Site icon InMarathi

अस्थमासारख्या गंभीर आजारावर रामबाण उपाय ठरली आहे ही मिठाची खाण!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

जगात आधुनिक वैद्यकशास्त्राला जेवढा प्रतिसाद असतो तितकाच अनेकदा पारंपरिक, निसर्गोपचार, विविध परंपरेने चालत आलेल्या उपचारपद्धती, घरगुती औषधे, विविध वनस्पतींच्या, फुलांच्या उपचारपद्धती यांनाही मिळतो.

यातील अनेक उपचारपद्धतीत त्रास काही नाही, झालाच तर फायदाच असाही प्रकार असतो. त्यामुळे लोक निर्धास्तपणे असे उपचारही करून बघतात.

 युक्रेनमधील दम्याच्या आणि इतर काही आजारांवरची अशीच एक उपचारपद्धती म्हणजे मीठाच्या खाणीत काही काळ वास्तव्य करण्याची उपचारपद्धती आहे.

मीठाच्या खाणीतील हवा श्वासोच्छवासात भरून घेणे –

 

ua.all.biz

 

युक्रेनियन लोकांकडे दम्याच्या आजारावर एक वेगळाच उपाय आहे. आणि तो आहे युक्रेनमधील सोलोट्विनो या गावाजवळ असलेली ३०० मीटर खोल मिठाच्या खाणीतली थेरपी.

अनेक वर्षांपासून सोलोट्विनोजवळील ही मिठाची खाण दमा, विशिष्ट प्रकारचा ताप, अॅलर्जी, खाज इत्यादी आजारांवर तसेच विविध प्रकारच्या ब्रॉन्कायल ब्लॉकेजेस असलेल्या रुग्णांना इथल्या खाणीत उपचारांसाठी आणलं जातं.

या खाणीतल्या अंधाऱ्या आणि कोंदट जागेतील मीठ आणि वायू यांच्या संयुगात काही गुणधर्म असे आहेत, की जे या प्रकारच्या आजारांवर गुणकारी ठरले आहेत.

या उपचारांना सॉल्ट थेरपी किंवा स्पेलिओथेरपी म्हणून ओळखले जाते. या उपचाराची सुरूवात पोलंड येथे १९५० मध्ये सुरू झाली होती. आणि ती एका फिजिशियनने शोधून काढली होती. त्याचे नाव आहे फेलिक्स बोक्झोव्हस्की.

त्याच्या हे लक्षात आले होते, की मीठाच्या खाणीत काम करणाऱ्या लोकांना क्वचितच फुफ्फुसाचे आजार किंवा टीबीसारखे आजार वगैरे होतात. ही उपचारपद्धती आता पूर्व युरोप आणि मध्य युरोपमधील देशांमध्ये प्रचलित उपचारपद्धत आहे.

 

observers.france24.com

 

मात्र बाकीच्या देशांत ही उपचारपद्धती अजून माहीत झालेली नाही. शिवाय सर्वच तज्ज्ञांचा या उपचारपद्धतीवर विश्वास नाही. तज्ज्ञ लोकं ही उपचारपद्धत अजून सिद्ध झालेली नाही असे मानतात. त्यामुळे त्यांचा त्यावर विश्वास नाही.

 

सोलोट्विनो मिठाची खाण –

या खाणीला वर्षाला जवळपास पाच हजार लोक भेट देतात. आणि तिथे उपचार करून घेतात. ते या खाणीतल्या मिठात दुपारनंतर काही वेळ किंवा रात्रभर झोपून राहतात. असं जवळपास महिनाभर उपचार घेतात आणि परत आपल्या घरी जातात.

त्यांच्या उपचारपद्धतीची तिथं सोय केलेली आहे. तिथे बेड्स, बसायला कोच, खुर्च्या आदी सोय केलेली असते.

 

wired.com

 

असं म्हणतात, की मीठाबरोबर संयुग पावलेली हवा श्वासांतून आत घेतल्याने ती फुफ्फुसातील दम्याला कारणीभूत असलेला श्लेष्मा दूर करते. तो श्लेष्मा विरघळून जातो आणि श्वासयंत्रणा मोकळी होते.

श्वासोच्छवासासंबंधित कोणत्याही विकारांवर पर्यायी उपचार म्हणून स्पेलिओथेरपीची शिफारस केली जाते. हे कोणतेही औषध नसून थोडक्यात एक निसर्गोपचार आहे.

