' कोरोना: रक्तातील ऑक्सिजन मोबाईलवर मोजताय? गंभीर चूक टाळण्यासाठी हे वाचा – InMarathi

कोरोना: रक्तातील ऑक्सिजन मोबाईलवर मोजताय? गंभीर चूक टाळण्यासाठी हे वाचा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

कोरोनाचा प्रसार इतक्या वेगाने सुरू असताना कोणतीही कंपनी जर त्याच्याशी निगडित कोणती वस्तू किंवा सेवा सुरू करून लोकांना मदत आणि स्वतःचा फायदा करून घेत असेल तर त्याबद्दल आश्चर्य वाटायला नको.

बिजनेस वर्ल्ड मध्ये हेच होत असतं. जसा ट्रेंड तसे प्रॉडकट्स. थोडक्यात, सध्या चे बिजनेस हे त्या ‘Season’ दुकानदारांसारखे झाले आहेत जे, की पावसाळा आला की छत्र्या विकतात आणि उन्हाळा आला की टोप्या.

आता या सर्वांमध्ये मोबाईल कंपन्यांची सुद्धा भर पडली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर iphone सारख्या कंपनीने आपल्या शरीरातील रक्त आणि ऑक्सिजन ची पातळी चेक करण्याचं एक अॅप काही दिवसांपूर्वी लाँच केलं आहे.

 

iphone pulse oxymeter
informationweek.com

 

या आधी आपण बघितलं आहे की, तुम्ही किती पावलं चाललात किंवा तुमच्या आजच्या व्यायामातून किती कॅलरी burn झाल्या हे सांगणारे किती तरी अॅप आपल्या मोबाईल मध्ये देऊ केलेले आहेत.

आपल्या शरीरातील सर्व यंत्रणा अद्ययावत सुरू असताना या अॅप चा वापर करण्यात काहीच गैर नाहीये. पण, त्यांच्या रिडींगवर अवलंबून राहून एखादा त्रास होत असेल तर तो स्वतःपर्यंत ठेवू नका.

“कधी कधी असे त्रास हे नंतर येणाऱ्या मोठ्या आजाराची लक्षणं असतात, त्यामुळे या आणि तत्सम अॅप वर खूप जास्त अवलंबून राहू नये” असा सल्ला काही डॉक्टरांनी दिला आहे.

कोरोना च्या पेशंटचं सर्वात मोठं लक्षण म्हणजे श्वास घेण्यासाठी होणारा त्रास. शरीरातील ऑक्सिजनचं प्रमाण दर्शवणारं ‘पल्स ऑक्सिमीटर’ हे आसपास असणं हे अत्यंत आवश्यक आहे.

 

iphone pulse oxymeter 1
cnet.com

 

वाढत्या मागणीमुळे बऱ्याच वेळेस या गोष्टी मेडिकल मध्ये स्टॉक मध्ये नसतात. अशावेळी लोक iphone कॅमेरा अॅपचा सहारा घेतात जे की, शरीरातील रक्त आणि ऑक्सिजनचं प्रमाण सांगू शकतात असं म्हणतात.

कोपऱ्यात स्टार * मार्क देऊन, “हे काही मेडिकल उपकरण नाहीये” असंही सांगण्यात आलं आहे. काही जण सॅमसंग फोन मधील ऑक्सिजनचं प्रमाण कळण्याचं feature वापरतात.

काही जण स्मार्टवॉच वापरतात आणि त्यात सांगितलेल्या ऑक्सिजनची रिडींग घेऊन डॉक्टरकडे जातात. डॉक्टरांना या गोष्टीचा प्रचंड त्रास होतो.

युनिव्हर्सिटी ऑफ अलाबामा या बर्मिंगहम च्या संस्थेचे डायरेक्टर डॉ. वॉल्टर श्रेडिंग यांच्या म्हणण्यानुसार,

“पल्स ऑक्सिमीटर हे अॅप जेव्हा ऑक्सिजनचं प्रमाण कमी असतं तेव्हा योग्य रिडींग दाखवत नाही. या अॅप वर अवलंबून राहणं हे तुम्हाला खूप महागात पडू शकतं. “

तुम्ही आजारी नसताना मोबाईलच्या कॅमेरा वर बोट ठेवून तुम्ही ऑक्सिजनचं प्रमाण चेक करणं ही एक वेगळी गोष्ट आहे. त्यावेळी तुम्हाला रिडींग ही बरोबरच दिसेल.

 

iphone pulse oxymeter 5
citiusminds.com

 

पण जेव्हा तुमचं ऑक्सिजनचं प्रमाण कमी झालं असेल, तेव्हा सुद्धा ते तुमच्या सरासरी रिडींग नुसार तुम्हाला एक रिडींग दाखवली जाते.

