Site icon InMarathi

अपयशावर मात करून यशाचा प्रवास सुरु करा, अंगिकारा “या १०” सवयी!

Ranveer Allahabadia InMarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आपला दृष्टीकोन आपल्याला यशाच्या मार्गावर नेण्यास मदत करतो. कुठलीही यशस्वी व्यक्ती सहजरित्या तिथे पोचलेली नसते. तिथे पोहचण्यासाठी स्वतःमध्ये अनेक बदल घडवून आणावे लागतात.

वैयक्तिक शिस्त, योग्य उत्साह आणि ध्येयाकडे असलेला फोकस या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात.

हे गुण आत्मसात केले, तर तुंम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. स्वत:ला सर्वोत्कृष्ट बनवण्यासाठी मेहनत घ्या. तुमची उपयुक्तता त्यामुळे आपोआप सिद्ध होईल. अर्थातच, तुम्ही पाहिलेली स्वप्न पूर्ण व्हायला मदत होईल.

 

 

पण अनेकदा असं होतं की मेहनत करून सुद्धा तुम्हाला यश मिळत नाही.

याकरिता तुम्हाला योग्य शिक्षण आणि मेहनत घेण गरजेचं आहे. त्याचबरोबर निरोगी राहणं आणि अनेक महत्वाच्या सवयी अंगीकारणे आवश्यक ठरते. असं केलंत तर तुमचं भविष्य नक्कीच उज्ज्वल होईल.

 

१. तुमच्या स्वप्नांची, ध्येयांची यादी करा:

 

greatist.com

 

जीवनातील तुमचे उद्दिष्ट निश्चित करा. त्यासाठी काय करावे लागेल याचा योग्य अंदाज घ्या. आवश्यक त्या गोष्टींची एक मुद्देसूद यादी तयार करा. तुमची स्वप्नं पूर्ण होण्यासाठी यामुळे योग्य दिशा मिळेल. यशाचे टप्पे ठरवा. पुढील ५ ते १० वर्षांत कुठपर्यंत मजल मारता येईल याचा अंदाज घ्या.

उदाहरणार्थ, तुम्हाला तुमचा व्यवसाय स्थिर स्थावर करायचाय तर उत्तमप्रकारे प्लॅन तयार करा. त्या विषयाशी संबंधित ऑनलाइन लेक्चरर्स अटेंड करा.

साध्या शब्दांत सांगायचं तर अगदी सोप्या कामांच्या याद्यांमध्ये दीर्घकालीन दृष्टीकोन असणे आवश्यक आहे. कार्यसूची तयार केल्याने आपण कुठे वेळ घालवत नाही ना याचा अंदाज तुम्हाला येईल.

 

२. आरोग्याला जपा:

 

active.com

 

निरोगी आयुष्य जगणं हे सुद्धा यशस्वी होण्यातील एक महत्वाचं कारण आहे. तुमचा आहार जितका उत्तम आणि आरोग्यदायी असेल तितके तुम्ही ताजेतवाने राहता.

हिरव्या भाज्या खाणे हा उत्तम आरोग्यासाठीचा एक सोपा पर्याय आहे. भाज्या खाल्याने तुम्हाला फायबर मिळतं. शरीराला पोषक घटक मिळतात.

त्यामुळे डॉक्टर सुद्धा ‘तुमच्या जेवणात पालेभाज्यांचं प्रमाण वाढवा’ हा सल्ला वारंवार देतात. भाजी खाण्याची आवड कमी असल्यास, पराठे, पास्ता असे वेगवगेळे पदार्थ खा. ज्यामध्ये भाज्यांचा वापर केलेला असेल.

 

३. शिस्त – स्वत: ला डेडलाईन द्या :

 

Young christian workers

 

डेडलाईन ही यशाच्या मार्गातील एक महत्त्वाची बाब ठरते. ‘मला अमुक-एक कालावधीत हे काम पूर्ण करायचंच आहे’ हा विचार मनात असायला हवा. यामुळे तुम्ही विचलित होणार नाही. काम वेळेत पूर्ण करायचे ठरवले असेल, तर नवनवीन मार्ग आपोआप सुचत जातात.

एखाद्या मित्राला किंवा कुटुंबातील सदस्याला तुमच्या डेडलाईनबद्दल माहित असायला हवं. जेणेकरून ते तुम्हाला त्या डेडलाईनची जाणीव करून देऊ शकतील. काम वेळेत पूर्ण होण्यावर इतरांचा अंकुश असणं फायद्याचं ठरेल.

 

४. कृतज्ञता बाळगा :

एखाद्याचं म्हणणं ऐकू न आल्यास, पुन्हा ते सांगण्याची विनंती करताना किंवा एखाद्या अनोळखी व्यक्तीला धक्का लागला, तरीही आपण “सॉरी” म्हणतो. सॉरी म्हणण्याची ही सवय अनेकवेळा फायदेशीर ठरते.

 

theswaddle.com

 

“सॉरी” हा एक साधा शब्द आहे. पण तरीसुद्धा त्यातून तुमची विचार करण्याची पद्धत दिसू शकते. याचा समोरील व्यक्तीवर सकारात्मक परिणाम होतो.

“माफ करा” असं म्हणणं किंवा “धीर धरल्याबद्दल धन्यवाद!”, “उशीर झाल्याबद्दल क्षमस्व!” असं म्हणणं हे सगळे कृतज्ञता पाळण्याचे मार्ग आहेत.