प्रतिबंधात्मक उपचार म्हणून तसेच श्वासोच्छवासाच्या आजाराची लक्षणे दिसताच लगेच या मीठांच्या खाणीत येऊन उपचार घेणे फायदेकारक ठरते असे तिथल्या लोकांचे म्हणणे आहे.

अशाप्रकारे तिथे किमान ४५ मिनिटांच्या पाच सत्रांसाठी जाण्याची शिफारस आजारी लोकांना केली जाते.

काही प्रकारच्या तापांमध्ये आणि अॅलर्जीने त्रस्त असलेल्या लोकांना दोन ते तीन भेटींतच त्रास कमी होण्याची शक्यता असते. दम्याच्या रुग्णांना मात्र हे उपचार दीर्घ काळ घ्यावे लागतात.

दमा कधीच शंभर टक्के बरा होऊ शकत नाही, परंतु अनेक महिन्यांपासून नियमितपणे येत असल्यास त्यांना त्यात बऱ्यापैकी आराम मिळतो.

 

wired.com

 

थोडक्यात, मीठातील सोडियम, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम यामुळे रक्तदाब सुधारतो आणि त्याचा हृदय आणि रक्ताभिसरणावर सकरात्मक प्रभाव पडतो, तर कॅल्शियम रोगप्रतिकार शक्ती मजबूत करते.

किरील कुलेत्स्की हा एक आर्ट फोटोग्राफर आहे. सध्या तो लंडन येथे राहून काम करतो. त्याच्या वेबसाईटवर सोलोट्विनो येथील मीठांच्या खाणींची आणि तिथल्या उपचारपद्धतींची संपूर्ण माहिती आहे.

त्याने घेतलेल्या फोटोंवरून लक्षात येईल, की तिथे आलेले पेशंट तिथे मजेत असतात. त्यांच्यासाठी तिथे ३०० फूट आत झोपण्याची, बसण्याची, वावरण्याची व्यवस्था केलेली असते.

लोक तिथे आरामात बसतात, झोपतात. वेळ घालवतात. तिथले वातावरण हे चैतन्यदायी असते.

 

recyclenation.com

 

खरंतर इतक्या खोलवरील खाणीतील ते वातावरण असुरक्षित असते. पण लोकांची श्रद्धा आणि विश्वास यामुळे ते जराही न घाबरता तिथे ठरलेला वेळ घालवतात.

लिफ्टने खाणीत खोलवर जावे लागते. तिथे अगदी लहान मुले, तरूण आणि वयस्क लोक देखील उपचार घेण्यासाठी येत असतात.

लोकांना घालण्यासाठी हेल्मेट, प्लास्टीकचे कव्हर्स दिले जातात. त्यामुळे मीठाच्या पाण्यात ओले होणार नाही याची काळजी घेतली जाते.

एवढंच कशाला धूम्रपान करणाऱ्या लोकांसाठी तिथे वेगळी रुम देखील तयार केलेली आहे. लोकांना काही त्रास झाला तर खाणीजवळ एक हॉस्पिटल देखील आहे.

 

ua.all.biz

 

सोलोट्विनो येथील खाणींबद्दल अजून एक मनोरंजक गोष्ट म्हणजे क्लिनिकमध्ये राहणारे आणि काम करणारे लोक यांचे मिश्रण.

हे गाव रोमानियाच्या सीमेवर वसलेले आहे. बरेच रोमानियन कर्मचारी दररोज सकाळी या खाणीत आणि शेजारच्या रुग्णालयात काम करण्यासाठी युक्रेनमध्ये फिरतात.

हे कर्मचारी सगळे विविध भाषा बोलणारे आहेत. त्यांच्यात रशियन, युक्रेनियन आणि रोमानियन लोक आहेत. मात्र तरीही त्यांच्यात कोणतेही मतभेद नाहीत. ते सगळे एक होऊन तिथे काम करतात.

जगात विविध आजारांवर असे बरेच आपारंपरिक उपचार केले जातात. आपल्याकडे भारतात देखील अनेक आजारांवर निसर्गोपचार केले जातात.

मोठ्या संख्येत लोक अशा उपचारांवर विश्वास ठेवतात. असे उपचार आधुनिक वैद्यकात वापरले जात नाहीत. हे उपचार प्रयोगाने सिद्ध झालेले नसल्याने आधुनिक वैद्यक त्यांचे थेट सुचन करत नाही.

मात्र तरीही अनेकदा लोक अशा उपचारांमुळे फायदा होतो असे समजतात आणि आपल्यावर असे उपचार करून घेताना दिसतात.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version