आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
कोरोना जगामध्ये येऊन आता वर्ष होऊन गेले. संपूर्ण जगात आतापर्यंत करोडो लोकांना कोरोनाची बाधा झाली झाली आहे. दुर्दैवाने काहीजण मृत्यू पावले आहेत.
त्यापैकी कितीतरी रुग्ण बरेही झाले आहेत. आता हे बरे झालेले रुग्ण आपल्या आसपास वावरत आहेत. यावेळेस त्या रुग्णांसहित अनेकांच्या मनात शंकाही येत आहेत, की यापुढे नक्की काय करावे?
कोरोना पेशंटची रिकव्हरी ही गुंतागुंतीची आहे. यासाठीच काळजी घेणे गरजेचे आहे. कधीकधी कोणतीच लक्षणे दिसत नाहीत.
रुग्णाला ही बरे वाटत असते, तरीदेखील अचानकपणे रुग्णाला त्रास होऊ शकतो. काही काही रुग्णांमध्ये फुफ्फुसांची क्षमता कमी झाली आहे.
यामध्ये तज्ञ डॉक्टर असेच म्हणत आहेत, की प्रत्येक रुग्णाचा बरा होण्याचा कालावधी हा वेगवेगळा असतो.
बऱ्या झालेल्या रुग्णांनी घ्यावयाची काळजी:
बऱ्या झालेल्या रुग्णाने घरी आल्यानंतरही घरांमध्ये स्वतःला आठ ते दहा दिवस तरी क्वारंटाईन करून रहावं. लगेचच लोकांमध्ये मिसळू नये.
कारण कोरोनाची टेस्ट निगेटिव्ह आलेली असली, तरी काही रुग्णांमध्ये दोन आठवड्यांपर्यंत तो व्हायरस ॲक्टिव असतो. त्यामुळे इतरांना कोरोनाची बाधा होऊ शकते.
बरे झाल्यानंतरही लोकांमध्ये जाताना तोंडावर मास्क लावावा.
बऱ्या झालेल्या रुग्णांना शिंक जरी आली किंवा थोडासा खोकला आला तरीही लोक त्यांच्याकडे साशंकतेने पाहतील. म्हणूनच अशा रुग्णांनी सोशल डिस्टंसिंग पाळावं, तसेच वारंवार हात स्वच्छ करत राहावे.
Covid-19 ची टेस्ट पॉझिटिव्ह आल्यापासून दहा दिवस जर त्या व्यक्तीला कोणतीही लक्षणे दिसत नसतील, तर दहा दिवसानंतर त्या व्यक्ती पासून इतर कोणालाही कोरोनाची बाधा होण्याचा धोका कमी असतो.
ज्या रुग्णांना कोरोनाची तीव्र लक्षणे दिसून आली असतील, त्यांनी मात्र डॉक्टर सांगतात त्याप्रमाणे वागणे गरजेचे आहे. टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतरही दहा दिवस होम क्वारंटाईन राहणे गरजेचे आहे.
घरातल्या व्यक्तींपासून स्वतःला लांब ठेवावे. त्यांच्याशी बोलताना तोंडावर मास्क ठेवावा, तसेच जेवणाची भांडी वेगळी ठेवावीत. ती शक्यतो एकत्र करू नयेत. कारण या गोष्टीने देखील कोरोना पसरण्याची शक्यता असते.
पूर्ण बरे झाल्यावर देखील अशा रुग्णांनी कोणाच्याही घरी भेटायला जाणे शक्यतो टाळावे. कारण बंद घरांमध्ये व्हायरस पसरण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे त्या घरात असणाऱ्या व्यक्तींना धोका निर्माण होऊ शकतो.
पण अगदीच भेटायचे असेल तर घराबाहेर भेटावे. आणि त्या व्यक्ती पासून सहा फुटाचे अंतर ठेवावे.
त्यावेळेस त्या व्यक्तीला भेटणाऱ्या सर्वांनी मास्क लावलेला असावा. १५ मिनिटांपेक्षा जास्त ती भेट नसावी तसेच त्या व्यक्तीची गळाभेट घेणे टाळावे.
या सगळ्यात काळजी घेणे गरजेचे आहे. नाहीतर मग अमेरिकेसारखी परिस्थिती भारतात येण्यास वेळ लागणार नाही.
तिथे बरे झालेल्या रुग्णांनी काहीच गाईडलाईन्स पाळल्या नाहीत. पार्ट्या करणे, एकत्र घरी भेटणे, सार्वजनिक कार्यक्रमांना हजेरी लावणे असे प्रकार केले. त्यामुळेच आता तिथला कोरोनाचा आकडा वाढत गेला आहे.
