लहान मुलांसाठी १२ असे चित्रपट जे त्यांनी पालकांबरोबर आवर्जून बघायला हवेत!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
आजकाल बॉलीवूडच्या चित्रपटांमध्ये आपल्याला नावीन्य दिसतं. अनेक वेगवेगळ्या थीममुळे आपण चित्रपट बघायला जातो. काही चित्रपट हे विनोदी, काही असतात गंभीर, काही हॉरर असतात तर काही असतात उपदेशपर.
आता उपदेशक म्हणजे नक्की काय तर त्यात काही ना काही सूचित केलेलं असतं. जसं आपण लहानपणी गोष्ट ऐकलेली असते आणि त्यात बोध दडलेला असतो तसच काहीसं इथे होतं.
चित्रपट निर्मात्यास फक्त दर्शकांना मनोरंजन द्याव अस वाटत नाही, तर त्याही पलीकडे त्यांचे हेतु आहेत. त्यांना चित्रपटात एक थीम हवी असते ज्यामुळे दर्शक उत्साहात असे म्हणू शकतील की ‘हो, हेच आहे ते!’.
अनेक चित्रपट असतात जे कुटुंबाबरोबर पाहण्यासारखे असतात, जे मुलाचा आणि पालकांचा दृष्टीकोन तयार करतं. त्या तीन तासांच्या चित्रपटात त्या मुलांचं फक्त मनोरंजन होत नाही तर ते चित्रपटाद्वारे प्रेरित होतात.
आणि म्हणूनच ते आयुष्यात नवीन पाऊल टाकण्याचा प्रयत्न करतात. तर या चित्रपटाचा लोक आणि मुलांवर खूप प्रभाव आहे.
तर अशाप्रकारे काही चित्रपट आहेत जे पालकांनी खास मुलांना घेऊन बसून बघावेत. ज्यामुळे तुम्हाला त्यांना समजून घेणं सोपं जाईल आणि तुमचं नातं आणखीन खुलवू शकाल. कुठले आहेत हे चित्रपट ते पाहूया.
१. उडान :
या सिनेमात भारतीय मध्यमवर्गीय कुटुंबातील हजारो तरुणांची कहाणी आहे. ज्यांना मोकळे होऊन त्यांच्या स्वप्नांच्या उत्कट अनुभवाचे अनुकरण करायच आहे.
२०१० साली यूएन रेकार्डमध्ये या चित्रपटाची फेस्टिव्हलमध्ये निवड करण्यात आली होती. cannes इथे निवडलेला हा पहिला भारतीय चित्रपट होता.
२. तारे जमीन पर :
तारे जमीन पर हा एक उत्कृष्ट चित्रपट आहे. याची मूळ कथा गंभीर असली तरी त्यात प्रेरणादायक भाग आहे. हा सिनेमा कोणीही वयाची पर्वा न करता पाहू शकता.
डिस्लेक्सिया झालेल्या ‘ईशान’ या लहान मुलाचे आयुष्य सुंदरपणे सिनेमात टिपलं आहे. तो त्याच्या आयुष्यातील एक चॅम्पियन होता.
प्रत्येकजण वेगळा आहे आणि या जगात वेगवेगळ्या गरजा आहेत हे सर्वांना ह्या चित्रपटाने सांगितलं!
३. ब्ल्यु अंब्रेला :
ब्लू अंब्रेला हा चित्रपट रस्किन बाँडच्या भारतीय कादंबरीवर आधारित आहे. विशाल भारद्वाज दिग्दर्शित हा उत्तम चित्रपट आहे.
हा चित्रपट एखाद्या मुलास खलनायक याविषयी एका वेगळ्याच दृष्टिकोनातून माहिती देतो. अगदी सगळ्यांनी हा चित्रपट पहावा.
४. अंजली :
दोन वर्षांच्या मानसिक दृष्ट्या आजारी असलेल्या या मुलीची एक सुंदर कहाणी आहे. जिला तिच्या आईपासून दूर ठेवलं गेलंय. या चित्रपटाच दिग्दर्शन मणिरत्नम यांनी केलंय. या चित्रपटात एका जोडप्याचे चित्रण करण्यात आल आहे,
ज्यांना मानसिक आजाराने त्रस्त असलेलं मूल झालं आहे. त्याचा मृत्यू होण्याच्या मार्गावर आहे, आणि तिच्या कुटुंबियांनी या आघातात कशा प्रकारे सामना केला आहे या चित्रपटामध्ये या चित्रपटाचे वर्णन केलं आहे.
