Site icon InMarathi

फावल्या वेळात केलेल्या ह्या गोष्टी तुम्हाला यशाच्या उंच शिखरावर विराजमान व्हायला फायदेशीर ठरतील!

guru inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

यश मिळवण्याची किंवा यशस्वी होण्याची व्याख्या प्रत्येकाची वेगळी असू शकते. यश म्हणजे काय? – तर तुम्ही निवडलेल्या मार्गावर सातत्याने काम करत राहणे आणि ते काम सर्वोत्तम कसं करता येईल यासाठी कायम प्रयत्नशील असणे.

पैसे कमावणे म्हणजेच फक्त यशस्वी होणे असा काही तरुणांचा समज असू शकतो. पण, ही व्याख्या खूप सीमित होईल. यश मिळवणे म्हणजे तुमच्या विषयात पारंगत होऊन स्वतःची योग्यता सिद्ध करणे आणि त्यामध्ये परफेकशन मिळवणे.

हे साध्य कसं करावं? हा एक फार मोठा प्रश्न आहे. एका इंग्रजी पुस्तकात याबद्दल खूप चांगलं वाक्य लिहिलं आहे : “Wakeup when others are sleeping”

 

timesofindia.indiatimes.com

 

अर्थात, जर का तुम्हाला यशस्वी व्हायचंच आहे तर जास्त कष्ट सुद्धा तुम्हालाच घ्यावे लागतील. सध्या आपण बघत आहोत की, लॉकडाऊन मुळे लोकांकडे खूप फावला वेळ आहे.

या वेळात काही जण वेबसिरीज बघत आहेत. तर काही जण सोशल मीडिया वर वेळ वाया घालवत आहेत.

तुम्ही तुमचा फावला वेळ कसा घालवता? यावर तुमचा यशाचा आलेख अवलंबून असतो असं म्हंटल्यास चुकीचं ठरणार नाही. हा तो वेळ असतो जेव्हा तुम्ही स्वतःबद्दल फीडबॅक घेऊ शकतात.

त्यासोबतच, तुमच्या काही नॉन प्रॉडक्टिव्ह गोष्टी शोधा आणि त्यांना खाली दिलेल्या चांगल्या सवयीने replace करा:

 

१. व्यायाम :

 

 

नियमित व्यायाम करणे ही शरीरासाठी अत्यंत उपयुक्त गोष्ट आहे. रोज फक्त ३० मिनिट जरी आपण व्यायाम केला तरी त्याचा खूप फायदा होतो. फक्त शरीरच नाही तर मन सुद्धा प्रफुल्लित राहतं. बुद्धी तल्लख राहते आणि स्ट्रेस लेवल वाढत नाही.

तुम्ही बिजनेस करत असाल तर तुम्हाला अलर्ट आणि active ठेवण्यासाठी व्यायाम ही अत्यंत उपयुक्त गोष्ट आहे.

बिजनेस च्या भाषेतच सांगायचं तर, हा वेळ म्हणजे waste नसून ती तुम्हाला योग्य वेळी योग्य निर्णय घेता यावेत म्हणून करावी लागणारी एक investment आहे.

 

२. छंद :

 

 

बिजनेस किंवा नोकरी केल्याने तुमच्या गरजा भागल्या जातात. पण, तुमचे छंद हे तुम्हाला नेहमीच आनंद मिळवून देत असतात. काहींना हा आनंद वाचनाने मिळतो तर काहींना लिखाणाने.

काहींना हा आनंद वेगवेगळे पदार्थ करणं शिकल्यामुळे मिळतो. तर, काही त्यांचा आस्वाद घेतल्याने आनंदित होत असतात. कोणताही छंद हा योग्य किंवा अयोग्य नसतो.

त्याची मात्रा फक्त शरीराला झेपेल इतकी असावी. आपण बघतो की, कित्येक मोठे उद्योगपती हे गोल्फ खेळत असतात. काही उद्योगपती हे नेहमीच क्रिकेट ला follow करत असतात.

काही जणांना gardening मुळे खूप आनंद मिळत असतो. या सर्व लोकांनी स्ट्रेस लेवल कमी करण्यासाठी हे पर्याय शोधून ठेवले आहेत.

