामुळेच देशभरातून अनेक तरुण कारसेवेमध्ये मोठ्या संख्येने सामील होत होते.
याच कारसेवेमध्ये दाखल झाले होते बंगाल मधील शरद आणि रामकुमार कोठारी.
२१ ते ३० ऑक्टोबर १९९० पर्यंत अयोध्येत मोठ्या संख्येने कारसेवक जमले होते. बाबरीच्या विवादित ढाचा परिसरात हे कारसेवक जायच्या तयारी होते.
या विवादित परिसरात भारी सुरक्षेचा बंदोबस्त केला गेला होता. कलम १४४ नुसार अयोध्येत कर्फ्यु लागू केला होता. याच कर्फ्युच्या दरम्यान सकाळी १० वाजता बाबरी मशिदीच्या विवादित ढाच्या कडे कारसेवक निघाले.
अयोध्येत यूपी सरकारने तब्बल ३० हजार पोलीस तैनात केले होते.
सकाळी ११ च्या दरम्यान हनुमान गढीच्या परिसरात आंदोलनाला आलेल्या कारसेवकांना पकडून अयोध्ये बाहेर नेण्यासाठी जी बस पोलिसांनी ठेवली होती, ती कारसेवकांनी हस्तगत केली.
कारसेवकांनी ती बस विवादित ढाच्याकडे वळवली. बॅरिकेट तोडून ती बस थेट ढाच्या जवळ पोहोचली. जसं बॅरिकेट तुटलं तसे ५००० कारसेवक आत घुसले.आणि विवादित स्थळाजवळ पोहोचले.
कल्याणसिंह यांनी राजीनामा दिल्यानंतर मुलायमसिंग यादव यांनी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री पदाची कमान हाती घेतली. त्यांनी पोलिसांना सरळ सूचना दिलेल्या की बाबरी मशिदीला काही होता कामा नये.
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पोलिसांना सूचना दिल्या होत्या, की अश्रू धुराचा वापर करून गर्दी पांगवावी आणि नंतर कारसेवकाना तिथून माघारी पाठवावे.
ठरल्या प्रमाणे पोलिसांनी अॅक्शन घेतली. पण गर्दी पांगण्याऐवजी गर्दी जास्तच स्फुरण घेऊन बाबरी जवळ पोहोचली आणि त्यांनी बाबरीवर चढाई सुरू केली.
आणि याच दरम्यान बंगाल वरून आलेल्या दोन कारसेवकांनी बाबरी मशिदीच्या घुमटावर भगवा ध्वज फडकवला. ते कारसेवक होते शरद आणि रामकुमार कोठारी!
गर्दी पांगत नाही पाहून पोलिसांनी नाईलाजाने गोळीबार करावा लागला. पोलीस रेकॉर्ड नुसार ५ कारसेवकांनी या गोळीबारात आपले प्राण गमावले.
कोठारी बंधू :
२२ ऑक्टोबर १९९० ला कोठारी बंधू, शरद आणि रामकुमार कोलकाताहुन अयोध्येला निघाले आणि वाराणसी येथे येऊन थांबले. निर्माण झालेल्या तणावाच्या परिस्थितीला लक्षात घेऊन सरकारने ट्रेन आणि बस सेवा अनिश्चित काळासाठी थांबवली होती.
तरी न थांबता ते टॅक्सीने आझमगडच्या फुलपूर गावापर्यंत आले. आणि तिथून २५ ऑक्टोबरला कोठारी बंधु अयोध्येसाठी पायी निघाले. तब्बल २०० किमी पायी अंतर कापल्यानंतर ३० ऑक्टोबर ला दोघे अयोध्येला पोहोचले.
बाबरीच्या घुमटावर सर्वप्रथम चढणारा शरद कोठारी होता. त्याच्या पाठोपाठ त्याचा धाकटा भाऊ रामकुमार सुद्धा चढला. आणि दोघांनी मिळून बाबरीच्या त्या घुमटावर भगवा ध्वज फडकवला.
नंतर गोळीबारामुळे हळूहळू सर्व कारसेवक माघारी वळले. पुढे २ नोव्हेंबर ला विनय कटीयार यांच्या नेतृत्वाखाली कारसेवक दिगंबर आखड्या पासून हनुमान गढीच्या दिशेने निघाले. शरद आणि रामकुमार कोठारी हे सुद्धा यामध्ये सामील होते.
पोलिसांनी यांच्यावर सुद्धा गोळीबार केला. गोळीबारापासून वाचण्यासाठी शरद आणि रामकुमार दोघे जवळपासच्या घरात लपून बसले.
थोड्या वेळाने मात्र सगळं शांत समजून बाहेर पडल्यावर तयारीत असलेल्या त्यांच्यावर पोलिसांनी गोळ्या चालवल्या आणि दोघा कोठारी बंधूंचा जागेवर मृत्यू झाला.
हनुमान गढी जवळ झालेल्या या गोळीबारात त्या दिवशी १६ कारसेवकांनी प्राण गमावले.
बाबरीवर भगवा फडकवणाऱ्या कोठारी बंधूंचा मृत्यू झाला हे कळताच शरयू नदीच्या काठावर कारसेवकांची एकच गर्दी उडाली. ४ नोव्हेंबर १९९० ला शरयू नदीच्या घाटावर दोघा कोठारी बंधूंचा अंतिम संस्कार केला गेला.
हजारो लोक त्यासाठी शरयूच्या काठावर जमले होते. दोघा भावांच्या अमर होण्याच्या घोषणा दिल्या गेल्या.
मूलतः कोठारी बंधू हे राजस्थानच्या बिकानेर जिल्हाचे रहिवासी. पण अनेक पिढ्या पासून ते कोलकात्याला रहात आले आहेत. जवळपास महिनाभरा नंतर १२ डिसेंबरला त्यांच्या बहिणीच विवाह होणार होता.
३० ऑक्टोबरला कोठारी बंधूनी केलेल्या साहसामुळे कारसेवकांमध्ये त्यांना ओळख मिळाली होती. तीच ऑक्टोबरला झालेल्या गोळीबारात ते मारले गेल्यामुळे त्यांच्याबद्दल कारसेवकांमध्ये आपोआप एक वेगळे वलय निर्माण झाले.
आणि अंततः ज्या बाबरी वर कोठारी बंधूनी भगवा फडकवला होता, तोच बाबरीचा विवादित ढाचा कारसेवकांनी ६ डिसेंबर १९९२ ला ध्वंस केला.
ज्या कोठारी बंधूंमुळे कारसेवेला एक वेगळे स्फुरण मिळाले त्याच कोठारी बंधूंच्या कुटुंबाला निमंत्रण गेल्यामुळे अनेक कारसेवकांनी न्यासाच्या या निर्णयाचे स्वागत केले.
एकंदरीत “मंदिर वही बनाएंगे” घोषणेला मूर्त स्वरूप येताना दिसत आहे.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
—
===
हे ही वाचा – बाबरी मशीद पाडण्यापर्यंत प्रकरण गेलंच कसं? : बाबरी मशीद प्रकरणाचा इतिहास
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.