आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
आश्चर्य वाटतंय का हे वरच वाक्य वाचून? पण जर अस खरच झालं तर? अहो झाल तर काय नाही अशा प्रकारे लोक आता काम करणार आहेत!
साधारण या कोविड १९ च्या सुरू झालेल्या लॉकडाउनमुळे सगळेच जण घरी बसून कंटाळले आहेत. यामध्ये सलग बारा तास वर्क फ्रॉम होम करणारी माणसं आहेत.
मग अशा काळात तुमच्या मनाला आणि शरीराला जरा मनमोकळा श्वास घेता यावा म्हणून एक भन्नाट कल्पना हिलवर स्वतःचे रिसोर्ट असणाऱ्या प्रवीण नागपाल यांना सुचली. ती काय आहे ते बघुया.
उत्तराखंड इथे असलेल्या मुक्तेश्वर येथील बनलेखी रिसोर्टचे मालक प्रवीण नागपाल म्हणून आहेत. ते तिथे सहा कॉटेज असलेले त्यांचे रिसोर्ट मागचे अनेक वर्ष उत्साहाने चालवतात.
दोघांसाठीच फायदेशीर असणाऱ्या अशा या कोटजेस आहेत. जिथे लोक घरापासून दूर आरामशीर वातावरणात येऊन काम करतात आणि ते त्यांच्यासाठी एक उत्पन्नाच साधन बनलयं.
घरातील वर्कस्टेशन्स या ऊंच टेकड्यांकडे जातांना आपण विसरतो आणि काही काळ का असेना पण तुम्ही आनंदी होता.
उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशने त्यांच्या इथल्या सीमा उघडल्यामुळे अनेक व्यावसायिक त्यांच्या कुटुंबियांसह लॅपटॉप व कोव्हीडच्या टेस्ट केल्याचं निगेटिव्ह प्रमाणपत्र घेऊन शहरातील नीगेटिविटी आणि उष्णतेपासून स्वतःचा बचाव करतायेत.
ज्यांना काम करायच आहे त्यांच्यासाठी प्रवीण नागपालने हिमाचल प्रदेशच्या सोलन येथे आपला दोन खोल्यांचा बंगलाही उघडला आहे.
ते म्हणाले की ते आणि त्यांचे उद्योगातील भागीदार आता मासिक भाड्यावर गेस्टची सुविधा म्हणून स्वत:च्या मालमत्ता चालवण्याचा विचार करतायेत.
ज्यामध्ये लोकांना अभ्यासाच टेबल, चांगल वायफाय आणि स्वयंपाकघर अशा सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. तसच, केवळ या सगळ्या सुविधा अशांना देण्यात येणार आहेत ज्या व्यक्ती तिथे किमान ७ दिवस राहतील.
प्रवीण यांच्या मुख्यत: हॉटेलमध्ये आराम आणि काम दोन्ही करण्यासाठी दिल्ली, गुरुग्राम, चंदीगड आणि नोएडा इथून चौकशी केली जात आहे.
आणि गुरुग्राममधील एका कॉर्पोरेट ऑफिसने विचारल की, आमच्या १५ कर्मचार्यांना त्यांच्या कुटुंबीयांसह एका महिन्यासाठी सवलतीच्या दरात तुमच्या हॉटेलमध्ये सोय करता येईल का?
त्यावर प्रवीण नागपाल यांनी आम्ही अशा विनंत्या पूर्ण करण्यासाठी खुप उत्सुक आहोत असा पॉजिटिव रिप्लाय त्यांनी दिला.
या महिन्याच्या सुरूवातीला अनलॉक २.० सेट झाल्यावर उत्तराखंड सरकारने आणि हिमाचल सरकारने आपल्या पर्यटकांसाठी सीमा उघडल्या. तिथे जाणाऱ्या पर्यटकांना आवश्यक असलेल्या मान्यताप्राप्त प्रयोगशाळेचे कोविड १९ चे नकारात्मक अहवाल पाहिले जातात.
जो प्रवेशाच्या वेळी शेवटच्या ७२ तासात केला जातो. त्यामुळे डोंगरांकडे कुटुंबा बरोबर जात असताना आपल्या व्यावसायिक जबाबदाऱ्या न सोडता मस्त आनंद लुटणारी लोक आहेत.
यामुळे राज्य प्रवेशाच्या ठिकाणी लांबलचक रांगा सुद्धा बघायला मिळते.
काही हॉटेलवाल्यांना कमी पैसे देऊन क्वारंटाईन पर्यटनासाठी कॅटरिंग देण्याची कल्पना यांनी काढली.