म्हणजे, तुम्हाला जेव्हा या तंत्रज्ञानाची सर्वात जास्त गरज असते, तेव्हाच तुम्हाला अशा चुकीच्या रिडींग मिळत असतात हे एका प्रयोगातून स्पष्ट झालं आहे.

 

iphone pulse oxymeter 2
theverge.com

 

२०१९ मध्ये तीन वेगवेगळ्या iphone च्या पल्स ऑक्सिमीटरचा अभ्यास करून ते या निष्कर्षावर आले आहेत.

त्यांनी ऑक्सिजनचं प्रमाण कमी असणाऱ्या काही व्यक्तींची चाचणी या अॅप द्वारे केली आणि त्यांच्या लक्षात आलं की, त्यांच्या रिडिंग मध्ये प्रचंड तफावत आहे.

हाच फीडबॅक मध्यंतरी ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीच्या ‘Centr of Evidence- Based Medicine’ या संस्थेला सुद्धा आला होता.

त्यांनी सुद्धा एक पत्रक जाहीर करून कोरोना च्या जागतिक महामारीच्या काळात हे अॅप विश्वासार्ह नाहीये असं जाहीर केलं आहे.

 

असं का होतं?

App हे योग्य results दाखवत नाही याचं प्रमुख कारण म्हणजे, ऑक्सिजन चेक करण्याची पद्धत.

स्टॅंडर्ड जे पल्स ऑक्सिजन मोजण्याचे instruments असतात ते दोन प्रकारच्या wavelengths परावर्तित करत असतात. एक म्हणजे रेड आणि दुसरं म्हणजे infrared.

 

iphone pulse oxymeter 4
thenewyorktimes.com

 

तुमच्या बोटाच्या माध्यमातून ही टेस्ट केली जाते. तुमच्या बोटाच्या स्किनच्या जवळ रक्ताचं प्रमाण हे नेहमीच जास्त असतं.

हिमोग्लोबिन हे एक असं प्रोटीन आहे, जे की तुमच्या रक्तामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण योग्य ठेवण्यास मदत करत असतं आणि हिमोग्लोबिन हे ऑक्सिजन सोबत घेऊन जाताना इन्फ्रारेड waves जास्त प्रमाणात receive करत असतं.

जेव्हा ते कमी प्रमाणात ऑक्सिजन carry करत असतं, तेव्हा ते लाल रंगाच्या waves जास्त receive आणि transmit करत असतं.

आपण जे अॅप वापरतो ते या दोन्हींमधील फरक चेक करून ऑक्सिजनचं प्रमाण रक्तात किती आहे याची माहिती देत असते. स्मार्टफोन मध्ये पांढऱ्या रंगाच्या लाईट ची पद्धत आहे.

त्यामुळे हे रिडींग आणि खरं ऑक्सिजनचं प्रमाण यामध्ये फरक असतो.

अजून एक फरक म्हणजे स्टॅंडर्ड पल्स ऑक्सिमीटर हे एका दिशेने हाताच्या बोटाचे wavelenths receive करतात आणि दुसऱ्या बाजूच्या सेन्सर मधून ऑक्सिजनच्या प्रमाणाची माहिती देतात.

स्मार्टफोन मध्ये wavelength पाठवणं आणि फोटो काढणं हे एकाच स्पॉट वरून केलं जातं. स्मार्टफोन मध्ये wavelength च्या प्रतिबिंबावर अवलंबून रहावं लागतं. त्यामुळे ही पद्धत अचूक मानली जात नाही.

Fitbit आणि Garmin या दोन कंपन्यांनी त्यांच्या स्मार्टवॉच मध्ये ऑक्सिजन मोजण्याची सोय करून दिली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, ते मनगटावरून सुद्धा ऑक्सिजनचं प्रमाण सांगू शकतात.

 

iphone pulse oxymeter 3

 

पण, दोन्ही कंपन्यांनी हे सुद्धा त्यांच्या वेबसाईटवर लिहून ठेवले आहे की, “आमचे स्मार्टवॉच हे कोणत्याही मेडिकल टेस्ट साठी वापरण्यात येऊ नये.”

जर का हे अॅप ऑक्सिजन कमी असताना सुद्धा योग्य रिडींग दाखवू शकले, तर त्यांच्या वापरण्यात कोणताही आक्षेप कोणाला नसेल. पण, तोपर्यंत मात्र आपण सर्वांनी सतर्क रहावं असा सल्ला डॉक्टरांनी सर्वांना दिला आहे.

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?