Site icon InMarathi

१० वी नंतर पुढे करियर निवडताना काय काळजी घ्यावी? कोणत्या चुका टाळाव्यात? समजून घ्या!

tensed boy inmarathi

memegenrator.net

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आपल्या भारतीय शिक्षण पद्धतीनुसार करियरच्या आधी शिक्षण येतं. आणि शिक्षणात पहिला मैलाचा दगड येतो तो इयत्ता दहावी. मैलाचा दगड का?

तर, करियरच्या दिशेने पाय ठेवण्यासाठी महत्त्वाचे पाऊल इथून उचलले जाते. बारावी आणि नंतर पदवी अभ्यासक्रम.

आपआपल्या आवडीनुसार दहावी नंतर विषय ठरले जातात किंवा सोबत असणाऱ्या मार्गदर्शक व्यक्तीच्या नुसार याचा निर्णय होतो. तरी महत्वाचा असणाऱ्या या निर्णयात बहुतेक दहावी पास विद्यार्थी गोंधळून जातात.

 

 

hindustantimes.com

 

आवड, घरच्यांचा दबाव, मित्र असे अनेक मुद्दे यात असतात. आणि अनायसे चुकीचे निर्णय घेतले जातात.

दोन उदाहरण घ्या. त्यापैकी पहिले म्हणजे भारताचे माजी राष्ट्रपती कलाम साहेब. आकाशात उड्डाण करायचं हे त्यांचं स्वप्न. त्यानुसार इंटरमेडीएट पास झाल्यावर सायन्स घेतलं.

एरोनॉटिक्समध्ये पदवी घेऊन वैमानिक होण्याच्या आपल्या स्वप्नांसाठी परीक्षा सुद्धा दिली. आणि त्यात टॉप करून दाखवलं!

पण, उंची कमी असल्याने त्यांना ती नोकरी नाकारण्यात आली. आपली मर्यादा त्यांना कळाली. डीआरडीओची परीक्षा दिली. त्यात सुद्धा टॉप केलं आणि शास्त्रज्ञ म्हणून रुजू झाले. मजल दरमजल करत इस्रो मध्ये पोहोचले.

स्वतःचं स्वप्न देशाचं स्वप्न समजून देशाला अंतराळात त्यांनी स्थान मिळवुन दिल.

 

 

दुसरं म्हणजे २०१५-१६ मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत टॉप आलेल्या टीना डाबी यांचं. त्यांचं आयएएस व्हायचं हे फिक्स होत. त्यामुळे दहावी नंतर आर्ट्स, बारावी नंतर बीए घेऊन त्यांनी त्यांचं ध्येय गाठलं.

सांगायचं तात्पर्य एवढंच, की भविष्यात काय करायचं हे स्पष्ट असेल तर निर्णय घेताना अडचणी येत नाहीत. तरी नेमकं काय करायचं याबाबत अजून गोंधळात असाल तर पुढील माहिती नक्कीच उपयोगी ठरेल.

सर्वप्रथम आपल्याला नेमकं काय करायचं आहे ते ठरवा. जमलं तर त्यासाठी एखाद्या उत्तम कौन्सिलर किंवा करियर मार्गदर्शन करणाऱ्या व्यक्तीची मदत तुम्ही घेऊ शकता.

दहावी नंतर स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी खूप स्कोप असतो. करियर साठी प्रत्येक मार्ग इथून खुला होतो. योग्य निर्णय घेऊन त्यावर जर काम करत राहिलो तर दहावीला एव्हरेज मार्क मिळून सुद्धा स्वप्न सत्यात उतरवता येतात.

त्यामुळे करियर निवड हा सगळ्यात महत्वाचा असा विषय आपण म्हणू शकतो. मग आता योग्य निर्णय कसा घ्यायचा?

दशकभर मागे जाऊया, पालकांचं सायन्स घेणे हा आधीच निर्णय झालेला असायचा. आणि तो निर्णय ते आपल्या पाल्यावर थोपवायचे.पण सायन्स मध्ये सुद्धा बायोलॉजी घ्यायचं की मॅथेमॅटिक्स की दोन्ही. यासाठी सुद्धा ते अनुभवी व्यक्तीची मदत घ्यायचे.