कोरोनाच्या आजारामागचे विज्ञान समजले तर फारसे काही अवघड नाही. परंतु लोक तेच समजून घेत नाहीत.
तुमच्या आरोग्य यंत्रणा, डॉक्टर्स ज्या सूचना तुम्हाला सांगत आहेत त्यांचे तंतोतंत पालन केले पाहिजे. नाही तर व्हायरसची प्रगती होईल आणि आपला ताबा सुटून जाईल.
कोरोना झाला, याचा फायदा हाच आहे की आधी कोरोना झाल्यामुळे शरीरामध्ये अँटीबॉडीज तयार झालेल्या असतात.
–
हे ही वाचा – जगातील सर्वात महागडं औषध! वाचा किंमत आणि त्यामागचं कारण…
नवीन अभ्यासानुसार कोरोनाच्या रुग्णांमध्ये असे दिसून आले आहे, की त्या अँटीबॉडीज साधारण तीन महिनेच जास्त अॅक्टिव असतात. तरीही याविषयी शास्त्रज्ञांच्या मनात शंका आहेत.
आपल्याही आसपास आता असे रुग्ण असतीलच. त्यामुळेच प्रत्येकजण काळजी घेतानाच एकमेकांकडे साशंकतेने पाहत आहे.
अशा वेळेस बऱ्याच ठिकाणी हा अनुभव आला आहे, की लोक ज्यांना कोरोना झाला आहे त्या घरातील लोकांना वाळीत टाकल्यासारखे वागतात. त्यांच्याशी संपर्क टाळतात अगदी फोनवरही बोलत नाहीत.
खरे म्हणजे यामध्ये कोरोना झालेल्या रुग्णांची कोणतीही चूक नसते. कारण हा एक आजार आहे तो कोणालाही होऊ शकतो. व्यवस्थित काळजी घेतली तर तो बरा होतोय.
आता अशा बऱ्या झालेल्या रुग्णांशी कसं वागावं असाही प्रश्न लोकांना पडतो.
कोरोना वर मात करून आलेल्या रुग्णांशी इतरांनी कसे वागावे?
एक म्हणजे ते बरे होऊन आल्यानंतर त्यांचे अभिनंदन करावे. त्यामुळे खचलेल्या मनांना नक्कीच उभारी मिळते.
लक्षात घ्या, कोणत्याही आजाराशी लढताना माणसाला मानसिकदृष्ट्या खंबीर राहणे गरजेचे असते. हेच बळ आपण देऊ शकतो. त्यामुळे त्यांच्या मनाला उभारी देण्याचं काम करा.
पुण्यामध्ये आपली बहीण कोरोनातून बरी होऊन घरी आल्यानंतर तिच्या लहान बहिणीने नाचून आनंदाने तिचे स्वागत केले. हा व्हिडिओ मध्यंतरी खूप व्हायरल झाला होता.
कधी कधी घरातील संपूर्ण कुटुंबच कोरोनाबाधित असते. ते बरे झाल्यानंतर घरी येतात. त्यावेळेस त्यांना काही दिवस घरातच राहावे लागणार असते. बाहेर जाता येणार नसते.
त्यावेळेस त्यांना जीवनावश्यक वस्तूंची गोष्टींची, आवश्यकता असते ते पुरवण्याची व्यवस्था आपण शेजारी म्हणून करू शकतो.
कधीकधी घरातील एखादी, दुसरी व्यक्ती कोरोना बाधित असते. परंतु संपूर्ण कुटुंबातील व्यक्तींना होम क्वारंटाईन व्हावे लागते.
त्यावेळेसही त्या लोकांना मानसिक आधाराची गरज असते. केवळ आपल्या चार गोड शब्दांनी देखील त्यांना तो आधार मिळतो.
जेव्हा कोरोनातून बरी झालेली व्यक्ती दोन-तीन आठवड्यानंतर तुम्हाला भेटते, त्यावेळेस देखील सुरक्षित अंतर ठेऊन त्या व्यक्तीशी संवाद साधावा. आणि फार विशेष काही झाले आहे असे भासवू नये.
कोरोना या विषयावर त्यांच्याशी बोलू नये. कोरोना असताना काय त्रास झाला वगैरे विचारू नये. त्यांनी स्वतःहून आपले अनुभव शेअर केले तर त्याबद्दल आभार मानावेत आणि त्यांना प्रोत्साहन द्यावे.
फोनवर आपल्याला ज्या सूचना मिळतात त्यांचे तंतोतंत पालन करावे. ” हमको बिमारी से लडना है बीमार से नही ” हे कायम ध्यानात ठेवावे.
===
महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.