Site icon InMarathi

जगातल्या अर्ध्या लोकसंख्येला टोचली गेलेली लस या भारतीयाने निर्माण केली आहे

cyrus poonawalla inmarathi featured

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

जगातल्या अर्ध्या लोकसंख्येला टोचली गेलेली लस फक्त एका भारतीयाने समर्थपणे पेलली आहे. ती व्यक्ती आहे सायरस पुनावाला.

चेक रिपब्लिक येथील पोलियो डोस मेकर कंपनी नॅनोथेरप्युटीक्स इंटरनॅशनल ५२१ कोटी रुपयांत खरेदी करून सीरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडिया ही भारतीय कंपनी सध्या जगातील व्हॅक्सिन बनवणारी सर्वात मोठी कंपनी बनलेली आहे.

या कंपनीचे मालक आहेत सायरस पुनावाला. सायरस पुनावाला यांनी सुरुवातीला रेसच्या घोड्यांचा व्यवसाय सुरू केला होता. आता ते जगातील क्रमांक एकची लस बनवणाऱ्या सीरम इन्स्टीट्यूटचे मालक आहेत.

ते सध्या जगातील सातव्या, तर भारतात चौथ्या क्रमांकाचे श्रीमंत माणूस म्हणून ओळखले जात आहेत.

 

 

सायरस पुनावाला यांचा जन्म एका हॉर्स रेसिंग व्यवसायात असलेल्या पारशी कुटुंबात झाला. त्यांचे वडील आणि भाऊ यांनी मिळून देशातला पहिला स्टड फार्म सुरू केला होता.

इथे रेसला लागणाऱ्या घोड्यांचे प्रजनन आणि त्यांना रेसची ट्रेनिंग दिली जात असे. सायरस पुनावाला देखील आपल्या या घरच्या व्यवसायात वयाच्या १८ व्या वर्षीच रुजू झाले होते.

दोनच वर्षांत त्यांनी बदलता काळ ताडला. या देशात रेसच्या घोड्यांपेक्षा रेसच्या कार्सना अधिक उज्ज्वल भविष्य मिळणार आहे हे त्यांनी ओळखलं.

त्यांनंतर त्यांनी आपल्या एका मित्रासोबत मिळून एका जग्वार कारचे रुपांतर देशातल्या पहिल्या स्पोर्ट्स कारमध्ये केले. त्यासाठी तेव्हा त्यांना खर्च आला होता १२० डॉलर्स.

मात्र या व्यवसायासाठी भरपूर पैसा लागणार होता. म्हणून सायरस यांनी तो विचार सोडून दिला.

हे ही वाचा – उद्योजक बनायचंय? हे १० गुण आत्मसात केले तर यशाचं शिखर नक्की गाठू शकाल!!

जगातील सर्वात मोठी लस कंपनी –

 

 

१९६६ मध्ये सायरस पुनावाला यांनी सध्या देशातच नव्हे, तर जगात मोठी ठरलेली व्हॅक्सीन कंपनी, सीरम इन्स्टीट्यूटची स्थापना केली. त्यांच्या या कंपनीने सर्वात आधी टिटॅनसच्या लसीचा शोध लावला होता.

स्थापनेनंतर दोनच वर्षांत त्यांनी ही लस बनवली होती. त्यानंतर सन १९७४ मध्ये त्यांनी डीटीपी व्हॅक्सिन तयार केली. ही लस लहान मुलांना डिप्थेरिया, टिटॅनस आणि डांग्या खोकला यावर दिली जाते.

त्यानंतर १९८१ मध्ये सर्पदंशावरील लस, आणि १९८९ मध्ये गोवरवरील लस बनवणारी आणि विकणारी सीरम इन्स्टीट्यूट ही जगातील पहिली कंपनी होती.

सध्या या कंपनीत बनवलेल्या अनेक लसी जगभरातील जवळपास १०० देशांत स्वस्त किमतीत विकल्या जातात.

 

साडेसात कोटीचा घोडा –

 

 

तीनेक वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. पुनावाला हे पूर्वीपासून रेसचे आणि रेसच्या घोड्याचे शौकीन राहिलेले आहेत. त्यांचा वडिलोपार्जित व्यवसायही तोच होता.