जेव्हा तुम्ही चुकता किंवा दुसर्‍या व्यक्तीच्या भावना दुखावल्या जातात तेव्हा नाते संबंधात दिलगीरीपूर्वक व्यक्त होणं महत्वाचं आहे. त्याहूनही अधिक उत्तम ठरतं, ते तुमचं कृतज्ञतापूर्ण वागणं…

 

५. नाही म्हणायला शिका :

 

xaviroca.com

 

अनेकदा वेळ नसताना एखादी जबाबदारी पार पाडणे जमणार नसताना सुद्धा आपण समोरच्या व्यक्तीला ‘जमणार नाही’ असं उत्तर देत नाही. इतरांसाठी कायम available आहोत असं आपण भासवतो.

मात्र, नकार देणं हा काही गुन्हा नाही. तुमचं काम जास्त महत्वाचं आहे. त्यामुळे कामाला प्रथम प्राधान्य द्या. 

एखाद्या मित्राकडे असलेली पार्टी किंवा इतरांच्या आनंदात सहभागो होणं योग्यच आहे. मात्र एखादेवेळी कामामुळे ते शक्य नसल्यास स्पष्टपणे नकार द्यायला शिका.

 

६. योग्य ठिकाणी जरूर पैसे खर्च करा :

 

 

उत्तम आयुष्य जगण्यासाठी पैशांची आवश्यकता असते. जेव्हा आपण मित्रांबरोबर कुठेही फिरायला जातो तेव्हा अनेकदा गरजेपेक्षा जास्त खर्च करतो. मात्र तारुण्यात, तुम्हाला बचतीचे महत्त्व कळणे सुद्धा आवश्यक आहे.

क्षणिक आनंदासाठी उगाचंच अति खर्च करू नका. तुम्हाला यशस्वी होण्यासाठी उपयुत ठरतील अशा गोष्टींवर अधिक खर्च करा.

स्वतःच्या आरोग्यासाठी जिम लावणे, नवनवीन ज्ञान आणि माहिती मिळण्यासाठी ऑनलाइन कोर्स करणे व उरलेल्या पैशांची योग्य बचत करणे अशा फायदेशीर गोष्टींसाठी पैसे खर्च करा.

 

७.व्यवस्थित झोप घ्या :

depositphotos.com

 

तुम्हाला अधिक झोप येणं अशक्य वाटत असलं, तरी ही सवय तुम्हाला लागणं गरजेचं आहे. झोपेचा योग्य दिनक्रम ठरवा. रोज किमान आठ तास झोपल्याने तुम्ही दुसर्‍या दिवशी ताजेतवाने असता.

तुमचा मूड दिवसभर चांगला असतो. यावर योग्य पर्याय म्हणजे झोपायच्या आधी फोन बाजूला ठेवा. वेळेवर उठण्यासाठी अलार्म लावत असाल, तर ती शिस्त पाळणं सुद्धा फायदेशीर ठरेल.

 

८. वाचन करा :

 

shutterstock.com

 

जर तुम्हाला एखाद्या विषयात उत्तम ज्ञान मिळवायचं असेल तर वाचनाची सवय लावा. निवडक आणि उत्तम दर्जाची पुस्तक वाचा. जितकं अधिकाधिक वाचन करणं शक्य होईल, तेवढा अधिक फायदा तुम्हाला होईल. वाचनाचे अनेक फायदे आहेत.

एखाद्या गोष्टीबद्दलचं तुमचं ज्ञान वाढेल. तुमची मतं मांडताना याचा फायदा होईल. तुमचा आत्मविश्वास वाढेल. तुम्ही कायम त्या विषयाबद्दल अपडेटेड राहाल.

 

९. व्यायामासाठी वेळ काढा :

 

 

आपले शारीरिक आरोग्य सुधारण्याने तुमची सर्जनशीलता वाढते. उत्तम सहनशक्ती निर्माण करण्यासाठी आणि उत्साही राहण्यासाठी व्यायाम हा देखील एक प्रभावी मार्ग आहे.

व्यायामामुळे एंडॉरफिन हार्मोन्स तयार होतात जे शरीरातील प्रतिकार शक्ती वाढवतात. त्यामुळे व्यायाम करणं कधीही चांगलं आहे.

 

१०. समोरच्याचं म्हणणं ऐकून घ्या:

 

goodchoicesgoodlife.org

 

जर तुम्हाला वैयक्तिक आणि व्यावसायिक संबंध टिकवून ठेवायचे असतील तर प्रभावी संवाद आवश्यक आहे. आणि समोरच्याचं ऐकून घेणं हा उत्तम संवादामधील मुख्य भाग आहे. यामुळे तुम्हाला नवीन दृष्टीकोन मिळण्यास मदत होईल.

त्याचप्रमाणे समोरच्या माणसाला काय म्हणायचं आहे आणि त्याचा नेमका अर्थ काय आहे हे नीट जाणून घ्या. आपण जितकं अधिक ऐकतो तितकं आपण शिकतो.

त्यामुळे तुम्ही उत्तम श्रोता होणं आवश्यक आहे.

तर, अशाप्रकारे जर तुम्हाला आयुष्यात यशप्राप्ती करायची आहे तर वरील दहा गोष्टी लक्षात ठेवा.

ज्याने तुमची आर्थिक, बौद्धिक आणि मानसिक वाढ नक्की होईल. आणि तुम्ही या जगात स्वत:ला सिद्ध करू शकाल.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version