तिथे धरणीवीर सिंह चौहान हे एक सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत ते झोस्टेल, मनाली, डलहौसी, मॅकलॉडगंज, ऋषिकेश आणि मुक्तेश्वर अशा ठिकाणी आठ मालमत्ता चालवतात!
ते म्हणतात की या क्षणी जरी होटल्स बंद आहेत तरी भविष्यातील बुकिंगसाठी दररोज अनेकजण चौकशी करतात. सवलतीच्या दरात त्यानी १५ – २१ – ३० अशा दिवसांची पॅकेजेसची योजना आखून दिलीये.
बर्याच जणांना त्यांच्या कुटूंबियांसोबत राहण्याची, संपूर्ण लॉकडाउन मस्त थंड वातावरणात घालवायची आणि तरीही काम करण्याची संधी यांनी दिली आहे.
म्हणून अनेक लोक तिथे जाण्यासाठी जे काही करायच आहे ते करीत आहेत. नवी दिल्ली इथे एक डेटा विश्लेषक आहेत गौतम मिश्रा ते म्हणतात,
“मी पुढच्या आठवड्यात माझ्या कुटुंबासोबत उत्तराखंडला जात आहे. सध्या त्यांच्या नियमानुसार मी आरटी-पीसीआर प्रमाणपत्र घेऊन प्रवास केला पाहिजे, जे त्यांना त्यांच्या कॉरंटाइन ठेवण्याच्या किमान मुदतीच्या नियमांमधून मुक्त करत.
ते अजुन पुढे म्हणतात, कोविड -१९ याचा नकारात्मक रिपोर्ट हातात आला की काय करायच याच प्लानिंग आम्ही सगळे करतोय.”
हे कुटुंब एक महिना डोंगरात जाऊन राहण्याची योजना आखत आहे. मिश्रा आणि त्यांची पत्नी वर्क फ्रॉम होम सुरू ठेवतील, तर त्यांची मुल बिनसरमधील रिसॉर्टमधून त्यांचे ऑनलाइन वर्ग घेतील.
उत्तराखंडमधील हॉटेलवाल्यांच्या संघटना आहे त्यांच्या अनधिकृत अंदाजानुसार, गेल्या काही आठवड्यात विविध राज्यातून ८००० हून अधिक पाहुणे उत्तराखंडमध्ये गेले आहेत.
तर, हिमाचल प्रदेश हॉटेल असोसिएशनच्या अंदाजानुसार राज्यात बाहेर राहणाऱ्यांची संख्या जवळपास ६,००० एवढी तरी आहे.
लॉकडाऊनमध्ये शहरात तापमान वाढू लागल तेव्हापासून लोकांना हीलस्टेशनच आकर्षण वाटू लागलं. पण गेल्या महिन्यापर्यंत ते इतक सोप नव्हतं.
दिल्लीस्थित रोली बुक्सचे संस्थापक प्रकाशक प्रमोद कपूर हे गेल्या महिन्यात मसुरीत त्यांच्या सुट्टीच्या घरी पत्नी किरणसमवेत राहात आहेत. ते म्हणतात,
“आमच्याकडे तिथे एक घर आहे आणि येथे बराच वेळ घालविण्यासाठी परवानगी पास मिळावा यासाठी आम्ही बराच काळ प्रयत्न केले. आता जुलै संपेपर्यंत ते तिथेच आहेत. पण तरी हिल स्टेशनचा अनुभव तिथे घेता येत नाही.
बघायला गेल तर कळेल पालमपूर, कसौली इथली अनेक छोटी हॉटेलं आणि होमस्टे पर्यटकांना राहण्यासाठी देत आहेत. कसौली येथे सहा बेडरूमचे हॉटेल चालवणारे अनिल ठाकूर म्हणतात,
“आम्ही औपचारिकरित्या अजुन हॉटेल उघडले नसले तरी कोणीतरी किमान १० दिवस खोली हवी अशी विनंती करतात, तर आम्ही स्वच्छता आणि मूलभूत स्वयंपाकघरातील आवश्यक वस्तूंची व्यवस्था त्यांच्यासाठी करतोय.”
ते येणाऱ्या आठवड्यांत अजून गर्दीची अपेक्षा करीत आहेत. खासकरुन ज्यांना शहरात राहून आणि तिथल्या वातावरणापासून दूर रहायचं असेल तर अशी हिल स्टेशन आता कोविड -१९ च्या काळात उपलब्ध आहेत.
तर बघा विचार करा तुम्हालाही जायला आवडतय का अशा सुंदर आणि हवेशीर वातावरणात. कारण आता घरात बसून वैतागून काम करण्यापेक्षा तिथे आनंदात आणि स्वच्छ हवेत राहाल हे मात्र नक्की.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.