' “अपना टाइम आयेगा” म्हणत ३० परीक्षांमध्ये नापास झालेल्या आयपीएस अधिकाऱ्याचा सल्ला ठरेल फायदेशीर!  – InMarathi

“अपना टाइम आयेगा” म्हणत ३० परीक्षांमध्ये नापास झालेल्या आयपीएस अधिकाऱ्याचा सल्ला ठरेल फायदेशीर! 

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

‘अपयश ही यशाची पहिली पायरी असते.’ हे वाक्य आपण खूप वर्षांपासून वाचत आहोत. अपयशाने खचून न जाता पुन्हा नव्याने उभारी घेऊन परीक्षेला सामोरं जाणं इतकंच आपल्या हातात असतं.

काही लोक अपयश आलं की त्या परिस्थितीकडे भावनिक नजरेने बघतात आणि प्रसंगी मार्गावरून भटकतात.

बल्ब चा शोध लावताना थॉमस एडिसन यांचे कित्येक प्रयोग आधी चुकले होते आणि मग ते बल्ब चा शोध लावू शकले होते. हे आपण जाणतो; पण तरीही काही वेळेस विसरतो.

खेळाच्या नजरेतून या गोष्टीकडे बघितलं तर असं उत्तर मिळतं की, तुम्ही खेळताना खाली पडलात तर प्रॉब्लेम नाहीये. पण, तुम्ही जर का दुसऱ्याच क्षणी उठून खेळासाठी तयार झाला नाहीत तर तो सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे.

या गोष्टीचा प्रत्यय दक्षिण आफ्रिका क्रिकेट टीमचा खेळाडू जॉन्टी रोड्स ची फिल्डिंग करण्याची पद्धत आठवली तर आपल्याला लगेच लक्षात येईल.

 

johnty rhodes inmarathi
indiatvnews.com

 

ज्या चपळाईने तो डाईव्ह मारून, बॉल उचलून रन आऊट सुद्धा करायचा ते बघणाऱ्या व्यक्तीला फार सहज वाटायचं.

बारावी च्या निकालानंतर काही जण नाराज होतात आणि भलतंच पाऊल उचलतात. त्यांनी संयमाने त्यांच्या परफॉर्मन्स आणि result कडे बघावे आणि करिअर ची पुढची दिशा ठरवावी.

एक वर्ग असाही आहे की जे कायम स्पर्धा परिक्षेची तयारी करत असतात आणि त्यांचं सरकारी पदावर रुजू होण्याचं ध्येय फार आधीच निश्चित झालेलं असतं.

त्या लोकांना त्यांचे कितीही अटेम्पट्स झाले तरी त्याचं टेन्शन येत नसतं. ते पुढच्या वेळी पुन्हा त्याच जोशाने परीक्षेला सामोरं जातात आणि निकालाचा तो एक दिवस त्यांना त्यांच्या मेहनतीचं फळ देत असतो.

उत्तर दिल्ली भागातील मुखर्जी नगर हा एक असा एरिया आहे ज्याला स्पर्धा परिक्षांचं माहेरघर या नावाने प्रसिद्ध आहे.

त्या एरिया मध्ये चाणक्य अकॅडमी सारखे सगळेच नामवंत शिक्षण स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेणाऱ्या संस्था आहेत ज्या कि, हजारो विद्यार्थ्यांना सर्वात अवघड UPSC ची परीक्षा क्लिअर करण्यासाठी तयार करत असतात.

 

upsc students inmarathi
supdelhi.com

 

२०१६-१७ च्या आकड्यांनुसार ११ लाख विद्यार्थ्यांनी UPSC ची परीक्षा दिली होती. त्या पैकी १५,४४५ विद्यार्थ्यांनी फक्त prelims क्लीअर केली होती.

२९६१ विद्यार्थ्यांना फक्त इंटरव्यूह साठी बोलावलं होतं. त्या पैकी १०९९ विद्यार्थ्यांनी इंटरव्यूह क्लीअर केला होता आणि त्यापैकी फक्त १८० विद्यार्थ्यांना IAS (Indian Administrative Services) मध्ये नोकरी मिळाली होती.

IPS आदित्य यांचा अनुभव वाचला तर लक्षात येईल की या पोस्ट वर जाण्यासाठी किती शारीरिक आणि मानसिक शक्तीची गरज आहे.

आदित्य यांनी ३० स्पर्धा परीक्षांमध्ये स्वतःचं नशीब आजमावलं होतं.

