तुमचा सेलफोन स्वच्छ करण्याची योग्य पद्धत कोणती? जाणून घ्या
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
सध्या कोरोनाकाळात स्वच्छतेला महत्त्व आलेलं आहे. जगभर आपले हात आणि आपण वापरत/हाताळत असलेल्या सगळ्या वस्तू म्हणजे चाव्या, मोबाईल, पैसे आणि इतर गोष्टी सॅनिटाइझ करून घ्या असा सल्ला आपल्याला वारंवार देण्यात येतो.
त्यामुळे हल्ली जो तो आपला मोबाईल, नाणी, नोटा, चाव्या यांसारख्या वस्तु देखील सॅनिटायझरने साफ करताना दिसतोय. त्यावर स्प्रे मारताना दिसतोय.
आपले लॅपटॉप, पीसी देखील लोक सॅनिटायझर वापरून साफ करताना दिसतात. मात्र असे करताना थोडा विचार करायला हवा.
या सर्व सॅनिटायझरमुळे आपले फोन, लॅपटॉप खराब होण्याची शक्यता आहे याचाही विचार करा.
सॅनिटायझर वापरल्याने फोनची स्क्रीनच नव्हे, तर सोबत हेडफोन जॅक आणि स्पीकर देखील खराब होण्याची शक्यता दाट आहे.
दुकानांमध्ये मोबाईल दुरुस्तीला येण्याचे प्रमाण वाढलेले आहे. या मेकॅनिक्सचे म्हणणे आहे, की सध्या लोक खूप सॅनिटायझर वापरून फोन स्वच्छ करीत असल्याने या तक्रारी होतात.
मोबाईलला सॅनिटायझर लावून साफ करत असताना मोबाईलच्या हेडफोन जॅकमध्येही हे सॅनिटायझर जाते आणि फोनच्या आत शॉर्ट सर्किट होऊन फोन खराब होतो.
याशिवाय फोनचा डिसप्ले, कॅमेरा हे देखील सॅनिटायझरमुळे खराब होतात. म्हणून मोबाईल स्वच्छ करण्यासाठी योग्य पद्धत काय आहे ते पाहू या.
मोबाईल ही तर नेहमी हातात राहणारी वस्तू. त्याच्यावर बॅक्टेरिया बसण्याच्या शक्यता सर्वात अधिक. त्यामुळे फक्त हात धूत राहून चालणार नाही. मोबाईल सुद्धा दिवसांतून अनेकदा स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे.
कोरोनाचा विषाणू हा अतिशय संसर्गजन्य असल्याने तो मोबाईलवर देखील बसून संसर्ग देऊ शकतो. नुसते हात धुतले, तरी तेच हात मोबाईलला लागले की मोबाईलवरील विषाणू पुन्हा हाताला लागणार. कोरोना विषाणूच्या काळात तर एरव्हीपेक्षा जास्त स्वच्छता आणि काळजी घेणं गरजेचं आहे. त्यासाठी सॅनिटायझर हे सर्वात चांगले आहेत, प्रभावी आहेत.
मात्र ते योग्य प्रकारे वापरले नाहीत, तर मोबाईल स्वच्छ करत असताना तुमचे महागडे स्मार्टफोन खराब होण्याची शक्यताही तितकीच आहे.
आपला फोन सॅनिटायझरने नक्की साफ करा, मात्र तो साफ करण्याची योग्य पद्धत जाणून घ्या.
कापूस किंवा वायपरने –
बाजारात कापूस आणि अनेक प्रकारचे वायपर मिळतात. हे वायपर अनेकदा ब्यूटी पार्लरमध्ये वापरले जातात. यांचा उपयोग जास्तीचा मेकअप टिपून काढणे, चेहरा स्वच्छ करणे यासाठी वापरले जातात.
हेच तुम्ही मोबाईल स्वच्छ करण्यासाठी वापरू शकता. सॅनिटायझरचा डायरेक्ट स्प्रे मोबाईलनवर न वापरता या वायपरच्या किंवा कापसाच्या सहाय्याने स्वच्छ करा.
आधी फोन स्वीच ऑफ करा. त्यानंतर कापसाचा बोळा किंवा वायपर अल्कोहोलमध्ये डीप करून फोनची स्क्रीन सरळ धरून स्वच्छ करा.
प्रत्येक कंपनीचा मोबाईल वेगळा असतो, त्यामुळे शक्यतो आपल्या मोबाईल कंपनीच्या कस्टमर केअर सेन्टरला फोन करून त्यांचाच सल्ला घ्या.
