आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
६ डिसेंबर १९९२ ला बाबरी मशिदीची विवादित वास्तू जमीनदोस्त करण्यात आली. माथेफिरू धर्मांध लोकांनी सामान्य लोकांचे जीव घेतले. त्यानंतर देशात एक धार्मिक तेढ निर्माण करणारे दंगे सुरू झाले.
“मंदिर की मशीद” हा वाद समाजाच्या उन्मादास कारणीभूत ठरला.
हा खटला अनेक वर्ष चालूच होता. सरकर बदलले, पण विरोधकांनी एकमेकांवर कुरघोडी करणे चालूच ठेवले. कोर्टाच्या पायऱ्या चढण्याचा नेम कोणत्याच राजकरण्याला चुकला नाही.
मशीद पाडण्यात नेमका कोणाचा हात होता? या सगळ्या राजकरणामागचे सूत्रधार कोण? दोषी कोण? चूक कोणाची? असे एक ना अनेक प्रश्न यातून उभे राहिले.
या खटल्यातील सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न होता तो म्हणजे, या जागेवर मालकी कुणाची?
गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या “अयोध्या राममंदिर” खटल्यात अयोध्येची वादग्रस्त जागा ही ‘रामलल्ला’चीच असल्याचा निकाल कोर्टाने २०१९ मध्ये दिला. आणि इतक्या वर्षांची प्रतीक्षा अखेर संपली.
निकालापूर्वीही राजकारण्यांनी एकमेकांवर ताशेरे ओढण्याची संधी सोडली नव्हती. आणि आता राममंदिराचे भूमिपूजन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले असतानाही एकमेकांवर ताशेरे ओढण्याची राजकारण्यांची खोड काही जात नाहीये.
सध्या संपूर्ण देशाचे लक्ष ५ ऑगस्ट या तारखेकडे लागले आहे. ठराविक लोकांच्या उपस्थितीत मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमीपूजनाचा सोहळा पार पडणार आहे.
कोरोना महामारीचा आलेख बघता या कार्यक्रमासाठी अत्यंत ठराविक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमावरून एआयएमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी आक्रमक झालेले दिसत आहेत.
त्यांच्या अनेक वक्तव्यांवरुन ते या आधीही अनेक वेळा वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. अयोध्या खटल्याच्या बाबतीत तर त्यांची मतं विशेष वादातीत आहेत.
६ डिसेंबर २०१५ रोजी “अयोध्येत राम मंदिर नाही, तर बाबरी मस्जिदच होईल” असंही ते म्हणाले होते.
फक्त हाच खटला नाही तर “नोटाबंदी”, “तीन तलाक” अशा प्रत्येक घटनांमध्ये त्यांनी कायमच वादातीत मत प्रदर्शित केले आहे.
त्यांचा हा आक्रमक पवित्रा आणि वादांचा इतिहास बघता, भूमिपूजनावर त्यांनी मतप्रदर्शन केले नसते तरंच नवल होतं.
“पंतप्रधानांनी भूमीपूजनाच्या कार्यक्रमाला जाणं हे संविधानाच्या शपथेविरोधात जाणारं आहे” असं त्यांनी ट्विट करून सांगितलं.
Attending Bhumi Pujan in official capacity will be a violation of @PMOIndia‘s constitutional oath. Secularism is part of the Basic Structure of Constitution
We can’t forget that for over 400 years Babri stood in Ayodhya & it was demolished by a criminal mob in 1992 https://t.co/qt2RCvJOK1
— Asaduddin Owaisi (@asadowaisi) July 28, 2020
“पंतप्रधानांनी भूमीपूजनाच्या कार्यक्रमात सहभागी होणं म्हणजे संविधानातील शपथेच्या विरोधात जाणारं आहे. धर्मनिरपेक्षता हा संविधानाचा मुलभूत घटक आहे.