 

indianexpress.com

 

पण आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. मुलांना आपली आवड निवड कळून त्यामार्गे आपलं फिल्ड निवडण्याचे ज्ञान किंवा इंटरनेटच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार आपलं करियर मार्ग निवडायचा एकंदरीत ज्ञान आले आहे असं म्हणून शकतो.

तरी पुन्हा प्रश्न राहतो की दहावी नंतर काय?

फेव्हरेट करियर साईड म्हणून सायन्स स्ट्रीम ही नेहमीच प्रथम पसंतीला राहिलेली आहे. तरी आपल्या बुद्धीला पटेल आणि आपलं ज्ञान याच्या बळावर योग्य ती स्ट्रीम निवडावी. ज्यामुळे करियरमधली शिखरं गाठतना गोंधळ निर्माण होणार नाही.

इथ पर्यंत सुद्धा निर्णय होत नसेल तर पुढील माहिती अजून उपयुक्त ठरेल.

सायन्स (विज्ञान शाखा)

सर्वाधिक पसंत केली गेलेली शाखा. डॉक्टर, इंजिनिअर, आर्किटेक्ट बनायचं असेल तर मग ही शाखा महत्वाची.

सायन्स घेतल्याचा एक फायदा म्हणजे बारावी नंतर डिग्री साठी तुम्ही कॉमर्स किंवा आर्ट्सकडे जम्प करू शकता. (जर सायन्स मध्ये तुम्ही कम्फर्टेबल नसाल तर!)

 

indiadidac.org

 

एव्हीएशन मध्ये करियर करायचं असेल तर सायन्स गरजेचं. त्याशिवाय नॅशनल डिफेन्स अकॅडमी मध्ये प्रवेश हवा असेल तर बारावी सायन्स असणे गरजेचे आहे.

नाही म्हटलं तरी भारतीय संरक्षण व्यवस्थेत अधिकारी व्हायचं असेल तर सायन्स स्ट्रीम नक्कीच मदत करू शकते.

 

कॉमर्स (वाणिज्य शाखा)

बिझनेसमन लोकांची आवडती स्ट्रीम. चार्टर्ड अकाऊंटंट, कंपनी सेक्रेटरी, बँकिंग प्रोफेशन सारखे रेप्युटेड जॉब साठी कॉमर्स गरजेचं आहे.

सायन्स एवढंच महत्वाचे करियर ऑप्शन कॉमर्स मध्ये आहेत. ऑडिट, इन्कम टॅक्स, इन्व्हेस्टमेंट बँकिंग, आर्थिक सल्लागार सारखे मार्ग कॉमर्स मधून निघतात.

 

guidanceedge.com

 

आर्ट्स (कला शाखा)

अंडररेटेड आणि एक्सायटिंग करियरसाठी उपयुक्त! आताच्या काळात सर्वाधिक परसेप्शन चेंज करणारी स्ट्रीम.

लिमिटेड व्हिजन असलेल्या या स्ट्रीम ने येत्या काळात एवढं ब्रॉड व्हिजन ठेवलं की आर्ट्स स्ट्रीम मध्ये ऍडमिशन घेणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढली.

शिक्षकी पेक्षा, जर्नलिजम, सामाजिक कार्यकर्ते, साहित्य सारखे समाजोपयोगी करियर ऑप्शन इथून खुले होतात. त्याशिवाय स्पर्धा परीक्षा आहेतच. सरकारी नोकऱ्या त्या वेगळ्या!

पोलिटिकल सायन्स, सोशियोलॉजी, साहित्य, फिलॉसॉफी, भाषा सारख्या विविध विषयात अभ्यास आणि संशोधनाला आज खूप मागणी आहे.

 

universitiesrankings.com

 

आणि यासाठी कला शाखेतली पदवी गरजेची आहे.

 

पॉलिटेक्निक डिप्लोमा

बारावीची परीक्षा बायपास करून इंजिनिअरिंग करायचे असेल तर हा ऑप्शन बेस्ट आहे. तीन वर्षे डिप्लोमा त्यानंतर इंजिनिअरिंगच्या थेट दुसऱ्या वर्षात प्रवेश असं एकूण याच स्वरूप आहे.

 

व्होकेशनल कोर्सेस.(आयटीआय)

इंडस्ट्रीयल बिझनेस साठी हा पर्याय आहे. इलेक्ट्रिशियन, फिटर, कार्पेन्टर, वेल्डर सारख्या व्होकेशनल कोर्सेस साठी हा ऑप्शन आहे.

