आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
Asteroid 2020 ND हे यावर्षीचं अजून एक संकट समोर येऊन ठेपलं आहे. २०२० हे वर्ष म्हणजे सर्वांच्या परीक्षेचं वर्ष असं घोषित केल्यास कोणाची हरकत नसावी.
NationAl Aeronautics and Space Administration (NASA) या संस्थेने दोन लघुग्रह पृथ्वी च्या दिशेने प्रवास करत असल्याची माहिती सांगितली आहे.
या दोन लघुग्रहांना नासा ने 2016 DY30 आणि 2020 ME3 ही नावं दिली आहेत. सध्या हे दोन्ही लघुग्रह पृथ्वीच्या दिशेने अनुक्रमे ५४००० किलोमीटर प्रति तास आणि १६००० किलोमीटर प्रति तास इतक्या गतीने प्रवास करत आहेत.
२४ जुलै २०२० रोजी हे दोन्ही लघुग्रह पृथ्वीला पार करून पुढे निघून जातील अशी माहिती नासा ने जाहीर केलेल्या पत्रकात म्हंटलं आहे. पृथ्वी भोवती लघुग्रहांना नासा ने दोन प्रकारात विभागलं आहे.
एक तर Non Hazardous Asteroid म्हणजेच धोका नसलेले लघुग्रह आणि दुसरा प्रकार म्हणजे Potentially Hazardous Asteroids (PHA) म्हणजेच धोकादायक लघुग्रह.
प्रामुख्याने या लघुग्रहांचं पृथ्वीपासूनचं अंतर आणि त्यांच्या प्रवाहाची गती यावरून त्यांच्याकडून असलेल्या धोक्याची पातळी ठरवली जाते. सर्व लघुग्रह जे पृथ्वीपासून अगदी कमी अंतरावर आहेत ज्याला की Minium Orbit Intersection Distance (MOID) असं म्हणतात ते जास्त धोकादायक म्हणून जाहीर केले जातात.
जेव्हा हे अंतर 0.05 au किंवा त्यापेक्षा कमी असतं तेव्हा त्या लघुग्रहांना PHAs म्हणजेच Potentially Hazardous Asteroids असं नाव दिलं जातं.
Asteroid 2020 ND हे 170 मीटर लांब आहेत आणि एकमेकांपासून 0.034 astronomical units म्हणजेच 50,86,328 किलोमीटर इतक्या अंतरावर ते प्रथ्वीपासून आहेत.
ज्या लघुग्रहांची गती ही ४८००० किलोमीटर प्रति तास पेक्षा जास्त असते त्यांना धोकादायक म्हणून संबोधलं जातं. 2016 DY30 हा लघुग्रह पृथ्वीच्या दिशेने ५४००० किलोमीटर प्रति तास इतक्या वेगाने मार्गक्रमण करत आहे.
2020 ME3 ची मार्गक्रमणाची गती ही १६००० किलोमीटर प्रति तास इतकी आहे. या दोन लघुग्रहांपैकी 2016 DY30 हा लहान आकाराचा असून त्याचा आकार १५ फूट इतका आहे.
सध्याच्या परिस्थिती नुसार, नासाच्या Near Earth Object Studies (CNEOS) ह्यांनी हे सांगितलं आहे की, 2016 DY30 हा लघुग्रह हा 0.02306 au म्हणजेच ३४ लाख किलोमीटर इतक्या अंतरावर आहे.
१९ जुलै २०२० या दिवशी सकाळी १०.०२ वाजता याचं प्रथ्वीपासूनचं सर्वात कमी अंतर नोंदवलं गेलं.
या लघुग्रहाला अपोलो लघुग्रह असंही संबोधलं गेलं कारण त्याच्या सुर्याभोवतीच्या प्रदक्षिणेच्या आधी त्याने पृथ्वी वरून प्रवास केला.
2020 ME3 हा पृथ्वीपासून जास्त अंतरावर असेल जेव्हा तो पृथ्वीच्या त्याच्या सर्वात कमी अंतरावर असेल. २१ जुलै २०२० रोजी पहाटे २.५१ ला हे अंतर सर्वात कमी म्हणजे पृथ्वीपासून 56 लाख किलोमीटर इतकं ते नोंदवलं गेलं.
या लघुग्रहाला Amor asteroid असं सुद्धा नाव देण्यात आलं होतं. त्याच्या प्रवासात तो पृथ्वीवरून प्रवास करत नाही. तो फक्त काही ठिकाणी पृथ्वीच्या जवळ येत आहे.
दोन्ही लघुग्रहांकडून पृथ्वीला कोणती भीती नाहीये; पण सतर्क असणं कधीही चांगलं. या साठी ही माहिती नासा ने जाहीर केली आहे.
या Near-Objects ला इतर ग्रहांकडून त्यांच्या गुरुत्वाकर्षणामुळे दूर लोटले जाते ज्यामुळे त्यांचं आपल्या सूर्यमालेपासूनचं अंतर हे कमी होत असतं.
हे Near-Objects हे मुख्यत्वे बर्फाचं पाणी आणि धूलिकण यांनी तयार झालेले असतात आणि सूर्यमालेत प्रवेश करताना ते पृथ्वीच्या सर्वात कमी अंतरावर आलेले असतात.
प्लॅनटोरी सोसायटी च्या अनुसार, जवळपास १ अब्ज लघुग्रह हे अस्तित्वात आहेत जे की १ मीटर पेक्षा जास्त मोठ्या आकाराचे आहेत. या लघुग्रहांपैकी ज्यांचा आकार ३० मीटर पेक्षा लांब असतो त्यांच्या आदळल्याने पृथ्वीला किंवा इतर कोणत्याही ग्रहाला काही त्रास होऊ शकतो.
दरवर्षी जवळपास ३० असे लघुग्रह पृथ्वीवर आदळत असतात. पण, त्यांच्या आदळल्याने पृथ्वीला कोणताही त्रास होत नाही.
या Near-Objects पैकी ९० टक्के गोष्टी या १४० मीटर इतक्या लांब म्हणजे एखाद्या फुटबॉल स्टेडियम पेक्षा त्या मोठ्या असतात.
या Near-Objects कडून पृथ्वीला निदान पुढच्या १०० वर्ष कोणताही धोका नाहीये असं नासा ने जाहीर केलं आहे.
आता प्रतीक्षा आहे ती २४ जुलै २०२० ची जेव्हा या लघुग्रहांचं अंतर 50 लाख किलोमीटर इतकं कमी झालेलं असेल. हे इतके मोठे आकडे, आकार आणि अंतर वाचून त्यांचा नेमका अभ्यास करणाऱ्या शास्त्रज्ञ लोकांबद्दल नितांत आदर वाटतो.
कारण, या इतक्या बारीकसारीक घडामोडींकडे सतत लक्ष ठेवून असणं हे खरंच सोपं काम नाहीये. माणूस हा इतक्या सगळ्या घटकांपैकी किती छोटा आहे हे या खगोलशास्त्राचा अभ्यास करताना कधी तरी नक्की जाणवते.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.