अयोध्येत ४०० वर्षाहून अधिक काळ बाबरी मस्जिद उभी होती आणि १९९२ मध्ये गुन्हेगारांच्या गटाने ती पाडली हे आम्ही कधीच विसरणार नाही”
आजतक वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले की,
“मी सुप्रीम कोर्टाचा मान रखत असलो तरीही, सुप्रीम कोर्टाचा निर्णय योग्य नव्हता. मोदी देशाला जोडण्याचा नाही, तर स्वतःचे राजकारण देशावर थोपवण्याचा प्रयत्न करत आहेत.
ज्या पद्धतीने आता देश चालला आहे, ते बघता संविधान बेचिराख करण्यात येत आहे असेच वाटते. संविधानाच्या विरोधात कोणी बोलत असताना मी शांत राहू शकत नाही. देशातला एक खूप मोठा गट मनातल्या मनात मला पाठिंबा नक्की देईल.
जर प्रधानमंत्री भूमीपूजनाच्या समारंभास गेले तर ते एका ठराविक संप्रदायाला पाठिंबा देत आहेत असे चित्र उभे राहील. पंतप्रधान संविधानाशी जोडलेले आहेत. देशाला कोणताही धर्म नसतो. केंद्र सरकारला कोणताही एक ठराविक धर्म नाही.
प्रधानमंत्री हे मुस्लिमांचे, हिंदूचे, दलितांचे प्रधानमंत्री आहेत. जे कोणत्याही देवाला मनात नाहीत अशांचेही ते प्रधानमंत्री आहेत. त्यामुळे, त्यांनी पंतप्रधान म्हणून भूमीपूजनाला जाऊ नये. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात येऊ नये”
“कोर्टाने जरी निकल दिलेला असला तरीही, मी जिवंत असेपर्यंत हा मुद्दा बंद होणार नाही” असेही ते म्हणाले.
त्यांच्या या मतावरून सोशल मिडियावर एक वेगळेच वादंग उठले आहे. त्यांच्या या मतानंतर लोकांनी अक्षरश: त्यांना ट्रॉल करायला सुरुवात केली आहे.
अल्लाच्या नावावर ओवेसी संसदेत शपथ घेतात तेव्हा ती आस्था, भक्ती असते. परंतु प्रधानमंत्री जर अयोध्येत गेले तर ते चुकीचे ठरते” हे ओवेसींचे वागणे दुट्टप्पीपणाचे आहे असा काहीसा सूर लोकांच्या प्रतिक्रियांमधून येतोय.
१) जेव्हा राष्ट्रपती “इफ्तार” पार्टीचे आयोजन करतात तेव्हा कोणतीही धर्मनिरपेक्षता आड येत नाही का? मंदिराचा पाडाव करून मशीद बांधण्यात आली होती. त्यामुळे, ती चूक आता सुधारली आहे असे म्हणणे योग्य आहे.” अशा प्रतिक्रिया या ट्विटवर येत आहेत.
When Presidents of India & CM’s of states were organising Iftaar parties in official capacity, in official residences where was your ‘secularism’?
Masjid was built by razing the temple. That mistake is now reversed.
P.S We don’t need lessons in constitutionalism from Razakars. https://t.co/1vk9I2zvIe
— Tejasvi Surya (@Tejasvi_Surya) July 28, 2020
तेजस्वी सूर्या यांच्या ट्विट मध्ये “रझाकारांकडून आम्हाला संविधानाचे धडे घेण्याची गरज नाहीये” असेही म्हटले आहे.
२) गेल्या २००० वर्षांपासून त्या जागेवर मंदिर होते. बाबरने येऊन ते पाडले आणि एवढेच नाही तर त्या जागेवर त्याने मशीद उभारली. हिंदुवर अनेक वर्ष अन्यायच झालेला आहे.
३) लोकांनी अक्षरश: अगदी हव्या नको त्या शब्दात सुनावले आहे हे खालील काही ट्विटस पाहिले तर लक्षात येते.
४)
५)
६)
७)
८)
९)
१०)
११)
१२)
१३)
१४)
१५)
भरात भर म्हणजे, आता मा. शरद पवार यांच्याही काही विधानांनी सोशल मिडियावर खळबळ उडाली आहे. ५ तारखेला हा सगळा सोहळा नक्की कसा पार पडतो हे पाहणेच उचित!!
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.