आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
मंदिर आणि तिथलं स्थापत्यशास्त्रकला वगैरे आपल्या भारताला काही नवीन नाही. भारत हा देश आपल्या इथल्या मंदिरांमुळे आणि तिथल्या विविध कलाकुसरींमुळे खूप प्रसिद्ध आहे, भारत देश हा मंदिरांचाच देश आहे असं म्हंटलं तरी अतिशयोक्ति ठरणार नाही!
वेवगवेगळ्या देवी देवतांची मंदिरं तर आहेतच पण आपल्या इथे कोणार्क येथे सूर्याचे सुद्धा एक खास मंदिर आहेत, अशाप्रकारे प्रत्येक मंदिराची खास अशी काही वैशिष्ट्ये सुद्धा आहेत!
काही मंदिरांच्या तळघरात तर कोट्यावढी रुपयांचे दाग दागिने खजिना सुद्धा सापडला आहे, पद्मनाभ मंदिर सगळ्यांनाच ठाऊक असेल, तिथल्या तळघरातल्या दारवाज्यामागचा खजिना आणि त्यामागचं रहस्य तर जगजाहीर आहे!
आपल्या देशाचा सांस्कृतिक तसेच ऐतिहासिक वारसा जपण्यात ही मंदिरं प्रमुख मानली जातात!
भारतीय संस्कृतीमध्ये देवी देवतांसोबतच निसर्गाची देखील पूजा केली जाते.
निसर्ग आपल्याला सर्व काही देतो म्हणून भारतीय संस्कृतीमध्ये निसर्गाला देखील अनन्यसाधारण महत्त्व आहे म्हणूनच आज देखील गोवर्धन पर्वताची पूजा केली जाते.
अशाच एका आश्चर्यकारक मंदिराबद्दल आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. मित्रांनो, या मंदिरामध्ये चक्क माशाची पूजा केली जाते. काय आहे हे प्रकरण नेमकं जाणून घेऊयात.
भारतीय संस्कृतीमध्ये प्राण्यांची पूजा आधीपासूनच केली जाते नागपंचमीला आपण नागदेवतेची पूजा करतो, तसेच खंडोबा सोबतच कुत्र्याचा सुद्धा मान राखला जातो, गणपतीचे वाहन म्हणून उंदीर सुद्धा आपल्याला पूज्य आहे.
अशा परिस्थितीत जर कुठे माशांची पूजा होत असेल तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही परंतु तरीही इतर जगासाठी मात्र ते आश्चर्यच आहे.
गुजरात राज्यातील वलसाड तालुक्यात मगोद डुंगरी म्हणून एक गाव आहे. या गावात चक्क माशाच्या हाडांची पूजा केली जाते.
हे मंदिर “मत्स्य माताजी” मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी हजारो भाविक तर येतच असतात पण त्यासोबतच जगभरातील पर्यटक सुद्धा या अनोख्या मंदिराला दरवर्षी भेट देतात.
असं म्हटलं जातं की हे मंदिर जवळपास तीनशे वर्ष जुनं आहे. या मंदिराची निर्मिती कुठल्यातरी कोळी समाजाच्या बांधवाने केल्याचं सांगितलं जातं.
समुद्रात मासेमारी करायला जाण्याच्या आधी सर्व कोळी बांधव या मंदिरात दर्शन घेऊन मगच पुढे समुद्रात मासेमारीसाठी जातात.
या मंदिराची सुद्धा एक वेगळीच कथा आहे या कथेनुसार असं सांगितलं जातं की जवळपास तीनशे वर्षापूर्वी या भागात प्रभू टंडेल नावाचा एक कोळी वास्तव्यास होता त्याला एक स्वप्न पडलं ज्यात एक विशाल व्हेल मासा समुद्रकिनारी मृत अवस्थेत पडला आहे.
त्या स्वप्नामुळे तो गडबडुन गेला, सकाळी उठून सर्वप्रथम तो किनाऱ्यावर गेला तर त्याला त्याचे स्वप्न सत्य असल्याचे लक्षात आले.
त्या किनाऱ्यावर खरच एक विशाल आकाराचा व्हेल मासा मृतावस्थेत आढळला या विशाल माशाला पाहण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली.
टंडेल याला स्वप्नात असं देखील दिसलं होतं की माशाचं रूप घेऊन स्वतः देवी प्रवास करत होती परंतु किनार्यावर येताच तिचा मृत्यू झाला.
हे स्वप्न टंडेलने संपूर्ण गावकऱ्यांना सांगितलं ग्रामस्थांनी देखील त्याच्यावर विश्वास ठेवत त्या माशाला एक अध्यात्मिक अवतार मानत एक देऊळ तयार केलं. या मंदिरामध्ये त्या माशाची हाड ठेवण्यात आलेली आहेत.
या मंदिराची निर्मिती होण्याच्या आधी टंडेलने हा मासा जमिनीत पुरला होता आणि मंदिराचं काम पूर्ण झाल्यानंतर त्याने माशाची हाडं परत मंदिरात आणून त्याची स्थापना केली.
यानंतर या मंदिराची नियमित पूजाअर्चा होऊ लागली काही ग्रामस्थ मात्र या प्रकारापासून नाराज होते त्यांनी या मंदिरात कसल्याही प्रकारची पूजाअर्चा केली नाही.
काही दिवसांनी गावामध्ये एक भयानक आजार पसरू लागला ग्रामस्थांचे हाल होऊ लागले.
या परिस्थितीमध्ये टंडेल याने याच मंदिरात नवस मागितला आणि चमत्कार म्हणजे संपूर्ण गाव आजार मुक्त झालं तेव्हापासून गावातील प्रत्येक गावकरी या मंदिराचे नित्यनेमाने पूजा-अर्चना करू लागला.
तेव्हापासून आजपर्यंत गावातील प्रत्येक कोळी समुद्रात मासेमारीला जाण्याच्या आधी या मंदिरात दर्शन घेतो.
आज देखील हे मंदिर टंडेल परिवारच सांभाळत दरवर्षी नवरात्रीमध्ये अष्टमीला या ठिकाणी मोठी यात्रा देखील भरवली जाते.
अशी भारतात आणखीन किती अद्भुत मंदिरं आणि त्यांच्या कथा दडल्या आहेत हे सांगणं कठीण आहे, कारण आधी म्हंटल्याप्रमाणे भारत हा जणू मंदिरांचा देश आहे!
प्रत्येक मंदिराचं एक खास वैशिष्ट्य आहे, स्वतंत्र इतिहास आहे, काही रहस्यं देखील आहेत आणि यामुळेच सांस्कृतिक आणि ऐतिहासिक दृष्ट्या भारत हा प्रचंड संपन्न आहे!
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.