त्यांना पॅरीसमध्ये एक रेसचा घोडा खूप आवडला. त्यांनी तो घोडा लिलावात साडेसात कोटी रूपयांना विकत घेतला. त्यांचा स्टड फार्म पूर्ण जगात प्रसिद्ध आहे.

ते परदेशात देखील रेसिंग करतात. त्यासाठी त्यांनी एक स्पेशल कंपनी स्थापन केली आणि भारत सरकारची त्यासाठी परवानगी घेतली.

पुण्यात वाढले पुनावाला –

पुणे येथील बिशप स्कूलमध्ये त्यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. १९६६ मध्ये त्यांनी महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्समधून पदवी घेतली. त्यानंतर पुणे युनिव्हर्सिटीने त्यांना १९८८ मध्ये मानाची पी.एच.डीची पदवी देऊन त्यांचा गौरव केला.

त्यांच्या पत्नीचे नाव आहे विल्लो पुनावाला आणि मुलगा अदार पुनावाला. त्यांचा मुलगा अदार सध्या सीरम कंपनीचे कामकाज बघत असतो. तो सीरम इन्स्टीट्यूटचा सीईओ देखील आहे.

 

हे ही वाचा – पकोडे विक्रेता ते भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती: या उद्योजकाचा प्रवास मार्गदर्शक ठरतो

पुनावाला कुटुंबाचे मालदिव्ज येथे बुल्गारियन हॉटेल देखील आहे. लंडन मधील एका घराचा लिलाव झाला असता तिथे त्या घराची सायरस पुनावालांनी ९०० मिलियन डॉलरची बोली लावून ते घर घेतले होते. तेव्हा ते चर्चेत होते.

आपल्या स्टडफार्ममधले आणि रेसमधले घोडे रेसमधून बाद झाले, की ते घोडे पुनावाला हाफकिन इन्स्टीट्यूटला डोनेट करायचे. लस तयार करण्यासाठी घोड्यांचं रक्त बेस म्हणून वापरलं जातं.

डोनेट करता करता पूनावालाने हाफकिनच्या एका पशुंच्या डॉक्टरकडून यातलं इंगित जाणून घेतलं आणि त्यांच्या लक्षात आलं, की आधुनिक वैद्यकशास्त्रात त्यांचे घोडेच त्यांना पैसा मिळवून देणार.

घोड्याच्या रक्तापासून अँटीटॉक्सिन तयार करण्याच्या त्यांच्या जुन्या उद्योगाला त्यांनी आधुनिक विज्ञानाची जोड दिली आणि १९६६ साली पुण्यात सिरम इन्स्टीट्यूटची पायाभरणी केली.

त्यानंतर या कंपनीने अनेक लसी बनवण्याचा धडाका लावला. १९७४ मध्ये घटसर्पावरची, १९८१ साली सर्पदंशावरची, डांग्या खोकल्यावरची त्यांची लस लोकप्रिय झाली.

आज जगातल्या प्रत्येक दोन बालकांपैकी एकाला जी लस टोचली जाते, ती सिरम इन्स्टीट्यूटची असते असं पुनावाला आत्मविश्वासाने सांगतात.

 

 

ही कंपनी आज भारतात वर्षाला दहा हजार कोटींचा महसूल तयार करते. आणि वर्षाला दीड अब्ज डोस तयार करू शकते.

म्हणून जगभर संशोधन सुरू असलं तरी कोरोनापासून जगाला वाचवणारी लस देखील सीरम कंपनीच तयार करणार हे नक्की. ऑक्सफर्डची जी लस तयार होतेय तिच्या उत्पादनाचा करार पुण्यातल्या सिरम इन्स्टीट्यूटबरोबरच झालेला आहे.

सध्या या कंपनीच्या नावावर इन्फ्ल्युएन्झा, गोवर, कांजिण्या, धनुर्वात, घटसर्प, हेपिटायटीस बी आणि सर्पदंशावरच्या लशी नोंदलेल्या आहेत.

२०१४ साली सिरम कंपनीने सिप्ला कंपनीबरोबर करार केला आहे. सिरमने तयार केलेल्या लहान मुलांसाठीच्या लसी जागतिक बाजारात विकण्याचा हा करार आहे.

अशी ही बडी कंपनी, जिचा भारतीय म्हणून आपल्याला रास्त अभिमान वाटायला हवा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version