Site icon InMarathi

“बॉयकॉट चायना” च्या पार्श्वभूमीवर गुगल-रिलायन्सच्या युतीचं “हे” महत्व प्रत्येक भारतीयाने समजून घ्यायला हवं!

jio google inmarathi

republicworld.com

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

जगातली सर्वात मोठी बाजारपेठ कोणती? तर उत्तर मिळेल,अफकोर्स भारत. १३० करोड लोकसंख्या असलेला देश.सर्व प्रकारच्या उत्पादनाच्या विक्रीसाठी बेस्ट असलेलं ठिकाण.

आणि या मार्केट मध्ये दबदबा राहिला आहे तो चायनीज कंपन्यांचा. लहान मुलांच्या खेळण्यापासून ते स्वस्त मोबाईल फोन पर्यंत.

आणि आता एमजी हेक्टर ही स्वस्तातील एसयुव्ही भारतीय मार्केट मध्ये उतरवून भारताच्या ऑटोमोबाईल इंडस्ट्री मध्ये खुद्द भारत,जपान आणि जर्मनीला टक्कर द्यायला चीन उतरला आहे.

(एमजी मोटर्सची मालकी चीनच्या साईक मोटर्स (Saic Motors) कडे आहे.)

 

indiatoday.in

 

तर गलवन घाटीच्या चकमकीनंतर ट्रेंड मध्ये बॉयकॉट चायना आणि चायनीज प्रॉडक्ट्स मूव्हमेंट आली आणि या ना त्या प्रकारे चीनचा विरोध करण्याचा भारतीयांनी निर्णय घेतला.

त्यात भारतीय कंपन्या पण सामील झाले. हिरोने चीनी कंपनी सोबत असलेली तब्बल ९०० करोड ची डील कॅन्सल केली.

रिलायन्स जिओ ने ५जी साठी लागणाऱ्या इक्विपमेंट साठी आपला मोर्चा युरोप अमेरिकेकडे वळवला.

याच रिलायन्स जिओ मध्ये तब्बल ४३५७३ करोडची गुंतवणूक करून फेसबुकने रिलायन्स जिओचे ९.९% शेअर्स विकत घेतले.

फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट (एफडीआय) मार्गे भारतात कोणा परदेशी कंपनीने केलेली ही सगळ्यात मोठी गुंतवणूक आपण म्हणू शकतो.

या बातमीवर धूळ बसत नाही तेवढ्यात गुगलचे सीईओ सुंदर पिचाई आणि रिलायन्स इंडस्ट्रीचे मुकेश अंबानी यांनी रिलायन्सच्या पहिल्या एजीएम मध्ये गुगल जिओ मध्ये करत असलेल्या गुंतवणूकीबद्दल बातमी जाहीर केली.

गुगल जिओ मध्ये ३३७३७ करोडची गुंतवणूक करून ७.७३% शेअर्स आपल्या नावावर केले आहेत. फेसबुक, गुगल सोबत जिओ मध्ये इंटेल चे ०.३९% तर क्वालकॉमचे ०.१५% शेअर आहेत.

 

britannica.com

 

जगातील सगळ्यात मोठं सर्च इंजिन, जगातल्या जवळपास अर्ध्या स्मार्टफोन मध्ये ज्याचे प्रोसेसर आहेत आणि जगातील सगळ्यात जास्त ज्याचे युजर्स आहेत अशा कंपन्या एकत्र आल्या म्हणजे काय अर्थ निघतो?

एक एन्ट्री लेव्हल स्मार्टफोन! तो देखील स्वस्त.

गुगलने याआधी मोटोरोला, सॅमसंग आणि एलजी सोबत कोलॅब करून आपली स्वतःची नेक्सस सिरीज डेव्हलप केली होती.

कालांतराने आपली स्वतःची पिक्सेल सिरीज काढून गुगल ने नेक्सस ला फुलस्टॉप लावला.

रिलायन्सच्या १५०० वाल्या जिओ फोनने मार्केट मध्ये धुमाकूळ घातल्यानंतर गुगल सोबत जिओ काय उलाढाल करते याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे.

जिओ, फेसबुक, इंटेल, क्वालकॉम यांची जिओ मधली गुंतवणूक पाहता पाश्चिमात्य कंपन्यांनी भारताला फेव्हरेट लीड करून चीनला धोबीपछाड देण्याचा मानस आखलेला दिसतो.

