' नासा तयार करतेय अंतराळात उडणारी रेल्वे! – InMarathi

नासा तयार करतेय अंतराळात उडणारी रेल्वे!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

रेल्वेने अंतराळात प्रवास करण्याचे स्वप्न तुमच्यापैकी कोणाला कधी पडलंय का? जर असं स्वप्न तुम्ही पाहत असाल किंवा हे स्वप्न सत्यात साकार व्हावं अशी तुमची इच्छा असेल तर अभिनंदन!!! कारण ही स्वप्नवत कल्पना प्रत्यक्षात साकार होण्याची आशा आहे.

फार लांब नाही, पण 2032 पर्यंत तुम्ही एखाद्या रेल्वेमध्ये बसून अंतराळ पर्यटनासाठी निघू शकता. ‘स्ट्रारट्रॉम’ नावाच्या वाहनामुळे ते शक्य होणार आहे. अमेरिकेच्या नासा या अंतराळ संस्थेतील शास्त्रज्ञांसह अनेक नामांकित शास्त्रज्ञ या प्रकल्पावर काम करीत आहेत. चुंबकीय शक्तीवर चालणारी रेल्वे डिझाइन करणारे शास्त्रज्ञ डॉ. जेम्स पॉवेल यांनी ही संकल्पना पूर्णत: शक्य असल्याचे म्हटले आहे.

space-railway-marathipizza

स्रोत

चुंबकीय शक्तीवर चालणाऱ्या रेल्वे प्रमाणेच ही स्टारट्रॉम अंतराळात उड्डाण घेईल. सर्वात आधी एका लांब धावपट्टीवर ही ट्रॉम पळवली जाईल. त्यानंतर 10 अंशाच्या कोणात सुमारे 8000 मीटर उंच ट्यूबमध्ये ती पाठवली जाईल.

ही ट्यूब पृथ्वीवरील एखाद्या उंच डोंगरावर असेल. तिथूनच ही ट्रॉम अंतराळात प्रवेश करील आणि त्याच मार्गाने परतही येईल.

space-railway-marathipizza01

स्रोत

चुंबकीय रेल्वेचे डिझाइन तयार झाल्यानंतरच या प्रकल्पाच्या संकल्पनेचा आराखडा करण्यात आला होता. 1960 मध्ये जेम्स आर. पॉवेल आणि गार्डन डॅन्बी यांनी मॅग्लेव्ह रेल्वेची डिझाइन तयार केली होती. त्यानंतर पॉवेल यांनी स्टारट्रॉम कंपनी स्थापन केली. त्यात अंतराळ अभियंता डॉ. जॉर्ज मॅसेही सहभागी झाले. 2001 मध्ये पहिल्यांदाच या प्रकल्पाचे दस्तऐवजाच्या स्वरूपात प्रेझेंटेशन करण्यात आले. त्यानंतर नासाच्या शास्त्रज्ञांनी त्याचे आधुनिक संगणकीय मॉडेल तयार केले.

पहिल्या टप्प्यात कार्गो आणि पुनर्वापर करता येण्यासारख्या आवश्यक वस्तू अंतराळात पाठवण्यात येतील. दुसऱ्या टप्प्यात पर्यटक पाठवले जातील. 1000 किलोमीटर लांबीच्या ट्यूबमध्ये 8 किलोमीटर प्रतिकिलोमीटर वेगाने धावल्यानंतर स्ट्रारट्रॉम उड्डाण घेईल. 20 किलोमीटर उंचीवरून स्ट्रारट्रॉमचे लाँचिंग होईल. त्यासाठी स्वतंत्र उड्डाणस्थळ बांधण्यात येणार आहे.

space-railway-marathipizza02

स्रोत

अमेरिका माऊंट सेंट अ‍ॅलियास, अलास्का 5489 मीटर, रशिया क्लायउदेवस्काया, कामचाट्का 4750 मीटर, चीन गोंगा शान, शेजवन प्रांत 7556 मीटर, ग्रीनलँड बर्फाचा सर्वात उंच सुळका 3220 मीटर या ठिकाणांवरून स्ट्रारट्रॉम उड्डाण घेऊ शकते.

40 डॉलर/ किलोग्रॅम म्हणजेच सुमारे 2000 रुपये प्रति किलोग्रॅम इतका प्रवासाचा खर्च येऊ शकतो. सध्याच्या अंतराळ प्रवासाच्या तुलनेत हा प्रवास खूपच स्वस्त असल्याचे म्हटले जाते.

space-railway-marathipizz3

स्रोत

ही कल्पना जर खरोखर अस्तित्वात आली तर तो जगासाठी एक अद्भुत अनुभव ठरेल हे मात्र नक्की!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?