' तुमचा स्मार्टफोन या ९ ठिकाणी ठेवण्याची चूक तुम्हाला प्रचंड महागात पडू शकते! – InMarathi

तुमचा स्मार्टफोन या ९ ठिकाणी ठेवण्याची चूक तुम्हाला प्रचंड महागात पडू शकते!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

अन्न, वस्त्र, निवारा या आपल्या मूलभूत गरजा आहेत असं आपण पुस्तकातून शिकलो आहोत. पण आता यामध्ये स्मार्टफोनची गणना केल्यास वावगे ठरणार नाही.

पहिले पत्रव्यवहार व्हायचा मग हळूहळू लँडलाईन्स आले, आणि मग मोबाईल ने त्याची जागा कशी घेतली हे तर सगळ्यांना माहीतच आहे!

आजच्या काळात टेक्नॉलॉजीने माणूस एवढा वेढला गेला आहे की सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण या ना त्या कैक वस्तूंचा वापर करतो. टेक्नॉलॉजीमुळे या गोष्टी मानवी जीवनाचा अविभाज्य भाग बनल्या आहे.

खास करून स्मार्टफोन, स्मार्टफोन शिवाय मानवी जीवन तर अपूर्णच आहे. हे हळूहळू या लॉक डाऊनच्या काळात दिसून येतच आहे.

मोबाईल फोनची एवढी सवय झाली आहे की एखाद्या वेळेस माणूस जेवायला विसरेल पण फेसबुक, इंस्टा, व्हाट्सअँप चेक करायला नाही विसरणार.

 

mobile addiction inmarathi
indiatoday.in

 

तर, मोबाईलच्या संबंधितचं आज आपण काही गोष्टी पाहणार आहोत.

सकाळी प्रात:विधी पासून ते रात्री झोपताना आपल्या उशीखाली मोबाईल येतोच. ही अतिशय वाईट सवय आहे,  बदलत्या काळाशी जुळवून घेणं हे अत्यंत गरजेचं आहे, कामाचा खूप लोड आहे अशी टुक्कार कारणे देत, स्वतःची गोड गैरसमजूत घालून बऱ्याच जणांनी हे प्रकार सर्रास चालवलेले दिसून येते.  पण वरकरणी साधी वाटणारी ही मोबाईल सतत जवळ बाळगण्याची सवय हानिकारक ठरू शकते

आज आपण असेच काही जागा पाहणार आहोत जिथे मोबाइल फोन ठेवणे घातक ठरू शकते.

 

१. पॅन्टचा पुढचा खिसा :

 

mobiles in pocket inmarathi
foxnews.com

 

मोबाईल हे इलेक्ट्रॉ मॅग्नेटिक रेडिएशन वर चालणारं यंत्र आहे. पुढच्या खिशात ठेवल्यामुळे मानवाच्या विशेषकरून पुरुषांच्या आरोग्यात घातक बदल झालेले अभ्यासात दिसून आले आहे.

रेडिएशनच्या प्रभावामुळे पुरुषांच्या वीर्याची क्वालिटी आणि क्वांटीटी यावर थेट फरक पडतो. त्यामुळे जेवढा फोन खिशात राहील तेवढा आरोग्याला जास्त धोका.

 

२. ब्रा :

 

phone in bra inmarathi
vanguardngr.com

 

मेडिकल रिसर्च मध्ये दिसुन आले आहे की कमी वयात स्तनांच्या कॅन्सरला बळी पडलेल्या स्त्रियांच्या या रोगाला कारण हा मोबाईल फोन असल्याचे दिसून आले आहे.

रेडिएशन जरी कमी असले तरी सततच्या त्या रेडिएशनच्या संपर्कामुळे स्तनांच्या काही भागात डेड सेल्सच्या निर्मितीला पोषक अशी स्थिती निर्माण होते.

 

३. झोपताना डोक्याजवळ :

 

mobile while sleeping inmarathi
sclhealth.com

 

रात्री अचानक नोटिफिकेशन आले की, अंधाराच्या मानाने जास्त ग्लो होणाऱ्या प्रकाशामुळे झोप कंट्रोल करण्यासाठी मेंदू मधून निघणाऱ्या मेलाटॉनिन हार्मोन वर थेट फरक पडतो.

इलेक्ट्रो मॅग्नेटिक रेडिएशनच्या सलगच्या संपर्कामुळे चक्कर येणे,डोकेदुखी सारखे त्रास होण्याचे चान्सेस जास्त असतात.

उशीच्या खाली मोबाईल असेल तर व्हेंटिलेशन न मिळाल्यामुळे फोन गरम होऊन स्फोट होण्याची शक्यता असते.