५. आय अॅम कलाम :
हा एक चमत्कारिक पण खरोखरच एक प्रेरणादायक चित्रपट आहे. या चित्रपटामध्ये एका राजस्थानी मुलाची कहाणी दाखविली गेली आहे. जी राष्ट्रपति कलाम यांच्यावर आधारित आहे.
आणि असा मुलगा जो स्वप्नांच अनुकरण करण्याचे धैर्य शोधत आहे. गंभीर असली तरी, एक हृदयस्पर्शी कथा अशी ही नक्कीच आहे.
६. चिल्लर पार्टी :
संपूर्ण भारतभरातील प्रत्येक मुलांसाठी आतापर्यंतचा सर्वात मनोरंजक चित्रपट कोणता असेल तर तो आहे चिल्लर पार्टी.. संपूर्ण कुटुंबासमवेत पाहता येण्यासारखा हा सिनेमा आहे.
हा चित्रपट त्या लहान मुलांविषयी आहे ज्यांनी त्यांच्या स्वत:च्या न्याय मार्गाने स्वतःच्या हक्कांसाठी संघर्ष केला.
७. स्टेनली का डिब्बा :
स्टेनली का डब्बा हा एक मनोरंजक सिनेमा आहे. चौथ्या इयत्तेच्या विद्यार्थ्याला आपल्या हिंदी शिक्षकाने टिफिन आणण्यास भाग पाडले आहे.
आणि त्यानंतर त्याला असणार्या सर्व अडचणींसह त्याने शाळेत आपला वेळ कसा घालवला हे या चित्रपटामध्ये दाखवलं आहे. यामुळे शाळेचा काळ खूप चांगला लक्षात ठेवता येतो.
८. मकडी :
कथा चुन्नी आणि मुन्नी या दोन बहिणींची आहे. त्या खेड्यातल्या एका वाईट जादूने अडकल्या आहेत. आणि तो जादूगार त्यांना सोडण्यासाठी कठीण काम करण्यास भाग पाडतात.
हा साहसी तसेच सर्वांना आवडेल असा मनोरंजनात्मक चित्रपट आहे.
९. कोई मिल गया :
कोई मिल गया हा पहिला विज्ञानावर आधारित थ्रीलर चित्रपट आहे. ज्यात मुलाला आणि त्याच्या मित्रांना एका एलियन ने मदत केली आणि तो परत त्याच्या जगात गेला. आपण सगळे पाहू शकू असा हा चित्रपट आहे.
१०. छोटा चेतन :
या चित्रपटाने भारतात थ्रीडी चित्रपटांना सुरुवात केली. या चित्रपटाची कथा आणि पात्र मुलांना आवडतील अशी आहेत. ‘माय डियर कुट्टीचाथन’ या मल्याळी चित्रपटाची ही हिंदी आवृत्ती होती.
११. हीचकी :
या चित्रपटात टॉरेट सिंड्रोमने पीडित असलेल्या एका शिक्षिकेला (राणी मुखर्जी) हिला शाळेचा सर्वात वाईट वर्ग सुधारण्याच काम दिलय. तिच्यात अनेक उणीवा असूनही ती मुलांना योग्य मार्गावर आणण्याचे काम करते.
अशी ही एक वेगळ्याच अर्थाची आणि विषयाची कथा आहे.
१२. बम बम बोले :
बम बम बोले प्रसिद्ध पुरस्कारप्राप्त इराणी चित्रपट आहे. ‘चिल्ड्रन ऑफ हेव्हिन्स’ चे अधिकृत रूपांतर यात केलं आहे.
ही एका १२ वर्षाच्या मुलाची गोष्ट आहे जो तिचे शूज हारवतो आणि घरची गरीबी असताना ते शूज कसे परत मिळवतो अशी ही कथा आहे.
हे वरील १२ चित्रपट तुमच्या मुलांबरोबर नक्की बघा जेणेकरून ते ही अनेक गोष्टी यातून शिकतील आणि तुम्हाला सुद्धा काही काही चित्रपटांमधून मुलांशी कसं वागायच हे कळेल.
कारण लहान मुलांना सगळ्यात जास्त जवळचे त्यांचे आई बाबा असतात. तर हे चित्रपट जरूर बघा आणि तुमच्या मुलांशी नातं घट्ट करा.
–
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.