आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
आपण सगळेजण लहानपणापासून एक वाक्य कायम ऐकत मोठे झालो आहोत, “पाऊस आला आणि लाईट गेले”.
पाऊस पडल्यामुळे वाऱ्याने झाडं उन्मळून पडतात आणि त्यामुळे विद्युत पुरवठा किंवा इंटरनेट स्लो होतं हे आपण मान्य केलं आहे. या गोष्टीकडे आपण इतर वेळी दुर्लक्ष सुद्धा करतो.
सध्या वेबसिरीज, OTT प्लॅटफॉर्मची लोकप्रियता इतक्या शिखरावर आहे, कोरोनामुळे बाहेर जाणं कमी झालं आहे, पाऊस पडत आहे अशा वेळी जर इंटरनेट सुद्धा बंद पडलं किंवा स्लो झालं तर माणसाने करावं तरी काय? हा फार मोठा प्रश्न पडतो.
अन्न, वस्त्र आणि निवारा या प्राथमिक गरजांमध्ये काही दिवसांनी इंटरनेट चा जर समावेश झाला, तर आश्चर्य वाटायला नाही पाहिजे.
मध्यंतरी इतक्या गोष्टी बंद होत्या पण कोणाचंच काही अडलं नाही. कारण, इंटरनेट सुरू होतं. तेच जर का उलट झालं असतं तर चित्र फार भयानक असलं असतं.
तुमचं Wifi जर का अपेक्षित स्पीड ने काम करत नसेल, तर लगेच सर्विस इंजिनिअरला बोलावण्याची घाई करू नका. खराब वातावरणामुळे इंटरनेट स्लो का होतं? त्याची आधी कारणं समजावून घ्या:
पावसाच्या पाण्याने पब्लिक पोल वरील इंटरनेट स्लो होतं. कारण, पावसाच्या पाण्याचे थेंब हे रेडिओ सिग्नल्सला अंधुक करू शकतात.
जसं की, पाऊस पडत असताना आपल्या डोळ्यांना सुद्धा समोरचं चित्र स्पष्ट दिसत नाही, तेच पब्लिक पोल वरील wifi चं होत असतं. पण, जर का तुमच्या घरातील wifi जर का ‘गंडलं’ असेल तर त्याला प्रामुख्याने ही करणं आहेत :
१. तुमच्या फोन किंवा लॅपटॉप यांचं तुमच्या राऊटर पासून असलेलं अंतर :
जेव्हा हवामान खराब असेल आणि त्याच वेळी जर का तुमची कोणती महत्वाची ऑनलाईन मीटिंग ठरलेली असेल, तर अशा वेळी तुमच्या wifi router च्या शेजारीच बसा. तुम्हाला सिग्नल स्ट्रेंथ चांगली मिळेल.
२. तुमच्या wifi वरून किती सदस्य इंटरनेट वापरत आहेत ते चेक करून घ्या. कधी कधी तुमच्या घरातील किंवा शेजारच्या एखाद्या सदस्याच्या जास्त इंटरनेट वापरामुळे सुद्धा तुम्हाला सिग्नल स्ट्रेंथ कमी मिळू शकते.
मुख्य प्रश्न हा आहे की असं का होतं ?
कित्येक वर्षांपासून आपल्याकडे कॉपर म्हणजेच तांब्याच्या तारीचा वापर हा टेलिफोन लाईन्स आणि ब्रॉडबँड च्या कनेक्शनला घरापर्यंत आणण्यासाठी होत आलेला आहे.
रिसर्चने हे सांगितलं आहे की, कॉपरच्या वायर ह्या लँडलाईन फोन साठी सर्वात उपयुक्त होत्या. लांब अंतरावर जाणाऱ्या इंटरनेट वहनासाठी कॉपर वायर हे माध्यम बरोबर नाहीये.
त्यांची रचना ही मुळात voice communication साठी झाली होती असं म्हंटल्यास वावगं ठरणार नाही. कॉपर वायर या विद्युत पुरवठ्याचा वापर करून तुमच्यापर्यंत इंटरनेट पोहोचवतात.
त्याच्या तुलनेत सध्याच्या इतर सर्व वायर्स या रेडिओ frequncy चा वापर करून तुमच्यापर्यंत इंटरनेट पोहोचवतात.
कॉपर वायरचा जर का वापर इंटरनेटसाठी होणार असेल तर निदान ते अंतर कमी असावं. अंतर वाढलं की, सिग्नल्स weak होतात आणि तुमचं इंटरनेट स्लो होतं.
