डिप्रेशनवर करा मात, हमखास यशस्वी होणाऱ्या “९ टिप्स” समजून घ्या!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
नैराश्य हा विषय आपल्याला काही नवा नाही. सुशांत सिंग राजपुत आत्महत्या प्रकरणानंतर तर हा विषय पुन्हा एकदा प्रकाशझोतात आला. केवळ मिडीयातच नव्हे तर घराघरांमध्येही आता याविषयावर मोकळेपणाने चर्चा होवू लागलीय.
यापुर्वीपर्यंत केवळ या विषयाची थट्टा केली जायची, पण आता मात्र त्याकडे पाहण्याचा किमान दृष्टिकोन बदलत आहे हे ही नसे थोडके.
आपण अनेकदा एकटे बसून असतो, तेव्हा डोक्यात नुसती चक्र फिरत राहतात. आपलं आयुष्य कुठे जातंय? हा प्रश्न तर अगदीच सामान्य आहे.
आपण स्वत:लाच सतत विचारत असतो की आपली निवड तर चुकतं नाहिये ना? किंवा आपण पुढील आयुष्यात एकटे तर राहणार नाही ना?
आपण कुठल्या ना कुठल्यातरी दिशांच्या शोधात असतो तेव्हा या शंका आपल्या मनात सहज येतात. पण हे माहिती असून सुद्धा आपण या क्षणी हरवलोय ही भावना खूप साहजिक आहे.
यावर उपाय म्हणजे एकतर आपण स्वतःला नेहमीच असं सांगितलं पाहिजे की, आपण योग्य मार्गावर चालत आहोत, योग्य दिशेने आपला प्रवास सुरु आहे. मात्र यासाठी गरज असते ती आत्मविश्वासाची.
यामध्ये सर्वाधिक मोठी चूक म्हणजे समाजाचा अतिरिक्त दबाव. आपले मित्र, नातेवाईक किंवा इतर परिचित आपल्याबाबत काय विचार करतात, त्यांच्या आपल्याकडून अपेक्षा काय? त्या अपेक्षा आपण पुर्ण करण्यात अपयशी ठरतो तर… या आणि यांसारख्या असंख्य प्रश्नांचं वलय आपण स्वतःहूनच आपल्याभोवती निर्माण करतो.
स्वतःबाबत इतरांना प्रश्न विचारण्यापेक्षा ते स्वतःलाच विचारणं केंव्हाही चांगलंच.
यावर मात करणं काही फार कठीण गोष्ट नाहीये. गरज आहे फक्त शांत बसून विचार करण्याची.
आपण आपल्या भविष्याची खूप काळजी करतो, पण त्याच्या बरोबरीने भूतकाळाकडे लक्ष देणं देखील महत्वाचं आहे. आपल्या आयुष्याच्या प्रवासाची सुरुवात कशी आणि कुठून झाली यांपासून ते आत्ता आपण कुठे पोहोचलोय याचा विचार होणं गरजेचं आहे.
म्हणून, आपल्याला हरवल्यासारखं वाटत असलं तरी खचून न जाता नव्या दिशा शोधल्यास जगण्याचा एक नवा दृष्टिकोन सापडतो.
तर अशा नैराश्येच्या कोषात अडकण्यापुर्वी पुढील गोष्टी नक्की वाचा. त्या तुम्हाला बहुतेक पॉझिटिवली विचार करायला लावतील.
१. स्वतःला ओळखा :
सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट, तुम्हाला कायम वाटतं तुम्ही स्वतःला पूर्णपणे ओळखता का? पण त्याच उत्तर नकारार्थी आहे. आपण आपला खरा स्वभाव कायम झाकून ठेवतो.
चांगल जीवन जगण्यासाठी आत्म-जागरूकता महत्त्वपूर्ण आहे, परंतु त्याची पातळी पूर्णपणे विकसित करणं अशक्य आहे. तरीही प्रयत्न करा. शक्य तितक्या स्वतःच्या जवळ जा.
२. स्वतःचं परीक्षण करा :
बऱ्याचदा आपण स्वतःला एका साच्यात बसवण्याचा प्रयत्न करतो. पण कधी विचार केला आहे का, की हा साचा कशासाठी? या पलिकडे जाऊन आपण काही करु शकत नाही का?
यशस्वी व्हायचं असेल तर स्वतःला कोणत्याही साच्यात अडकून ठेवू नका, तुमच्या परिश्रमांना कोणत्याही मर्यादा राहिल्या नाहीत तेव्हाच तुम्ही अमर्यादित यश अनुभवु शकाल.
इतरांमध्ये स्वत: चं व्यक्तिमत्व काय दिसत हे समजण्यासाठी, यशस्वी होण्यासाठी आपण स्वतःला बदलण्यास सांगितलेल्या सर्व गोष्टी तपासा. स्वतःवरील संयम आणि तुम्हाला मदत करणारे लोक यांच्या प्रयत्नांवर विश्वास ठेवा.
३. तुम्हाला उत्साह, एनर्जी कशातून मिळते ते बघूया.
आपल्या नजीकच्या भूतकाळात डोकावून बघा, साधारणपणे १ वर्षाचा आढावा घ्या. आपण एकाच वर्षात बरच काही करतो. त्यातल्या काही गोष्टी आपल्याला फार आवडतात आणि आपण त्या सहजपणे करतो . याच गोष्टीतुन तुम्हाला तुमची आवड निवड कळु शकते, तसंच तुमचं ध्येयही निश्चित होवु शकतं.
म्हणून स्वत:ला हे प्रश्न विचारण्यासाठी ५ मिनिटं द्या आणि उत्तर शोधा.
गेल्या वर्षी, काय केल्यामुळे तुम्हाला उत्साही वाटलं होतं?
