Site icon InMarathi

डेंटिस्ट कडे न जाता तोंडाचं उत्तम आरोग्य राखण्याचा “हा उपाय” जाणून घ्या

mr bean inmarathi

youtube.com

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

कोविड – १९च्या संसर्गाच्या या काळात लोक आपल्या घशाची, तोंडाच्या आतल्या भागाची जास्तीत जास्त काळजी घेताना दिसत आहेत. मात्र त्यासाठी दातांच्या डॉक्टरांकडे जायचे टाळत आहेत.

तोंडाच्या आतल्या भागाची स्वच्छता राखायची असेल, आणि दुर्गंधी टाळायची असेल, दात स्वच्छ ठेवायचे असतील, तर तुम्ही काय खाता आणि केव्हा खाता यावरही बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. तेवढी दक्षता ठेवली तरी तुमच्या तोंडातील आरोग्य चांगले राहण्यास मदत होईल.

तज्ज्ञांचं म्हणणं आहे, की अती साखर असलेले पदार्थ, प्रक्रियायुक्त पदार्थ, पित्तकारक पदार्थ आणि अति कार्बोहायड्रेट्स असलेले पदार्थ टाळायला हवेत. असंही त्यात पोषक तत्वं फारशी नसतात.

त्याऐवजी पोट साफ राहण्यासाठी भरपूर फायबर असलेले पदार्थ, पोषक पदार्थ, कॅलशिअम, फॉस्फरस आणि मॅग्नेशिअम असलेले पदार्थ आहारात समाविष्ट करा.

सध्याच्या कोविड संसर्गाच्या काळात डेंटिस्टकडे जाता येत नाही. अशावेळी दातांचे, आणि तोंडाच्या आतील भागांचे आरोग्य कसे राखायचे हे पाहू या.

 

livemint.com

 

सुरूवात आधी आहारापासून करू. आपल्या आहारावर आपल्या तोंडातील बरेचसे आरोग्य अवलंबून असते हे तुम्हाला ठाऊक आहे का? दातांची मजबूती टिकवायची असेल, तर कमी कार्बोहायड्रेट्स आणि कमी साखर असलेले पदार्थ आहारात असू द्या.

त्याऐवजी कॅलशिअम, मॅग्नेशिअम, फॉस्फरस अशा शरीरावश्यक तत्वांनी समृद्ध असलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करा.

प्रक्रियायुक्त, साखरेचे पदार्थ टाळा. तळलेले, मसालेदार पदार्थ पित्त करतात त्यांचा परीणाम तोंडातील दुर्गंधी येण्यावर होतो. ते टाळा.

कोणते पदार्थ खायचे?

तुमचे तोंडातील आरोग्य टिकवण्यासाठी पुढील पाच पदार्थांचा आहारात समावेश असू द्या.

 

१. चॉकलेट :

 

globaldentalcare.org

 

दातांच्या आरोग्यासाठी चॉकलेट्स? आश्चर्य वाटले ना. परंतु चॉकलेट्स हे दातांच्या आरोग्यासाठी, त्यांना सडण्यापासून रोखण्यासाठी, त्यांवरील बॅक्टेरीया मारण्यासाठी खरंच चांगले आहे. परंतु त्यात साखर नसेल तेव्हाच!

हे लक्षात असू द्या. बिना साखरेच्या चॉकलेट बिया किंवा कोको हा दातांना सडण्यापासून रोखतो.

२००९च्या अभ्यासावरून हे सिद्ध झालेले आहे की कोको, कॉफी आणि चहा हे तिनही पदार्थ आरोग्याला चांगले आहेत, ते तोंडातील दुर्गंधी दूर करतात. बॅक्टेरीया मारतात आणि दातांना सडण्यापासून वाचवतात.

मात्र या तिन्ही पदार्थांचे सेवन साखरेशिवाय करायचे आहे. ब्लॅक टी, ग्रीन टी, साखर विरहित कॉफी यांच्या सेवनाने फायदा होतो. तर त्यात साखर, दूध आदी टाकल्याने नुकसान!

डार्क चॉकलेट्स बाजारात मिळतात ते आरोग्याला चांगले हे सिद्ध झालेले आहेत.