 

gadgetbridge.com

 

त्यात फेसबुक आणि गुगल दोहोंवर चीनमध्ये बंदी आहे.

एकूणच ट्रेडमध्ये चीन सोबत सुरू असलेल्या छुपे युद्धासोबत टेक्नॉलॉजी एरियामाध्ये अमेरिकन कंपनी आणि चिनी कंपनी मध्ये छुपे युद्ध सुरू झाल्याचे दिसून येत आहे. आणि या युद्धाची भूमी आहे ती भारत!

जगात सगळ्यात स्वस्त डेटा हा भारतात दिला जातो.आणि भारतात टेलिकॉम मध्ये सध्या लीड ला आहे ती रिलायन्सची जिओ. आणि सर्वाधिक वापरलं जाणार अप्लिकेशन आहे ते फेसबुक आणि सर्च इंजिन आहे ते गुगल.

नवीन ३० ते ४० करोड वापरकर्ते लक्षात घेऊन जिओने ही पार्टनरशिप केल्याचे दिसून येते.

चीनची हुआवे ही लीड टेलिकॉम कंपनी जगात अनेक कारणांमुळे वादग्रस्त ठरत आहे. डेटा चोरीचे आरोप, करार तोडून इक्विपमेंटचा वापर वगैरे.

त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर हुआवे ला टक्कर देण्यासाठी एका नवीन टेलिकॉम कंपनी म्हणून जिओला प्रोजेक्ट करण्याचा चांगला प्रयत्न इथे दिसून येतो.

नुकताच अमेरिकेच्या ५जी च्या लिस्ट मधून हुआवे सोबत अनेक चायनीज टेलिकॉम कंपन्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. आणि त्याच लिस्ट मध्ये जिओला कायम ठेवण्यात आलेलं आहे.

 

cnn.com

 

भारतामध्ये स्मार्टफोन मार्केट हे बरंच मोठं आहे. आणि या बिझनेस मध्ये रेडमी, रियलमी, ओप्पो, विवो या चायनीज कंपन्यांनी मिडरेंज फोनचं मार्केट कव्हर केलेलं आहे.

गुगल आणि जिओ यांच्या पार्टनरशिपचं मुळात उद्देशचं एन्ट्रीलेव्हल स्मार्टफोनचं आहे.

एकूणच मोबाईल इंडस्ट्री मध्ये चिनी कंपन्यांना दणके देण्याचे काम ही डील करत आहे म्हणण्यास हरकत नाही.

प्रत्येक क्षेत्रात चीनची असलेली मक्तेदारी तोडण्यास हळूहळू सुरवात ही झाल्याची दिसून येत आहे.

टेलिकॉम मध्ये जिओ एक एक नवीन मैलाचा दगड पार करत आहे आणि फेसबुक, गुगल सारखे आंतरराष्ट्रीय स्तरावरचे खणखणीत नाणे वाजवणारे कंपन्या जिओला येऊन मिळत आहेत. आणि चिनी कंपन्यांना टक्कर देईल असा प्लेटफॉम तयार करण्याच्या तयारीत आहे.

कन्स्ट्रक्शनमध्ये चायनीज कंपन्यांना गेलेले टेंडर होल्ड वर गेले तर काही टेंडर लार्सन अँड टूब्रोने मिळवण्यात यश आले.

देशातील सगळ्यात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्री जे पावलं उचलत आहे ते इतर कंपन्यांना सुद्धा प्रेरणादायी आहे.

जिओच्या स्वस्त डेटा देण्याच्या संकल्पनेमुळे या मोठ्या कंपन्या जिओ मध्ये गुंतवणूक करण्यात आकर्षित झाले म्हणायला हरकत नाही.

इतर भारतीय कंपन्यांनी सुद्धा अशाच पॉलिसीचा स्वीकार करून आपल्या देशात जास्त गुंतवणूक आणून एक विशाल इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण करण्याचा प्रयत्न केला, तर चीनवर असलेली आपली डिपेंडंसी भरपूर प्रमाणात कमी होऊ शकेल.

 

businessinsider.in

 

म्हणून रिलायन्स जिओ मध्ये गुगल ने केलेली गुंतवणूक ही बॉयकॉट चायना मिशनची पहिली पायरी आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version