Site icon InMarathi

शहाळ्याच्या पाण्याचे हे “सर्वात मोठे” फायदे आपल्याला माहीतच नसतात!

sara ali khan coconut water inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

आपल्याकडे कोणीही आजारी असेल, हॉस्पिटल मध्ये असेल तर आपण पेशंटला आग्रहाने शहाळ्याचे पाणी प्यायला घेऊन जातो. काही लोकांना त्यात असलेली मलई प्रचंड आवडते म्हणून ते त्याकरता पाणी पितात.

पण आपण पित असलेल्या साध्या पाण्याच्या एवढच ताकदीच हे शहाळ्याच पाणी आहे. हे पाणी आपल्याला लगेच रीफ्रेश करत. हे ट्रेंडी पेय इलेक्ट्रोलाइट्स आणि इतर आवश्यक पोषक घटकांनी युक्त असत.

जगभरातील अनेक उष्णकटिबंध प्रदेश आहेत जिथे शाहळ्याच्या पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणात पिण्यासाठी केला जातो. पारंपारिक आयुर्वेदिक औषधांमध्ये या शहाळ्याच्या पाण्याचे घटक असतात.

ज्यामुळे अन्न पचन, लघवी नीट होते. हे पूर्वीपासून डिहायड्रेशनच्या उपचारांसाठी देखील वापरल जातं. हा अगदी शंभर टक्के उपाय नसला तरी याचे आरोग्य विषयक बरेच फायदे आहेत.

 

babycenter.com

 

शहाळ्याचे पाणी एक चमत्कारिक पेय म्हणून मानल जात आणि जरी तुम्ही डायटच्या दृष्टीने विचार केला तरी यामध्ये कॅलरीज कमी आहेत.

आणि त्यात पोटॅशियम सारखी नैसर्गिक खनिजे आहेत जे त्याला सुपर ड्रिंक बनवतात. हे पाणी योग्य वेळी प्यायल्यास आरोग्यासाठी त्याचा निश्चितच दुप्पट फायदा होऊ शकतो.

पण तरी इतर पेयांप्रमाणे शहाळ्याचे पाणी पिण्याची अशी काही उत्तम वेळ ठरलेली नाही. आपण दिवसा आणि रात्री देखील हे पाणी सहज पिऊ शकता.

हे पाणी दररोज का प्याव आणि त्याचे काही आरोग्यदायी फायदे पुढीलप्रमाणे :

 

१. वजन कमी करणे :

 

entertales.com

 

वजन कमी करण्यासाठी शहाळ्याचे पाणी योग्य असू शकत का? असा प्रश्न वजन वाढलेली लोक सहज डायटीशीयन यांना विचारतात. आणि याचं उत्तर हो अस आहे.

हे पाणी कमी उष्ण असतं आणि पोटाला पचायला सुद्धा हलक असतं. यात बायोअॅक्टिव घटक देखील असतात जे आपल्याला पचन क्रियेत मदत करतात आणि मेटाबॉलीजम वाढवतात.

दिवसातून कमीतकमी तीन ते चार वेळा थोड्या थोड्या प्रमाणात शहाळ्याच पाणी प्यायल्याने अतिरिक्त किलो मध्ये वाढलेलं वजन कमी करण्यास मदत होते.

 

२. खेळाडुंकरता ताकदवान पेय :

 

stack.com

 

हीलिंग फूड्स नावाच एक प्रसिद्ध पुस्तक आहे. ज्यात तुमच्या शरीराला कोणता योग्य आहार आवश्यक आहे आणि त्यातले घटक कोणते याची माहिती दिलेली आहे.

या पुस्तकानुसार, खेळांदरम्यान आणि इतर शारीरिक व्यायामानंतर आपली शुगर लेवल कमी होते आणि आपल्याला दमायला होत.

अशा वेळेस शरीरातल कमी झालेलं इलेक्ट्रोलाइट पुन्हा वाढवण्यासाठी शहाळ्याचे पाणी तुम्हाला मदत करत. बॉडी लगेच हायड्रट होते.

ताजतवान राहण्यासाठी किंवा कोणताही खेळ खेळण्यापूर्वी आणि त्या नंतर तुम्ही शहाळ्याच पाणी सहज पिऊ शकता.

त्यामध्ये असलेल्या पोटॅशियमचा इफेक्ट हा इतर कोणत्याही स्पोर्ट्स ड्रिंकपेक्षा तुमच्या शरीरावर चांगला होतो हे दिसून येईल.

 

३. कोलेस्ट्रॉल कंट्रोल :

 

healthlivingsolution.com

 

अनेक हेल्थ कॉनशियस असणारे डॉक्टर त्यांच्या अभ्यासावरून आपल्याला सांगतात की शहाळ्याचे पाणी प्यायल्याने रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते.