ज्यामध्ये AIEEE – All India Engineering Entrance Examination, Kendriya Vidyalaya Sangathan (KVS) आणि पाच वर्ष बँकेच्या परीक्षा यापैकी त्यांनी UPSC ची Civil Services Examination फक्त क्लिअर केली ती सुद्धा चौथ्या अटेम्पट मध्ये.

त्यांच्या वाटेला आलेल्या अपयशाने खचून न जाता ते परीक्षा देत राहिले आणि शेवटी भारतातून ६३० व्या क्रमांकावर पंजाब केडर मधून उत्तीर्ण झाले.

आज ते Assistant Supretendent of Police म्हणून संगुर या ठिकाणी कार्यरत आहेत.

 

ias aditya inmarathi
thebetterindia.com

 

राजस्थानच्या हनुमानगड जिल्ह्यातील अजितपुरा इथे आदित्य यांचा जन्म झाला. त्यांनी इतिहास, भूगोल आणि पॉलिटिकल सायन्स या विषयातून BA पूर्ण केलं.

सिव्हिल सर्विस मध्ये जाण्याचं बाळकडू त्यांना घरातूनच मिळालं. त्यांचे वडील सुद्धा सिव्हिल सर्विस मध्येच कार्यरत आहेत. UPSC तुम्ही वर्षातून एकदाच देऊ शकतात.

यामुळे आदित्य हे एकच वेळी बऱ्याच स्पर्धा परीक्षेची तयारी करत होते आणि स्वतःचं ज्ञान वाढवत होते. आई वडील दोघेही शिक्षक असल्याने त्यांना घरून पूर्ण पाठिंबा होता.

इतक्या अपयशा नंतरही आदित्य यांनी फोकस कायम ठेवला आणि सतत स्वतःला सांगत राहिले की, “अपना टाईम आयेगा…”

हिंदी मिडीयम मधून झालेलं शिक्षण हे सुद्धा आदित्य यांच्या प्रगतीमध्ये अडथळा नव्हतं. पहिल्या वेळी आदित्य preliminary exam क्लिअर करू शकले नाहीत.

दुसऱ्या वेळेस पर्सनल इंटरव्यू क्लिअर करू शकले नाहीत. ह्या अडचणींवर आदित्य कशी मात करू शकले यासाठी त्यांनी काही गोष्टी सांगितल्या आहेत :

१. कोणतीही गोष्ट गृहीत धरू नका. खात्री करून घ्या.

२. तयारी करताना मॅनेजमेंट पासून जनरल नॉलेज प्रत्येक बाबींवर प्रभुत्व मिळवा.

 

ips aditya inmarathi
theprint.in

 

. रोज भरपूर लिखाण करा. रोज थोडा वेळ निबंध लिहिण्यासाठी द्या. त्यामुळे तुमची लिखाणाची स्पीड वाढते आणि उत्तर लिहिताना तुम्ही एका विशिष्ठ पॅटर्न मध्ये लिहितात.

४. रोज छोटे छोटे ध्येय ठेवा आणि ते साध्य करा. रोज कमीत कमी सात तास अभ्यास हा पुरेसा वेळ म्हणता येईल. प्रत्येक तासानंतर एक ब्रेक घ्या आणि स्वतःला दिवसभर फ्रेश ठेवा.

५. माहितीचे ठराविक मध्यम फक्त वापरा. एकच कंटेंट वेबसाईट, कोचिंग क्लास आणि पुस्तकांमध्ये वाचण्यापेक्षा फक्त पुस्तक वाचण्यावर भर द्या. पन्नास पुस्तकं वाचण्यापेक्षा एक पुस्तक पन्नास वेळेस वाचा.

६. वेळेचं नियोजन व्यवस्थित करा. एका वेळी एकच काम करा.

७. तुमच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव पडेल असं स्वतःला तयार करा. तुम्ही जे बोलणार आहात त्याची पूर्ण माहिती तुम्हाला आहे की नाही हे खात्री करूनच बोला.

स्वतःवर विश्वास असेल आणि मन शांत असेल तर तुम्ही काहीही साध्य करू शकतात हे आपण IPS आदित्य यांच्या उदाहरणातून नक्कीच म्हणू शकतो.

आपल्यापैकी कोणीही जर अश्या स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर हा लेख आणि वर दिलेल्या टिप्स नक्की आमलात आणा आणि त्या इतरांना सुद्धा नक्की शेयर करा. आमच्या कडून तुम्हाला शुभेच्छा.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?