Site icon InMarathi

एवढी साधी गोष्ट केलीत तर तूमच्या आरोग्याला प्रचंड फायदा होऊ शकतो. सविस्तर वाचा..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

टाळ्या वाजवून कौतुक, आनंद, स्वागत इत्यादी अनेक भावना व्यक्त करण्याची पद्धत जगात सगळीकडे आहे. आपल्याकडे भारतातही आहे. तसेच आपल्याकडे देवाच्या आरतीतही मोठ्याने टाळ्या वाजवण्याची पद्धत आहे.

या टाळ्या वाजवण्यात भावना सामील असतातच. परंतु टाळ्या वाजवल्याने शरीराला अनेक फायदेही होतात.

दोन्ही हात एकमेकांवर आपटून टाळ्या वाजवल्याने दोन्ही हाताचे बरेचसे महत्त्वाचे पॉइन्टस दाबले जातात. त्यांच्यावर प्रेशर येतं. त्यामुळे एक्युप्रेशर होऊन त्याचे सर्व फायदे आपल्याला मिळतात.

क्लॅपिंग थेरपी –

 

deccanherald.com

 

यालाच क्लॅपिंग थेरपी असेही म्हणतात. कारण या टाळ्या वाजवण्यातून अनेक शारीरिक समस्यांपासून मुक्ती मिळते. अनेक व्याधी कमी होण्यास मदत होते.

ठराविक, विशिष्ट पद्धतीने त्या टाळ्या वाजवल्यास त्याचे अचूक फायदे मिळू शकतात.

 

टाळ्या वाजवण्याची नेमकी पद्धत –

 

patrika.com

 

सर्व प्रथम हाताला कोणतेही तेल लावून हातांना मसाज करून घ्या. शक्यतो खोबऱ्याचे तेल यासाठी चांगले. मसाज केल्याने दोन्ही हातात तेल शोषले जाते.

यानंतर पायात मोजे घालून घ्या. त्यामुळे तुमच्या शरीरात तयार होणाऱ्या ऊर्जेच्या लहरी शरीरातून बाहेर पडून जमिनीत उतरणार नाहीत.

त्यानंतर दोन्ही हातांचे तळवे एकमेकांना समांतर सरळ जुळवून घ्या. एकमेकांवर सरळपणे आपटायला सुरूवात करा.

म्हणजे अंगठ्यावर अंगठा, चारी बोटांवर समोरासमोरची चारी बोटं, तळव्याला तळवा आपटतील अशारितीने ठेवा.

शक्यतो ही थेरपी सकाळच्या वेळी करावी. तर त्याचे चांगले फायदे मिळतात.

 

किती वेळ

 

thelogicalindian.com

 

साधारण अशा रितीने अर्धा तास तरी टाळ्या वाजवल्यास त्याचा योग्य फायदा मिळू शकतो. याने रक्ताभिसरण सुधारते. दोन्ही हातांच्या महत्त्वाच्या बिंदूंवर दाब येतो आणि पर्यायाने अॅक्युप्रेशर थेरपीचे सर्व फायदे यातून मिळतात.

रक्ताभिसरण सुधारल्याने रक्तवाहिन्यांमधील दोष दूर होण्यास मदत होते. आणि रक्तातील कोलेस्ट्रोल देखील कमी होण्यास मदत होते.

टाळ्या वाजवताना मुख्य ५ अॅक्युप्रेशर बिंदूंवर दाब येऊन त्याचे फायदे मिळतात : 

 

फायदे –

 

thehealthsite.com

 

theindianexpress.com

 

 

तळहातांवरचे प्रेशर बिंदू –

सध्या हास्य थेरपीप्रमाणेच क्लॅपिंग थेरपी देखील लोकांमध्ये लोकप्रिय होताना दिसत आहे.

आपल्या शरीराची रचना ही बरीच गुंतागुंतीची रचना असते. शरीरातील प्रत्येक अवयव हा दुसऱ्या अवयवाशी या ना त्या प्रकारे जोडलेला असतो.

आपल्या तळहातात आपल्या रक्तवाहिन्यांची टोकं असतात. जर तुम्ही त्यांना उत्तेजित केलंत, तर तुमचे बरेच आजार बरे होण्यास मदत होते. हे एक आश्चर्यकारक सत्य आहे.

 

onlymyhealth.com

 

आपल्या दोन्ही तळहातांवर मिळून जवळपास तीसच्या वर अॅक्युप्रेशर बिंदू असतात. टाळ्या वाजवून तुम्ही हे बिंदू कार्यरत करू शकता. नेहमीच्या सरावाने तुम्ही या बिंदूंवर दाब देऊन त्याचे फायदे मिळवू शकता.

टाळ्या वाजवल्याने मानसिक आरोग्य देखील सुधारते. आपले लक्ष एकाग्र होते. आणि मन स्थिर होते. यामुळे तुम्ही जे काम करत आहात, त्यात अडथळे येत नाहीत.

हृदयाशी संबंधित विकारांवर आराम मिळतो हे तर आपण वर पाहिलेच आहे. बिंदूंवर दाब आल्याने रक्ताभिसरण सुधारून रक्तदाब देखील नियंत्रणात राहतो. त्याने पुढील समस्या कमी होतात. आटोक्यात राहण्यास मदत होते.

जर तुम्हाला फिट आणि अॅक्टीव्ह राहायचं असेल, तर सकाळी २०-३० मिनिटे टाळ्या वाजवल्यास रक्तवाहिन्यांमधील अडथळे दूर होऊन रक्तप्रवाह सुधारतो. सोबतच कोलेस्ट्रॉलचा त्रासही कमी होतो.

 

food.ndtv.com

 

टाळ्या वाजवल्याने लहान मुलांमधील वेगवेगळी कौशल्ये निर्माण होण्याची शक्यता असते. कारण त्यांच्या वाढीचा तो काळ असल्याने तळहातावरील बिंदू उत्तेजित होऊन ती कार्यरत होतात.

त्यामुळे इतर थेरपींप्रमाणेच ही पण एक समांतर उपचारपद्धती आहे. तुम्हीही त्याचा उपयोग करून पाहू शकता.

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version