या पाण्यामुळे तुमच्या शरीरातील एचडीएलची पातळी राखली जाते. उच्च रक्तदाब कमी होऊ शकतो. हे शरीरातील अँटिऑक्सिडंटची स्थिती आणि इन्सुलिन सुधारण्यात मदत करत.

 

४. हॅंगोवर पटकन घालवत :

 

gettyimages.com

 

जर आपण रात्रभर मद्यपान करत असाल तर तुमच्याबरोबर शहाळ्याचे पाणी आवश्यक ठेवा कारण ते अगदी पटकन हँगोवर वर उपाय करतं. हे शरीरातील इलेक्ट्रोलाइट्स पुन्हा भरून काढतं.

त्याचबरोबर उलट्या आणि डोकेदुखीपासून मुक्त होण्यासाठी ते हायड्रेशनला चालना देत.

शहाळ्याच्या पाण्यातील अँटीऑक्सिडेंट्स जास्त मद्यपान केल्यामुळे तयार झालेला ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करतात. आणि तुम्हाला परत फ्रेश बनवतात.

 

५. हायड्रेट करत :

 

shape.com

 

त्याचे हायड्रेटिंग गुणधर्म शरीरास आवश्यक तेवढी एनर्जि देण्यासाठी उपयुक्त आहेत. शहाळ्याचे पाणी हे तुम्हाला रिफ्रेश करणार ड्रिंक आहे. आणि याची चव सुद्धा थोडीशी गोड आणि तुरट असते जी तुम्हाला आवडू शकते.

त्यामुळे स्वतःला हायड्रेटड ठेवायचय तर हे पाणी दिवसातून २ वेळा ग्लास भरून नक्की प्या.

 

६. अन्नपचनाला मदत होते :

 

youtube.com

 

या शहाळ्याच्या पाण्यात बायोअॅक्टिव घटक मोठ्या प्रमाणात असतात. इतकच नाही तर तुमच्या शरीराला फायबर कंटेंट मिळतो ज्यामुळे अन्न पचनास मदत होते.

आणि आम्ल घटकांच शरीरात असलेलं प्रमाण कमी होत. ज्या क्षणी आपल्याला अॅसिडिटी किंवा अपचनाचा सामना करावा लागतो तेव्हा लगेच एक ग्लास नारळाच्या पाण्यात उतरा.

 

७. रक्तदाबावर नियंत्रण ठेवत :

 

express.co.uk

 

व्हिटॅमिन सी, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम यांची उपलब्धता तुम्हाला या एकाच पेयात मिळेल.

शहाळ्याचे पाणी रक्तदाब पातळी कमी करण्यास मदत करत. दररोज एक ग्लास हे पाणी पिण्यामुळे तुम्हाला ब्लड प्रेशरमध्ये हवा असलेला अपेक्षित बदल दिसतो.

२००५ सालातील झालेल्या एका अभ्यासात असं दिसून आलाय की उच्च रक्तदाब असेल तर त्या करता हे पाणी जास्त फायद्याच आहे.

 

८. किडनी स्टोन :

 

worldinfi.com

 

एका अभ्यासानुसार, शहाळ्याचे पाणी किडनी स्टोनच्या उपचारा दरम्यान केले तर ते जमा होण्याच प्रमाण कमी होत. यामुळे मूत्रात स्फटिकांची संख्याही कमी होते.

याव्यतिरिक्त, हे पाणी प्यायल्यामुळे मूत्रपिंडात ऑक्सिडेटिव्ह तणाव असेल तर तो प्रमाणात येऊन मूत्रपिंडाचे कार्य सुधारित होत.

 

९. पिंप्लसवर उपाय :

 

herzindagi.com

 

आजकाल पिंप्लस येणं हा अगदी त्वचेचा कॉमन आजार झाला आहे. मग त्यावर ते घालवण्यासाठी आपण अनेक क्रीम लावतो किंवा फेस पॅक लावतो. यापेक्षा तुम्ही उपाय म्हणून शहाळ्याचे पाणी पिऊ शकता.

या पाण्यात बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा गुणधर्म असतो, त्यात असलेल्या लॉरीक अॅसिडमुळे मुरुमांवर उपचार करण्यास मदत होते.

 

१०. सोरायसिसवर उपाय :

 

pulse.lk

 

शहाळ्याचे पाणी आणि सोरायसिसमध्ये थेट संबंध नाही. पण शहाळ्याच्या पाण्यामुळे डिहायड्रेशन प्रतिबंधित होऊ शकत. ज्यामुळे आपली त्वचा सोरायसिस सारख्या समस्येला नीगेटीवली प्रतिसाद देते.

शहाळ्याचे पाणी हे हेल्दी पेय आहे. त्याचे काही फायदे सिद्ध झाले आहेत तर काही नाहीत. पण हे आपल्याला ते पिण थांबवण्याची गरज नाही.

जेव्हा त्याचे चांगले परिणाम तुम्हाला दिसतील तेव्हा तुम्ही नक्कीच खुश व्हाल.

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

 

Exit mobile version