कॉपर हे विद्युत वहनासाठी उपयुक्त आहे. पण, त्यांची स्थिती ठराविक वेळाने बघणं अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा, जमिनीखाली किंवा टेलिफोन पोल्स वर असलेल्या वायर्सची मूळ स्थिती बऱ्याच वेळेस खराब झालेली असते.
जमिनीखाली असलेल्या कॉपर वायर्सला कोरडं ठेवण्यासाठी कॉपर वायर ला एक शिल्ड दिलं जातं. पण, जेव्हा जमिनीखाली असलेल्या पाण्याचं प्रमाण वाढतं तेव्हा पाणी आणि वीज हे एकत्र येतात.
जमिनीखाली फोन केबल्स या जोडल्या जातात. तिथे टेक्निशियन्स हे त्या वायरचं रिपेअर वर्क करत असतात. जेव्हा पावसाचं प्रमाण अधिक होतं तेव्हा ते पाणी या जॉईंट मध्ये शिरतं आणि केबलच्या विद्युत वहनाला मर्यादा येतात.
जेव्हा या वायर पाण्याखाली जातात, तेव्हा इलेक्ट्रिकल सिग्नल्स चा पुरवठा कमी गतीने होतो.
या कारणामुळे पाऊस सुरू असताना तुमच्या इंटरनेट ची स्पीड खूप कमी होते आणि त्या वेळात कोणतंही ऑनलाईन काम करणं हे फार अवघड होऊन बसतं.
पावसाचं प्रमाण जर कमी झालं नाही तर तुमचं इंटरनेट काही काळासाठी या कॉपर वायर्स मुळे बंद सुद्धा पडू शकतं. त्याचप्रमाणे, जर का केबल्स या पोल्स वर जॉईन केल्या असतील तर त्यांच्यात पाणी जायला जास्त वेळ लागू शकतो.
सर्वोत्तम उपाय काय आहे?
काही टेलीकॉम कंपनी ह्या समस्येवर काहीच उपाय नाहीये असं म्हणतात. पण, ते खरं नाहीये. तुम्ही तुमच्या घरात कॉपर NBN च्या माध्यमातून येणारं इंटरनेटला कायमस्वरूपी वायरलेस इंटरनेटने बदलू शकता.
मोबाईल फोनला असणाऱ्या नेटवर्क चा वापर तुमच्या लॅपटॉप साठी वापरू शकता, जेणेकरून तुमच्या महत्वाच्या कामात व्यत्यय येणार नाही. यासाठी तुम्हाला गरज असेल ती फक्त स्ट्रॉंग फोन सिग्नल्सची.
पाऊस किंवा तत्सम वातावरण असताना खालील गोष्टींची विशेष काळजी घ्यावी :
१. तुमच्या मॉडेम किंवा राऊटरला एकदा रिस्टार्ट करा किंवा त्यांना थोड्या वेळासाठी बंद ठेवा आणि मग त्यांना परत चालू करा.
२. अंतर्गत वायरची कामं टेक्निशियनला करू द्या.
३. तुमच्यातील आणि तुमच्या राऊटर मधील अंतर शक्य तितकं कमी करा.
४. तुमच्या परिसरात जर का तुम्हाला विद्युत तारा जमिनीवर पडलेल्या किंवा इंटरनेटच्या डिश वर पडलेल्या दिसत असतील, तर त्वरित तुमच्या इंटरनेट आणि इलेक्ट्रिसिटी कंपनी ला संपर्क साधून या परिस्थितीची माहिती द्या.
५. एकाच माध्यमावर अवलंबून राहू नका. कधी कधी प्रॉब्लेम हा तुमच्या हँडसेट किंवा कम्प्युटरचा सुद्धा असू शकतो.
जर का मोबाईल वर इंटरनेट ला स्पीड मिळत नसेल तर लॅपटॉप वर चेक करा. प्रत्येक वेळी नेटवर्क चा फक्त प्रॉब्लेम असेल असं नसतं. त्याची खात्री करून घ्यावी.
इंटरनेट सप्लाय बद्दलच्या या तांत्रिक बाबी माहीत असल्यावर तुम्हाला नेमक्या समस्येचं निदान कमी होईल या हेतूने हा लेख लिहिला आहे.
कोणत्याही अडथळ्या शिवाय आणि चीडचीड न होता इंटरनेटचा फायदा मिळत रहावा हीच इच्छा!!
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.