आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
कोरोनामुळे एक गोष्ट चांगली झाली ती म्हणजे लोक स्वतःची काळजी घ्यायला शिकले. स्वच्छता शिकले, प्रदूषण कमी कसं करता येते हेही शिकले. बाहेरचे जंक फूड खाणे कमी झाले!
ह्या सगळ्यामुळे लोक स्वतःच्या आरोग्याच्या बाबतीत अधिक जागरूक आणि सतर्क झाले, हे ही नसे थोडके!
ही गोष्ट आयुर्वेदात सुद्धा नमूद केलेली आहे. आपल्या देशात आयुर्वेदाला म्हणावं तसं स्थान अजून प्राप्त झालेलं नाही! नुकत्याच कोरोना व मात करू शकणाऱ्या आयुर्वेदिक औषधाचा शोध लावल्यावर सलग लोकांनी त्यावर प्रश्न उभे केले.
पण आयुर्वेदिक उपचार कधीही गुणकारीच ठरतात कारण त्याचे काही साईड इफेक्टस नाहीत. केवळ पथ्य पाणी योग्य नियमित ठेवणे हेच महत्वाचे असल्याने त्याचा फायदा हा नक्कीच दिसून येतो!
२०२० हे वर्ष इतकं घडामोडींचं वर्ष आहे की या वर्षी प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या टेन्शन मध्ये आहे. काहींना तब्येत व्यवस्थित ठेवण्याचं टेन्शन, तर काहींना नोकरी टिकवण्याचं टेन्शन.
त्यात अजून भर पडते ती म्हणजे न्यूज चॅनल बघितल्यावर. कोरोना रग्णांचे सतत वाढणारे आकडे, त्याच्या जाळ्यात अडकणारे आपले आवडते, जवळचे लोक.
इतकं सर्व सुरू असताना सर्वात जास्त फरक पडतो तो म्हणजे झोप येण्यावर.
साधी गोष्ट आहे. मेंदू शांत असेल तर माणूस झोपेल. जी शांतता मागच्या वर्षी आपल्या आजूबाजूला होती ती यावर्षी हरवली आहे. त्यामुळे सध्या शांत झोप न लागणे हा अगदीच कॉमन प्रॉब्लेम झाला आहे.
यावर उपाय शोधण्यासाठी सध्या लोक विविध प्रयत्न करत आहेत. काही जण ध्यान धारणा करत आहेत तर काही जण हे घरातल्या घरात शक्य तितका व्यायाम करत आहेत.
भारतीय आयुर्वेदाने निर्माण केलेलं ‘अश्वगंधा’ हे औषध या सर्व त्रासांवर एक जालीम उपाय आहे. त्याबद्दल आम्ही या लेखात सांगत आहोत:
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
—
===
हे ही वाचा – दारू, सिगारेट नव्हे तर `ही’ ७ व्यसनं तुमचा घात करू शकतात
===
‘अश्वगंधा’ ही औषधी नावाप्रमाणेच मनुष्याला घोड्याप्रमाणे एनर्जी आणि स्टॅमिना वाढवण्यासाठी सर्वात उपयुक्त औषध आहे.
किती तरी शतकांपासून भारतीय आयर्वेद हे ‘अश्वगंधा’च्या माध्यमातून लोकांना त्यांचा स्ट्रेस, अस्वस्थता, थकवा या शरीराच्या अंतर्गत त्रासापासून मुक्त करण्यास सर्वश्रेष्ठ औषध मानलं जात आहे.
रात्री झोपायच्या आधी दुधासोबत ‘अश्वगंधा’ घेतल्यास स्ट्रेस लेवल कमी होते हे काही रिसर्च ने सिद्ध करून दाखवलं आहे. ‘अश्वगंधा’ मुळे नर्व्हस सिस्टीमचं कार्य व्यवस्थित सुरू राहण्यास मदत होते.
शरीरातील पांढऱ्या पेशींच्या वाढीसाठी सुद्धा ‘अश्वगंधा’ खूप गुणकारी आहे. काही रिसर्च मधून हे सुद्धा सिद्ध झालं आहे की, योग्य प्रमाणात ‘अश्वगंधा’ चं सेवन केल्यास समरणशक्ती सुद्धा सुधरते.