याविरुद्ध, गेल्या वर्षात कोणत्या गोष्टींनी /कामांनी मला खूप दडपण, नकारात्मकता आली होती?
गेल्या वर्षी मला सर्वात जास्त अभिमान कधी वाटला आणि मी काय करत होतो? असे प्रश्न स्वतःला विचारा आणि मग पुढे जा.
४. छोटी -छोटी पावले उचला :
दिशाभूल करणार्या मोठ्या मार्गांपेक्षा लहान पाऊल उचलणं अधिक चांगली आहेत. संयमी गती नेहमीच फलदायी ठरते आणि म्हणून स्वत: ला विचारत राहा की, मी आत्ता करू शकेन अशी सर्वात लहान गोष्ट कोणती आहे?
उदाहरणार्थ, आजूबाजूच्या घटनांविषयी जेव्हा आपण ब्लॉग किंवा पोस्ट लिहितो तेव्हा आपल्याला गर्व वाटतो, कोणी कौतुक केलं की अभिमान वाटतो आणि प्रक्रियेमुळे उत्साह निर्माण होतो.
त्यापेक्षा अधिक जाणवण्याकरिता आपण करू शकणारी सर्वात छोटी गोष्ट कोणती आहे?
आता अशा प्रकारचे अनेक ब्लॉग लिहून तुम्ही काही वर्षात हजारो लोकांपर्यंत पोहोचू शकता. त्यामुळे सुरुवातीला छोटी पाऊलं उचला, छोटी स्वप्न बघा जी तुम्हाला पुढे उंचावर नेतील.
५. तुम्ही एकटे नाही :
जेव्हा आपण एखाद्या ठिकाणी हरवतो तेव्हा आपण असा विचार करतो की आपण एकटे आहोत. माझं कुटुंब नाहीये, उत्तम मित्र नाहीयेत.
असा विचार करणं म्हणजे नैराश्येची पहिली पायरी समजा.
पण या विचारांवर मात करून तुम्ही त्यातून बाहेर आलात तर तुम्हाला कळेल की तुमच्याकडे बरेच लोक आहेत जी आपली वाट बघतायेत. तुम्हाला उत्साह आणि प्रेरणा देणारे कायम तुमच्या सोबत आहेत.
६. स्वतः शी प्रामाणिक रहा :
जोपर्यंत तुम्ही स्वतः मी खचलोय अशी कबुली देत नाही तोपर्यंत तुम्ही कधीच जीवनातले प्रॉब्लेम्स सोडवू शकणार नाही. प्रत्येक गोष्ट ठीक असल्याचे भासवू नका.
आतापर्यंत घडलेल्या प्रत्येक चूकीच्या गोष्टींची संपूर्ण जबाबदारी स्वीकारा. आपण चुकीचे निर्णय घेतल्याचे कबूल करा.
स्वतःशी खोटं बोलण्याने आपल्याला मानसिक समाधान मिळेल. जे अतिशय चूक आहे. त्यापेक्षा पहिले स्वतः शी प्रामाणिकपणे वागा.
७. पुस्तकं वाचा :
आता पुस्तक वाचण्याने आपले आणि स्वतःचे आयुष्य बदलत नाही, पण ते आपल्या जीवनातील बदलाचे मार्ग तयार करते.
एक उत्तम पुस्तक आपल संपूर्ण जीवन बदलू शकतं. पुस्तकं प्रेरणा देऊ शकतात, मन विस्तृत करू शकतात आणि जे शक्य आहे त्यासाठी आपले डोळे उघडू शकतात.
उत्तम पुस्तकांमध्ये बर्याचदा लेखकाकडून वर्षानुवर्षाचं ज्ञान दिलेलं असत.
एखाद्याने आधीपासून तुमच्या मार्गावर पुस्तक लिहिलेलं असेल. तर त्यांच्या कथा वाचा, त्यांच्या चुकांमधून शिका आणि त्यांचे ज्ञान आत्मसात करा. ही पुस्तकं वाचल्याने तुमचा आत्मविश्वास वाढेल.
८. स्वतःची आवड-निवड ओळखा :
आपली आवड आणि आपलं कौशल्यं हे आपल्यापेक्षा इतर कुणालाही कळु शकणार नाही. त्यामुळे तुम्ही वेळीच ती आवड ओळखणं गरजेचं आहे.
आपल्याला लाखो रुपये मिळवण्याची गरज नाही आणि खूप फेमस होण्याची सुद्धा अजिबातआवश्यकता नाही. मग काय हवं आहे?आपल्याला आवश्यकता आहे एक कौशल्य प्राप्त करण्याची ! ते कौशल्य विकसित करून स्वत: वर प्रभुत्व मिळविण्याची.
तुमची क्षमता ही गुरुकिल्ली आहे. तुमच्या आवडत्या क्षेत्रात, जीव झोकून देऊन अविरत परिश्रम करण्याची मानसिकता ठेवा, मग तुम्हाला फळ नक्कीच मिळायला हवं.
९. तक्रारी बंद करा :
आपल्या सगळ्यांना तक्रार करायला आवडते.
तक्रारीमुळे तुम्हाला नकारात्मक वाटतं. तक्रार करण्याची सवय पूर्णपणे थांबविणे अवघड आहे, पण स्वतः ला प्रयत्नपूर्वक रड्या माणूस होण्यापासून थांबवू शकता आणि पॉझिटीव्ह राहू शकता.
जर तुम्हाला आयुष्यात रडत न बसता खूप काही वेगळं आणि मोठं करायचं असेल तर वरील ९ मुद्दे लक्षात ठेवा. केवळ लक्षात ठेवू नका, उठा, योग्य दिशेने पाहिले पाऊल टाका, मेडिटेशन करायला शिका!
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.