 

२. डेअरी प्रॉडक्ट्स –

 

meticulousblog.org

 

चीज, बटर इत्यादी डेअरी पदार्थांमध्ये के२ हे व्हिटॅमिन असते. ते दातांसाठी महत्त्वाचे असते. तरीही जगातील बहुतांश लोकांच्या शरीरात के२ या जीवनसत्वाची कमतरता दिसून येते.

दातांच्या आरोग्यास मदत करणारे के२ अजून आपल्याला मिळू शकते ते गोमांस, बदकं, अंडी आणि चिकन यांच्यातून. शिवाय या सगळ्या पदार्थांमध्ये फॉस्फरसचे प्रमाणही जास्त असल्याने ते दातांना पोषक असतात.

 

३. जाड मोठे मासे –

 

indiatoday.in

 

अशा माशांमध्ये व्हिटॅमिन डी भरपूर असते. हे व्हिटॅमिन शरीराच्या सगळ्याच अवयवांना आवश्यक असते. परंतु महत्त्वाचे म्हणजे हे व्हिटॅमिन दातांना सडण्यापासूनही वाचवते हाही त्याचा फायदा आहे.

व्हिटॅमिन डी हे व्हिटॅमिन ए आणि के२ या व्हिटॅमिनच्या संगतीने दातांना कॅलशिअम पुरवण्याचे काम करते. त्यावरील एनॅमल बळकट ठेवण्याचे काम करते. त्यामुळे या तीन्हीपैकी कोणतेही व्हिटॅमिन कमी पडले तरी दातांचे एनॅमल कमकुवत होऊ शकते.

माशांमध्ये ओमेगा-३ हे फॅट्स असतात. ते आपल्या हिरड्या मजबूत ठेवण्यास मदत करते. आणि हिरड्यांच्या आजारांपासून मुक्त ठेवते.

जर दात घासताना किंवा फ्लॉसिंग करताना तुमच्या हिरड्यांतून रक्त येत असेल, तर ते बंद करण्यासाठी आहारात ओमेगा-३ हे फॅट्स मिळवून देणारे पदार्थ आहारात समाविष्ट करा.

ट्युना, मॅकरेल, सामन आणि ट्राऊट या माशांमध्ये व्हिटॅमिन डी आणि ओमेगा-३ हे फॅट्स असतात.

 

४. हिरव्या पालेभाज्या –

 

blog.mybalancemeals.com

 

हिरव्या पालेभाज्यांमधून शरीराला आवश्यक असणारे बॅक्टेरिया मिळतात. कार्बोहायड्रेट्सच्या अगदी विरुद्ध हिरव्या भाज्या तोंडाला नायट्रेट कमी करणारे बॅक्टेरिया तयार करण्यास मदत करतात.

नायट्रीक ऑक्साईडमधील वाढीव स्रोतामुळे आपल्या तोंडातील अवयवांना, आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी प्रणालीला फायदा होतो.

हिरव्या पालेभाज्या दातांना स्वच्छच ठेवतात असं नाही तर त्यांचे आरोग्यही चांगले राखून दात बळकट राहतात. पालक, हिरवा माठ इत्यादी पालेभाज्या आपल्या दातांसाठी चांगल्या असतात.

 

५. द्राक्षे आणि संत्री –

 

pikist.com

 

द्राक्षे, संत्री इत्यादींसारखी सायट्रस फळे दातांसाठी अत्यंत चांगली असतात. अर्थात ती प्रमाणातच खायला हवीत. या फळांमध्ये भरपूर मात्रेत व्हिटॅमिन सी असते. हे तोंडातल्या रक्तवाहिन्या आणि संयोजी उतींना मजबूत ठेवते.

या व्हिटॅमिनमुळे हिरड्याही मजबूत राहतात. आणि त्यातून ब्लिडींग होणे थांबते.

सन २००५च्या प्रायोगिक अभ्यासातून असे दिसून आले आहे की फक्त दोन आठवडे रोज द्राक्षे, संत्री इत्यादी फळे खाल्ल्याने शरीरातील व्हिटॅमिन सीची पातळी वाढते आणि हिरड्यांतून रक्त येण्याचे बंद होते.

कोणते पदार्थ खाणे टाळा?

पुढील पाच पदार्थ टाळा. हे दात सडणे, हिरड्यांतून रक्त येणे आणि दातांतून कळा मारणे अशा आजारांना आमंत्रण देतात.