 

४. लहान मुलांचे स्ट्रोलर :

 

mobile phone on stroller inmarathi
proclipusa.com

 

कधी कधी पालक आपला फोन मुलांच्या स्ट्रोलर अर्थात ढकलगाडी मध्ये ठेवतात. याचा दूरगामी परिणाम हा होऊ शकतो.

मोबाईलच्या रेडिएशनच्या संपर्कात लहान मुलं आल्यामुळे त्यांच्या विकसित न झालेल्या मेंदूवर परिणाम होतो.

चिडचिडेपणा, दुर्लक्षित करणे, लक्ष केंद्रित न करणे यासारख्या आजारांना निमंत्रण दिले जाऊ शकते.

 

५. थेट सूर्यप्रकाशात :

 

phone in sunrays inmarathi
techxoid.com

 

यामुळे शरीराला काही प्रॉब्लेम नाही. परंतु थेट सूर्यप्रकाशात मोबाईल फोन आल्यास कमी वेळेत सूर्यप्रकाशाचा फरक मोबाईलच्या बॅटरी वर पडायला सुरुवात होते.

ज्यामुळे बॅटरी ओव्हरहिट होऊन मोबाईलच्या फंक्शनिंग वर वेगळा प्रभाव पडू शकतो.

 

६. गाडीच्या ग्लव्ह कंपार्टमेंट मध्ये :

 

glovebox inmarathi
matrix888.com

 

गाडीचा ग्लव्ह कंपार्टमेंट ही पूर्ण बंदीस्त जागा असते. जिथे वारा येण्या जाण्यासाठी काही मार्गच नाही.

अशा ठिकाणी मोबाईल फोन ठेवल्याने ओव्हर हिटिंग मुळे मोबाईल डॅमेजचे चान्सेस खूप असतात. शिवाय एनएफसी आणि कम्युनिकेशन पार्ट वर त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो.

 

७. गॅस-स्टोव्हशी संपर्क :

 

mobile using while cooking inmarathi
youtube.com

 

मोबाईलच्या सेल्युलर सिस्टीम साठी जवळपास २ मेगाहर्ट्झ पर्यंत इलेक्ट्रो मॅग्नेटिक रेडिएशन वापरली जाते. जी गॅस आणि इतर ज्वलनशील पदार्थांना पेटवण्यासाठी पुरेशी आहे.

म्हणून मोबाईल फोन शक्यतो ज्वलनशील वस्तूंच्या पासून लांब राहील याची काळजी घ्यावी.

 

८. अति थंड/अति उष्ण जागा :

 

mobile heat inmarathi
guide.serivify.in

 

या दोन्ही परिस्थिती मध्ये मोबाईलला एकसारखेच नुकसान आहे. या परिस्थितीचा सगळ्यात जास्त परिणाम होतो तो बॅटरी वर.

बॅटरी फुगून निकामी होणे, किंवा बॅटरीचा स्फोट होणे या सारख्या अनेक घटना पाहायला मिळतात. कम्युनिकेशन मध्ये प्रॉब्लेम,स्लो इंटरनेट सारखे प्रॉब्लेम सुद्धा फेस करावे लागतात.

 

९. वॉशरूम/टॉयलेट मध्ये मोबाईल नेणे टाळावे :

 

mobile phone in toiler inmarathi
dailymail.co.uk

 

जस आपणास माहीत आहेच की सर्वाधिक बॅक्टेरिया हे टॉयलेट-बाथरूम सारख्या ठिकाणीच सापडतात.

टॉयलेट मधून बाहेर आल्यावर तुम्ही हात स्वच्छ करत असाल पण मोबाईलचं काय? तो तर साबण लावून धुवू नाही शकत.

त्यामुळे मोबाईल सोबत आलेले बॅक्टेरिया-रोगजंतू आपण तसेच घेऊन फिरतो.ज्यामुळे अनेक रोगांना निमंत्रण दिले जाऊ शकते.

तर, हे आहेत असे काही ठिकाण जिथे मोबाईल ठेवल्यामुळे किंवा मोबाईलचा संपर्क आल्यास आपल्या शरीराला धोका निर्माण होऊ शकतो किंवा अप्रत्यक्षपणे आपल्याला नुकसान होऊ शकते.

शक्यतो अशा ठिकाणी मोबाईल नेणे किंवा ठेवणे कटाक्षाने टाळावे.आपली सावधगिरी भविष्यात आपल्या सोबत होऊ शकतील अशा अनेक घटनांना आणि त्रासांना टाळू शकते.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?