तुमचे छंद हे नेहमी तुमचा स्ट्रेस घालवणारे असतात आणि तुमच्या creativity ला वाव देणारे असतात. त्यांना नक्की जोपासा आणि जिवंत ठेवा.

 

३. नवीन शिकण्याची इच्छा :

 

omidyarnetwork.in

 

सतत काहीतरी नवीन शिकण्याची इच्छा असणे हे यशस्वी होण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. अतिरिक्त वेळात काही जण नवीन भाषा शिकतात, तर काही लोक नवीन टेक्नॉलॉजी बद्दल सतत माहिती घेत असतात.

सध्याच्या ट्रेंड नुसार बरेच लोक हे वेबिनार अटेंड करत अश्या अपडेट्स च्या नोट्स काढून सतत स्वतःला उद्यासाठी तयार ठेवत असतात. IT मध्ये येणारे नवीन सॉफ्टवेअर, app याबद्दल या व्यक्ती नेहमी माहिती असणारे असतात.

म्हणून, लोक यांना सल्ला विचारत असतात. एका सर्वेक्षणात हे सिद्ध झालं आहे की, तुमच्या आजूबाजूला जर शिकण्याचं वातावरण असेल तर तुमची व्यक्तिगत आणि व्यवसायिक कार्यक्षमता ही ३७ टक्क्याने वाढते.

सध्या तर काही नवीन शिकणं म्हणजे, फक्त गुगल करून योग्य सोर्स पर्यंत पोहोचणं इतकं सोपं झालं आहे. असं असल्यावर तुम्ही कोणती गोष्ट माहीत नसल्याचं कारण देऊ शकत नाहीत.

 

४. मनःशांती :

 

awarenessjunkie.com

 

मागच्या काही वर्षात योगा हे इतकं लोकप्रिय होण्याचं एक कारण आहे. ते म्हणजे, लोकांचं मन शांत नाहीये. सगळं easily reachable आहे. पण, मन का अस्वस्थ आहे ते फार कमी जण सांगू शकत आहेत. ज्याला आपण ‘स्व संवाद’ म्हणतो तो दिवसेंदिवस हरवत चालला आहे.

मनःशांती असल्याने तुम्ही स्वस्थ आयुष्य जगू शकतात आणि तुमची कार्यक्षमता कैक पटीने वाढवू शकतात. यासाठी नियमित ध्यान करणे हे सर्व तज्ञांनी सुचवलं आहे.

ते जरी जमत नसेल तर, तुम्ही दिवसभरात दोन वेळेस २० मिनिट शांत जरी बसलात तरी तुमच्या शरीराला अपेक्षित मनःशांती तुम्हाला मिळेल.

ते ही जमत नसेल तर, ऑफिस मध्ये बसल्या बसल्या १० मिनिटांसाठी खुर्ची मागे करून सिलिंग कडे जरी बघितलं आणि तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांकडे तितक्या वेळासाठी जरी दुर्लक्ष केलं तरीही तुम्हाला शांत वाटेल.

हे साध्य करण्यासाठी आजूबाजूचे ‘लोक काय म्हणतील ?’ या गोष्टीकडे दुर्लक्ष करायला शिकणे हे सुद्धा तितकंच गरजेचं आहे.

 

५. उद्देश :

 

visitsingapore.com

 

तुम्ही जो काही बिजनेस किंवा नोकरी करत आहात त्याचा उद्देश स्वतःला क्लिअर करा. तुम्हाला जर का तो उद्देश क्लिअर होत नसेल तर अधूनमधून तुमच्या जवळच्या धर्मदाय संस्थेला कधी भेट द्या.

तुमच्या कमाईतील काही हिस्सा अश्या संस्थांना देता येईल का याबद्दल जरा विचार करा. आपल्या समाजाला आपल्या बिजनेस मधून काही फायदा होणे यासारखं सुख कोणतं नाहीये.