त्यांनाच विचारून घ्या, की मोबाईल या काळात स्वच्छ कसा ठेवायचा? ते अधिक चांगलं राहील. कारण सर्वच कंपन्यांचे फोन मटेरिअल वेगवेगळे असू शकतात.
अॅपलसारख्या स्मार्टफोन कंपनीने आपले मोबाईल कसे साफ करायचे याच्या सुचना प्रसारित केल्या आहेत.
अँटी बॅक्टेरीअल टिशू पेपर –
मेडीकल स्टोअरमध्ये तुम्हाला असे टिश्यू पेपर्स सहज मिळतील. तयाने देखील तुम्हाला आपले मोबाईल्स स्वच्छ करता येतील.
कमी अल्कोहोल असलेले किंवा डायल्यूटेड सॅनिटायझर वापरले, तर ते विषाणूला मारण्यास दुर्बल ठरेल. शिवाय ते वापरूनही फोन खराब होणारच नाही असेही नाही.
वर सांगितल्याप्रमाणे, वायपर किंवा कापसाने स्वच्छ केले, तर फोन खराब होण्याची शक्यता थोडी कमी होते. पण १००% नाही.
अशावेळी करायचं तरी काय?
सर्वात आधी तर आपल्या फोनला स्क्रॅचगार्ड बसवून घ्या. विना स्क्रॅचगार्ड फोन ठेवू नका.
स्क्रॅचगार्डमुळे केवळ फोनवर चरे पडण्यापासूनच संरक्षण मिळणार नाही, तर सॅनिटायझरने साफ केले तर ते थेट फोनला न लागता वरील स्क्रॅचगार्डवरचे विषाणू नष्ट करून फोनला अल्कोहोलपासून वाचवायचे काम करेल.
स्क्रीन प्रोटेक्टरच्या बाहेरचा भाग साफ करण्यासाठी अल्कोहोल फ्री सॅनिटायझरचा वापर करू शकता. किंवा मग साबणाचे सौम्य द्रावण त्यासाठी वापरू शकता.
अॅपल कंपनीने देखील ते सुचवलेले आहे. अर्थात कोणतेही द्रावण वायपर किंवा कापसाच्या बोळ्यावर घेऊनच त्याने हलकेच फोन स्वच्छ करायचा आहे. त्याला खूप चोळायचं नाही, किंवा त्यावर स्प्रे मारत राहायचं नाही.
दुकानांत अल्कोहोल फ्री हॅन्ड सॅनिटायझर देखील मिळतात. त्यांचा वापर तुम्ही फोन स्वच्छ करण्यासाठी करू शकता. हे सॅनिटायझर देखील चांगले असतात. त्यांनी बॅक्टेरीया आणि व्हायरस दोन्ही मरतात.
हे सॅनिटायझर बराच काळ अॅक्टीव्ह राहून विषाणूला दूर ठेवू शकतात. आपले फोन सुरक्षित राखून स्वच्छ करण्याचा हा सर्वात चांगला आणि सोपा व जलद उपाय आहे.
असे सॅनिटायझर छोट्या बाटल्यांमध्ये खिशात ठेवता येतील असे आणि फोमस्वरुपातही मिळतात.
साबणाने स्वच्छ करा –
साबण हा सर्वात सोपा, स्वस्त आणि जलद उपाय आहे. सध्याच्या काळात अनेकदा बाजारात सॅनिटाझरची कमतरताही जाणवते.
त्यासाठी सोपा उपाय म्हणजे ज्या साबणाने हात स्वच्छ करतो त्याच साबणाच्या कोमट पाण्याने आपला स्मार्टफोन स्वच्छ करू शकता. हे साबणाचे कोमट पाणी कापसावर घेऊन किंवा हातरुमालावर घेऊन त्याने आपला फोन स्वच्छ करा.
ते सुरक्षित आहे. कारण आपले सध्याचे बहुतेक फोन हे वॉटरप्रुफ आहेत.
मोबाईल दिवसांतून किती वेळा स्वच्छ करावा?
जर तुम्हाला बाहेर पडावं लागत असेल, लोकांशी संपर्क येत असेल, तर असे सुरक्षित सॅनिटायझर किंवा साबणाचे पाणी छोट्या बाटलीत ठेवून, जेव्हा जेव्हा तुम्हाला आवश्यक वाटेल तेव्हा तेव्हा वायपरचा एक जलद हात मोबाईलवरून फिरवून घ्या.
मात्र घरीच असाल, तर वारंवार मोबाईल स्वच्छ करण्याची गरज नाही. दिवसांतून दोन वेळा केला तरी चालू शकतं.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.