आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
माणसाचा मेंदू हा आजही कोणत्याच शास्त्रज्ञांना नीट समजलेला नाही, माणसाचा मेंदू हा एक सर्वात मोठं आणि न उलगडणारं कोडं आहे असाही बऱ्याच लोकांचा समज आहे!
माणूस हा त्याच्या मेंदूचा फक्त १०% च वापर करतो असंही काही शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे, जर त्याने त्याच्या मेंदूचा १००% वापर केला तर अशक्य गोष्टी सुद्धा तो शक्य करून दाखवू शकतो,अर्थात ह्या सगळ्या थेयरीज आहेत, ह्याचा पुरावा किंवा उदाहरण आजतागायत कुणीच दिलेलं नाही!
नुकताच अभिषेक बच्चन, नित्या मेनन आणि अमित साद यांची ‘ब्रेथ-अंडर द शॅडोज’ ही वेब सिरीज अमेझॉन प्राईम वर रिलीज झाली.
अभिषेक बच्चनला मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डरचा मानसिक आजार असल्याच यात दाखवलं आहे. दोन वेगवेगळ्या व्यक्ती एकाच मेंदूमध्ये या आशयावर ती सिरीज आहे.
तर काही वर्षांपूर्वी आलेला चियान विक्रमचा ‘अपरिचित’ कोणाला माहीत नाही? अंबि, रेमो आणि अपरिचित एकाच व्यक्ती मध्ये.
पडद्यावर या स्टोऱ्या आपण बऱ्यापैकी एन्जॉय करतो.पण तुम्हाला माहीत आहे का की,अमेरिकेत एकाच व्यक्तीमध्ये असे २४ वेगवेगळे व्यक्ती होते.
मानसशास्त्र विज्ञान मधील सर्वाधिक चॅलेंजिंग आणि प्रसिद्ध अशी ही केस आहे.
अमेरिकेच्या ओहिओ स्थित बिली मिलीगन या व्यक्तीमध्ये रेकोर्डब्रेक २४ व्यक्तींचा छबी होत्या.
१९५५ मध्ये जन्मलेल्या बिलीचे वडील लहानपणीचं वारले. बिली आणि त्याच्या इतर दोन भावंडाना घेऊन त्यांची आई मियामी येथे आल्या.
इथे बिली आणि त्याच्या कुटुंबाला दुर्लक्षित आणि अपमानास्पद वागणूक मिळू लागली. ज्याचा थेट परिणाम बिलीच्या मानसिकतेवर झाला.
ऑक्टोबर १९७७ मध्ये बिली ४ बलात्काराच्या आरोपाखाली जेलमध्ये गेला. चारही पीडित स्त्रियांनी दिलेलं स्टेटमेंट हे वेगवेगळ्या प्रकारचे होते.
एकीने सांगितले की बिली त्यावेळेस एक लेस्बियन स्त्री सारखा वागत होता. दुसऱ्या स्त्रीचं म्हणणं होतं की तो लहान मुलगा होता. तर तिसरी स्त्री म्हणत होती की तो जर्मन बोलणारा माणूस आहे.
एकूणच पोलिसांना काय चालले आहे ते कळेना. वरिष्ठांनी रिपोर्ट पाहिल्यावर त्यांना हे चार वेगळे आरोपी आहेत असे वाटले. परंतु क्राईम सिन वरून सापडलेले फिंगर प्रिंट चारही ठिकाणी समान असल्याने बिलीला अटक केल्याचे सांगितले गेले.
अन याच बिली स्पष्टीकरण देऊ शकला नाही. केस मधली विविधता पाहून ओहिओ पोलिसांनी बिलीच्या इन्वेस्टीगेशन साठी एका मानसशास्त्र तज्ज्ञाची मदत घ्यायचे ठरवले.
आणि डॉ.विलीस ड्रीस्कॉल यांची नेमणूक झाली.सुरवातीला डॉक्टरांनी स्किझोफ्रेनिया अर्थात मानवाच्या विचार आणि वागणुकीवर फरक करणारा आजार म्हणून त्यांनी डायग्नोस केलं.
त्यांच्या रेफरन्स ने ओहिओच्या मेंटल हेल्थ सेंटर मध्ये भर्ती झाल्यावर मात्र डॉ.टर्नर यांनी बिलीला मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर असल्याचे आपल्या रिपोर्ट मध्ये सांगितले.
बिलीच्या या आजरामुळे तो बलात्काराच्या केस मधून निर्दोष सुटला अन ट्रीटमेंट साठी त्याला डॉक्टरांच्या स्वाधीन करण्यात आले.
ओहिओच्या त्याच हॉस्पिटलमध्ये त्यावर ट्रीटमेंट चालू झाली.अन हळूहळू त्याच्या आत दडलेली एक एक पर्सनॅलिटी बाहेर येऊ लागली.
अंततः १९८८ मध्ये डॉक्टरांनी त्याला आजारातुन बरं झाल्याचे रिपोर्ट देऊन त्याची सुटका केली.