सरकारी लायसन्स काढून कमी वेळेत बिझनेस करण्यास किंवा सरकारी कॉन्ट्रॅक्ट घेण्यास हे कोर्सेस उपयोगी ठरू शकतात.

 

indiatoday.in

 

आता यापैकी कोणता ऑप्शन निवडावा? त्यासाठी पुढील गोष्टी आपण करू शकतो.

१. आवड आणि स्वारस्य कशात आहे याची पडताळणी :

बऱ्याचदा तुम्ही पाहिलं असेल की नोकरी करणारी व्यक्ती नाखुश आहे. करायचं एक होतं आणि वर्तमानात दुसरंच करत आहे. असं आपल्या सोबत होऊ नये असं कोणाला वाटणार नाही?

तर, हे टाळण्यासाठी आपली आवड आणि स्वारस्य असलेले विषय ओळखा. आणि त्याच मार्गे करियर साठी उपयुक्त असलेली स्ट्रीम निवडा. आवड असलेली गोष्ट करण्यात जी मजा आहे ती ओढून ताणून केलेल्या कामात नाही!

 

psychmatters.co.uk

 

आपल्या आवडीनुसार आपली शाखा निवडा. मग ती कोणतीही असो. तुमची आवड त्या मध्ये जपली जाणार आहे.

 

२. ताकद ओळखा :

एकदा का आवडीनुसार तुमचा विषय ठरला की मग त्या विषयाला अनुसरून तुमची क्षमता आणि कौशल्य याबद्दल विचार करा.

तुमच्या आवडीनुसार तुम्ही स्ट्रीम निवडलीत पण त्या स्ट्रीमला अनुसरून तुमच्या कडे कौशल्य नसेल आणि ते विषय हाताळायला क्षमता नसेल तर नैराश्य येणं साहजिकच आहे.

उदाहरणार्थ, तुम्हाला गणित आवडतं आणि तुम्ही सायन्स घेऊन त्यात पुढे गणित घेऊन जाणार असाल तर तुम्हाला दहावीच्या लेव्हलच्या गणिताबद्दल विचार सोडून बारावीच्या गणिताला अनुसरून कौशल्य विकसित करावं लागेल.

 

rulestheynevertoldus.com

 

कारण बारावीला असणारं डेरिव्हेशन, इंटेग्रेशन, व्हेक्टर हे दहावी पर्यंत आलेलंच नसतं. अकरावीला त्यांची तोंडओळख असते आणि बारावीला सखोल अभ्यास.

 

३.करियरचा मार्ग निश्चित करा :

एकदा का आवड करियर मध्ये परावर्तित झाली की कळतं घेतलेला निर्णय किती योग्य होता. तुम्हाला आवडणारी प्रत्येक गोष्ट करियर मध्ये परावर्तित होईल असं नसतं.

तुम्ही उत्तम पतंग उडवता याचा अर्थ तो उत्तम करियर चॉईस आहे असं नाही. तुमची आवड तुम्हाला कोणत्या क्षेत्रात उत्तम यश गाठून देऊ शकते याबद्दल विचार करा.

याबाबत तुम्ही प्रोफेशनल करियर मार्गदर्शकांची सुद्धा मदत घेऊ शकता.

 

whitneycareerguidance.com

 

४.अनुभवी लोकांचे मार्गदर्शन :

आपल्या आजूबाजूला असे बरेच जण असतात की त्यांनी त्यांच्या आवडीला त्यांचे करियर बनवले आहे. तुमचे स्वतःचे आई बाबा, मोठी भावंडे, मित्रांचे आई बाबा, त्यांची भावंडे इत्यादी.

मार्गदर्शन घेऊन त्यानुसार ठरवले तर ते सुद्धा आपल्या भविष्यासाठी उत्तम राहील.

एकूणच, दहावी नंतर करियर साठी अनेक वाटा खुल्या होतात. आपली आवड, इच्छा, फायनल गोल यांचं एकूण तारतम्य ठेवून दहावी नंतर काय याचं उत्तर मिळू शकेल.

त्यानुसार त्यावर काम करून प्रश्नांची उत्तरं मिळवली तर पुढे पडणारे अनेक प्रश्न आपोआप सुटून जातील.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version