‘अश्वगंधा’ चे सेवन किती प्रमाणात आणि कसे करायचे हे जाणून घेऊयात.
झोपायच्या आधी दुध गरम करून घ्यावं, त्यात अर्धा चमचा ‘अश्वगंधा’ पावडर टाकावी. तितकीच दालचिनी, थोडं आलं आणि थोडं जायफळ हे एकत्र करून पाच मिनिटांसाठी एकत्र गरम करावे.
त्यामध्ये एक चमचा खोबरेल तेल आणि चवीपुरतं मध टाकावे. तयार झालेल्या दुधाला ‘मुन मिल्क’ असं म्हणतात. याचे सेवन रोज रात्री करावे.
त्याने इतर कोणते फायदे होतात ते सुद्धा जाणून घेऊयात.
२ – कॅन्सरवर सुद्धा गुणकारी :
काही रिसर्च ने हे दाखवून दिलं आहे की, ‘अश्वगंधा’ मध्ये काही घटक असे आहेत जे की काही प्रकारच्या कॅन्सरशी मुकाबला करण्यात रुग्णांची मदत करू शकते.
या कॅन्सर पैकी ब्रेस्ट, ब्रेन, लंग्ज, थायरॉईड या आजारात ‘अश्वगंधा’ ही किमोथेरपी आणि रेडिएशन इतकीच महत्वाची मानली जाते.
३ – न्यूरो (मज्जातंतू) संबंधित आजार :
रिसर्चने हे सिद्ध केलं आहे की, नर्व्हस सेल्स च्या डॅमेज ला ‘अश्वगंधा’ रोखू शकते.
अल्झायमरच्या रुग्णांना डॉक्टरच्या सल्ल्यानुसार ‘अश्वगंधा’चं सेवन करायला दिल्यास फरक पडू शकतो असं प्राण्यांवर केलेल्या काही चाचण्यांनी दाखवून दिलं आहे.
४ – संधिवात :
प्राण्यांवर करण्यात आलेल्या काही रिसर्चने हे सुद्धा सिद्ध केलं आहे की, ‘अश्वगंधा’च्या सेवनाने जॉईंटची दुखणी कमी होतात.
===
हे ही वाचा – नियमितपणे कान साफ करताय? मग थोडं सांभाळून!? यामागचे धोके माहित आहेत का?
===
त्यामुळे संधिवात असल्यास ‘अश्वगंधा’चं सेवन करावे हे प्रमाणित करण्यात आलं आहे.
५ – व्यायाम आणि दमखम:
रिसर्चने हे सुद्धा दाखवलं आहे की, जर ८ आठवडे रोज ‘अश्वगंधा’ पावडर ही दुधासोबत घेतली तर तुम्हाला व्यायाम करताना अजून जास्त एनर्जी मिळते.
आणि तुमची श्वसन क्रिया सुद्धा सुधारते आणि तुम्ही आधीपेक्षा जास्त ऑक्सिजन शरीराला देता.
६ – पुरुष वंध्यत्व :
एका स्टडीने दाखवून दिलं आहे की, जर एखाद्या व्यक्तीने ९० दिवसांसाठी जर ५ ग्राम ‘अश्वगंधा’ पावडर घेतली तर पुरुषात शुक्राणूंची संख्या आणि त्याची ताकद ही वाढू शकते.
७ – गरोदर स्त्रीया
‘अश्वगंधा’चं सेवन हे गरोदर स्त्रियांनी आणि ज्यांना काही इतर औषध सुरू सुरू असेल तर डॉक्टर च्या सल्ल्याशिवाय घेऊ नये.
अशा या गुणकारी ‘अश्वगंधा’चे रोज रात्री, दुधासोबत सेवन करायला सुरुवात करा, आपल्या शरीराची रोग प्रतिकार शक्ती वाढायला मदत होईल.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
—
===
हे ही वाचा – रोजच्या जीवनातील या पदार्थानी खरोखरच किडनी स्टोन होतो का? जाणून घ्या
===
महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.