असं केल्याने तुम्हाला त्या गरजू लोकांच्या सदिच्छा मिळतात आणि तुमच्या क्षतेत्रातील तुमचं योगदान हे काही व्यक्तींना जगण्यासाठी मदत करू शकते ही भावना तुम्हाला अजून मेहनत करण्यासाठी उभारी देईल.

 

६. वाचन :

 

pinkvilla.com

 

नवीन माहिती मिळवणे, यशस्वी लोक वेगळं काय करतात ? अश्या सर्व गोष्टी शिकण्यासाठी गरज आहे ती वाचनाची आवड वाढवण्याची. वाचन मग ते कोणत्याही प्रकारचं असो.

कधी ते एखाद्या यशस्वी व्यक्तीचं आत्मचरित्र असेल किंवा कधी स्किल्स शिकवणारं पुस्तक असेल. वाचनाने नेहमीच तुमच्या सर्जनशीलतेला चालना मिळते.

तुमच्या विचारांना दिशा मिळते आणि तुमच्या दिवसभरातील कामाचा थकवा घालवण्यासाठी तुम्हाला मदत होईल. दिवसातील काही वेळ वाचनासाठी सुद्धा नक्की ठेवा.

हे वाचन मोबाईल पेक्षा एखाद्या पुस्तकाचं असल्यास जास्त फायदा होईल हे तितकंच खरं.

 

७. कुटुंब :

 

chabad.org

 

अधूनमधून तुमच्या व्यस्त शेड्युल मधून आपल्या कुटुंबासाठी एखादा ब्रेक घ्या. हा पॉईंट जरी या लिस्ट मध्ये शेवटी आला असला तरी महत्व देतांना तुमच्या कटुंबालाच पहिलं प्राधान्य द्या असं प्रत्येक यशस्वी व्यक्ती तुम्हाला सांगेल.

तुमच्या कुटुंबातील सदस्य हे तुमच्यावर सर्वात जास्त प्रेम करणारे असतात. तुम्हाला काही झालं तर हेच लोक सर्वात आधी हजर असतील हे कधीच विसरू नका.

निदान आठवड्यातील एक दिवस असा ठेवा जेव्हा तुम्ही तुमच्या कामाचं कोणतंही टेन्शन घरी आणायचं नाही असं स्वतःशी ठरवा आणि पूर्ण वेळ तुमच्या कुटुंबाला द्या.

यशस्वी लोक नेहमी या गोष्टीचं भान ठेवतात आणि त्यांच्या करिअर मध्ये नवीन शिखर ते नेहमीच सर करत असतात.

 

८. सेल्फ रिचार्ज :

 

elements.elvato.com

 

आपण मोबाईल मध्ये किती बॅटरी शिल्लक आहे हे ठराविक अंतराने बघतच असतो. कधी आपल्या मेंदू ची बॅटरी सुद्धा रिचार्ज करून घ्यावी. ज्याला आपण सेल्फ रिचार्ज म्हणू शकतो.

हे करण्यासाठी तुम्हाला शांत झोप घेण्याची फार आवश्यकता आहे. त्यासोबतच काही वेळ निसर्गसोबत घालवल्याने सुद्धा तुम्हाला आवश्यक तो रिचार्ज मिळू शकतो.

एखादी संध्याकाळ कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू शिवाय व्यतीत करता येईल का ते बघा. तुमची बॅटरी रिचार्ज होईल आणि त्याचं आयुष्य वाढेल.

या सोबतच, तुमच्या मित्रांना आणि सोशल नेटवर्क मधून तुम्ही ज्या क्षेत्रात काम करत नाहीत त्याची सुद्धा माहिती मिळवण्याचा आणि तुमचं नेटवर्क सर्कल वाढवण्याचा प्रयत्न करा.

कोणती व्यक्ती तुमच्या कधी कामी येईल हे काही सांगता येत नाही.

वाढत्या तंत्रज्ञानाचा सकारात्मक फायदा करून अतिरिक्त वेळेचा पुरेपूर फायदा करून घेण्यासाठी आणि गोष्टी सुरळीत झाल्यावर आपल्या ध्येयप्राप्तीसाठी आमच्या टीम कडून हार्दिक शुभेच्छा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version