 

१. कुरकुरे –

 

thehindubusinessline.com

 

चॉकलेट्स, कॅन्डी, आईस कॅन्डी यांच्याहीपेक्षा दातांना अधिक हानीकारक कोणता पदार्थ असेल तर तो विविध प्रकारचे कुरकुरे, वेफर्स इत्यादी. असे पदार्थ तोंडात लवकर विरघळतात आणि तोंडभर पसरतात.

त्यामुळे काही सेकंदातच बॅक्टेरियांना तिथे मेजवानी मिळते. हे जीवाणू दातांवरचे आम्ल विरघळवतात आणि त्यामुळे दात सडण्यास कारणीभूत ठरतात.

जर तुम्हाला कुरकुरे खायचेच असतील तर ते वेगवेगळ्या नट्सपासून आणि तीळ, अळशी इत्यादींपासून बनवलेले खा. मैद्याचे, किंवा पिठाचे खाऊ नका.

 

२. ड्रायफ्रूट्स किंवा सुका मेवा –

 

timesofindia.indiatimes.com

 

ताजी फळे दातांच्या आरोग्याला चांगली असतात, परंतु ड्राय फ्रूट्समधील सर्व पाणी निघून गेलेले असते आणि मागे जे उरलेले असते तो चिकट गर असतो. जो खाताना दातांच्या फटीत आणि दातांवर चिकटून बसतो.

शिवाय त्यात साखरही असते. त्यामुळे दातांमध्ये जिवाणूंचा शिरकाव मोठ्या प्रमाणात होतो. ताज्या फळांत पाणी असल्याने त्यातील गर असा चिकटून राहत नाही.

 

३. सोडा –

 

parenting.firstcry.com

 

सोडा युक्त कोल्ड्रींक्समध्ये मोठ्या प्रमाणावर ऍसिड असते. या ऍसिडमुळे हिरड्या कमकुवत होणे, दात सडणे असे प्रकार होतात. ही कोल्ड्रींक्स दातांच्या आणि तोंडातील आरोग्याला अतिशय हानीकारक असतात.

जर तुम्हाला अशी पेये प्यावीशी वाटतच असतील तर ती लवकर संपवा. हळू हळू पीत बसू नका. आणि पिऊन झाल्यावर लगेच चूळ भरून तोंड स्वच्छ करून घ्या. त्यानंतर अर्ध्या तासाने ब्रश करून घ्या.

 

४. बिन्स (कडधान्ये) आणि डाळी –

 

daitradesco.com

 

खरंतर डाळी आणि कडधान्ये शरीराला चांगली असतात. मात्र त्यातील फायटीक ऍसिड दातांना हानीकारक ठरते. कारण फायटीक ऍसिड हे शरीरातील कॅलशिअम, फॉस्फरस, व्हिटॅमिन डी आणि मॅग्नेशिअम यांना प्रतिरोध करते.

त्यामुळे ही दातांसाठी आवश्यक असलेली तत्वे नष्ट होतात. किंवा ती दातांना ऍब्सॉर्ब करण्यास कठीण बनतात.

त्यामुळे दात सडण्यास मदत होते. मात्र डाळी आणि कडधान्ये यांच्यात फायटीक ऍसिड जास्त झाले तर ते आरोग्याला चांगले असते.

 

५. आईस्क्रीम्स, चॉकलेट्स, कॅन्डी इत्यादी –

 

youtube.com

 

आपण वरती पाहिले की साखर नसलेले किंवा कमी साखरेचं चॉकलेट दातांच्या आरोग्याला चांगले असते, तर साखर असलेली चॉकलेट्स, कृत्रिम रंग, चव आणि साखर असलेली आईस्क्रिम्स, कॅन्डी इत्यादी खाल्ल्यामुळे तोंडात जिवाणूंची संख्या वाढण्यास मदत होते आणि पर्यायाने दात सडण्यासही.

त्यामुळे असे पदार्थ एकतर टाळावे किंवा खाऊन झाल्यावर लगेचच तोंड स्वच्छ पाण्याच्या चुळा भरून स्वच्छ करून घ्यावे.

वरीलप्रमाणे काळजी घेऊन तुम्ही तुमच्या आहारात बदल केलेत, तर डेंटिस्टकडे न जाताही तुमचे दात आणि तुमच्या हिरड्या, तसेच तोंडाचे आरोग्य चांगले राहील.

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version