त्यानंतर कॅलिफोर्निया मध्ये एक लहान बिझनेसमन म्हणून बिली राहू लागला. २०१४ ला कॅन्सरमुळे त्याचा मृत्यु झाला.
जवळजवळ एक दशक चाललेल्या या ट्रीटमेंट बद्दल ओहिओ मेंटल हेल्थ सेंटरचे डॉक्टर सांगतात, बिलीचं व्यक्तिमत्त्व हे अतिशय भीतीदायक होते.
ते चांगले आणि वाईट दोन्ही होते आणि प्रत्येक व्यक्तीच्या मागे निर्माण व्हायला एक कारण होत. नंतर रिलेशन मध्ये आल्यावर मिलीगन आपल्या पार्टनर सोबत त्याच्या इतर व्यक्तीरेखा दूर ठेवण्यात यशस्वी झाला.
पण राग, भीती, ताण आला की ती ती व्यक्तिरेखा बाहेर येण्यास प्रवृत्त होत असे.
झाले असे होते की बिली मिलीगन ही मूळ व्यक्ती इतर व्यक्तिरेखांमुळे दबली गेली. आणि ओहिओच्या डॉक्टरांच्या अथक प्रयत्नानंतर बिली पूर्ववत आपल्या मूळ स्वभावात आला!
ओहिओच्या डॉक्टरांनी नमूद केलेल्या बिलीच्या इतर व्यक्तिरेखा
१. बिली मिलीगन – स्वतः. मूळ व्यक्तिरेखा.
२. आर्थर – एक उच्चशिक्षित सोफीस्टीकेटेड इंग्लिशमन.
३. रेगन – रेग अगेन अर्थात सतत राग येणे.ज्या चोरीच्या घटना झाल्या त्या याने निकालात काढलेले.
४. अँलेन – फसवणूक करणारा मॅनिप्युलेटर, सिगारेट फुकणारी एकमेव व्यक्ती.
५. टॉमी – स्वभावाने अँलेन सारखाच. त्यामुळे या दोहोंमध्ये बिली गोंधळून जायचा, लँडस्केप पेंटिंग मध्ये मास्टर.
६. डॅनी – पुरुषांची भीती वाटणारा.
७. डेव्हिड – आठ वर्षाचा बालक.
८. ख्रिस्टेन – तीन वर्षाची मुलगी.
९. ख्रिस्तोफर – ख्रिस्टेनचा भाऊ.
१०. अदलना – एक स्त्री समलैंगिक.बलात्कार करण्यास कारणीभूत.
११. फिल – पेशावर चोर, जेवढ्या चोरी बिलीने केल्या त्या सगळ्याच प्लॅनिंग याने केलेल्या.
१२. केविन – फिल सारखाच गुन्हेगार, गुन्हे करण्याच्या प्लॅनिंग मध्ये मास्टर.
१३. वॉल्टर – ऑस्ट्रेलियन नागरिक.
१४. एप्रिल – बिलीच्या सावत्र वडिलांना मारणारी.
१५. सॅम्युएल – देवावर विश्वास असलेली ज्यू व्यक्ती.
१६. मार्क – एक मृत व्यक्ती.
१७. स्टीव्ह – एक भोंदू व्यक्त, कॉमेडी करणारी व्यक्ती.
१८. ली – एक प्रॅन्कस्टार, प्रॅक्टिकल जोक मारणारी व्यक्ती.
१९. जेसन – एक प्रेशर व्हॉल्व्ह. कुठला ताण निर्माण झाला की ही व्यक्ती पुढे येत असे.
२०. बॉबी – ऍडव्हेचंर प्रिय व्यक्ती.
२१. शॉन – बहीरी व्यक्ती.
२२. मार्टिन – न्यूयॉर्कस्थित एक घमंडी व्यक्ती.
२३. तिमोथी – एका गे व्यक्तीची हत्या करणारा.
२४. द टीचर – बिलीला यातून उभारायला मदत करणारी व्यक्ती.सगळ्या २४ पर्सनॅलिटी याला माहीत होत्या.बिलीच्य मेंदूची बसलेली गाठ उलगाडण्यात यानेच मदत केली होती.
अमेरिकेत मानसशास्त्र विभागात या केसचा आजही अभ्यास केला जातो. मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डरच्या केसेस कशा सॉल्व्ह करायच्या कोणत्या प्रकारच्या थेरपी वापरायच्या यासाठी ही केस खूप फायदेशीर ठरली आहे.
माणसाच्या विविध मानसिकतेतून एकाच मेंदूमध्ये अशा अनेक व्यक्ती निर्माण होत राहतात. ते सुद्धा मूळ व्यक्तीच्या नकळत. मेंदूच्या ह्या न उलगडलेल्या रहस्यमुळे बिली मेलीगनची ही केस महत्वाची आणि फायदेशीर ठरते.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.